
झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये या आठवड्यात अनेक महत्त्वाची वळणं पाहायला मिळणार आहेत. प्रेम, कौटुंबिक नाती, संघर्ष आणि थरार यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार आहे.
📺 सावळ्याची जणू सावली
सावलीच्या प्रयत्नांमुळे गुरुकुलला नवी जागा मिळणार आहे. मात्र, पहिल्याच दिवशी वाडेकर स्वतःला गुरुकुलचे नवे मालक घोषित करून सर्वांना धक्का देणार आहेत.
📺 लक्ष्मी निवास
आनंदीच्या परदेशात उच्च शिक्षण घेण्याच्या निर्णयाला सिद्धू आणि भावना विरोध करणार आहेत. त्यामुळे नाराज झालेली आनंदी घर सोडून लक्ष्मीकडे जाणार असून कुटुंबात नवा संघर्ष निर्माण होणार आहे.
📺 धाकट्या सुनेबाई
गावातील पाणीटंचाईचा संघर्ष सुरू असतानाच राधिका आणि वेदांतमधील जवळीक वाढणार आहे. पाडव्याला राधिका पहिल्यांदाच सर्वांसमोर बासरी वाजवणार आहे. दुसरीकडे, गोदाक्का तिच्या लग्नाची जुळवाजुळव सुरू करणार आहे.
📺 कृष्णाईच्या लेकी
अशक्त कृष्णाईला शंकर आणि गौरीचा आधार मिळणार आहे. तर भाऊबीजेच्या निमित्ताने तिन्ही मुली आपल्या आईला शिक्षणातील यशाच्या रूपाने अनोखी ओवाळणी देणार आहेत.
📺 कमळी
ऋषी आणि कमळी कॉलेजच्या प्रोजेक्टनिमित्त एकत्र येणार असून त्यांच्यातील जवळीक वाढणार आहे. मात्र, दोघांना एकत्र पाहून नयनताराला धक्का बसणार आहे.
📺 तारिणी
कौशिकीचा अपमान करणाऱ्या युवराजच्या केदार कानाखाली लगावणार आहे. तर दुसरीकडे, शाळेच्या बसमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करण्याची धाडसी जबाबदारी तारिणीवर येणार आहे.
सहा मालिका, सहा वेगवेगळ्या कथा आणि प्रत्येक कथेत नवं वळण… तुम्ही कोणत्या मालिकेची सर्वाधिक आतुरतेने वाट पाहत आहात?
