‘रुबाब’च्या निमित्ताने शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण!

मराठी चित्रपटसृष्टीत नव्या विषयांसोबतच नवे, ताकदीचे दिग्दर्शक आपला ठसा उमटवत आहेत आणि आता या यादीत दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांचे नाव ठळकपणे जोडले गेले आहे. Zee Studios प्रस्तुत व झणकर फिल्म्स निर्मित रुबाब या चित्रपटाची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. धडाकेबाज टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियासह सिनेरसिकांमध्ये चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली असून,… Read More ‘रुबाब’च्या निमित्ताने शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण!

जेव्हा ५० लाखात बनलेला सिनेमा १२० कोटीचा धंदा करतो… मराठी सिनेमाचं काय चुकतंय?

बॉक्स ऑफिसचा खरा धुरंदर आहे गुजराती चित्रपट – ‘लालो कृष्णा सदा सहायाते’ २०२५ हे वर्ष भारतीय सिनेसृष्टीसाठी मोठ्या अपेक्षांचं ठरलं. भव्य सेट्स, मोठे स्टार्स, कोट्यवधींचे बजेट आणि आक्रमक प्रमोशन असलेले अनेक चित्रपट या वर्षात प्रदर्शित झाले. ‘धुरंधर’, ‘छावा’, ‘सैयारा’, ‘कांतारा’ यांसारख्या सिनेमांनी प्रेक्षकांची गर्दी खेचली, सोशल मीडियावर चर्चा निर्माण केली आणि बॉक्स ऑफिसवर मोठी उलाढालही… Read More जेव्हा ५० लाखात बनलेला सिनेमा १२० कोटीचा धंदा करतो… मराठी सिनेमाचं काय चुकतंय?

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि त्या मुखवट्यामागे दडलेले असतात असंख्य सुख-दुःख, न दिसणाऱ्या भावना आणि अनेक गूढ रहस्य. हा मुखवटा जेव्हा अचानक बाजूला सरकतो, तेव्हा समोर येणारा खरा चेहरा आपल्यालाच चक्रावून टाकतो. अशाच एका अस्वस्थ करणाऱ्या आणि विचारांना हादरवणाऱ्या कथेचा वेध घेणारा मराठी चित्रपट म्हणजे केस नं. ७३. चार खून आणि शून्य पुरावे –… Read More मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

संगीत विश्वात २० वर्षांचा प्रवास ते सदाबहार जुन्या गाण्यांना नवा ट्विस्ट — या कारणांनी गायक अभिजीत सावंत यांच्यासाठी २०२५ ठरलं खास!

२०२५ : अभिजीत सावंतसाठी चर्चेचं वर्ष सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं जंगी स्वागत करत असताना, २०२५ हे वर्ष अनेक कलाकारांसाठी लक्षवेधी ठरताना दिसलं. नवनवीन प्रोजेक्ट्स, अनपेक्षित कोलॅबोरेशन्स आणि वेगळ्या माध्यमांतून स्वतःला सिद्ध करणारे कलाकार चर्चेत राहिले. याच यादीत ठळकपणे उठून दिसलं एक नाव — गायक अभिजीत सावंत. सदाबहार गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण… Read More संगीत विश्वात २० वर्षांचा प्रवास ते सदाबहार जुन्या गाण्यांना नवा ट्विस्ट — या कारणांनी गायक अभिजीत सावंत यांच्यासाठी २०२५ ठरलं खास!

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचा जन्मदिन…विनम्र अभिवादन 🙏

संघर्षातून घडलेलं व्यक्तिमत्त्व भारतीय उद्योगविश्वात शांत, संयमी आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वाचं प्रतीक ठरलेलं नाव म्हणजे रतन टाटा. ऐश्वर्याच्या वातावरणात जन्म असूनही त्यांचं बालपण भावनिक संघर्षांनी व्यापलेलं होतं. पालक विभक्त झाल्यानंतर आजी नवाजबाई टाटा यांच्या संस्कारांत त्यांची जडणघडण झाली. अमेरिकेत शिक्षण घेत असताना “टाटा” हे आडनाव बाजूला ठेवून स्वतःच्या कष्टांवर उभं राहण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक निर्णय घेतला. हॉटेलमध्ये… Read More ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचा जन्मदिन…विनम्र अभिवादन 🙏

मराठमोळा स्वॅग आणि प्रेमाचा नवा साज,अनुश्री माने दाखवणार ‘दिसली तू पहिल्यांदा २’ मध्ये नखरेल अंदाज!

लोकप्रिय रियालिटी शोमधून अल्बम सॉंगपर्यंतचा प्रवास सध्या मराठी संगीतविश्वात नव्या गाण्यांची लाट उसळलेली असताना, ठेका धरायला लावणारं आणि मनाला भिडणारं गाणं म्हणून दिसली तू पहिल्यांदा २ प्रचंड चर्चेत आलं आहे. रोमँटिक भावविश्व आणि रॅपचा आधुनिक ठसा यांचा सुंदर मेळ साधत हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यात अभिनेत्री अनुश्री माने तिच्या नखरेल,… Read More मराठमोळा स्वॅग आणि प्रेमाचा नवा साज,अनुश्री माने दाखवणार ‘दिसली तू पहिल्यांदा २’ मध्ये नखरेल अंदाज!

दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!

“दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार थीमसोबत बिग बॉस मराठी सिझन ६चा बहुप्रतिक्षित प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, संपूर्ण महाराष्ट्रात नव्या सिझनची चर्चा जोरात सुरू झाली आहे. सहाव्या पर्वाचा हा प्रोमो केवळ उत्सुकता वाढवणारा नाही, तर यंदाचा खेळ मनोरंजनाच्या चौकटीपलीकडे जात नशिबालाच आव्हान देणारा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत देतो. रितेश भाऊंच्या कडक संवादांनी सेट… Read More दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!

एन.डी. स्टुडिओत कार्निव्हलला थाटात सुरुवात

कर्जत–खालापूर येथील एन.डी. स्टुडिओ येथे आयोजित कार्निव्हलला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. विशेष मुलांच्या हस्ते उद्घाटन करत या उपक्रमाचा भावनिक आणि प्रेरणादायी प्रारंभ करण्यात आला. उद्घाटनानंतर वातावरण अधिकच रंगले ते अभिनेत्री कविता लाड यांच्या अनुभवकथनातून झालेल्या मुलाखतीमुळे. पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या एन.डी. स्टुडिओत २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान… Read More एन.डी. स्टुडिओत कार्निव्हलला थाटात सुरुवात