मजेशीर रहस्ये दडलेला ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा टिझर प्रदर्शित

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या नावातच आपल्याला कळतेय की, हा चित्रपट ‘चाळीशी’भोवती फिरणारा आहे. मात्र यात काही रम्य रहस्ये दडलेली आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लिपस्टिकचे एक निशाण दिसत होते. या निशाणाबाबत तर्कवितर्क काढत असतानाच आता या चित्रपटाचा जबरदस्त टिझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये चाळिशीतील मित्रमैत्रिणी पार्टी एन्जॉय करताना दिसत असून अचानक लाईट जातेय… Read More मजेशीर रहस्ये दडलेला ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा टिझर प्रदर्शित

झी चित्र गौरव पुरस्कार २०२४च्या मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार !

मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी गौरव पुरस्कार २०२४’  हा सोहळा मोठ्या दिमाखदार आणि धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या ‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२४’ सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार साहेब. ह्या पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित दादा अवधूत गुप्तेंनी विचारलेल्या प्रश्नांना सामोरे गेले आणि अतिशय खुमासदारपणे आणि मनोरंजकपणे त्यांचा… Read More झी चित्र गौरव पुरस्कार २०२४च्या मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार !

भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, संजय मोने अभिनित ‘झिंग चिक झिंग’ चित्रपटाला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रेक्षकांची पसंती!

अन्नदाता सुखी भवः अर्थात देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे ‘झिंग चिक झिंग’ या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट नुकताच अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर  प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनात गंभीर विचारांची दाहकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाला अल्ट्रा झकास ओटीटीवर… Read More भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, संजय मोने अभिनित ‘झिंग चिक झिंग’ चित्रपटाला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रेक्षकांची पसंती!

क्रौर्याच्या तत्त्वज्ञानाचा  ‘किमिदिन’मधून शोध

मानवी संवेदनांचा कानाकोपरा शोधत क्रौर्याचे तत्वज्ञान कसे आणि कुठून येते याचा मर्मभेदी शोध “किमिदिन” या चित्रपटातून घेतला जाणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नीलेश नवलाखा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, क्राइम थ्रिलर प्रकारातील या चित्रपटात तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. माधवी नवलाखा निर्मित “किमिदिन” या चित्रपटाचं लेखन संजय सोनवणी यांनी केलं आहे. संजय सोनवणी नामवंत साहित्यिक आणि अभ्यासक… Read More क्रौर्याच्या तत्त्वज्ञानाचा  ‘किमिदिन’मधून शोध

साजिद नाडियाडवाला यांचे सह्याद्री फिल्म आणि जोफिएल एन्टरप्रायजेससोबत मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!

हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रख्यात निर्माते साजिद नाडियाडवाला आता मराठी चित्रपटसृष्टीत उतरत आहेत. वर्दा नाडियाडवाला यांच्या जोफिएल एन्टरप्रायजेस आणि तेजस्विनी पंडित यांच्या सह्याद्री फिल्म्सची निर्मिती असलेल्या चित्रपटाची प्रस्तुती ही नाडियाडवाला यांच्या ‘नाडियाडवाला ग्रॅंडसन’ या संस्थेतर्फे केली जाणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा सध्या विविधांगी विकास होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या नवीन भागीदारीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत आणखी उत्तमोत्तम चित्रपट बनणार आहेत. चाकोरी मोडणारी कथानके… Read More साजिद नाडियाडवाला यांचे सह्याद्री फिल्म आणि जोफिएल एन्टरप्रायजेससोबत मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!

मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणार ‘रणधुरंधर’

गणराज स्टुडिओ प्रस्तुत, श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘रणधुरंधर..’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणारा हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, गुजराथी आणि पंजाबी भाषेत प्रदर्शित होणार आहे. भाग्यश्री जाधव, अमित भानुशाली, अनुप अशोक देशपांडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. यापूर्वीही गणराज स्टुडिओ आणि अमित… Read More मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणार ‘रणधुरंधर’

पुरस्कार नामांकनात ‘बापल्योक’ चित्रपटाची बाजी

चित्रभाषेच्या जाणिवा समृद्ध करणं हे चित्रपट महोत्सवांचे उद्दिष्टय असते. या उद्देशानेच आजवर अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सहभागी होत गौरविल्या गेलेल्या ‘बापल्योक’ चित्रपटाने झी चित्र गौरव पुरस्कार आणि  मटा सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या नामांकन विभागातही दमदार बाजी मारली आहे. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात तब्ब्ल १७ आणि मटा सन्मान पुरस्कार सोहळ्यात ३ नामांकने मिळवत ‘बापल्योक’ चित्रपटाने आपली … Read More पुरस्कार नामांकनात ‘बापल्योक’ चित्रपटाची बाजी

मराठी चित्रपटसृष्टीच्या उत्कर्षासाठी शासनाचा संवादरूपी ‘कलासेतू

मराठी  चित्रपटसृष्टीतील कलावंत आणि  शासन यांच्यात समन्वयाचा पूल बांधण्याच्या  दृष्टिकोनातून  सांस्कृतिक  कार्य  विभाग आणि  महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात (दादासाहेब फाळके  चित्रनगरी ) यांच्या वतीने गुरुवारी  ‘कलासेतू’ या विशेष अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत तीन वेगवेगळे… Read More मराठी चित्रपटसृष्टीच्या उत्कर्षासाठी शासनाचा संवादरूपी ‘कलासेतू