६ फेब्रुवारीला लागणार ‘लग्नाचा शॉट’!

लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि लगबग… पण कधी कधी हाच आनंद जर गोंधळात बदलला, तर काय होईल? अशाच एका मजेशीर गोंधळावर आधारित ‘लग्नाचा शॉट’ हा नवा मराठी चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून, त्यातून चित्रपटाचा हलकाफुलका आणि धमाल मूड स्पष्टपणे समोर येतो. लग्नातील गोंधळ आणि… Read More ६ फेब्रुवारीला लागणार ‘लग्नाचा शॉट’!

जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राजा शिवाजी’चे चित्रीकरण यशस्वीरित्या संपूर्ण

मुंबई, १६ डिसेंबर २०२५ मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट **‘राजा शिवाजी’**चे चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओज व मुंबई फिल्म कंपनी यांच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख निर्मित हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य जीवनप्रवासावर आधारित आहे. हा ऐतिहासिक बहुभाषिक अ‍ॅक्शन ड्रामा १ मे २०२६ रोजी जागतिक… Read More जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राजा शिवाजी’चे चित्रीकरण यशस्वीरित्या संपूर्ण

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर

शिवरायांचे बुद्धिचातुर्य आणि मुत्सद्देगिरीचा थरारक अध्याय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या पराक्रमाइतकेच त्यांचे बुद्धिचातुर्य हे केंद्रस्थानी राहिले आहे. महाराज हे केवळ रणांगणावरील योद्धे नव्हते, तर अत्यंत कुशल मुत्सद्दी होते, हे त्यांनी असंख्य मोहिमांतून सिद्ध केले. गनिमी कावा ही कूटनीती त्यांनी इतक्या प्रभावीपणे वापरली की शत्रू सावध होण्याआधीच त्याला पराभवाचा धक्का बसायचा. मुघल साम्राज्याला हादरा… Read More ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर

नाट्य रतन २०२५ | बहुभाषिक आंतरराष्ट्रीय रंगमंच महोत्सव

२५ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान मुंबईत भव्य आयोजन करवान थिएटर ग्रुप, मुंबई यांच्या वतीने नाट्य रतन – बहुभाषिक आंतरराष्ट्रीय रंगमंच महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून Curated Classics या संकल्पनेतून या महोत्सवाची मांडणी केली आहे. हा प्रतिष्ठित रंगमंच महोत्सव २५ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा (पश्चिम), मुंबई येथे पार पडणार आहे.… Read More नाट्य रतन २०२५ | बहुभाषिक आंतरराष्ट्रीय रंगमंच महोत्सव

तस्करीमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर झळकणार इम्रान हाश्मी सोबत!

वर्ष संपताना अमृताचं प्रेक्षकांसाठी नवं सरप्राईज २०२५ हे वर्ष संपत असताना अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या चाहत्यांना एकामागून एक खास सरप्राईज दिली आहेत. अभिनयाच्या विविध माध्यमांमध्ये सातत्याने स्वतःला नव्याने सादर करणारी अमृता नव्या वर्षात रंगभूमीवर पदार्पण करणार असतानाच, वर्षाच्या अखेरीस नेटफ्लिक्सवरील एका नव्या कोऱ्या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकताना दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर येणारी ‘तस्करी’ वेब… Read More तस्करीमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर झळकणार इम्रान हाश्मी सोबत!

शरद पोंक्षेंच्या त्या ‘सावली’ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला!

प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘हिमालयाची सावली’ हे अजरामर नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर अवतरले आहे. मोरया भूमिका आणि अथर्व निर्मित हे नाटक समाजासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ‘हिमालयाच्या’ पाठीशी उभ्या राहिलेल्या ‘सावली’चे, म्हणजेच त्यांच्या पत्नीचे, मन हेलावून टाकणारे आयुष्य मांडते. या महत्त्वपूर्ण भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई दिसत… Read More शरद पोंक्षेंच्या त्या ‘सावली’ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला!

३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का’ बालनाट्य अव्वल

१९ बालनाट्यांमध्ये रंगलेली अटीतटीची चुरस सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रविकिरण संस्थेची ३९ वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात पार पडली. ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे झालेल्या या स्पर्धेत १९ दर्जेदार बालनाट्यांनी सहभाग घेतला. कल्पनाशक्ती, अभिनय आणि विषयवैविध्यामुळे ही स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरली. ‘अडलंय… Read More ३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का’ बालनाट्य अव्वल

बे दुणे तीन मधील क्षितीश दातेचा वैयक्तिक आणि भावनिक दृष्टिकोन

झी 5 वरील ‘बे दुणे तीन’ची रसिकजनात चर्चा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली झी 5 वरील वेब सिरीज बे दुणे तीन सध्या चर्चेत आहे. तरुण प्रेक्षकांना विशेषतः भावणारी ही मालिका वेगळ्या विषयावर आधारित असून आजच्या पिढीच्या नातेसंबंधांवर भाष्य करते. समकालीन जीवनशैली, निर्णयांची गुंतागुंत आणि भावनिक संघर्ष या सगळ्यांचा सुंदर मिलाफ या कथेत पाहायला मिळतो. अभय–नेहाची… Read More बे दुणे तीन मधील क्षितीश दातेचा वैयक्तिक आणि भावनिक दृष्टिकोन