भास आणि सत्य यांमधील अंतर उलगडणाऱ्या ‘दृश्य-अदृश्य’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; १९ जूनला होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत रहस्यपटांची समृद्ध परंपरा आहे आणि त्या परंपरेला पुढे नेणारा आणखी एक महत्त्वाकांक्षी चित्रपट म्हणजे ‘दृश्य-अदृश्य’. ५६व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (IFFI) कौतुकाची थाप मिळवलेल्या या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, येत्या १९ जून २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आरएसटी कॅनव्हास प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती प्रद्योत पेंढारकर, अनिल… Read More भास आणि सत्य यांमधील अंतर उलगडणाऱ्या ‘दृश्य-अदृश्य’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; १९ जूनला होणार प्रदर्शित

लाईव्ह’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू…

काही दिवसांपूर्वीच ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आल्यानंतर गीत ध्वनीमुद्रणाने चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. त्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये झळकलेल्या बातम्यांनी ‘लाईव्ह’बाबत रसिकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण वेगात सुरू आहे. रिद्धी बिद्दी व्हिजन्स या बॅनरखाली निर्माते सुमित पांडे ‘लाईव्ह’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते छबी असीम… Read More लाईव्ह’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू…

आईच्या संघर्षातून उभी राहणारी स्त्रीशक्तीची कहाणी; ‘कृष्णाईच्या लेकी’ १५ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला

“मुलगी ही ओझं नाही, तर घराचा आधार आहे” या संदेशाची भावस्पर्शी मांडणी समाजातील रूढी, परंपरा आणि स्त्रियांविषयीच्या भेदभावपूर्ण मानसिकतेवर भाष्य करणाऱ्या कथा नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतात. अशाच आशयघन आणि प्रेरणादायी कथानकासह झी मराठीवर नवी मालिका ‘कृष्णाईच्या लेकी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका खंबीर आईचा संघर्ष, तिच्या मुलींची स्वप्नं आणि समाजाने घालून दिलेल्या चौकटींविरुद्धची त्यांची… Read More आईच्या संघर्षातून उभी राहणारी स्त्रीशक्तीची कहाणी; ‘कृष्णाईच्या लेकी’ १५ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला

टीव्हीच्या चौकटीतून ऐश्वर्या शेटेची रंगभूमीच्या भव्य अवकाशात एन्ट्री… ‘आता थांबवायचं कसं?’

मुंबई : मराठी दूरचित्रवाणी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आता आपल्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे. विविध मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या ऐश्वर्याची आता दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकातून रंगमंचावर दमदार एंट्री होत आहे. प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर या पाच… Read More टीव्हीच्या चौकटीतून ऐश्वर्या शेटेची रंगभूमीच्या भव्य अवकाशात एन्ट्री… ‘आता थांबवायचं कसं?’

लाडक्या कलाकारांसोबत रंगला, झी मराठी ‘आंबा महोत्सव’ पर्व २

नव्या मालिकेसह, वहिनींसाठी लवकरच खास सरप्राईज ! महाराष्ट्राची महावाहिनी म्हणून आपले स्थान अधिक भक्कम करत झी मराठी ‘ने अत्यंत उत्साहात आणि दिमाखात आपल्या ‘ आंबा महोत्सव २०२६’ च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन केले होते. फळांचा राजा आंबा आणि मनोरंजनाची राणी झी मराठी यांनी या महोत्सवात कलाकार, पत्रकार आणि मान्यवर मंडळींसोबत अविस्मरणीय अनुभव घेतला. पहिल्या पर्वाला मिळालेल्या… Read More लाडक्या कलाकारांसोबत रंगला, झी मराठी ‘आंबा महोत्सव’ पर्व २

राहुल देशपांडे यांची अभंगवारी : जेव्हा भक्ती संगीताच्या पलीकडे जाऊन भावना बनते

काही मैफिली फक्त ऐकल्या जात नाहीत.त्या मनात उतरतात.आणि शेवटचा स्वर संपल्यानंतरही दीर्घकाळ आत कुठेतरी घुमत राहतात. राहुल देशपांडे यांची अभंगवारी हा तसाच एक अनुभव आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेतून जन्मलेली ही संगीतमय यात्रा आज जगभरातील रसिकांच्या मनात घर करणारी एक वैश्विक भावयात्रा बनली आहे. तानपुर्‍याचा नाद, टाळ-मृदंगाचा ठेका आणि संतांच्या शब्दांमधील अध्यात्म यांच्या संगमातून अभंगवारी ही केवळ… Read More राहुल देशपांडे यांची अभंगवारी : जेव्हा भक्ती संगीताच्या पलीकडे जाऊन भावना बनते

अभिनेता आदिनाथ कोठारेच्या ‘सिस्टम’ चित्रपटाच्या कास्टिंगमागची भन्नाट फिल्मी गोष्ट

टेलिव्हिजन, मराठी चित्रपटसृष्टी आणि ओटीटी या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या विविध प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. वैविध्यपूर्ण भूमिका, सहज अभिनयशैली आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आदिनाथने मराठीसोबतच हिंदी मनोरंजनविश्वातही स्वतःचं खास स्थान निर्माण केलं आहे. सध्या ॲमेझॉन प्राईमवरील ‘सिस्टम’ या प्रोजेक्टमधील त्याच्या भूमिकेची विशेष चर्चा रंगली असून, या प्रोजेक्टमध्ये त्याला… Read More अभिनेता आदिनाथ कोठारेच्या ‘सिस्टम’ चित्रपटाच्या कास्टिंगमागची भन्नाट फिल्मी गोष्ट

‘देऊळ बंद २’ चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज; आता होणार थेट ‘देवाची परीक्षा’!

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवरून देवालाच आव्हान; प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद २’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवणाऱ्या ‘देऊळ बंद’ चित्रपटानंतर प्रेक्षक ज्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. ‘वटवृक्ष एण्टरटेन्मेंट’ निर्मित आणि प्रविण विठ्ठल तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा थरारक, भावनिक आणि… Read More ‘देऊळ बंद २’ चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज; आता होणार थेट ‘देवाची परीक्षा’!