पुष्कर श्रोत्री सांगतोय ‘श्श… घाबरायचं नाही’ पण…

गूढतेच्या रंगभूमीवर पुन्हा एकदा नव्या रूपात पुष्कर श्रोत्री मराठी रंगभूमीने अनेक प्रयोगशीलतेचे सोनेरी पर्व पाहिले आहे. अशाच एका प्रयोगशील सादरीकरणात अभिनेता पुष्कर श्रोत्री पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे येत आहे. ‘श्श… घाबरायचं नाही’ या आगामी नाट्यप्रयोगाविषयी बोलताना त्याने प्रेक्षकांच्या मानसिकतेबद्दल आणि रंगभूमीवरील आशयघनतेविषयी महत्त्वाचे विचार मांडले. “मी काय वेगळं करू शकतो?” – या प्रश्नातून साकारलेलं… Read More पुष्कर श्रोत्री सांगतोय ‘श्श… घाबरायचं नाही’ पण…

अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

लोकल प्रवासात फुलणारी प्रेमाची गोष्ट “मुंबई लोकल” १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईच्या जीवनशैलीला आरसा ठरणाऱ्या लोकल ट्रेनच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘मुंबई लोकल’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता स्वप्निल जोशी यांच्या विशेष उपस्थितीत लाँच करण्यात आला. ‘मुंबई लोकल’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं असून बिग ब्रेन… Read More अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

रेडबल्ब स्टुडिओज आणि लिब्रा फिल्म्सचा नवा दमदार प्रवास सुरू!

क्रिएटिव्ह भागीदारीतून साकार होणार प्रभावी कंटेंट अभिषेक जावकर यांच्या नेतृत्वाखालील Redbulb Studios LLP आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या Libra Films LLP यांच्यात नुकतीच एक सर्जनशील भागीदारी झाली असून, चित्रपट, टीव्ही कंटेंट, संगीत, सोशल मीडियातील कंटेंट, ब्रँड प्रमोशन्स आणि विविध माध्यमांमध्ये नवे प्रकल्प साकारण्याच्या दिशेने ही जोडी पुढे सरसावली आहे. पहिला प्रोजेक्ट – प्रभावी मराठी थ्रिलर… Read More रेडबल्ब स्टुडिओज आणि लिब्रा फिल्म्सचा नवा दमदार प्रवास सुरू!

‘सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित

८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार सती प्रथेवर आधारित चित्रपट ‘सत्यभामा – अ फरगॉटन सागा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांना आपल्या समाजाच्या भूतकाळातील विचारसरणीचे आणि सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवणार आहे. एकोणिसाव्या शतकातील सती प्रथेवर आधारलेला हा चित्रपट त्या काळातील सामाजिक अन्याय आणि स्त्रीशोषणावर भाष्य करतो. चित्रपटात निस्वार्थ प्रेम, बंधनांची सुंदर वीण आणि सामाजिक लढ्याचा भावनिक… Read More ‘सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित

स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेचे ११०० भाग पूर्ण

शशांक केतकरच्या कारकिर्दीतील सर्वाधिक भागांची मालिका स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’ने नुकताच ११०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. रमा-अक्षय या प्रेक्षकप्रिय जोडीसह मुकादम कुटुंबानेही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मालिकेच्या यशामध्ये प्रेक्षकांच्या प्रेमासोबतच कलाकारांच्या समर्पित कामाचा मोलाचा वाटा आहे. शशांक केतकरचा खास अनुभव अक्षय मुकादमची भूमिका साकारणारा शशांक केतकर याने यापूर्वी अनेक… Read More स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेचे ११०० भाग पूर्ण

सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे व रिंकू राजगुरचा लव्ह ट्रायंगल

२२ ऑगस्टला होणार ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ प्रदर्शित हास्याने भरलेली, धमाल प्रसंगांनी नटलेली आणि नात्यांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारी एक हटके प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ हा चित्रपट एक मजेशीर लव्ह ट्रायंगल घेऊन येत आहे, ज्यात नात्यांमधील गैरसमज, गोंधळ आणि त्यातून उगम पावणारे हास्य यांचा सुरेख मिलाप पाहायला मिळेल. मजेशीर… Read More सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे व रिंकू राजगुरचा लव्ह ट्रायंगल

‘परिणती – बदल स्वतःसाठी’ : दोन सशक्त स्त्रियांच्या मैत्रीचा भावनिक प्रवास

जबरदस्त ट्रेलरने प्रेक्षकांची वाढवली उत्सुकता काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. मराठी सिनेविश्वातील दोन ताकदवान अभिनेत्री अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांना एकत्र पाहण्याची उत्सुकता वाढली असतानाच, नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारा ठरतोय. चित्रपटाच्या शीर्षकातून आणि पोस्टरमधूनच हा स्त्रीप्रधान सिनेमा असल्याचे सूचित… Read More ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ : दोन सशक्त स्त्रियांच्या मैत्रीचा भावनिक प्रवास

“कुर्ला टू वेंगुर्ला”मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’

१९ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार तंत्रज्ञान, दळणवळण, शिक्षण आणि आर्थिक स्थिती या सगळ्या बाबतीत गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. या बदलांमुळे नव्या पिढीच्या अपेक्षा आणि दृष्टिकोनही लक्षणीय रीतीने बदलले आहेत. ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट एका लग्नाच्या गोष्टीवर आधारित रंजक प्रवास दाखवणार आहे. प्रल्हाद कुडतरकर,… Read More “कुर्ला टू वेंगुर्ला”मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’