परदेशी थाटात खुललेली मराठी लव्हस्टोरी! ‘आसा मी अशी मी’चा ट्रेलर प्रदर्शित. चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस

अमोल शेटगे दिग्दर्शित आणि सचिन नाहर–अमोग मलाविया निर्मित हा मराठी रोमँसला आंतरराष्ट्रीय उंची देणारा ‘आसा मी अशी मी’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणून धरली आहे. लंडनच्या मोहक आणि देखण्या लोकेशन्समध्ये घडणारी ही प्रेमकहाणी ग्लॅमर, भावनिक लय आणि सिनेमॅटिक भव्यतेची अप्रतिम सांगड घालते. ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेममध्ये मोठ्या दृष्टीकोनाची छाप जाणवते आणि… Read More परदेशी थाटात खुललेली मराठी लव्हस्टोरी! ‘आसा मी अशी मी’चा ट्रेलर प्रदर्शित. चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस

चित्रपट निर्मितीच्या सुविधा आता एकाच छताखाली!

फिल्मसिटीमध्ये कॅमेरा टू क्लाउड व्यवस्था उभारणार; इफ्फी बाजारच्या नॉलेज सिरीज परिसंवादात स्वाती म्हसे पाटील यांचे प्रतिपादन पणजी २३: महाराष्ट्रातील विविध लोकेशन्स चित्रीकरणासाठी अत्यंत अनुकूल असल्याने देश-विदेशातील चित्रपटकर्मींची महाराष्ट्राला कायमच विशेष पसंती आहे. याच पार्श्वभूमीवर आता फिल्मसिटीमध्ये कॅमेरा टू क्लाउड प्रणाली उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित होत असल्याची घोषणा महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय… Read More चित्रपट निर्मितीच्या सुविधा आता एकाच छताखाली!

व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते झाले चित्रनगरीच्या स्टॉलचे उद्घाटन

माध्यमकर्मी व चित्रकर्मींसोबत साधला संवाद पणजी, २२ — देशविदेशातील चित्रपटकर्मी, भारतीय प्रादेशिक चित्रपटांचे प्रतिनिधी, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उत्साही उपस्थितीमुळे ५६ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गजबजून गेला आहे. या महोत्सवातील वेव्हज फिल्म बाजार विभागात दादासाहेब फाळके चित्रनगरीने उभारलेला आकर्षक आणि भव्य स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या… Read More व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते झाले चित्रनगरीच्या स्टॉलचे उद्घाटन

हृषिकेश जोशी यांचा ‘बोलविता धनी’ नक्की आहे तरी कोण?

नव्या विषयाची रंगभूमीवरील सफर मुंबई — अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रांत समान ताकदीने स्वतःचा ठसा उमटवणारे अष्टपैलू हृषिकेश जोशी पुन्हा एकदा रंगभूमीवर दमदार पुनरागमन करत आहेत. ‘अमरदीप + कल्पकला + सृजन थिएटर्स’ निर्मित, रसिकराज प्रकाशित आणि ‘सेरेंडिपिटी आर्ट्स’ यांच्या सौजन्याने साकारलेलं त्यांचं नवीन नाटक — ‘बोलविता धनी’. नांदी नाटकानंतर लेखक-दिग्दर्शक म्हणून येणारं त्यांचं… Read More हृषिकेश जोशी यांचा ‘बोलविता धनी’ नक्की आहे तरी कोण?

मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सुवर्णसंधी

गेले दशकभर दादासाहेब फाळके चित्रनगरी घेतेय इफ्फी फिल्म बाजारमध्ये सहभाग पणजी दि. २१ — भारतीय चित्रपटसृष्टीतील निर्माते, तंत्रज्ञ आणि जगभरातील व्यावसायिक चित्रपट संस्थांना एका मंचावर आणणाऱ्या इफ्फी फिल्म बाजारमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीने गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने सहभाग नोंदवला आहे. यंदाच्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने वेव्हज फिल्म… Read More मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सुवर्णसंधी

नव्या नात्यातील दरवळ खुलवणारा ‘बहर नवा’

‘असंभव’ चित्रपटातील ‘बहर नवा’ हे नवं गीत प्रदर्शित ‘असंभव’ चित्रपटातील नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘बहर नवा’ हे गीत प्रेक्षकांच्या मनात कोमल भावनांची सुरेल लहर निर्माण करत आहे. अभय जोधपूरकर आणि आनंदी जोशी यांच्या सुरेल आवाजात सजलेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांच्या शब्दांनी नाजूक रंग प्राप्त झाले आहेत. संगीतकार अमितराज यांच्या साजशृंगारामुळे या गीताला अप्रतिम माधुर्य लाभलं… Read More नव्या नात्यातील दरवळ खुलवणारा ‘बहर नवा’

‘निर्धार’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित – २८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

तरुणाईने अनेकदा इतिहास घडवला आहे आणि समाजपरिवर्तनाची ताकद तिच्यात दडलेली असते. केवळ एकजूट झाली तर कोणताही बदल शक्य होतो — याच संघर्षाची प्रभावी कथा ‘निर्धार’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘वंदे मातरम…’ या सुमधूर गीतानंतर प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवतो. संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मिती,… Read More ‘निर्धार’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित – २८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

भारत–यूके–ऑस्ट्रेलिया–थायलंडमधील प्रेस ब्रिफिंगनंतर ‘महाबिझ २०२६ – दुबई’ला जागतिक प्रतिसाद

दुबई, [19 नोव्हें.] — जीएमबीएफ ग्लोबल (GMBF Global) आयोजित महाबिझ २०२६ या आंतरराष्ट्रीय व्यवसाय संमेलनाला भारत, लंडन (यूके), सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि बँकॉक (थायलंड) येथे झालेल्या प्रेस ब्रिफिंगनंतर जोरदार आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. विविध देशांतील उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिक समुदाय यामुळे या संमेलनाबद्दल प्रचंड उत्सुकता व्यक्त करत आहेत. दुबई — जागतिक व्यवसाय विस्तारासाठी सर्वोत्तम केंद्र… Read More भारत–यूके–ऑस्ट्रेलिया–थायलंडमधील प्रेस ब्रिफिंगनंतर ‘महाबिझ २०२६ – दुबई’ला जागतिक प्रतिसाद