‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच; कॉमेडीचा ओव्हरडोस देणारा चित्रपट १५ मेपासून थिएटरमध्ये

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हलकाफुलका आणि धमाल कॉमेडी अनुभव देण्यासाठी ‘पिक्चर बॉईज’ हा चित्रपट सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला असून, १५ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हिरो होण्यासाठी धडपडणाऱ्या दोन तरुणांची मजेशीर आणि मनोरंजक गोष्ट या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. यंग ब्रिगेडची धमाल प्रस्तुती त्रिमूर्ती फिल्म्सच्या बॅनरखाली साकारलेला… Read More ‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच; कॉमेडीचा ओव्हरडोस देणारा चित्रपट १५ मेपासून थिएटरमध्ये

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत बालकलाकार तक्षा शेट्टीची एण्ट्री

स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही लोकप्रिय मालिका सध्या अत्यंत रंजक टप्प्यावर पोहोचली आहे. कथानकात नव्या वळणाची भर घालत मालिकेत लवकरच एका चिमुकल्या पाहुणीची एण्ट्री होणार आहे. प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी बालकलाकार तक्षा शेट्टी ‘जुई’ या भूमिकेतून मालिकेत प्रवेश करत आहे. छोट्या सावित्रीच्या भूमिकेतून मिळालेलं प्रेम ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत सावित्रीबाईंचं… Read More ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत बालकलाकार तक्षा शेट्टीची एण्ट्री

‘शांतेचं कार्टं चालू आहे’ पुन्हा रंगभूमीवर!

रंगभूमीवर काही नाटकं अशी असतात, जी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे असंच एक गाजलेलं आणि प्रेक्षकांचं लाडकं नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर परतत आहे. काही काळ विश्रांतीनंतर हे नाटक नव्या उत्साहात सादर होणार असून, ११ एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात त्याचा प्रयोग रंगणार आहे. दिग्गज टीमची दमदार साथ… Read More ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ पुन्हा रंगभूमीवर!

‘बाप्या’मधील ‘हळदीत माखले’ गाण्याची धम्माल रंगत; लग्नसोहळ्यांना नवा तडका

वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत ‘बाप्या’ या आगामी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता या उत्सुकतेला आणखी रंग चढवत चित्रपटातील पहिले गाणे ‘हळदीत माखले’ प्रदर्शित झाले असून, हे गाणे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. हळदीच्या रंगात रंगलेली मस्ती लग्नातील हळदी समारंभ म्हटलं की रंग, नाच, जल्लोष आणि मस्ती यांचा संगम असतो. ‘हळदीत… Read More ‘बाप्या’मधील ‘हळदीत माखले’ गाण्याची धम्माल रंगत; लग्नसोहळ्यांना नवा तडका

प्रकाश कुंटेच्या नव्या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

मराठी चित्रपटसृष्टीत आशय, मांडणी आणि सादरीकरणाच्या नव्या वाटा शोधण्याची परंपरा आता अधिक ठळकपणे दिसू लागली आहे. अशा बदलत्या प्रवाहात अनोख्या विषयांमुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक प्रकाश कुंटे पुन्हा एकदा नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘हंपी’नंतर स्वरूप स्टुडिओसोबत पुन्हा जुळली गट्टी ‘हंपी’सारख्या गाजलेल्या चित्रपटानंतर प्रकाश कुंटे आणि स्वरूप स्टुडिओ यांची जोडी पुन्हा एकदा… Read More प्रकाश कुंटेच्या नव्या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

दिल्लीतील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळा अभिजीत नलावडे ठरला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता

दिल्लीमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आरवली फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी कलाविश्वासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. एका मराठमोळ्या युवा अभिनेत्याने हिंदी चित्रपटासाठी उत्कृष्ट कामगिरी करत थेट राजधानीत मराठीचा झेंडा फडकावला आहे. ‘द मशरूमस’मधील अभिनयासाठी अभिजीतचा सन्मान श्रीजा बरुआ दिग्दर्शित ‘द मशरूमस’ या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी अभिजीत नलावडे याला ‘सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. संयमित, सूक्ष्म… Read More दिल्लीतील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळा अभिजीत नलावडे ठरला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता

गौतमी पाटीलने नृत्यातून रंगवली राधिकेची कहाणी

मनाला मोहणाऱ्या कृष्णाच्या सावळ्या रूपाची जादू आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या राधिकेची कोमल भावना… या सुंदर नात्याचा सुरेल आविष्कार आता ‘कृष्ण सावळा रे’ या नव्या गाण्यातून रसिकांच्या भेटीला आला आहे. हे गाणे म्हणजे भक्ती, प्रेम आणि समर्पणाचा सुंदर संगम असून त्यातून राधिकाच्या कृष्णाप्रती असलेल्या भावना अतिशय भावपूर्ण पद्धतीने उलगडत आहेत. राधिकेच्या नजरेतून दिसणारा कृष्णाचा मोहक,… Read More गौतमी पाटीलने नृत्यातून रंगवली राधिकेची कहाणी

‘सावनी रेकॉर्डझ्’ या म्युझिक लेबलची घोषणा

मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि ताकदीच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र आता एका नव्या भूमिकेतून संगीतप्रेमींसमोर आली आहे. तिच्या आवाजातील गोडवा, अभिव्यक्तीची ताकद आणि प्रत्येक गाण्यातून जाणवणारी भावना यामुळे सावनीने रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे आणि आता हाच सुरेल प्रवास पुढे नेत ती स्वतःचं म्युझिक लेबल… Read More ‘सावनी रेकॉर्डझ्’ या म्युझिक लेबलची घोषणा