कोण म्हणतं येणार नाही!’.. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक

‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’ तर्फे आतापर्यंत ५८ वैविध्यपूर्ण नाट्यकृतींची निर्मिती झाली. आता नुकतीच ‘भद्रकाली ‘ तर्फे ५९ वी नाट्यकृती जाहीर केली. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक….” कोण म्हणतं येणार नाही! “ २०२५ मध्ये रंगभूमीवर दाखल होणार आहे. या विनोदी नाटकाचे लेखन चैतन्य सरदेशपांडे याचे असून दिग्दर्शन गणेश पंडित करणार आहेत.याविषयी सांगताना ‘ भद्रकाली ‘ चे… Read More कोण म्हणतं येणार नाही!’.. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक

नथुराम गोडसे को मरना होगा’ हिंदी नाटकाचे विशेष प्रयोग

मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक आता  हिंदी रंगभूंमीवर नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं  आहे. यासाठी निर्माते परितोष पेंटर, सेजल दिपक पेंटर, लेखक दिग्दर्शक भरत दाभोळकर  यांनी पुढाकार घेतला आहे. परितोष पेंटर प्रस्तुत आणि भरत दाभोळकर लिखित दिग्दर्शित ‘नथुराम गोडसे  को मरना होगा’ या हिंदी  नाटकाचे दोन विशेष प्रयोग रविवार १५  डिसेंबरला दुपारी… Read More नथुराम गोडसे को मरना होगा’ हिंदी नाटकाचे विशेष प्रयोग

लग्नाची नवी परिभाषा सांगणारा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

शुभम फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, ट्रेलर पाहून या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. खरंतर टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कुतूहल होते. ‘लग्न’संस्थेबाबतचे आधुनिक काळाचे विचार अतिशय हलक्याफुलक्या आणि मजेशीर पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आल्याचे टिझरमध्ये दिसत होते. आता ट्रेलर पाहून  या… Read More लग्नाची नवी परिभाषा सांगणारा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट ‘इलू इलू’

पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कोपरा प्रत्येकजण आपल्या मनात सदैव जपत असतो. मनाच्या कोपऱ्यातील या गोड आठवणी आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर सदैव आपल्या सोबत असतात. कधीतरी या गोड आठवणींनी मन हळवं होतं. त्या पहिल्या नजरेने, पहिल्या स्पर्शाने झालेलं ‘इलू इलू’ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतं. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन प्रत्येकाच्या मनात दडलेल्या पहिल्या… Read More आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट ‘इलू इलू’

सैराट’ मधील आर्चीचा नवा सिनेमा.. ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा… Read More सैराट’ मधील आर्चीचा नवा सिनेमा.. ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी

जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली. स्त्री- पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्री च्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली होती. नाटकातील संवेदनशील आणि सामाजिक संवादामुळे त्यावेळी हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले होते. मराठी रंगभूमीवरील ही महत्वपूर्ण कलाकृती सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.… Read More चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना “नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार”

मुंबई : साईदिशा प्रतिष्ठान व इंडियाज टॅलेंट सम्मान फाऊंडेशन (आयटीएसएफ) या संस्थेच्यावतीने यंदाचा “नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार”  ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ याना जाहीर झाला आहे. अभिनेते सयाजी शिंदे, गायक  शंकर महादेवन, गायिका वैशाली सामंत याना नटसम्राट बालगंधर्व  गौरव पुरस्कार तर गायिका पिहू शर्मा  आणि  गायक अंगद राज यांना नटसम्राट बालगंधर्व रायझिंग स्टार अवॉर्ड पुरस्काराने… Read More ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना “नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार”

55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवज्योत बांदिवडेकर यांनी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार पटकावला

55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये नवज्योत बांदिवडेकर ‘घरत गणपती’ या त्यांच्या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा  पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा  पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार बांदिवडेकर यांचा दिग्दर्शनातील पदार्पणाचा प्रभाव अधोरेखित करतो आणि त्यांना चित्रपट उद्योगातील एक नव्या दमाचा प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून पाहतो. भारतीय सिनेमाच्या उत्क्रांतीत युवा प्रतिभावंतांच्या योगदानाची दखल घेत देशभरात चित्रपट निर्मिती करणाऱ्या… Read More 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवज्योत बांदिवडेकर यांनी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार पटकावला