मनमौजी’ ८ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात

तारुण्य हे प्रेमाचं, आकर्षणाचं असतं. म्हणूनच प्रत्येक तरुणाला कोणती ना कोणती मुलगी आवडतेच… पण मुलगी किंवा बायका न आवडणारा एखादा तरुण असेल तर? अशाच एका तरुणाची गोष्ट उलगडणाऱ्या ‘मनमौजी’ या चित्रपटाचे अनोखे मोशन पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. अतिशय फ्रेश लुक असलेला, तगडी स्टारकास्ट असलेला “मनमौजी” हा चित्रपट ८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार… Read More मनमौजी’ ८ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात

कोल्हापूरच्या कलाकारांचा  चित्रपट ‘ह्या गोष्टीला नावच नाही’

आत्ताच्या तरुण पिढीकडे प्रचंड टॅलेन्ट आहे. भन्नाट कल्पना आहेत. याच  जोरावर अनेक नवे चेहरे काहीतरी वेगळं करू पाहतायेत.  ‘सर्जनशाळा’ आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, कोल्हापूर येथील कलेला पोषक असं वातावरण.. त्यातूनच फुलत गेलेल्या कलेतून अभिनेता जयदीप कोडोलीकरला एक वेगळी ओळख मिळाली. कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणारा जयदीप आता आता मोठ्या पडद्याच्या माध्यमातून आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज… Read More कोल्हापूरच्या कलाकारांचा  चित्रपट ‘ह्या गोष्टीला नावच नाही’

कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपटाचा टीजर लाँच

सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल ११  वेळा आमदार म्हणून निवडून आलेले, राज्याचे  कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांचं जीवन आणि कार्य आता चित्रपटातून उलगडणार आहे. “कर्मयोगी आबासाहेब” असं नाव असलेल्या या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला असून, आबासाहेबांच्या आयुष्याविषयी कुतूहल निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी… Read More कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपटाचा टीजर लाँच

दि एआय धर्मा स्टोरी’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

वडिल – मुलीचे भावनिक नाते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा ‘दि एआय धर्मा स्टोरी’ येत्या २५ ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. ट्रेलरमधील प्रत्येक क्षण या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा आहे. पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित या चित्रपटात पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, दीप्ती लेले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बियु… Read More दि एआय धर्मा स्टोरी’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

“२१७ पद्मिनी धाम” नाटक दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुनश्च शुभारंभ करणार

नाट्यसंस्कृती निर्मित “२१७ पद्मिनी धाम” हे नाटक रंगभूमीवर पुनःश्च येत आहे. ‘नाट्यसंस्कृती’ निर्मित चंद्रशेखर सांडवे आणि सतीश आगाशे यांनी या नाटकाला पुनरुज्जीवित केले आहे. वैशिष्ट्य म्हणजे आता या नाटकात एक नवीन गाण नाटकाची रंगत द्विगुणित करणार असून सम्पूर्ण जुनीच टीमचा सहभाग असणार आहे. अभिनेत्री पूजा कातुर्डे हिचे या नाटकातील नव्याने आगमन हा लक्षणीय योग आहे.… Read More “२१७ पद्मिनी धाम” नाटक दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुनश्च शुभारंभ करणार

भाऊ कदम यांचे नवीन नाटक

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर १२ ऑक्टोबरला होणार नव्या नाटकाचा शुभारंभ अभिनेते भाऊ कदम आणि विनोद  हे समीकरण पक्क असताना आता मात्र कॉमेडीचा हा शार्प शूटर ‘सिरियल  किलर’  ठरला आहे.  अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली निर्मित आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक येत्या शनिवारी… Read More भाऊ कदम यांचे नवीन नाटक

उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि नृत्य- संगीताचा नेत्रसुखद अविष्कार… ‘फुलवंती

By: SANDESH KAMERKAR (Senior Reporter) ‘अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादावणार आपली फुला’ अशा ठसकेबाज तोऱ्यात आपल्या मनमोहक अदाकारीने, नृत्याच्या सुंदर आविष्काराने सर्वांना भुरळ पाडणारी ‘फुलवंती’ आपल्या भेटीला येतेय. तिच्या येण्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच ; फुलवंती’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लक्ष वेधून घेतोय. ट्रेलरमध्ये ‘फुलवंती’च्या भूमिकेतील प्राजक्ता माळी आणि प्रकांडपंडीत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री भूमिकेतील गश्मीर… Read More उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि नृत्य- संगीताचा नेत्रसुखद अविष्कार… ‘फुलवंती

महाराष्ट्राच्या भीषण परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘पाणी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत ‘पाणी’ हा महाराष्ट्रातील पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीवर भाष्य करणारा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या टीझरवर प्रेक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव होत असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. मराठवाड्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणाची संघर्षगाथा या… Read More महाराष्ट्राच्या भीषण परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘पाणी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला