महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना INSCR २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा

मुंबई – नवकिरण संस्था (चित्रपट), बीड जिल्हा पोलीस फाउंडेशन, नेपाळ फिल्म टेक्निशियन असोसिएशन आणि मास्क नेदरलँड्स यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या INSCR (इंडिया-नेदरलँड्स-नेपाळ-सुरीनाम सोशल कोलॅबोरेशन रिवॉर्ड) २०२५ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचे योगदान आणि नेतृत्व याची… Read More महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना INSCR २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा

‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित – उत्कंठावर्धक, भावनांनी भरलेला थरारक अनुभव

लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. तेजस प्रभा विजय देऊस्कर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईत पार पडला मुंबईत झालेल्या भव्य ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात दिग्दर्शक… Read More ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित – उत्कंठावर्धक, भावनांनी भरलेला थरारक अनुभव

२७ व्या सांस्कृतिक कलादर्पण चित्रपट महोत्सवला उत्साहात प्रारंभ

२७ वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण भव्य चित्रपट महोत्सवाची सुरुवात काल, सोमवार दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी उत्साहात झाली. उद्घाटन सोहळा प्रसिद्ध अभिनेते संतोष जुवेकर, निर्भिड लेखाचे संपादक व नाट्यनिर्माते कांतिलाल कडू, तसेच चित्रपट निर्माते दत्ताजी जवळगे यांच्या शुभहस्ते पार पडला. मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाला गौरवशाली सुरुवात या उद्घाटन सोहळ्याला नॅशनल अवॉर्ड विजेते चित्रपट… Read More २७ व्या सांस्कृतिक कलादर्पण चित्रपट महोत्सवला उत्साहात प्रारंभ

“अशी ही जमवा जमवी” चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित – अशोक सराफ आणि वंदना गुप्ते पुन्हा एकत्र!

प्रेम आणि मैत्रीला वयाचं बंधन नाही प्रेम, मैत्री आणि सहवास – या भावना कुठल्याही वयात जन्म घेतात आणि त्यांचा शोधही कुठल्याही टप्प्यावर सुरू होतो. याच नात्यांच्या गुंफणीतून निर्माण झालेली एक हळवी, खट्याळ आणि गोंडस गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे “अशी ही जमवा जमवी” या आगामी चित्रपटात. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटाचा… Read More “अशी ही जमवा जमवी” चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित – अशोक सराफ आणि वंदना गुप्ते पुन्हा एकत्र!

‘झापुक झुपूक’च्या शीर्षक गीताने रंगली मराठमोळ्या पार्टीची धमाल

सूरज चव्हाणच्या डान्सने पेटलाय मराठीचा डंका ‘बिग बॉस मराठी सिझन ५’चा विजेता सूरज चव्हाण आता ‘झापुक झुपूक’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटाचं पहिले गाणं म्हणजेच ‘झापुक झुपूक’ हे शीर्षकगीत प्रदर्शित झालं आहे. पार्टी साँग म्हणून गाजण्याची क्षमता असलेलं हे गाणं… Read More ‘झापुक झुपूक’च्या शीर्षक गीताने रंगली मराठमोळ्या पार्टीची धमाल

‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया मराठी चित्रपटात दिसणार

प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी घराघरांत राम आणि सीतेच्या रूपात अढळ स्थान मिळवलं आहे. १९८०-९० च्या दशकात ‘रामायण’ मालिकेतील त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या आणि आजही त्यांची जोडी भक्तीभावाने ओळखली जाते. आता ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार असून, या वेळेस त्यांनी साकारलेल्या भूमिका आहेत छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता… Read More ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया मराठी चित्रपटात दिसणार

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ नेत्रदीपक लघुदर्शन सोहळा

हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या तालावर फुगड्या खेळत दंग झालेले कलाकार, वारकऱ्यांच्या पायांनी धरलेला ठेका, अभंगांच्या स्वरात चिंब झालेले मायबाप प्रेक्षक आणि कृतज्ञता सन्मान अशा भक्तिमय वातावरणात ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या भव्य आध्यात्मिक चित्रपटाचा नेत्रदीपक लघुदर्शन सोहळा (ट्रेलर) उत्साहात पार पडला. अल्पावधीतच या ट्रेलरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून १८ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.… Read More ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ नेत्रदीपक लघुदर्शन सोहळा

“जयभीम पँथर” चित्रपटातून उलगडणार एक थरारक संघर्षाची दमदार कहाणी

दलित आणि जातीभेदाविरोधातील संघर्षाची थरारक आणि वास्तववादी कथा ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून, त्याला समाजमाध्यमांवर मोठा प्रतिसाद मिळत आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनची सशक्त निर्मिती भदंत… Read More “जयभीम पँथर” चित्रपटातून उलगडणार एक थरारक संघर्षाची दमदार कहाणी