Home

  • Neeti Goel and Taha Shahto Join Forces with NCB to Launch ‘WHT Now’ Against Cyber Harassment and Drug Abuse”

    Mumbai, India – [21st July 24] – Celebrated restaurateur Neeti Goel and youth icon Taha Shah have joined forces to launch ‘WHT Now’, India’s largest youth movement aimed at addressing the pressing issues of cyber harassment and drug abuse. This groundbreaking initiative, launched in collaboration with the Narcotics Control Bureau (NCB), seeks to empower and educate the youth of India, fostering a safer and more supportive environment.

    A United Front Against Cyber Harassment and Drug Abuse


    ‘WHT Now’ (What Now) is a dynamic platform that will mobilize the youth of India to combat the rising concerns of cyber harassment and drug abuse. By combining the expertise and influence of Neeti Goel and Taha Shah, the initiative promises to create significant awareness and provide practical solutions to these pressing issues.

    *Key Objectives of ‘WHT Now’:*
    – *Education and Awareness:* Hosting workshops, webinars, and seminars to educate young individuals about the dangers of cyber harassment and drug abuse.
    – *Support Systems:* Establishing support networks and helplines to offer immediate assistance and guidance to those affected.
    – *Collaborations with Authorities:* Working closely with the NCB and other authorities to ensure stringent actions against offenders and promote preventive measures.
    – *Empowerment Programs:* Creating platforms for youth to voice their concerns, share their experiences, and participate in decision-making processes.

    Quotes from the Founders:

    Neeti Goel

    Co-founder of ‘WHT Now’, expressed her commitment, stating, “The youth of India are our future, and it is our responsibility to provide them with a safe and supportive environment. ‘WHT Now’ is a step towards eradicating the pervasive issues of cyber harassment and drug abuse, and I am proud to be part of this movement.”

    Taha Shah Brand Ambassador and youth icon, added, “Cyber harassment and drug abuse are serious issues that can have devastating effects on young lives. Through ‘WHT Now’, we aim to educate, empower, and support our youth to stand against these challenges and emerge stronger.”


    Inaugural Event:

    The launch of ‘WHT Now’ will be marked by an inaugural event in Mumbai on [21st July 24], featuring keynote addresses by Neeti Goel, Taha Shah, and senior officials from the NCB. The event will also include interactive sessions, panel discussions, and live performances to engage and inspire the youth.

    For more information, please contact on 9019115115.

    ‘WHT Now’ is a youth movement founded by Neeti Goel and Taha Shah, dedicated to combating cyber harassment and drug abuse in India. In collaboration with the Narcotics Control Bureau (NCB), the initiative aims to educate, empower, and support the youth to build a safer and healthier society.

  • काळजाचा ठाव घेणाऱ्या “धर्मवीर – २” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

    चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या “धर्मवीर – २” चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलीवुडस्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर अशा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती.

    साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी “धर्मवीर – २” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे.  चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरबाबत प्रचंड उत्सुकता होती.

    २०२२ ला “धर्मवीर” चित्रपटाचा पहिला भाग आला जो सुपरहिट झाला. दिघे साहेबांचे कार्य खुप मोठे आहे जे केवळ एका भागत दाखवणे शक्य नाही. दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल नाही तर त्या पावलांवर जीव टाकून आम्ही काम करतो आहे. या चित्रपटात एक डायलॉग आहे “कार्यकर्त्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो” कारण नेत्याने लोकांच्या सुख- दुःखात, अडी-अडचणीत त्यांच्यासोबत उभे राहावे. प्रसाद ओक यांनी साकारलेली भूमिका अप्रतिम आहे, जी साकारणे तेवढे सोप्पे नाही कारण त्यांचा दिघे  साहेबांसोबत तसा कधी भेटण्याचा संबंध आला नाही.  मागच्या भागापेक्षा या भागात माझी भूमिका साकारलेले क्षितीश दाते यांचे काम छान झाले आहे. पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला त्यापेक्षाही हा. चित्रपट डबल हीट होईल अशा मी संपूर्ण टिमला शुभेच्छा देतो  असे महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले.

    गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित “धर्मवीर – २” या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. “हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही” ही चित्रपटाची टॅगलाईन जरी असली तरी शिंदेसाहेब असो किंवा आम्ही सर्व असू आमच्या जीवनाची टॅगलाईन सुद्धा हीच आहे. दिघे साहेबांच्या शिकवणी प्रमाणेच शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची धुरा समर्थपणे  सांभाळली आहे निश्चितच धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि स्व.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून आशिर्वाद देत असतील कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती. मलाही सिनेमा काढायचा आहे पण अजुन थोडा वेळ आहे कारण मी जेव्हा सिनेमा करेन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटतील आणि खरा चेहरा बाहेर येईल. चित्रपटाचा ट्रेलर पाहून आता चित्रपट पाहण्यासाठी मी उत्सुक असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले.

    ‘आपल्या संघटनेचा माज आहे तो भगवा रंग ‘ या वाक्यापासून सुरू होणारा  “धर्मवीर – २” चित्रपटाचा ट्रेलर पहिल्या फ्रेमपासूनच आपल्याला गुंतवून ठेवतो. सर्वसामान्यांमध्ये राहणारे, सर्वसामान्यांसाठी झटणारे, भगव्यासाठी आणि हिंदुत्त्वासाठी लढणारे दिघेसाहेब पुन्हा एकदा या ट्रेलरमध्ये दिसतात. ‘तुझ्या आणि हिंदुत्त्वामध्ये मी जरी आलो, तरी मला बाजूला सारून हिंदुत्त्वाला मिठी मार’ या दिघे साहेबांच्या तोंडी असणाऱ्या डायलॉग ने  तर अंगावर काटा उभा राहतो. ट्रेलरमध्ये एकनाथ शिंदे साहेबही दिसतात. “धर्मवीर – २” चित्रपटाची टॅगलाइन ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ असल्यानं आता या चित्रपटातून काय दाखवलं जाणार याची उत्कंठा आता अधिकच वाढली गेली आहे.

    “धर्मवीर – २” चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. गीतकार मंगेश कांगणे, स्नेहल तरडे , डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश – विश्वजीत आणि चिनार-महेश यांचे सुमधुर संगीत लाभले आहे तर ही गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, जावेद अली, सुखविंदर सिंग,विशाल दादलानी, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुमधुर आवाजात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये स्वरबद्ध करण्यात आली आहेत. या चित्रपटातील “चला करू तयारी…” ह्या गीताने अल्पावधीतच रसिक श्रोत्यांची मने जिंकली असून लवकरच अन्य गाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

    “धर्मवीर – २” हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

  • मनारा चोप्रा ते अलाया एफ पर्यंत बॉलीवूड तारकांमध्ये रंगलीए परीकथांबाबत दिलखुलास चर्चा

    ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील मालिका- ‘दिल को तुमसे प्यार हुआ’ अखेर टीव्हीवर प्रसारित झाली आहे. दरम्यान या मालिकेच्या निर्मात्यांनी अदिती त्रिपाठी (दीपिका) आणि अक्षित सुखिजा (चिराग) यांचा एक रोमांचक प्रोमो प्रदर्शित केला आहे. या ‘प्रोमो’त प्रेक्षकांना दीपिकाच्या वेदना आणि तिला तिच्या सावत्र आई आणि सावत्र बहिणीकडून मिळणारी वाईट वागणूक बघायला मिळते. दीपिकाच्या अंधाऱ्या आयुष्यात चिरागमुळे प्रकाशाची तिरीप आणि प्रेम कसे येते, हेही या प्रोमोत दाखवले आहे. या परीकथेची चर्चा आता बॉलिवूडपासून गुजराती मनोरंजन उद्योगापर्यंत सर्वत्र जोर धरू लागली आहे.

    बॉलिवूड तारका मनारा चोप्रा आणि अलाया एफ यांनीही ‘दिल को तुमसे प्यार हुआ’ या मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे आणि या मालिकेविषयी प्रेम व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर परीकथेबाबत त्यांनी आपली मतेही मांडली आहेत. मनारा चोप्राचा परीकथांवर विश्वास आहे आणि तिला वाटते की, ती स्वतः एक परीकथा जगतेय. तर, अलाया एफला विश्वास वाटतो की, त्याग आणि कठोर परिश्रम ही तुमची स्वप्ने साध्य करण्याची गुरुकिल्ली आहे.

    दुसरीकडे, गुजराती अभिनेत्री क्रिना पाठक, जी ‘मोती बा नी नानी वहू’सारख्या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रेक्षकांना परिचित आहे आणि उर्वशी सोलंकी, जिने गुजराती चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि ‘अवजो, नही रे छुटे तारो साथ’ आणि ‘शूटआउट’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, या तारकांनी ‘दिल को तुमसे प्यार हुआ’ या मालिकेकरता खास संदेश धाडला आहे.

    गुजराती अभिनेत्री क्रिना पाठकने *आपल्या संदेशात म्हटले आहे, “मी माझी परीकथा- जसे की, फाफड़ा जिलेबी आणि जगण्याचा आनंद लुटत जीवन जगत आहे. प्रेम हे नियतीचे होते, ते मेहनतीने घडवले होते आणि ते निभावायचे होते. बरोबर की नाही?”* तर उर्वशी सोलंकी म्हणते, “जोडीदार ही अशी व्यक्ती असते, जी तुम्हांला तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल, तुम्हांला स्वीकारते. असे म्हणतात की, जोड्या स्वर्गात बनतात, परंतु नंतर ते नाते टिकवण्यासाठी कितीतरी अवधी लागतो. खूप छान कथा. माझे प्रिय @niilampanchal तुम्हां सर्वांचे अभिनंदन.”

    या ‘प्रोमो’ला प्रतिसाद देणाऱ्यांच्या यादीत, हिमांशी पाराशर (जी साहिबाची भूमिका साकारत आहे) आणि नेहा हरसोरा (जी सायलीची भूमिका साकारत आहे) या ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील मालिकेच्या काही लोकप्रिय अभिनेत्रींची नावेही समाविष्ट आहेत.  ज्यांनी समाजमाध्यमांवर परीकथेविषयीचे आपले विचार मांडताना सांगितले आहे की, त्यांचा परीकथेवर आणि प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. साहिबा आणि सायली या दोघीही प्रेमावर व परीकथांवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या स्वतःच्या प्रेमकथेबाबतही त्यांना अशीच अपेक्षा आहे.

    याबाबत साहिबा म्हणते, “मला वाटते की, परीकथा अस्तित्वात आहेत आणि मला माझ्या आयुष्यातही एक परीकथा घडावी, असे वाटते.” तर या संदर्भात बोलताना सायली म्हणते, “परीकथा आहेत. जेव्हा मी माझ्या प्रवासाकडे मागे वळून पाहते, तेव्हा हा प्रवास पाहिल्यानंतर मला वाटून जाते की, कदाचित मी या परीकथांचा एक भाग आहे.”

    ‘दिल को तुमसे प्यार हुआ’ या मालिकेने प्रसारमाध्यमांतील बातम्यांत स्थान प्राप्त केले आहे आणि या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर, बॉलीवूड अभिनेत्रींपासून गुजराती सिनेसृष्टीतील तारकांपर्यंत-मनारा चोप्रा, अलया एफ, क्रिना पाठक, उर्वशी सोलंकी, नेहा हरसोरा, हिमांशी पाराशर आणि तहसीन पुनेवाला अशा अनेक अभिनेत्रींनी परीकथांबाबतचे आपले मत व्यक्त केले आहे, ही चर्चा या मालिकेइतकीच रंजक आहे.

  • वायआरएफ स्पाई यूनिवर्सचा भाग बनणे, हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे

    बॉलीवुडची उभरती स्टार शर्वरी, आलिया भट्टसोबत काम करण्याची आणि तिच्याकडून शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आभारी आहे. आलिया भट्ट, जी आदित्य चोपड़ा निर्मित  वायआरएफ स्पाई यूनिवर्स मधील पहिली फीमेल लीड असलेली चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे, त्यात शर्वरी सुपर-एजेंटची भूमिका निभावत आहे. शर्वरी या विशाल स्पाई युनिव्हर्सचा भाग बनून अभिभूत आहे, ज्यामध्ये भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या अग्रणी महिला दीपिका पदुकोण, कॅटरीना कैफ आणि आता आलिया भट्ट यांनी शोभा वाढवली आहे.

    शर्वरी म्हणते, “या विशाल  वायआरएफ स्पाई यूनिवर्स चा भाग बनणे अत्यंत रोमांचक आहे. मी खरोखरच दबावत नाहीये कारण मी या युनिव्हर्सचा भाग होण्याच्या प्रक्रियेचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. मी सध्या ऊर्जा आणि उत्साहाने भरलेली आहे – या संधीसाठी खूप उत्साहित आहे – आपल्या देशाच्या सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक असलेल्या आलिया भट्टसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

    ती पुढे म्हणते, “म्हणूनच, मी सेटवर जाण्याची, दररोज आलियाकडून शिकण्याची, माझे दृश्य चांगले साकारण्याची अपेक्षा करते. जर मी दबावाला माझ्यावर हावी होऊ दिले तर मला मजा येणार नाही आणि मी तसे होऊ देणार नाही. अशा युनिव्हर्सचा भाग बनणे, ज्यामध्ये माझे सिनेमातील आदर्श आहेत, हे खरोखरच स्वप्न साकार होण्यासारखे आहे. मी आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, कॅटरीना कैफ यांना आदराने पाहते. केवळ या तथ्यामुळे की मी सिनेमाच्या महानतम आयकॉनच्या या गॅलॅक्सीमध्ये सुपर एजंटची भूमिका साकारत आहे, हे खूपच अवास्तव आहे.”

    आदित्य चोपड़ा पहिल्या फीमेल लीड असलेल्या YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपटाला एक्शन स्पेक्टॅकल बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. ‘अल्फा’ चे दिग्दर्शन शिव रवैल करत आहेत, ज्यांनी YRF निर्मित ब्लॉकबस्टर ग्लोबल स्ट्रीमिंग सीरीज ‘द रेलवे मेन’ मध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.

    निर्माता आदित्य चोपड़ा निर्मित वायआरएफ स्पाय युनिव्हर्स आज भारतीय सिनेमातील सर्वात मोठी IP आहे. स्पायवर्समधील सर्व चित्रपट ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर’, ‘पठान’, ‘टायगर 3’ हे ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

  • अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील जबरदस्त जुगलबंदी २ ऑगस्टला पडद्यावर दिसणार

    लाईफलाईन’चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

    डॉक्टरांचे आधुनिक विचार आणि किरवंतामध्ये खोलवर रुजलेली परंपरेची मुळे या दोघांमधील वैचारिक तफावत दाखवणारा ‘लाईफलाईन’ चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टिझर पाहून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील जबरदस्त जुगलबंदी पाहाण्यासाठी प्रेक्षक आतुर असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अशोक सराफ, माधव अभ्यंकर, भरत दाभोळकर, हेमांगी कवी, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, सुश्रुत मंकणी, अवधूत गुप्ते यांच्या उपस्थितीत नुकताच ‘लाईफलाईन’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला.

    ट्रेलरमध्ये डॉक्टर आणि किरवंताची लढाई दाखवण्यात आली असून ज्ञान आणि विज्ञान एकत्र आले तर कित्येक गरजूंचे प्राण वाचू शकतील, या मताचे डॉक्टर आहेत तर माणसाच्या आयुष्यात दोनच जण महत्वाचे असतात, एक भगवंत जो जन्म देऊन खाली पाठवतो आणि दुसरा किरवंत जो निरोप देऊन वर पाठवतो, या विचारसरणीचे किरवंत आहेत. त्यामुळे या लढाईत कोण जिंकणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, आयुष्याचा प्रवास संपतो तेव्हा एका नवीन आयुष्याचा प्रवास सुरु होतो, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे.

    क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘लाईफलाईन’ चित्रपटाचे दिग्दर्शन साहिल शिरवईकर यांनी केले असून कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायली आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट चित्रपटाचे निर्माते आहेत.

    चित्रपटाबद्दल दिग्दर्शक साहिल शिरवईकर म्हणतात, ” दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि पहिल्याच चित्रपटात अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांसारखे दिग्गज कलाकार असणे, ही माझ्यासाठी खूपच मोठी गोष्टी आहे. व्यक्तिरेखा ठरल्यावर ज्यावेळी कलाकारांची निवड करण्याची वेळी आली, तेव्हा माझ्या मनात ही दोन नावे आधी आली. त्यानुसार मी अशोक सराफ सरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांच्या समोर अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स होत्या. सरांनी मला विचारले, एवढे चित्रपट असताना मी या चित्रपटाला होकार का द्यावा? यावर मी माझी स्क्रिप्ट त्यांना वाचून दाखवली आणि त्यामागची माझी भावनाही पटवून दिली. सरांचा होकार माझ्यासाठी फार आनंदाची बाब होती. चित्रपटातील सगळे कलाकार उत्कृष्ट आहेत. प्रत्येक कलाकाराची इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख आहे. चित्रपटाबद्दल सांगायचे तर आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरेमध्ये अडकलेला हा वाद आहे. आता या वादाचा शेवट कसा होतो, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. ‘लाईफलाईन’च्या निमित्ताने सामाजिक जागरूकता पसरवण्याचाही प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे, माझा हा प्रयत्न प्रेक्षकांना आवडेल.”

    तर अशोक सराफ म्हणतात, ‘’ ज्यावेळी साहिलने मला चित्रपटाबद्दल सांगितले, त्यावेळी स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी त्याला पहिला प्रश्न विचारला किरवंताची व्यक्तिरेखा कोण साकारणार आहे, त्यावेळी त्याने माधव अभ्यंकर यांचे नाव घेतले. तिथेच मला या मुलाची समज कळली. मला हा विषय आवडला. प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडणारा हा चित्रपट आहे. एक तरूण दिग्दर्शक असा चित्रपट बनवतोय, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे.’’

  • धनंजय भावलेकर दिग्दर्शित ‘कर्मवीरायण’ उद्या १९ जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात..

    कर्मवीरांच्या भूमिकेत किशोर कदम

    ‘कर्मवीरायण’ शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट, महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता उद्या म्हणजे १९ जुलै पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

    कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि घटना यांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे. ट्रान्सएफेक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी निर्मिती केलेल्या “कर्मवीरायण” चित्रपटाची प्रस्तुती 7 वंडर्स चे पुष्कर मनोहर करत आहेत. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांचा सशक्त अभिनय पाहायला मिळणार आहे. या चित्रपट पटकथा लेखनासाठी स्व.भाई वैद्य, स्व.नागनाथ कोतापल्ले, स्व.रामनाथ चव्हाण, स्व.राम ताकवले, डॉ. अभिजीत वैद्य, ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे अश्या मान्यवरांनी मार्गदर्शन आणि एक्स्पर्ट टीम म्हणून काम केले आहे. योगेश कोळी यांनी छायाचित्रण, संतोष गोठोस्कर यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे.

    बालपणातच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज त्यानंतर युवा अवस्थेत महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात समाजात वर्चस्ववाद बोकाळला होता. त्यामुळे गरीब आणि बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. त्या मुलांनाही शिकण्याचा समान हक्क आहे असा भाऊराव पाटील यांचा ठाम विचार होता. त्या काळी अनेक लोकांनी भाऊरावांना विरोध केला. मात्र विरोधाला न जुमानता शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य सुरूच राहिलं आणि स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हा मंत्र मनी बाळगून विविध शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील शिक्षणाकडे वळू लागले. त्यामुळेच ग्रामीण भागातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत झाली. महाराष्ट्राला शिक्षणाच्या मार्गावर नेणारे भाऊराव ‘कर्मवीर’ झाले. शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट आता १९ जुलै पासून चित्रपटाद्वारे पाहता येणार आहे.

  • डॉ.शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र

    अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची  ताकद असणारे  ज्येष्ठ अभिनेते डॉ.शरद भुताडिया आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे हे दोन उत्तम कलावंत प्रथमच मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी  जोडलेले आणि प्रामुख्याने मराठी  रंगभूमीवर सक्रिय असणारे हे  दोन कलावंत आगामी ‘घरत गणपती’ या  चित्रपटात दिसणार आहेत.

    व्यवसायाने डॉक्टर असलेले शरद भुताडिया हे मराठी रंगभूमी आणि मराठी, हिंदी चित्रपटातील नावाजलेले अभिनेते. कोल्हापुरातील ‘प्रत्यय’ या हौशी नाट्य संस्थेतर्फे ते १९८२पासून दिग्दर्शन करीत आहेत. त्यांनी साकारलेल्या ‘किंग लिअर’, ‘जोतिबा फुले’, तसेच ‘आईनस्टाईन’ यांच्या भूमिका खूप गाजल्या. तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी स्वत:ला जोडून घेऊन ‘व्हय मी सावित्रीबाई’, ‘तिच्या आईची गोष्ट’, ‘द मदर‘, ‘द घरवाली’ या आपल्या नाटयकृतींमध्ये स्त्री-सक्षमीकरणाचा जागर करणाऱ्या सर्जनशील कलावंत म्हणून अभिनेत्री सुषमा देशपांडे ओळखल्या जातात. ‘घरत गणपती’ या चित्रपटात हे दोघे आजी आणि आजोबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. कुटुंबप्रमुख असलेले ‘आप्पा’ आणि ‘माई’  यांची महत्त्वपूर्ण भूमिका ते साकारताना  दिसणार आहेत.

    आजी-आजोबा आणि नातवंडं यांच्या प्रेमळ नात्याची गोष्ट प्रेक्षकांना ‘घरत गणपती’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एकत्र  कुटुंबात आजी आणि आजोबा कशी समन्वयाची भूमिका पार पाडतात? आणि तुटणा-या नात्याचे बंध कसे जोडून ठेवतात, याचे भावनिक आणि मार्मिक चित्रण या चित्रपटात पहायला मिळणार आहे. कौंटुबिक मूल्यांची आठवण करून देणारा ‘घरत गणपती’  चित्रपट हसवता हसवता प्रत्येकाला अंतर्मुख करेल असा विश्वास हे दोघेही व्यक्त करतात.

    या दोघांसोबत निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, परी तेलंग, आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.

    पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

    या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

  • उत्सुकता वाढवणारा ‘गूगल आई’चा ट्रेलर प्रदर्शित

    शोध… भीती…  काळजी…  वेदना…  अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या ‘गूगल आई’चा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलर पाहून ‘गूगल आई’मध्ये काय रहस्य दडलेय, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच ‘गूगल आई’ बद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. त्यात आता या उत्कंठावर्धक ट्रेलरने प्रेक्षक ‘गूगल आई’ची आतुरतेने वाट पाहात आहेत.

    विविध भावनिक छटा उलगडणारा ‘गूगल आई’ चित्रपटाचा रंजक, रोमांचक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गूगल आई’ या चित्रपटाचे डॉलर दिवाकर रेड्डी निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन गोविंद वराह यांचे आहे. तर ‘गूगल आय’ला एस सागर यांचे संगीत लाभले आहे. प्रणव रावराणे,  प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

    ट्रेलरमध्ये एक हसतेखेळते, आनंदी कुटुंब दिसत असून अचानक त्यांच्या या सुखी कुटुंबात एक वादळ येते. या वादळात संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाल्याचे दिसत आहे. आता त्यांच्या आयुष्यात हे वादळ कसे आले, त्यातून ते बाहेर पडणार का? यात ‘गूगल आई’ची कशी मदत होणार, या सगळ्या प्रश्नांची प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहेत. दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथच्या दिग्दर्शकांनी केल्यामुळे यात साऊथचा तडकाही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘गूगल आई’च्या निमित्ताने मराठी चित्रपट एका वेगळ्या वळणावर गेल्याचे चित्र आहे. 

    चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणतात, ” मराठी सिनेसृष्टीबद्दल मला कायमच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे मराठीत एखादी तरी कलाकृती करावी, असे मनात होतेच आणि माझी ही इच्छा ‘गूगल आई’च्या निमित्ताने पूर्ण झाली. खरं तर साऊथ आणि मराठीची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. परंतु या सगळ्याच कलाकारांनी मला खूप सहकार्य केले. यात या चिमुरडीचे विशेष कौतुक करावे लागेल. तिनेही यात कमाल अभिनय केला आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा तिच्याभोवती फिरणारी आहे. ‘गूगल आई’ला थोडा साऊथ टचही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पाहातानाही एक वेगळा अनुभव येईल. तंत्रज्ञानाचा फायदाही आहे, नुकसानही आहे. त्याचा वापर कसा केला जातो, हे महत्वाचे आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. थरार,  रहस्यांनी भरलेला हा चित्रपट कौटुंबिक असून संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे.

  • ‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट… ‘घरत गणपती’

    प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ गोष्ट… ‘घरत गणपती’

    कोकणी माणसाचं आणि गणेशोत्सवाचं अजोड नातं आहे. ‘गणपती’ असा शब्दोच्चार जरी झाला तरी एक वेगळीच लहर कोकणी माणसाच्या मनाला स्पर्शून जाते. कोकणी माणसाला गणपतीत गावची ओढ लागण्याचं आणखी एक कारण कोकणवासी खरोखरच गोतावळा प्रिय असतो. नातेसंबंध जपण्यासाठी, पाहुणचारासाठी त्याची विशिष्ट अशी ओळख आहे. या सणाच्या निमित्ताने  नात्यांचे  बंध जपत  उत्सवाचा आनंद  द्विगुणीत करण्यासाठी याहून अनोखी संधी असूच शकत नाही.  याच गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन ‘घरत गणपती’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

    ‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव,संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.

    नातेसंबंधातील  प्रेम, गोडवा सणांच्या माध्यमातून निश्चितच निर्माण होत असतो. हाच धागा घेऊन सर्वांगसुंदर अशी ‘लंबोदर’ कथा ‘घरत गणपती’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. कोकणातल्या एका सुखवस्तू कुटुंबातील ही गोष्ट आहे. घरातील गणपतीच्या निमित्ताने घरत कुटुंबात घडणाऱ्या सहज-साध्या गोष्टी, ज्यात गमतीजमती आहेत, राग-लोभ आहेत, एकमेकांविषयी वाटणारी माया आहे.

    चित्रपटाला साजेशी चार गाणी चित्रपटात असून ‘माझा कोकण भारी’ आणि ‘नवसाची  गौराई  माझी’ या गाण्यांना सोशल माध्यमावर उत्तम प्रतिसाद मिळतोय. श्रद्धा दळवी, समीर सामंत,अलोक सुतार यांनी लिहिलेल्या गीतांना जावेद अली, विशाल ददलानी, अभय जोधपूरकर, सायली खरे, ‘द कोकण कलेक्टिव्ह’ गर्ल्स यांनी स्वरबद्ध केलं आहे.
     
    ‘घरत गणपती’ हा कौटुंबिक चित्रपट प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करेल असा विश्वास पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी व्यक्त केला. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर उत्तम कथानक व भव्यदिव्यता दिसेल असा विश्वास व्यक्त करताना नात्यांचा हा प्रवास प्रत्येकाला समृद्ध करेल, असं दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी सांगितलं.  

    पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’.  नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
    ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

  • बॉलीवूड स्टार सोनम कपूर लंडनमध्ये विम्बल्डन महिलांच अंतिम फेरीतील सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार।

    वैश्विक फॅशन आयकन आणि बॉलीवुड स्टार सोनम कपूर 2024 च्या विम्बलडन महिलांच्या अंतिम सामन्यात चमकदार उपस्थिती साठी  सज्ज आहे. ऐतिहासिक ऑल इंग्लंड क्लबमध्ये या वर्षाच्या इव्हेंटमध्ये सोनमची उपस्थिती या प्रतिष्ठित स्थळाला अधिक ग्लॅमर देणार आहे, जे महान टेनिस सामन्यांचे आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

    विम्बलडन चॅम्पियनशिप, जी 1877 मध्ये स्थापन झाली, ही जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा आहे. सोनमच्या प्रसिद्ध शैली आणि शालीनतेसह त्या इव्हेंटमध्ये एक मोठं फॅशन स्टेटमेंट देणार हे पाहण्यासाठी सगळ्यांचे लक्ष असेल.

    भारतातील प्रमुख फॅशन आयकन म्हणून सोनम कपूर ची वैश्विक माध्यमांनी तिच्या उत्कृष्ट फॅशन सेन्ससाठी नेहमीच प्रशंसा केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण शानदार पोशाख निवडींमुळे त्या शीर्ष फॅशन ब्रँड्समध्ये आवडत्या चेहऱ्यांपैकी एक बनल्या आहेत. सोनमच्या भारताच्या सांस्कृतिक राजदूत म्हणून स्थिती त्यांच्याद्वारे निवडलेल्या ब्रँड्सवर त्यांच्या प्रभावास दर्शवते, मग तो भारतात असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर.

    अलीकडेच, सोनमने पॅरिसमधील डिओर च्या हाउते कॉउचर फॉल/विंटर शोमध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रेग्नेंसी नंतर त्यांच्या पुनरागमनाची तयारी करत असताना, सोनमकडे दोन मोठे प्रोजेक्ट्स आहेत, ज्यात बॅटल फॉर बिट्टोरा समाविष्ट आहे, आणि दुसऱ्या प्रमुख प्रोजेक्ट बाबत तपशील गुपित ठेवला आहे.