
-
घरत गणपती’ २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

‘कुटुंब’हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातील,नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपलं प्रेमाचं, स्नेहाचं एक वेगळं नातं असतं. मराठी चित्रपटांतूनही कौटुंबिक विषय अतिशय उत्तमतेने हाताळलेले आपण पाहतो. आंबे, सुपारी, केळी, फणसाच्या बागा, काजू, कोकमाची झाडं असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी घरत कुटुंबाची मजेशीर गोष्ट आपल्याला आगामी ‘घरत गणपती’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. मनोरंजन क्षेत्रात तडाखेबंद कलाकृतींनी आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने मराठी चित्रपट ‘घरत गणपती’. हा भव्य चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे.
नातेसंबंधातील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक दृढ होत असतो. मायेने आणि आपलेपणाने माणसं जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या वेळी घडणारी गमतीशीर गोष्ट चित्रपटात पहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर कथाविषय, त्याला अभिनयसंपन्न कलाकारांची जोड यातून एक उत्तम कलाकृती दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर आपल्यासमोर घेऊन येत आहेत. त्याआधी ‘घरत गणपती’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि पहिली झलक आपल्यासमोर आली आहे.
निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर,दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.
कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. जो प्रत्येकाच्या मनाला भावेल, त्यामुळेच पॅनोरमा स्टुडिओज ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या सोबत भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले. नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. -
वीस वर्षीय यशने उभारले भारतातील मोठे थ्रीडी इलेव्हिजन म्युझियम

आपल्या हुशारीला, कल्पकतेला टेक्नॉलॉजीची जोड देत आजची पिढी सृजनात्मक गोष्टी करत आहे. वेगवेगळ्या कल्पना राबवून भन्नाट नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत आहे. या यादीत वीस वर्षीय यश राजेंद्र पाटील व कला क्षेत्रातील त्याचा मित्र सचिन कुटे यांचा समावेश झाला आहे. तरुणाईची फोटो काढण्याची वाढती क्रेझ लक्षात घेऊन त्या संदर्भात उत्तम संकल्पना राबवून या दोघांनी फोटोप्रेमींसाठी नवं दालन खुलं केलं आहे.
पर्यटक लोणावळ्या सारख्या निसर्गयरम्य पर्यटनस्थळी येऊन फोटो, रील्स काढत असतात. या विचारातून या दोघांच्या मनात एक कल्पना आली की, कल्पक आर्ट इल्यूशन (illusion) च्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांसाठी काही तरी वेगळे करून दाखवायचे. त्यातूनच थ्रीडी आर्ट व इल्यूशन म्युझियमची कल्पना आकाराला आली. यशाच्या या कल्पनेला साथ देण्यासाठी त्याची आई रेश्मा पाटील, वडील राजेंद्र पाटील आणि मित्र सचिन कुटे यांनी पुढाकार घेतला.
थ्रीडी आर्ट इल्यूशन म्युझियमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे थ्रीडी पेंटिंग तसेच नवीन टेक्नॉलॉजी, एलइडी वॉल, इल्यूशन ट्रिक्स याचा डिस्प्ले वापरून फोटो व रील्सच्या माध्यमातून ऍडवेंचर फोटो, फँटसी फन फोटो काढता येऊ शकतात. या म्युझियम मध्ये वेगवेगळ्या संकल्पना साकारण्यात आल्या आहेत. नवीन तंत्रज्ञान व कलेची सांगड घालून सुमारे ४०० फूट एवढया कॅनव्हासवर पेन्टिंग्स केले आहेत. अशा प्रकारचं भारतातील हे पहिलंच म्युझियम आहे.
यश पाटील यांनी साकारलेल्या म्युझियमला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतील फिल्मसिटी मध्ये बॉलीवूड टुरिझम चालवत असलेल्या संतोष मिजगर यांच्या ‘स्टारक्राफ्ट मनोरंजन’ आणि ‘मॉस युटीलिटी ‘कंपनीने पुढाकार घेतला आहे. आपल्या पंधरा वर्षाच्या अनुभवाचा उपयोग यश आणि त्याच्या सहकाऱ्यांना हा उपक्रम राबवण्यासाठी व्हावा यासाठी आम्ही या संकल्पनेला पाठिंबा दिल्याचे संतोष मिजगर सांगतात. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी या म्युझियमला एकदा तरी भेट देत पूर्ण ट्रिक व्हिजन टीम ला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
-
महाराष्ट्र दिनी ‘संयुक्त महाराष्ट्र’ची घोषणा

स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारण्यात आला. ही चळवळ भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या आतापर्यंत झालेल्या सर्व चळवळीतील एक प्रमुख चळवळ होती. आजवर झालेल्या अनेक चळवळी या इंग्रजांविरोधातील होत्या. मात्र ही चळवळ वेगळी होती. यामुळे देशाचे राजकारण कोलमडले आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आज याच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म्स प्रस्तुत ‘संयुक्त महाराष्ट्र’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘पॅावर वर्सेस प्राईड’ अशी टॅगलाईन आहे .तर सुनील शेळके ‘संयुक्त महाराष्ट्रा’चे निर्माते आहेत. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात कोण कलाकार झळकणार हे येत्या काळात कळलेच.
चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणतात, ‘’ ही चळवळ आजवरची संयुक्त महाराष्ट्राची सर्वात मोठी चळवळ होती. राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक अशा सगळ्याच बाजुने ही चळवळ होती. चित्रपटात हेच दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’ -
अप्सरा” चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च

प्रेम, राजकारण, ॲक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी “अप्सरा” या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, अप्सरा हा चित्रपट येत्या १० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील तीनही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले असून या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप, भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली असून ही गीते प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहेत. अभिनेता सुयश झुंजुरके, अभिनेत्री मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, अभिनेत्री मेघा घाडगे, शशांक शेंडे, विठ्ठल काळे, मयूर पवार, खान्देशरत्न सचिन कुमावत,विजय निकम, राजेश भोसले, आशिष वारंग,समीक्षा भालेराव, प्रज्ञा त्रिभुवन,संघर्ष भालेराव अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. राजा फडतरे यांनी छायांकन, निलेश राठोड यांनी संकलन, तर सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर, कृतिक माझिरे यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.
एका तरुणाच्या मनात असलेलं एका अप्सरेचं चित्र, त्याला भेटणारी तरुणी, त्याचं बदलणारं आयुष्य या संकल्पनेवर “अप्सरा” हा चित्रपट बेतला आहे. एक अनोखी प्रेमकथा असलेल्या अप्सरा या
चित्रपटाच्या ट्रेलरमधून कथेचा थोडाफार अंदाज बांधता येतो. तरुणाला भेटणारी त्याच्या मनातली अप्सरा आणि त्यानंतर होणारं राजकारण, त्या सगळ्याला तो तरूण कसा सामोरा जातो याचं कथानक चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुरेल गाणी, उत्तम अभिनय यासर्वाना अॅक्शनची जोडही कमालीची आहे. त्यामुळे “अप्सरा” हा चित्रपट प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार ठरणार आहे यात शंका नाही.
Trailer Link
https://youtu.be/LITwxtksQhY?si=N8MwbPbriUKri_BV -
‘कर्मवीरायण’ मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांच जीवनचरित्र

महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता १७ मे पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि घटना यांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे.
ट्रान्सएफएक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी निर्मिती केलेल्या “कर्मवीरायण” चित्रपटाची प्रस्तुती 7 वंडर्स चे पुष्कर मनोहर करत आहेत. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांचा सशक्त अभिनय पाहायला मिळणार आहे. योगेश कोळी यांनी छायाचित्रण,संतोष गोठोस्कर यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे.
लहान वयातच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव पडलेल्या भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात समाजात वर्चस्ववाद बोकाळला होता. त्यामुळे गरीब आणि बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. त्या मुलांनाही शिकण्याचा समान हक्क आहे असा भाऊराव पाटील यांचा ठाम विचार होता. त्या काळी अनेक लोकांनी भाऊरावांना विरोध केला. मात्र विरोधाला ज जुमानता शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य सुरूच राहिलं आणि विविध शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही शिक्षणाकडे वळू लागले. त्यामुळेच ग्रामीण भागातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत झाली. महाराष्ट्राला शिक्षणाच्या मार्गावर नेणारे भाऊराव कर्मवीर झाले. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट आता चित्रपटाद्वारे पाहता येणार आहे. -
“परंपरा” चित्रपटातील मिलिंद शिंदे यांच्या कामाचे रसिकांकडून कौतुक

प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेच्या जपणुकीवर लक्ष केंद्रित करणारा “परंपरा” हा लक्षणीय चित्रपट 26 एप्रिलला प्रदर्शित झाला. तब्बल 100 स्क्रीन्ससह हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशी दादरच्या प्लाझा येथे या सिनेमाचा प्रिमीयर धडाक्यात पार पडला. यावेळी मिलिंद शिंदे, जयराज नायर आणि अरुण कदम यांच्यासह या सिनेमातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ हजर होते.
समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या सिनेमात दाखवण्यात आला आहे. उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत, आशयघन कथानक असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी दणक्यात प्रतिसाद दिला होता.
हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो यांच्या स्टारगेट मुव्हीज या बॅनर अंतर्गत “परंपरा” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शन प्रणय निशाकांत तेलंग यांनी केले आहे. प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे आणि हरहुन्नरी अभिनेत्री वीणा जामकर यांच्या यात प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत प्रकाश धोत्रे, अरुण कदम, नम्रता पावसकर, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमण, भूषण घाडी, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांच्याही भूमिका पाहायला मिळतात.
चित्रपटाची पटकथा प्रणय निशाकांत तेलंग आणि संजय सावंत यांनी लिहिली असून छायाचित्रण निशा तेलंग यांनी केले आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना आनंद मेनन यांचे मधूर संगीत दिले आहे. श्रीकांत तेलंग यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे. -
संजू राठोडचं ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर

सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोड त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.त्याचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं सोशल मिडीयावर तुफान वायरल झाल आहे. आनंदाची बाब म्हणजे ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकलं आहे. ( New York Times square) ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ ( Gulabi saree) ला मिळाला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना संजू राठोड ( sanju rathod) म्हणाला की, गायक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करताना हे इतकं यश मिळेल याचा कधी विचारही केला नव्हता. अल्पावधीतच एवढं यश मिळालं यासाठी मी स्वत:ला फार भाग्यवान समजतो. आतापर्यंत माझ्या गाण्यांनी मिलियन व्ह्यूज चा टप्पा पार केला हाच आनंद माझ्यासाठी फार मोठा होता. त्यात आता न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर माझं गाणं झळकलं यामुळे माझ्या आनंदात आणखी भर पडली आहे. माझा आनंद मला शब्दांत व्यक्त करता येत नाही आहे. हे सगळं शक्य झालं ते माझ्या चाहत्यांमुळे. त्यांनी माझ्या गाण्यांना दिलेल्या प्रतिसादामुळे. त्यांच्या प्रेमामुळे मला आणखी प्रेरणा मिळाली आहे. चाहत्यांते ऋण मी कधीही विसरणार नाही.अशीच नवनवीन गाणी मी त्यांच्यासाठी कायम करत राहीन.
‘गुलाबी साडी’ या गाण्याला ( Marathi song) ‘यूट्यूब’वर ७० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ‘स्पॉटीफाय’वरही या गाण्याने १५ मिलियनचा टप्पा पार केला आहे.तसेच ‘यूट्यूब’वरील जागतिक स्तरावरच्या उच्चांक गाठणा-या व्हिडीओंमध्ये आणि ‘स्पॉटीफाय’च्या जागतिक वायरल गाण्यांमध्ये ‘गुलाबी साडी’ गाण्याचा समावेश करण्यात आला आहे. -
पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार ‘खास

आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी ‘उंची’ अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचे वाटतात. चित्रपट, मालिका, नाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या पुष्करच्या अभिनय कारकिर्दीत ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने भन्नाट योग जुळून आणला आहे.
अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचा ३० एप्रिलला वाढदिवस असतो. यंदा आपला ५५वा वाढदिवस साजरा करत असताना याच दिवशी रंगभूमीवरील आपल्या ५५ व्या नाटकाचा शुभारंभ ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने करणार आहे. आपल्या ३२ वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत रसिकांची मनं जिंकणारे पुष्कर या नाटकात ‘अतरंगी’ भूमिकेत दिसणार आहे. या नाटकाद्वारे पुष्कर वेगळी ‘उंची’ गाठणार आहेत. ती उंची कशी गाठणार? हे पाहण्यासाठी ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक पाहावं लागणार आहे.
‘पहिल्यांदाच बालनाट्यात काम करायला मिळणं आणि वेगळा रोल जो मला वेगळ्या उंचीवर नेणार आहे. ते करण्यासाठी उत्सुक असल्याचे पुष्कर यांनी सांगितले’. माझ्यासाठी ३० एप्रिल तारीख खास आहेच पण आमच्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकासाठी सुद्धा तारीख खास ठरावी. नाट्यरसिकांनी उत्तम प्रतिसाद देत ‘आज्जीबाई जोरात’चे जोरात स्वागत करावे, अशी आशा पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केली.
लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन ‘आज्जीबाई जोरात’ हे नवं कोरं AI बालनाट्यरंगभूमीवर घेऊन येतायेत. जिगीषा-अष्टविनायक संस्थेची निर्मिती असलेल्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकात सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे अशी कलाकारांची फळी आहे. हे नाटक विनोदाच्या अंगानं जाणारी फँटसी आहे. दिलीप जाधव, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर वेशभूषेची जबाबदारी कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी सांभाळली आहे. संगीत सौरभ भालेराव तर नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. -
Deepak Tijori’s Directorial ‘Tipppsy’ Trailer OUT NOW!

The trailer of the most anticipated film ‘Tipppsy’ is out now! Directed by Deepak Tijori and produced by Raju Chadha and Deepak Tijori, the narrative revolves around a bachelorette gone wrong, for a group of girl friends… when they get Tipppsy!
The movie stars Deepak Tijori, Alankrita Sahai, Natasha Suri, Kainaat Arora, Nazia Hussain, Sonia Birje, Harjinder Singh, Mandeep Kaur Sandhu, Danish Bhatt. Co-produced by Sana Khan and Anita Sharma, and associate produced by Ramesh Sharma, Panorama Studios Nationwide release, ‘Tipppsy’ is all set to hit cinemas on 10th May.
-
निशी- नीराजच्या लग्नात श्रीनुचे वाजले १२

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत निशी- नीराजचा लग्न सोहळ्याची लगबग सूर आहे. ह्यावेळी निशी खूप आनंदात आहे तिला जसे हवे होते तसं तिचं लग्न होत आहे. निशी म्हणजेच दक्षता जोईलने आपल्या ह्या लुक बद्दल बोलताना सांगितले, ” तर फायनली निशीला जसं हवं होतं तसं लग्न होतं आहे म्हणून निशी खूप खुश आहे. गेल्यावेळी निशीचा लुकमध्ये खूप साधेपण होता आणि त्या लुकच्या ही प्रतिक्रिया खूप छान मिळाल्या होत्या. म्हणून तो फील न सोडता कोकणातला टच देऊन फ्रेश रंग आणि साडीची स्टाईल ठेवली आहे. मेकअप अगदी सुद्धा सिम्पल पण चांगला दिसेल असा ठेवला आहे. अपेक्षा आहे की प्रेक्षकांना हा ही लुक आवडेल.” पण ह्या लग्नात असा कोणतरी आहे ज्याच्या चेहऱ्यावर १२ वाजले आहेत कारण त्याच्या लग्नाचा विचार खोत कुटुंब करत आहे आणि श्रीनुची वधू म्हणून ते चारूचा विचार करत आहे. श्रीनुच्या हृदयात ओवी आहे ह्याची कल्पना खोत कुटुंबाला नाही. पण चारूच्या मनात श्रीनू भरलाय ती मंजूशी बोलताना सतत त्याचा उल्लेख करते. दादाखोत सुद्धा चारूसाठी स्थळं बघत आहेत. सुरुवातीला चारूच्या वागण्याकडे फारसं लक्ष न देणारा श्रीनू आता सावध राहत आहे. त्यातून लाली सुद्धा मुद्दाम काही गोष्टी घडवून आणण्यासाठी धडपडते आहे. अशातच ओवीचा वाढदिवस ही आहे. चारुला एव्हाना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागलेली आहे. त्यामुळे ओवीचा वाढदिवस श्रीनूला साजरा करता नाही याच्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हे सर्व चालू असताना दुसरीकडे निशी आणि नीराजच्या लग्न विधी सुरु आहेत. खूप काळानंतर घरात एक मंगल कार्य पार पडत आहे म्हणून सगळे आनंदात आहेत.

तर ह्या सगळ्या गोंधळात श्रीनु ओवीचा वाढदिवस साजरा करू शकेल का? बघायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ दररोज रात्री ८:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

