Home

  • तेजस्विनी पंडित साकारणार ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’

    राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले… यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले .बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने स्त्रीशक्ती व मातृशक्तिचे चिरंतन उदाहरण आपल्या सर्वांस दिले. जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटात जिजाऊंची भूमिका तेजस्विनी पंडित साकारणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर झळकले असून राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा यात दिसत आहे. ६ फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत.

    चित्रपटाबद्दल दिग्दर्शिका अनुजा देशपांडे म्हणतात, “राजा नंतर घडतो, आधी घडते ती राजमाता’’ राजमाता जिजाऊसाहेब या लोकजीवनाला जोडणारी अस्मिता तर आहेतच पण त्याचबरोबर मराठी माणसाला त्याच्या अस्तित्वाची-सामर्थ्याची जाणीव करून देणारी एक शक्ती आहेत . हा अभिमान व जाणीव उराशी बाळगून वीरकन्या ते वीरमातेच्या जीवनकाळचे कथानक २-२.३० तासात मांडणे एक लेखिका म्हणून माझ्यासाठी आव्हानात्मक होते . जिजाऊसाहेबांच्या आयुष्यावरील वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आहे. जिजाऊसाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व ,त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेले प्रसंग-घटना आम्ही प्रेकक्षकांना दाखवणार आहोत.
    एक युगपुरुष घडविणाऱ्या ह्या विलक्षण वात्सल्यमुर्तीला मानाचा मुजरा व साष्टांग प्रणिपात. जिजाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व अभ्यासत /लिहित असताना माझ्या डोक्यात सारखा विचार असायचा की, ही असामान्य भूमिका साकारण्यासाठी उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम अभिनय असणारी अभिनेत्री मला हवी होती . तेजस्वीनी एक दर्जेदार अभिनेत्री तर आहेच शिवाय एक व्यक्ति म्हणून ती प्रेमळ आहे. त्याचसोबत एक उत्तम मार्गदर्शक व सहाय्यक आहे. तिच्या कामाप्रती ती खूप समर्पित व प्रामाणिक आहे. जिजाऊंचा करारीपणा तिच्यात झळकतो. मला पूर्ण खात्री आहे ती जिजाऊसाहेबांची भूमिका अगदी चोखपणे साकारेल.’’

    तेजस्विनी पंडित आपल्या भूमिकेबद्दल बोलते, ‘’ज्या स्त्रीने गुलामगिरीच्या काळोखात जखडलेल्या हिंद प्रांताला स्वतंत्र राज्य – स्वराज्य मिळावे हे स्वप्न पहिल्यांदा पाहिले, त्यासाठी वर्षानुवर्ष त्या झिजल्या, त्या भूमिकेवर अटल राहिल्या. कुठलीही गोष्ट प्रवाहाच्या विरोधात जाऊन करणे म्हणजेच क्रांती होय !! अशा राजमाता स्वराज्य जननी जिजाऊसाहेबांची भूमिका करायला माझी निवड केली ह्याबद्दल मी अनुजा ताईंची शतशः आभारी आहे. ही भूमिका करायला मिळणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यांना घडवले ती माऊली स्वतः निश्चितच त्याच ताकदीची, पराक्रमी, अत्यंत कुशल राजनैतिक आणि मुख्य म्हणजे दूर दृष्टीची असणार यात कसलेच दुमत नाही . अशा ह्या विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच!’’

  • एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या सदानंद कुंदर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान!

    ‘एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रा. ली. चे प्रवर्तक सदानंद कुंदर यांना ‘आयसीटी’ मुंबई (पूर्वीचे UDCT) आणि ‘द कलर सोसायटी’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या परिषदेत कलर इंडस्ट्रीतील प्रतिष्ठेच्या ‘जीवनगौरव पुरस्काराने नुकतेच मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. श्री. कुंदर यांना ‘पेंट’ उद्योग क्षेत्रातील भरीव कार्यासाठी हा पुरस्कार माननीय श्री. जे.बी. जोशी, पद्मभूषण व आयसीटीचे माजी संचालक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


    सौजन्य कलर च्या संचालिका सुश्री प्रिया भूमकर, उडुपी कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे सीईओ श्री. हरी कुमार आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
    ‘पेंट’ (रंग) निर्मिती उद्योग क्षेत्रातील महनीय व्यक्तिंना त्यांच्या अद्वितीय कार्याची दखल म्हणून हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. यापूर्वी एशियन पेंट्स चे श्री. अश्वीन दाणी, कॅमलीन चे श्री. सुभाष दांडेकर आदि मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
    सदानंद कुंदर यांच्या पेंट क्षेत्रातील नाविन्यपूर्ण योगदानांबद्दल त्यांना हा विशेष प्रेरणादायी ‘जीवनगौरव पुरस्कार’ बहाल करण्यात आला आहे. सदानंद कुंदर हे पेंट उत्पादन क्षेत्रात गेली ४० वर्षे धडाडीने कार्यरत असून त्यांचे पेंट निर्मिती, जहाजबांधणीसाठी पेंट कॉन्ट्रॅक्टिंग आणि ONGC या क्षेत्रांमध्ये मध्ये मोलाचे योगदान आहे.
    1981 मध्ये, वयाच्या 18½ व्या वर्षी, घरच्या आर्थिक अडचणींमुळे श्री. कुंदर उडुपीहून मुंबईत आले आणि त्यांनी अवघ्या 9/- रुपये रोजंदारीवर कनिष्ठ पेंट पर्यवेक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. 1984 मध्ये स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु करून घोडबंदर, ठाणे येथील शिपयार्ड कंपनीचे पहिले कंत्राट मिळविण्यात ते यशस्वी झाले. तेव्हापासून गेली चार दशके पेंट उद्योग क्षेत्रात त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले असून त्यांची घोडदौड अविरत सुरु आहे. माझगाव डॉक लिमिटेड, एल अँड टी, चौगुले ग्रुप, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून त्यांना अग्रक्रमाने प्राधान्य दिले जाते.


    पुरस्कार मिळाल्यावर कृतज्ञता व्यक्त करताना, सदानंद कुंदर म्हणाले “पेंट उत्पादन क्षेत्रात मी केलेल्या कार्याची दखल घेऊन मला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी ऋणी आहे. नव्या भारताच्या विकासात भरीव योगदान देण्याऱ्या तरुण उद्योजकांसाठी माझा अनुभव नक्कीच प्रेरणादायी ठरेल, त्यातून भावी प्रतिभावंत उद्योजक या क्षेत्राला लाभतील अशी मला अशा आहे.”
    एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड बद्दल:
    एक्सेल पेंट्स, हाय परफॉर्मन्स कोटिंग्ज उत्पादनातील एक अग्रगण्य कंपनी आहे , भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, माझगाव डॉक, L&T, चौगुले ग्रुप, भारत फोर्ज, ONGC व संरक्षण क्षेत्रातील अनेक OEM आस्थापनांसाठी विश्वासू भागीदार म्हणून काम करते.

  • लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे ‘लोकशाही’ चित्रपटाचे शीर्षक पोस्टर लॉंच

    कृपया प्रसिद्धीसाठीशाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात सर्वांनीच शिकलेली एक महत्वपूर्ण ओळ म्हणजे ‘लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही.’ याच आशयाची ओळ असलेला आणि गूढ आकर्षण निर्माण करणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘लोकशाही’ या मराठी चित्रपटाचा अनोखा गतिशील शीर्षक पोस्टर नुकताच सर्व सोशल मिडियावर प्रदर्शित होऊन महाराष्ट्रभर अत्यंत वेगाने पसरत आहे.

    सुशीलकुमार अग्रवाल निर्मित आणि संजय अमर दिग्दर्शित ‘लोकशाही’ चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून अंगावर शहारे आणणाऱ्या चित्रपटाच्या दृकश्राव्य शीर्षकाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. पोस्टरमध्ये उंच इमारती आणि त्यांना लागूनच असणारे झोपडपट्टी दिसत आहेत. पांढरपेशी भांडवलदारांनी तयार केलेलं स्वत:चं अलिशान शिखर आणि भांडवलदारांच्या भागीदारीत तेवढ्याच हिस्याचे पात्र असणारे झोपडपट्टीत राहणाऱ्या वंचित लोकांचे कदाचित ते प्रतीक असल्याचे दिसत आहे. तसेच लालभडक धुकट वातावरण आणि चित्रपटाचे नाव, एकूणच चित्रपट राजकारणाशी संबंधित संघर्षाला चिन्हांकित करत असल्याचे दिसत आहे.

    पोस्टरमध्ये एकामागोमाग येणारे शीर्षकाचे शब्द आणि शब्दांना साथ देत गूढ आणि उस्फूर्त करणारं पार्श्वसंगीत चित्रपटाबद्दल कमालीचं आकर्षण निर्माण करत आहे. पोस्टरमध्ये अद्याप कलाकारांची नावे घोषित केलेले नसून प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून कलाकारांबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांना मजेदार उत्तेजित करत आहे. “नुकत्याच प्रदर्शित केलेल्या ‘लोकशाही’ चित्रपटाच्या पोस्टरला प्रेक्षकांचा हा विलक्षण प्रतिसाद पाहून आम्हालाही चित्रपटाच्या प्रदर्शनाची खूपच आतुरता लागली आहे. लवकरच चित्रपटाचा पूर्ण पोस्टर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच शिगेला पोहचणार आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

  • मराठी महिला कलाकार ‘मकरसंक्रांत’ कशी साजरी करतात…

    वर्षाचा पहिला सण ‘मकरसंक्रांत’ जवळ आला आहे. तीळगुळाचा खमंग सुगंध हवेत पसरला आहे, बाजारात विविध रंगांचे पतंग, सजावटीच्या वस्तू आणि हलव्याचे दागिने पाहायला मिळतायत. सण म्हंटल की त्याच्या आठवणी आणि त्याला साजरा करण्याचा उत्साह सगळ्यांमध्ये असतो आणि कलाकार काही वेगळे नाही. झी मराठीच्या कलाकारांनी मकरसंक्रांत निमित्ताने त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

    ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील उमा म्हणजेच खुशबू तावडे ने सांगितले, “खूप खास आहे ही मकरसंक्रांत आमच्यासाठी कारण नवीन घरात पहिला सण आणि वर्षाचा ही पहिला सण आहे. नवीन घरात मार्गशीर्षातल्या गुरुवारी स्थलांतर केले. हंगाम बदलतो त्यासोबत खाण्या-पिण्याच्या सवयी ही बदलतात. तीळ आणि गुळाचा खाण्यात समावेश होतो. ह्या काळात मी काळे कपडे परिधान करते जसे मकरसंक्रांतीच्या दिवशी सगळे काळे कपडे घालतात कारण त्याने उब मिळते. हळदी-कुंकू माझ्या सासरी म्हणजे सायनला होतं, एकदम पारंपरिक पद्धतींनी साजरा केली जाते मकरसंक्रांत. माझा मुलगा राघव थोडं बोलायला लागला आहे तर त्याच्या तोंडातून तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे ऐकण्याचं कुतहूल आहे मला.”

    ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मधली नेत्रा आणि महाराष्ट्राची लाडकी तितिक्षा तावडे म्हणते, मकरसंक्रांत मी कुटुंबासोबत साजरी करते. माझी लहानपणाची आठवण आहे जेव्हा मी, खुशबू, आई आणि बाबा आम्ही एकत्र बसून तिळगुळाचे लाडू बनवायचो. मला लक्षात आहे मला ते नीट बनवायला जमायचे नाही आणि सारण गरम असल्यामुळे ते लाडू माझ्या हातात फुटायचे. गेले काही वर्षापासून मी उत्तम तीळ गुळाचे लाडू बनवते. आई- बाबा दुकान बंद करून उशिरा रात्री परतयायचे पण एकत्र बसून लाडू बनवायचा कार्यक्रम दरवर्षीचा ठरलेला होता. मला तिळगुळाचे लाडू प्रचंड आवडतात मी एका खेपेत डब्बा भरून लाडू संपवायचे. ह्या थंडीच्या ऋतूत तिळाच्या लाडवाचे फायदे ही आहे ते आपल्या शरीराला उब देतात. ह्या वर्षी सुद्धा आई-बाबां सोबत सण साजरा करायचा हाच बेत आहे. मी कधी पतंग उडवले नाही पण खुशबू जेव्हा गुजरातला शिकत होती तेव्हा तिने पतंग उडवले आहेत आणि पतंग उडवण्या मागचं ही कारण आहे की तुमच्या शरीराला सूर्याची उष्णता मिळाली पाहिजे. तुम्हा सर्वांना आमच्या कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! “तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि बघायला विसरू नका

    ‘सारं काही तिच्यासाठीची’ निशी म्हणजेच दक्षता जोईल म्हणते, “मला लहानपणी आई- बाबानी संक्रांतीचं महत्व समजावलं होत आणि तेव्हा पासून मला ह्या सणाची उत्सुकता होती. तर मला सर्वांना हा सण साजरा करण्यामागचं कारण सांगायला खूप आवडेल. मकरसंक्रांतला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो ज्योतिष शाश्त्रानुसार आणि ह्या सणाच्या दिवशी जे पदार्थ आपण बनवतो, खातो ते ह्या हंगामामध्ये पिकतात म्हणजे मका, शेंगदाणे, लाह्या इत्यादी गोष्टी. हे एक मनोरंजक तथ्य आहे हा सण साजरा करण्यामागचं. ह्या सणाला काळे कपडे घालण्या मागचं कारण हे आहे की काळे कपडे हिवाळ्यात उब देतात. माझी मकरसंक्रांतची आठवण सांगायची झाली तर हळदी कुंकूला मिळणारे घरचे नरम तीळगुळाचे लाडू आणि वाण जे आईला मिळतात, आणि ते मिळालेलं वाण जर माझ्या उपयोगाचं असेल तर ते माझे होऊन जातं. ह्या वर्षीही मी वाट पाहत आहे हळदी कुंकूंचे आणि तिळगुळांचे.”

    ‘अप्पी आमची कलेक्टर’ मधली अप्पी म्हणजे शिवानी नाईक म्हणते, ” मकरसंक्रातीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. मागचे २-३ वर्ष मी अहमदनगर मध्ये मी संक्रांत साजरी करत होते, कारण अहमदनगर महाकरंडक स्पर्धेचा शेवटचा दिवस असायचा हा. वर्षाचा पहिला सण आणि तो ही नाटकाच्या ग्रुप सोबत साजरा करण्याचा उत्साह वेगळाच असतो. एका कलाकारालासाठी ह्याऊन आनंदाची गोष्ट काय असू शकते. पण जेव्हा मी घरी असते तेव्हा आम्ही पतंग उडवतो सर्व एकत्र मिळून, गोडाचं खातो जे ह्या हंगामात आपल्या शरीराला उष्णता देतात जसं तिळाचे आणि गुळाचे पदार्थ त्या सोबत सगळ्यांशी गाठीभेटी होतात. पण ह्या वर्षी हा सण ‘अप्पी आमची कलेक्टरच्या’ सेट वर शूटिंग करत साजरा केला जाणार आहे.

    ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मध्ये विरोचकाची भूमिका साकारणाऱ्या सुरुची अडारकर ची लग्नानंतरची ही पहिली मकरसंक्रांत आहे आणि सुरुचीने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, “माझ्यासाठी खूप खास दिवस आहे हा कारण लग्नानंतरचा माझा हा पहिला सण आहे. पण मी आणि पियुष आम्ही दोघेही शूटिंग मध्ये व्यस्त आहोत. मला लक्षात आहे की मी माहेरी होती तेव्हा हळदी-कुंकू समारंभाची एक वेगळीच मज्जा असायची. आमच्याकडे लग्नानंतर पहिला सण साजरा नाही करत पण तिळगुळ खाणे आणि इतर गोष्टीचा आम्ही नक्की आनंद घेणार आहोत.”

    झी मराठीवर बघायला विसरू नका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ रात्री १०:३० वा., ‘सारं काही तिच्यासाठी’ संध्या ७:३० वा. आणि ‘अप्पी आमची कलेक्टर’ संध्या ७ वा.

  • Hindu Tan-Man: Dive into the Soulful Rhythms of Shri Atal Bihari Vajpayee’s Verses!

    A man of many values and a poet by heart, Shri Atal Bihari Vajpayee, wrote one of his popular poem “Hindu Tan-Man” during his young age. In Pankaj Tripathi starrer Main Atal Hoon, the poem gets a high octane rendition. The song launch took place in Lucknow, the city where Atal Ji served as the MP before retiring from active politics.

    The words for the song are by our beloved leader, Shri Atal Bihari Vajpayee making it extra special for the audiences. Sung by Kailash Kher the song is composed by Amitraj.

    Vinod Bhanushali presents, directed by Ravi Jadhav, and written by Rishi Virmani and Ravi Jadhav, “Main ATAL Hoon”, a Bhanushali Studios Limited and Legend Studios production, is produced by Vinod Bhanushali, Sandeep Singh, and Kamlesh Bhanushali. The film will release in cinemas on the 19th of January 2024.

    The song by Amitraj and sung by Kailash Kher from ‘Main ATAL Hoon’ Out Now!_

    Link: https://bit.ly/MainATALHoon-HinduTanMan-SongOutNow

  • आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम !

    १३ जानेवारी रोजी, दुपारी १२ वाजता माहिम येथील सिटीलाईट सिनेमा येथे नाट्य माहितीपटाचे खास स्क्रिनिंग


    निझामाच्या क्रूर रझाकारांपासून मराठवाड्याच्या मुक्तिसाठी लढा देणाऱ्या शूरवीर स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या धगधगत्या संघर्षाबरोबरच मराठवाड्याच्या मातीचा झळाळता गौरवास्पद इतिहास मांडणारा नाट्य माहितीपट आशियाई चित्रपट महोत्सवात सादर केला जाणार आहे.

    सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती असलेल्या या नाट्य माहितीपटाचे खास स्क्रिनिंग शनिवारी १३ जानेवारी रोजी, दुपारी १२ वाजता माहिम येथील सिटीलाईट सिनेमा येथे करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

    राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या `मुक्तिसंग्राम: कथा मराठवाड्याच्या संघर्षाची’ या नाट्य माहितीपटाची निर्मिती सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने केली आहे. तर प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे, समीर विद्वांस विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे अशा मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकारांनी या माहितीपटात भूमिका साकारली आहे.

    सिलेक्टेड करस्पॉन्डन्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा आदी पुस्तकांचा संदर्भ घेत माहितीपटाची संहिता लिहीण्यात आली आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास मोठ्या पडद्यावर प्रथमच येत आहे. या नाट्य माहितीपटातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास डॉ. ढाकणे यांनी व्यक्त केला.

  • Bhushan Kumar and Anurag Basu’s joint production ‘Metro…इन दिनों’ to now release on 13 September 2024!

    The chronicle stars an ensemble cast of Aditya Roy Kapur, Sara Ali Khan, Anupam Kher, Neena Gupta, Pankaj Tripathi, Konkana Sensharma, Ali Fazal and Fatima Sana Shaikh_

    Bhushan Kumar and Anurag Basu’s ‘Metro…इन दिनों’, has just announced its new release date. The film will now hit the theaters on 13th September 2024.

    Get ready to be swept away by the heartwarming stories of modern-day couples brought to life by a talented ensemble cast. Aditya Roy Kapur, Sara Ali Khan, Anupam Kher, Neena Gupta, Pankaj Tripathi, Konkona Sensharma, Ali Fazal, and Fatima Sana Shaikh will grace the screen with their incredible performances.

    Gulshan Kumar & T-Series in association with Anurag Basu Productions Pvt Ltd present Metro… इन दिनों . Directed by Anurag Basu, music by Pritam, produced By Bhushan Kumar, Krishan Kumar, Anurag Basu and Taani Basu the film will release on 13th September, 2024!

    ****
    Producer #BhushanKumar and the ace director #AnuragBasu ‘s Metro…इन दिनों gets a new release date! With an ensemble cast of #AdityaRoyKapur, #SaraAliKhan, #AnupamKher, #NeenaGupta, #PankajTripathi, #KonkonaSensharma, #AliFazal, and #FatimaSanaShaikh, this anthology will hit theatres on 13th September, 2024! Bringing together heartwarming stories of contemporary couples, #MetroInDino is produced by #TSeries and #AnuragBasuProductions

  • मनाला उभारी देणारे ‘मन बेभान’ गाणे प्रदर्शित

    पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच झळकले असतानाच आता या चित्रपटातील मनाला भिडणारे असे गाणे प्रदर्शित झाले आहे. जगण्याला नवे पंख देऊन पुन्हा भरारी घ्यायला लावणाऱ्या या फ्रेश गाण्याचे ‘मन बेभान’ असे बोल असून या सुंदर गाण्याला सुहित अभ्यंकर यांचा आवाज आणि श्रवणीय संगीत लाभले आहे. तर मनाला स्पर्श करणाऱ्या या गाण्याचे बोल मंदार चोळकर यांनी लिहिले आहेत. हे गाणे पूजा सावंत आणि चेतन मोहतुरे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

    या गाण्याबद्दल गायक सुहित अभ्यंकर म्हणतात, ” या गाण्याचे बोल अतिशय हृदयस्पर्शी आहेत. कधी कधी आयुष्यात आलेली मरगळ दूर करण्यासाठी हे गाणे नक्कीच स्फूर्तिदायी ठरेल. आयुष्याचा अर्थ सांगणारे, स्वप्नांचा मागोवा घेणारे हे गाणे आहे. त्यामुळे या गाण्याचे संगीत तसेच उत्साहाने भरलेले असणे आवश्यक होते आणि मला आनंद आहे की, अपेक्षित असे संगीत मला या गाण्यासाठी देता आले. हे गाणे ऐकायला जितके छान वाटते, तितकेच त्याचे सादरीकरणही उत्कृष्ट आहे.”

    दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, ” कोणत्याही चित्रपटातील गाणे हे त्याचा आत्मा असतो. संगीतातून अनेक भावना व्यक्त केल्या जातात. सोडूनी कालचे आज जगताना, तू नवा रंग दे आज स्वप्नांना, जीवनाला उद्देशून असणारे हे गाणे बरंच काही सांगत आहे.”

  • शेतकरी एक ब्रॅण्ड म्हणून जन्माला येणारे!’, ‘नवरदेव (Bsc Agri)’ ट्रेलर रिलीज

    शेतकरी राजाची मातीशी असणारी घट्ट नाळ, त्याच मातीतून पीक उगवण्याची तळमळ आणि त्याच शेतीमुळे त्याचं न जमणारं लग्न… याच विषयाला हात घालणारा चित्रपट ‘नवरदेव (Bsc Agri)’ २६ जानेवारीला प्रदर्शित होतोय. नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले. या दमदार ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रतिसादही दमदारच मिळतोय.

    तरूण शेतकऱ्याच्या भूमिकेतील क्षितीश दाते पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तर त्याच्या साथीला प्रियदर्शिनी इंदलकर, नवरी म्हणून त्याला मिळणार की नाही, हे चित्रपटगृहात जाऊनच बघावं लागेल!

    बी. एस. सी. अॅग्री केलेल्या महत्त्वाकांक्षी राजवर्धनला लग्नासाठी कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, त्याला नवरी मिळते की नाही, याची कथा या चित्रपटातून बघायला मिळणार आहे.

    आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी, तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला, कितीही प्रगत शेती केली, तरीही आज त्याला लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालंय. चित्रपटातील तरूण शेतकरी गावकऱ्यांना एकत्र करुन प्रगत शेती करतोय, जिद्दीने लढायला शिकवतोय. मात्र, असे असूनही नवरीचे आई-वडिल नोकरदार मुलांनाच आपल्या मुली देऊ इच्छितात. या सगळ्या अडचणींवर मात करत, शेतकरी राजवर्धन नवरीच्या मनात मळा फुलवणार का हे थिएटरमध्ये जाऊनच बघावं लागेल!

    दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी अगदी योग्य पद्धतीने भाष्य करत हा विषय किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले आहे. तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेलं या चित्रपटातील ‘लाल चिखल’ हे रॅप नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलं! याचे शब्द आणि लय ही मनाला पिळवटून टाकणारी आहे.

    नवरदेव (Bsc Agri)’ चित्रपट २६ जानेवारीला होणार प्रदर्शित

    अभिनेता क्षितीश दाते या चित्रपटात तरूण शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसेल, त्यासोबतच प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, तानाजी गळगुंडे, विनोद वणवे अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळेल. एका गंभीर सामाजिक प्रश्नाला हलक्या-फुलक्या पद्धतीत प्रेक्षकांसमोर ठेवण्याचे काम या चित्रपटाची टीम करत आहे.

    आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित नवरदेव या चित्रपटाचे क्रिएटीव्ह दिग्दर्शक विनोद वणवे हे आहेत, तर विनोद सातव हे क्रिएटीव्ह हेड आहेत. हा चित्रपट २६ जानेवारीला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

  • अवयवदाननाची महती सांगणारा “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी!

    अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. “८ दोन ७५” म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल.

    उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी – सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. वैभव जोशी यांनी गीतलेखन, अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत.

    “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट देहदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे. देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीनं मांडल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसतं. त्याशिवाय वैद्यकीय शिक्षणावरही या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे उत्तम स्टारकास्ट असलेला, महत्त्वाचा विषय मनोरंजक पद्धतीनं मांडणारा “८ दोन ७५”: फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट आता १९ जानेवारीला चित्रपटगृहात पाहता येईल.

    Trailer Link

    https://youtu.be/Sm4gFXa24S0?si=a1lJeeaJ3aNRKO5B