Home

  • एक्ट्रेस अंकिता लोखंडे बनीं बिग बॉस 17 की नई कैप्टन!

    इवेंट्स के सरप्राइज़िंग मोड़ में, अंकिता लोखंडे बिग बॉस सीजन 17 में घर की नई कप्तान के रूप में उभरी हैं। एक्ट्रेस ने हाल ही में कैप्टेंसी टास्क जीता है। वह अपने पति विक्की जैन के साथ शो में शामिल हुई हैं।

    अंकिता की जीत ने उन्हें इम्युनिटी, लक्जरी रूम एक्सेस और टास्क असाइनमेंट में अथॉरिटी जैसे स्पेशल प्रिविलेज के साथ कप्तानी दिलाई। कैप्टेंसी टास्क के दौरान, अंकिता ने बेहतरीन स्ट्रेटेजी का प्रदर्शन किया, उन्होंने अपने सिक्कों की देखरेख की और साथ ही बाकी काँटेस्टेन्ट्स के बीच विवाद के दौरान कुछ सिक्के हासिल करने में भी कामयाब रही। जहां पति विक्की, ईशा मालविया और नील भट्ट ने उनकी जीत का जश्न मनाया। वहीं बाकी काँटेस्टेन्ट्स ने ऑन-कैमरा टिप्पणियों के माध्यम से अपनी नाराजगी जाहिर की। अंकिता ने आर्ग्यूमेंट्स, कॉन्ट्रोवर्सीज और खुशनुमा पलों के जरिये रियलिटी शो में अपनी उपस्थिति से दर्शकों को खूब एंटरटेन किया है। विक्की के साथ अपनी लव स्टोरी के बारे में उनकी कैंडिडनेस शो में एक रोमांटिक टच जोड़ती है।

    जैसे कि अंकिता विक्की के साथ नई कप्तान बनीं, यह देखना दिलचस्प होगा कि वह जिम्मेदारियों और चैलेंजेज को कैसे संभालती हैं। क्या वह शांत रहेगी या नियंत्रण खो देंगी? बाकी काँटेस्टेन्ट्स उनके फैसले पर कैसे रिएक्ट करेंगे? क्या वह नॉमिनेशन से बचकर फाइनल में पहुंच पाएगी? तब तक के लिए, फैंस इस पावर कपल की सफलता के लिए खुश हो सकते हैं।

  • टीप्स मराठीच्या “श्रीदेवी प्रसन्न “ या पहिल्या-वहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

    लग्न का करावं, कुणाशी करावं याची प्रत्येकाची आपली अशी कारणं आणि कल्पना असतात. टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपट म्हणजे लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची कहाणी. टीप्स मराठीचा हा पहिला वहिला मराठी चित्रपट आहे. नवीन वर्षात टीप्स मराठी आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस देणार आहे. मराठीसोबतच बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली ब्युटिफूल सई ताम्हणकर आणि सध्या मराठीतला आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा हॅंडसम सिद्धार्थ चांदेकर पहिल्यांदाच टीप्स मराठीच्या श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आणि यातील सई-सिद्धार्थची दिसून आलेली केमिस्ट्री आणि संवादांची जुगलबंदी चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवून गेली. विशाल विमल मोढवे दिग्दर्शित ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

    ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात सई आणि सिद्धार्थ या मुख्य व्यक्तिरेखांसोबतच सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी अदिती मोघे यांनी उचलली असून मराठीतील प्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी यातील गाणी संगीतबद्द केली आहेत.

    ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाचं नाव नुसतं फिल्मी नाही तर याचं कथानकच टोटल फिल्मी म्हणावं लागेल. ‘लव एट फर्स्ट साईट’ चं स्वप्न मनात बाळगत प्रेमाच्या भन्नाट कल्पना विश्वात वावरणारा प्रसन्न, मॅट्रिमोनी साइटवर ‘श्रीदेवी’ या
    नावाच्या उत्सुकतेपोटी तिला रिक्वेस्ट पाठवतो आणि ती अॅक्सेप्ट देखील करते.
    या दोन टोकांच्या माणसांची मनं जुळतात की नाही,त्या दरम्यान नेमकं काय काय घडतं या कथानकाला ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटाच्या माध्य मातून दिलेला फिल्मी तडका रसिक प्रेक्षकांचे १०० टक्के मनोरंजन करणार यात शंकाच नाही.

    सई-सिद्धार्थच्या आगळ्या-वेगळ्या लव्हस्टोरीनं वाढवली रिलीजची उत्सुकता…
  • सोनू सूद बने विकलांगों की आवाज़! सरकार से उनकी जरूरतों को प्राथमिकता देने का आग्रह!

    परोपकार के प्रति अपनी अटूट प्रतिबद्धता का एक और प्रदर्शन करते हुए, सोनू सूद डिसेब्लड और ज़रूरतमंद लोगों की मदद करना जारी रखते हैं। देश के डिसेब्लड लोगों की आवाज बनते हुए, हाल ही में उन्होंने सोशल मीडिया पर एक पोस्ट साझा किया। इसमें संबंधित अधिकारियों और राज्य सरकारों से विकलांग लोगों के लिए बेसिक ग्रेच्युटी और मिनिमम पेंशन पर पुनर्विचार करने और बढ़ाने का आग्रह किया गया। पोस्ट का कैप्शन था:

    “माय न्यू ईयर रेसोलुशन

    “राइट्स फ़ॉर द डिसेब्लड”

    मैं संबंधित अधिकारियों और राज्य सरकारों से अनुरोध करता हूं कि वे विकलांगों लोगों की बेसिक ग्रेच्युटी और मिनिमम पेंशन को सुधारें और बढ़ाएं, ताकि वह अपनी जरूरतों को पूरा कर सकें। उनके सामने आने वाली चुनौतियों को प्राथमिकता दी जानी चाहिए ताकि उनका वित्तीय तनाव कम हो और वे भी सक्षम हो सकें।”

    https://www.instagram.com/reel/C1lWl9roaLN/?igsh=MTRoNmE5OTRvMmptOQ==

    उनके वर्क फ्रंट की बात करें तो, वह “फतेह” फिल्म पर काम कर रहे हैं, जिसे ज़ी स्टूडियो और उनकी प्रोडक्शन कंपनी, शक्ति सागर प्रोडक्शंस द्वारा को-प्रोड्यूस किया जा रहा है। बेहतरीन एक्शन और एक्सोटिक लोकेशन्स के साथ यह एक अद्भुत फिल्म लग रही है। इस फ़िल्म में सोनू और जैकलीन फर्नांडीज लीड रोल में हैं।

  • प्रकाश आंबेडकर अवतरले महात्मा फुलेंच्या रूपात

    महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या संघर्षमयी प्रवास दाखवणारा ‘सत्यशोधक’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने अकोला येथील सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली, यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक कंगोरे उलगडले, तसेच त्यांची प्रेमकहाणीही प्रेक्षकांना सांगितली. याच कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी म. फुलेंसारखी पगडी घालून आणि हातात मशाल घेऊन कार्यक्रमात प्रवेश केला, त्यामुळे उपस्थितांचे लक्ष आंबेडकरांकडे वेधले गेले.

    अकोला येथील सह्याद्री फाऊंडेशनने सत्यशोधक चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाश आणि अंजली आंबेडकर यांची मुलाखत घेतली. मुलाखतकार हे दुसरे तिसरे कोणी नसून या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर आणि म. फुलेंच्या भूमिकेतील अभिनेते संदीप कुलकर्णी होते. त्यामुळे या मुलाखतीला आणखीनच रंगत आली. त्यांच्यातील संवादामधून प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांसमोर आली. मुलाखतकारांनी त्यांचे भावनिक अंतरंग उलगडले. यावेळी अंजली यांनी सांगितले की, “मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी आमची मैत्री घडवून आणली आणि अशाप्रकारे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आम्ही विवाह केला, त्यामुळे आमचा मित्रांनी जमवलेला प्रेमविवाह आहे.’’ प्रकाश आंबेडकर हे जनतेचे नेते असल्याने कायमच लोकांच्या गराड्यात असायचे, त्यामुळे आम्हाला भेटण्यासाठी वेळ मिळायचा नाही, मात्र आम्ही बऱ्याचदा ट्रेनमध्ये भेटायचो अशीही आठवण यावेळी अंजली यांनी सांगतिली. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान या दोघांच्या आवडत्या असल्याने त्यांचा एकही चित्रपट आम्ही चुकवला नाही, असे अंजली यांनी सांगितले.
    ‘सत्यशोधक’ चित्रपटातही म. फुले आणि सावित्रीमाई यांची एक प्रेमळ आणि हळवी बाजू दाखवण्याचा दिग्दर्शकांचा आग्रह राहिला आहे. त्यामुळे समाजकार्यातही जोडीदाराचा पाठिंबा आणि साथ ही किती महत्त्वाची असते, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळेलच.

    समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित , संकल्पना – राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत. शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती मध्ये निखिल पडघन, देवानंद मोहोड, मंगला वानखडे आणि निता गवई याचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारी, २०२४ रोजी प्रदर्शित होईल.

  • ओली की सुकी’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

    प्रत्येक नवा दिवस आपल्यासोबत एक नवीन संधी घेऊन येतो, अशाच एका प्रेरणादायी विषयावर आधारित ‘ओली की सुकी’ चित्रपट ४ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘आनंद दिलीप गोखले’ यांनी केले असून चित्रपटात तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, शर्वरी लोहकरे, संजय खापरे, सुहास शिरसाट आणि वर्षा उसगांवकर हे सुप्रसिद्ध अभिनेते दिसणार आहेत.


    चित्रपटाची कथा झोपडपट्टी आणि त्यातील आयुष्यात भरकटलेल्या मुलांभोवती फिरते. झोपडपट्टीतील टुकार मुलांच्या दोन गटांत नेहमी विनाकारण भांडणे होत राहतात. ही मुले वाईट वळणांच्या एवढ्या अधीन जातात की चोरी करण्यापर्यंत यांचे विचार पोहचतात. पण त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात राधिकाताई येते, जी त्यांच्या संपूर्ण जीवनाला एक वेगळंच वळण देते. राधिकाताईने नेमकी अशी कोणती जादू या मुलांवर केली ते चित्रपटात पहायला मिळणार आहे.
    “आयुष्यात अनेक अडचणी येतात पण आपण त्यांना सामोरे जाऊन यशाच्या दिशेने अविरत चालत रहायला हवं. अशा प्रेरणादायी आशयाचा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल याची खात्री वाटते.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.


    नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

  • माधुरी दिक्षित सोबत मकर संक्रांत साजरी करण्याची संधी..

    माधुरी दिक्षित… एक अशी तारका आहे जिच्या स्माईलवर सगळेच फिदा आहेत. जिच्या अदाकारीने अनेक जण घायाळ होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, पुरूषांपासून स्त्रियांपर्यंत जगभरात तिचे असंख्य चाहते आहेत. अशा या आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची झलक पाहाण्याची, तिला भेटण्याची इच्छा अनेकांना असते. आता हे स्वप्न ‘पंचक’च्या माध्यमातून लवकरच पूर्ण होणार आहे. कारण स्वतः माधुरी दिक्षित ह्यांच म्हणणं आहे , “खूप छान वाटते, जेव्हा चाहते माझ्या अभिनयाचे, नृत्याचे आणि हास्याचे कौतुक करतात. अनेक जण मेसेजेस करतात, अनेक जण भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. परंतु या सगळ्यांना भेटणे शक्य होत नाही. त्यामुळेच आमचा ‘पंचक’ चित्रपट नवीन वर्षात ५ जानेवारी प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने आम्ही हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. जेणे करून मी माझ्या मैत्रिणींना भेटू शकेन. यावेळी महाराष्ट्रातील निवडक १०१ मैत्रिणींना मी ठाण्यात भेटून, त्यांच्यासोबत हळदी कुंकू साजरे करणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करावी लागणार आहे. ‘पंचक’ या चित्रपटाचे तिकीट बुक करून चित्रपटगृहात जाऊन आपला आणि तिकिटाचा फोटो काढून ‘पंचक’च्या अधिकृत इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवर शेअर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार आहे, माझ्या आणि ‘पंचक’मघील खोतांच्या घरातील महिलांसोबत हळदी कुंकू समारंभ साजरा करण्याची. तर मग भेटुयात लवकरच.

    ‘पंचक’ या चित्रपटाची निर्मिती डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित नेने यांनी केली असून राहुल आवटे आणि जयंत जठार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

  • Third Eye Asian Film Festival starts from 12th January 2024

    The 20th Third Asian Film Festival, which is the benchmark of film culture in Maharashtra, will be organized from 12 to 18th January 2024 in Mumbai and Thane. The selected films will be screened at City Light Cinema, Mahim and Thakur College of Commerce and Science in Kandivali.

    At the beginning of 21stcentury, globalization brought about a revolution in the film industry. Films from abroad, especially Hollywood and Europe, became easily accessible to Indian audiences. But at the same time, the Asian films that were playing globally were not reaching the audience. Asian Film Foundation started organizing Third Eye Asian Film Festival with the aim of showing these films which are popular in various International Film Festivals to the audience of Mumbai and other cities of Maharashtra. The first festival was held on August 3, 2002. This film festival is being organized in Mumbai for the last nineteen years.

    In the 20th edition of Third Eye Asian Film Festival, the Asian Spectrum section includes twelve films from Indonesia, Egypt, Nepal, Bangladesh, Malaysia and Sri Lanka. Seven films from Iran will be shown in the country focus section.

    Along with Asian films, the competition section of Indian films and Marathi films will be the attraction of the festival. The Indian film section includes twelve films in Malayalam, Kannada, Telugu, Bengali, Assamese, Marathi languages. It includes House of Cards, Deep Fridge, Seuj Sandhan, Episode 13, Aaro Ek Prithibi, Mini, Aatmapamphlet, This story does not have a name, Family, Whispers of Fire & Water, Bijoyar Pore, Gorai Phakhri

    Nine Marathi films will be screened in the Marathi competition section. Sthala [ Dir. Jayant Somalkar], Madar [Dir.Mangesh Badar] , Raghuveer [Dir.Nilesh Kunjir], Maharashtra Shaheer [Dir. Kedar Shinde ], Sala Te Sala Na Te [ Dir. Santosh Kolhe], Giraki [Dir. Kavita Datir/Amit Sonawane ] , Territory [ Dir Sachin Shriram], Gaabh [Dir. Anup Jatratkar], Jitraab [Dir. Tanaji Mahadeo Ghadge], are included in this competition category.

    On the occasion of the birth centenary year of the well-known Bengali director Mrinal Sen, the festival will have retrospective of his films.

    This year, a special award for film writing will be given in memory of late Sudhir Nandgaonkar.

    Along with the film screening, Open Forum by distinguished judges, master classes with directors and technicians will be organised during the Festival.

    The delegate registration of the festival starts from 5th January and the registration will also be available through the website http://www.thirdeyeasianfilmfestival.com.

  • BIGG BOSS 17 Fame Sana Raees Khan Rings In Her New Celebration In Maldives

    Bigg Boss 17 contestant Sana Raees Khan known for her vivacious personality and charismatic presence in the Bigg Boss house, chose to celebrate her individuality and welcome the new year in the tropical paradise. Sana Raees Khan, bid adieu to 2023 in style as she embarked on a picturesque vacation to the Maldives.

    Sana took to her social media and updated all her fans about her New Year celebrations by sharing glimpses of her breathtaking Maldives getaway. The actress seemed to be reveling in the sun, sea, and sand as she treated her followers to stunning snapshots of her holiday.

    Her social media posts conveyed a sense of joy, liberation, and newfound freedom post-eviction. In a bunch of pictures, we could see Sana donning a beautiful misprint multi-colored cord-set and apart from that the actress is also seen posing in a stunning multicolored body-hugging sleeveless swimsuit dress tow which she paired along with a beige corset top, around the windy and clean beach of Maldives, Sana surely impressed us with her unique sartorial choice.

    https://www.instagram.com/p/C1hMv_Dvn9X/

    Maldives, known for its crystal-clear turquoise waters and Sana’s heart-throbbing pictures, served as a perfect year-end escape. Sana also indulged herself in some well-deserved self-care, which we surely agree was much deserved for the actress post her Bigg Boss 17 journey.

    As she starts a new chapter post Bigg Boss, her vibrant Maldives journey is an inspiration for fans to prioritize self-care and celebrate personal milestones in style.

  • गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महागायक

    कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या ६व्या पर्वाचा Grand Finale दिमाखात पार पडला. ‘आवाज तरुणाईचा’ या पर्वात अकोल्याचा गोपाळ गावंडे विजेता ठरला. कार्यक्रमाच्या उल्लेखनीय प्रवासात, गोपाळने उत्कृष्ट सादरीकरण व अपवादात्मक कामगिरी पाहायला मिळाली. स्पर्धेतील त्याच्या उल्लेखनीय प्रवासामुळे तो या पर्वाचा ‘महागायक’ ठरला. या पर्वात जुनी गाणी नव्या अंदाजात ऐकायला मिळाली. या नव्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. गोपाळ गावंडे याचा अतुलनीय आत्मविश्वास आणि संपूर्ण पर्वातील अपवादात्मक कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्याला राजगायकाचा मान मिळाला. ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ हे पर्व संगीतातील वैविध्य आणि प्रतिभेची समृद्धता साजरी करणारे व्यासपीठ आहे. गोपाळ गावंडेचा विजय त्याचे समर्पण, उल्लेखनीय कामगिरी आणि प्रेक्षकांच्या प्रचंड पाठिंब्याचा पुरावा आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांना भुरळ घातली, त्यामुळे खरोखरच हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

  • १०० व्या नाट्य संमेलनाची मान्यवरांच्या हस्ते मुहुर्तमेढ

    मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध
    – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य तथा वने, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल शुक्रवारी सांगली येथे केले. शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाच्या मुहुर्तमेढ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

    ना. श्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मोठे आहे. मराठी नाट्यपरंपरा प्रगल्भ आहे. १०० व्या नाट्य संमेलनासाठी शासनाने ९ कोटी, ३३ लाख रूपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून, या माध्यमातून जिल्हास्तरावर नाट्यसंस्कृती जोपासली जावी.

    नाट्य संमेलनाच्या शतक महोत्सवासाठी शुभेच्छा व्यक्त करून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला प्रगल्भ नाट्यपरंपरा आहे. ही नाट्यसंस्कृती रसिकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावी, हा नाट्यसंमेलनाचा उद्देश आहे. मराठी रंगभूमी, नाट्यसंस्कृती जनतेच्या हृदयाच्या सिंहासनापर्यंत पूर्ण शक्तीने पोहोचवावी. शासन नाट्यकर्मींच्या पाठीशी आहे. दर्दी रसिकांच्या पाठिंब्यावर मराठी रंगभूमी एक हजाराव्या नाट्यसंमेलनाचा टप्पा गाठेल. याच विचाराने संबंधित सर्वांनी कृती करावी, असे ते म्हणाले.

    सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाटक हृदयापर्यंत आशयभाव पोहोचवते. नाटकामध्ये मेडिटेशन म्हणजेच एकाग्रता करण्याची ताकद आहे. २१ व्या शतकात विविध आव्हानांवर मात करून नाटककार, कलावंत आणि रसिकांनी नाट्यसंस्कृती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत. नाट्यसंमेलनामध्ये रंगभूमीपुढील आव्हाने व त्यावर मात करण्याबाबत चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात ८६ नाट्यगृहे असून त्यापैकी ५२ स्थानिक स्वराज्य संस्थांची आहेत. नगर विकास विभागाकडून सदर ५२ नाट्यगृहांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नरत आहे. त्याचबरोबर राज्यात नवीन ७५ सौर ऊर्जा वापरणारी अत्याधुनिक चित्र नाट्य मंदिरे उभारण्यासाठी मंजुरी प्राप्त असून, नाट्यगृहांमध्ये कलाकार व रसिक प्रेक्षकांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ही नाट्यगृहे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील, असे ते म्हणाले.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून राज्यातील सर्व जिल्ह्यात त्यांच्या जीवनावरील महानाट्य दाखवण्यात येणार आहे. तसेच, महासंस्कृती अभियानातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, याअंतर्गत नाटके प्रायोजित करावीत, असे त्यांनी सूचित केले. तसेच नाट्यप्रयोगांसाठी अनुदान देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

    विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, खासदार संजय पाटील, १०० वे नाट्य संमेलन स्वागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मराठी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, नाट्य परिषद सांगली शाखाध्यक्ष मुकुंद पटवर्धन आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

    सांगलीची नाट्यपंढरी अशी ओळख असून, १०० व्या नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ असल्याबद्दल स्वागत व शुभेच्छा व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, की सध्या रंगभूमीसमोर इलेक्ट्रॉनिक व अन्य माध्यमांचे आव्हान उभे आहे. मात्र, नाटकांची क्रेझ पुन्हा निर्माण होणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून नाट्य संमेलनासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर आपणही सांगलीचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीमधून १० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच, विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिरास सी.एस.आर. मधून वातानुकुलित यंत्रणेची सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. प्रेमानंद गज्वी यांनीही याप्रसंगी यथोचित मार्गदर्शन केले.

    १०० व्या नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ सांगलीत होत असल्याबद्दल अभिमानाची भावना व्यक्त करून स्वागत समिती अध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, समस्त सांगलीकर आणि नाट्यप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आद्य नाटककार विष्णुदास भावे, गोविंद बल्लाळ देवल व कृष्णाजी प्रभाजी खाडिलकर यांच्यामुळे सांगलीची ओळख नाट्यपंढरी म्हणून निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.

    सध्या नाटकांच्या प्रयोगांमुळे सर्व कलाकारांना एकत्र येणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या माध्यमातून एकत्र यायला मिळते, असे सांगून ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी नाट्यगृहांची देखभाल, अद्ययावत नाट्यगृहांमध्ये सौर ऊर्जेतून विज पुरवठा व नवोदित कलाकारांची मुंबईत निवास व्यवस्था व्हावी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच, कलाकार म्हणून आम्हीही आमची जबाबदारी पार पाडू, असे ते म्हणाले. अजित भुरे यांनी मनोगत व्यक्त केले

    मुकुंद पटवर्धन म्हणाले, दिग्गज कलावंत सांगलीत घडले. सांगलीत हे पाचवे नाट्य संमेलन होत आहे. १०० वे नाट्य संमेलन विभागवार ६ ठिकाणी होणार आहे. या माध्यमातून विविध सांस्कृतिक संस्थांचे प्रमुख एकच व्यासपीठावर आले आहेत. यातून रंगभूमीला नवी दिशा, विचार व नजर मिळेल. सांगलीची आलौकिक नाट्यपरंपरा पुन्हा प्रकाशमय होत असल्याचे ते म्हणाले.

    नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर, कोषाध्यक्ष सतीश लोटके, संमेलन समिती प्रमुख विजय चौगुले, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह नाट्यकर्मी, नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नटराजपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नांदी सादर करण्यात आली. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शमी, आंबा व उंबराच्या फांद्यांना मुहुर्तमेढ बांधण्यात आली. तसेच संहितापूजन करण्यात आले. प्रशांत दामले यांच्या हस्ते घंटा वाजवून मुहुर्तमेढ करण्यात आली. सदर घंटा ६ विभागीय संमेलनात वाजवली जाणार आहे.

    दरम्यान, या कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार राजेंद्र पोळ यांच्या १० नाट्यकृतींच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध पुरस्कारप्राप्त डॉ. तारा भवाळकर, सदानंद कदम, पंडित हृषिकेश बोडस, शाहीर देवानंद माळी यांचा श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    वनमंत्री असताना मी महाराष्ट्राचा साग आणि वाघ विविध माध्यमांतून जगभर नेला, अस सांगून श्री मुनगंटीवार म्हणाले की, आता
    शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढताना वापरलेली वाघनखे भारतात लवकरच आणणार आहोत. तमाम भारतीयांसाठी ती प्रेरणादायी गोष्ट ठरणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य दरवाजाचे लाकूडही आम्ही चंदारपूरहून दिल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. अजित पवार अर्थमंत्री असले तरी त्यांना नोटा छापण्याकरता लागणारा कागद आमच्या जंगलातील लाकडापासूनच तयार होताे, असे ते म्हणाले.