Home

  • आता उत्सुकता ५ जानेवारीची… ‘पंचक’च्या दुसऱ्या ट्रेलरने उत्कंठा वाढवली

    डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस असतानाच आता या चित्रपटाचा आणखी एक उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. इतकेच नाही तर बॉलिवूडमधीलही काही नामवंत कलाकारांनी ‘पंचक’च्या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले आहे. नवीन वर्षात प्रदर्शित होणारा हा चित्रपट मल्टीस्टारर आहे. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. तर आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांनी केले आहे.

    ‘पंचक’च्या पहिल्या ट्रेलरने खूप उत्सुकता निर्माण केली होती. त्यात आता या दुसऱ्या ट्रेलरने अधिक भर टाकली आहे. खोतांच्या घराला पंचक लागल्याने ‘आता कोणाचा नंबर ?’ हा प्रश्न अवघ्या घराला पडलेला असतानाच, अनेक जण आपापल्या परीने हे संकट टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या गोंधळात घरात सर्कस होत आहे, ऑपेराही होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे, याचे उत्तर प्रेक्षकांना ५ जानेवारी रोजी मिळणार आहे. कथा, दिग्दर्शन, कलाकार, संगीत या सगळ्याच चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.

    चित्रपटाबद्दल माधुरी दीक्षित नेने म्हणतात, ” या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह बाबींमध्ये मी विशेष लक्ष घातले आहे. पडद्यावरील आणि पडद्यामागील प्रत्येकाची निवड ही योग्य आहे. चित्रपट पाहताना याचा प्रत्यय प्रेक्षकांनाही नक्कीच येईल. प्रत्येक कलाकार त्या व्यक्तिरेखेत चपखल बसला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान थोड्या अडचणी आल्या परंतु आज जेव्हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे, तेव्हा मनाला समाधान मिळतेय. मला खात्री आहे, चित्रपटावर प्रेक्षक नक्कीच भरभरून प्रेम करतील.”

    तर ‘पंचक’च्या निर्मितीबद्दल डॉ. श्रीराम नेने म्हणतात, ”ज्या वेळी आम्ही या चित्रपटाची कथा ऐकली, तेव्हाच आम्ही निर्णय घेतला हा चित्रपट करायचाच. चित्रपटाच्या प्री प्रॉडक्शनसाठी सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे आणि आम्ही सगळ्यांनीच ही प्रोसेस एन्जॉय केली. आता आमचे हे एक कुटुंब बनले आहे. मी सुद्धा या चित्रपटाकडून, कलाकारांकडून बरंच काही शिकलो.”

  • Urvashi Rautela Welcomes Bobby Deol to NBK109 Family with Heartfelt Message

    Urvashi Rautela who had a very powerpack year, is looking forward to 2024, the actress who has been continuously shooting for her back-to-back films, recently recently took to social media to share her excitement about welcoming the talented Bobby Deol in their upcoming film, NBK109. The actress expressed her joy through a captivating picture and a touching caption that resonated with gratitude and anticipation.

    Urvashi Rautela has been signing a lot of South Indian movies. She will be next seen in NBK 109 featuring Nandamuri Balakrishna. Urvashi posted a couple of pictures with Bobby Deol. The actress welcomed Lord Bobby Deol on the NBK 109 film and NBK 109 film family. Urvashi also expressed gratitude to the Deol family. They launched her into the film industry. Urvashi debuted in Bollywood with Singh Saab The Great. She was paired with Sunny Deol in the family. Urvashi expressed her excitement as she is looking forward to sharing the screenspace with Bobby Deol. It seems Urvashi Bobby Deol and the team of NBK 109 will have a working New Year’s Eve

    Urvashi and Bobby are seen posing together with infectious smiles, radiating a sense of camaraderie. Sharing the picture of the drop from the flight Urvashi captioned, “Thrilled to welcome Lord #BobbyDeol to our #NBK109 film family 💜 Gratitude to Deol family for launching me in the world of cinema & now can’t wait to share screen space with you in #NBK109 post #SinghSaabTheGreat 🎥 #HappyNewYear Guys 🎉 🎈🎊.”

    https://www.instagram.com/p/C1b8GqgPLR0/?img_index=1

    The anticipation of Urvashi Rautela and Bobby Deol on-screen pairing in NBK109 is building up among fans. As Urvashi Rautela and Bobby Deol gear up to share screen space in this much-anticipated project, the chemistry between these two talented actors is sure to be a highlight

    The movie will be directed by none other than KS Ravindra also known as Bobby Kolli. The cast of NBK 109 includes Dulquer Salmaan, and Krishna Murali Posani apart from Nandamuri Balakrishna. Sai Soujanya and Suryadevara Naga Vamsi are going to produce NBK 109 under the banners of Fortune Four Cinema and Sithara Entertainment.

    The collaboration between Urvashi Rautela and Bobby Deol in NBK109 is undoubtedly one to watch out for in the coming year, promising a delightful cinematic experience for audiences around the world.

  • 31st संध्याकाळचे GRAND सेलिब्रेशन !

    पहा, सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा, GRAND FINALE, रविवार, ३१ डिसेंबर, संध्या. ७.०० वा. कलर्स मराठीवर.

    कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ या पर्वाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. ‘जुनं ते सोनं, पण नवंही हवं’ हा प्रयोग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या पर्वातील सगळेच स्पर्धक उत्तम असून यांपैकी सर्वोत्तम ६ पर्वाच्या शेवटी येऊन पोहोचले आहेत. आवाज तरुणाईचा या पर्वाचा GRAND FINALE जवळ आला आहे.

    ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ GRAND Finale सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स आणि मराठी सिनेसृष्टीतील लाडक्या कलाकारांच्या उपस्तिथीत पार पडणार आहे.

    ‘सूर नवा ध्यास नवा’ चा GRAND FINALE दिमाखदार अंदाजात साजरा होणार आहे. हा अद्वितीय उत्सव, या पर्वाच्या सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स, भव्य नृत्य प्रदर्शन आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित कलाकारांसोबत साजरा होणार आहे.

    हा अतुलनीय उत्सव केवळ मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचा नसून बॉलिवूड धक धक गर्ल माधुरी दीक्षित, दिग्गज कलाकार नाना पाटेकर, विनोदाचे बादशाह मकरंद अनासपुरे आणि आपल्या मधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका साधना सरगम यांसारख्या प्रतिष्ठित कलाकारांच्या हजेरीने हा सोहळा आणखीनच GRAND होणार आहे. मनोरंजनाच्या जादूने भरलेल्या सोहळ्यात मग्न होण्यास सज्ज व्हा.

    31st चा प्लॅन दिमाखात साजरा करण्यासाठी नक्की पाहा, *‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ , GRAND FINALE, रविवार, ३१ डिसेंबर, संध्या. ७.०० वा, आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.*

  • Rohitashv Gour shot for Dunki in a moment’s notice from Rajkumar Hirani

    Popular for his iconic character Manmohan Tiwari in &TV’s popular show Bhabiji Ghar Par Hai, Rohitashv Gour has carved a niche for himself in Television and Bollywood. His exceptional comic timing has solidified his position as a talented actor in the entertainment industry. Recently, Gour made a notable appearance in Rajkumar Hirani’s film Dunki by essaying the character of a deceptive Visa Agent. In a candid revelation, he shares intriguing details about how he grabbed the role.

    Speaking about his involvement in the Shahrukh Khan starrer film, Rohitashv Gour revealed, “It’s hard to believe, but this turned out to be one of the most significant opportunities that came to me after a surprisingly short wait. Interestingly, it all unfolded in one day. I am shooting for my show ‘Bhabiji Ghar Par Hain’ in Naigaon. Due to the extensive commute, I usually stay in an apartment near the set and only head back to my home in Goregaon during my off days. We were to shoot the next day, but I unexpectedly received news in the morning that we had a week off on set. I decided to utilize this break by spending time with my family and heading home. On my way, I received a call from Rajkumar Hirani Ji, who asked about my whereabouts. I informed him that I was en route home, and he suggested I head directly to Goregaon’s Filmcity without elaborating further. Upon reaching there, I was astonished to witness a massive set bustling with thousands of people. Mr Hirani then informed me that they were filming a scene with a well-known theatre artist from Punjab who was meant to portray a character that day but couldn’t make it for some reason. It was the film’s inaugural day of shooting, and Mr. Hirani was determined not to halt the production. Since it was the film’s first day and Rajkumar Hirani Ji didn’t want any disruptions, he immediately thought of me due to our past collaborations. Raju sir then offered me the role of Laltu, a counterfeit Punjabi visa agent in his film ‘Dunki.’ I gladly accepted the impactful role. He briefed me about the character and the scene, allowing me to practice my Punjabi accent. After the shoot, Rajkumar ji graciously sent a large bouquet to my house, expressing his gratitude. It was a kind gesture.”

    Talking about his equation with Rajkumar Hirani, the actor reminisced, “I first met him back in 1997 when I arrived in Mumbai to audition for one of his shows on DD1. Unfortunately, that show never made it to the screen. However, Rajkumar assured me of future opportunities in his projects, and ‘Dunki’ is one such instance. I collaborated with Hirani ji on one of his renowned anthology series, ‘The Bestsellers,’ where I played a leading role. Our bond remains strong to this day. The day of shooting for ‘Dunki’ was a delightful experience. Hirani Ji introduced me to Abhijat Joshi, the film’s writer, and Taapsee Pannu. I was pleasantly surprised when Taapsee mentioned recognizing me from ‘Bhabiji Ghar Par Hai’ and being an avid viewer of the show. It was beyond my imagination that I would land a role in such a significant film, and everything unfolded so swiftly (laughs). It was truly an amazing coincidence and an exhilarating experience for me.”

    Watch Rohitashv Gour as Manmohan Tiwari in &TV’s Bhabiji Ghar Par Hai at 10:30 PM every Monday to Friday!

  • कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात होणार २०२४ च स्वागत

    नवीन वर्षची सुरवात आपल्या माणसं सोबत आणि देवाच्या आशीर्वादाने होईल या हुन चांगली गोष्ट काय असू शकते. झी मराठीचे कलाकार २०२४ च स्वागत नवीन वर्ष कसे साजरा करणार आहेत ह्या बाबती उत्साह व्यक्त करताना सांगितले.

    ‘सारं काही तिच्यासाठी’ मधली उमा खोत म्हणजेच खुशबू तावडेनि सांगितले, “मी २०२४ चे स्वागत आमच्या नवीन घरात ,माझ्या पूर्ण परिवार सोबत साजरा करणार आहे. घरात आवडते पदार्थ बनवून, छान बोर्ड गेम खेळू, त्या सोबत गप्पा गोष्टी २०२३ चे आठवणींना उजाळा देऊन आणि नवीन वर्षात काय- काय करायचे आहे त्या बदल भरपूर चर्चा करणार.

    ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मधली श्वेत मेहेंदळे म्हणजेच इंद्राणी आपले जिवलग मित्र यश प्रधान,अपेक्षा चोक्सी आणि आपल्या परिवार सोबत नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे. मी आणि माझा परिवार पुण्याला जाणार आहोत यशच्या घरी. त्याची बायको अपेक्षा हिने नवीन कार घेतली आहे आणि ती आम्हाला फिरवणार आहे. आम्ही पुण्याच्या जवळपास वेगवेगळ्या जागा फिरणार आहोत. मढेघाट, पाबेघाट अश्या वेगवेगळ्या सुंदर जागांना शोधून एक्सप्लोर करण्याचा आमचा प्लॅन आहे.

    ‘अप्पी आमची कलेक्टर’ मधला तुम्हा सर्वांचा लाडका अर्जुन म्हणजे रोहित परशुरामने सांगितले कि, मी नवीन वर्षाचं स्वागत पत्नी पूजा आणि लेकी सोबत करणार आहे. आम्ही दर वर्षी ३१ डिसेंबरला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जातो. नवीन वर्षाचं आगमन महालक्ष्मीच्या दर्शनाने आणि तिच्या आशीर्वादने सुरु करणार इतकं सुख कशातच नाही फक्त ह्या वर्षी आमच्या सोबत आमचं पिलू म्हणजे माझी लाडकी लेक रुई असणार

    तुमच्या ह्या लाडक्या कलाकारांना नवीन वर्षात ही प्रेम देत राहा आणि बघत रहा ‘सारं काही तिच्यासाठी’ संध्याकाळी ७:३० वाजता, ‘अप्पी आमची कलेक्टर’ संध्या ६:३० वाजता आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ रात्री १०:३० वाजता

  • मराठी असू तर बोलूही मराठीच’आईच्या गावात मराठीत बोल’

    कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन हीच एक अफलातून बाब असते आणि अशा मराठी चित्रपटात जर जबरदस्त असा नैसर्गिक आणि खळखळून हसवणारा विनोद असेल तर चित्रपटाचे प्रदर्शन होण्याआधीच त्याची धमाल चर्चा सुरु होते. असाच एक मराठी चित्रपट आहे ‘आईच्या गावात मराठीत बोल’

    ‘आईच्या गावात मराठीत बोल’ चे ट्रेलर आणि संगीत अनावरण मुंबई मध्ये सर्व कलाकार , तंत्रज्ञ आणि मिडीया यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटाद्वारे ओमी वैद्यची भन्नाट मराठी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि त्यावर ते तद्दन खूश आणि हसून लोटपोट होणार आहेत. याला ओमीच्या नव्या भाषेचा चमत्कार म्हणायचे की विनोदाची एक नवी भाषा म्हाणायचे हे प्रेक्षकांनी ठरवायचे आहे.

    चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये मराठी मुलीसोबत लगीनगाठ बांधली की तिच्या वडिलांची संपत्ती आपलीच असा विचार करून परदेशस्थ समर (ओमी) भारतात येतो. दोन महत्वाची कामे घेऊन तो आलेला आहे. एक म्हणजे मराठी मुलगी शोधणे आणि दुसरे आणि अधिक महत्वाचे अस्खलित मराठी बोलायला शिकणे ही कामे त्याला करायची आहेत. भारतातला या संबंधातला त्याचा प्रवास चित्रपटात बघायला मिळणार आहे. त्यात लग्नासाठीचा खटाटोप तर तुम्हाला गुदगुल्या करेलच पण पुढे जे काही घडणार आहे त्याने तर तुम्ही लोटपोट होणारच आहात. तर १९ जानेवारी २०२४ निश्चित करून ठेवा. मुहूर्त चुकवू नका…

    ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटाची गाणी व्हिडिओ पॅलेसची प्रस्तुती आहे तर संगीत आणि पार्श्वसंगीत अविनाश विश्वनाथ यांचे आहे. ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या शीर्षक गीताचे धमाल बोल वैभव जोशी यांनी लिहीले आणि ठेका धरायला भाग पाडणाऱ्या या गीताला स्वप्निल बांदोडकर, विश्वजीत जोशी, मनीष राजगिरे आणि रोहित राऊत यांनी अस्सल मराठी आवाज दिला आहे. ‘तू हवीशी’ हे गाणे विश्वजीत जोशी यांनी लिहले आहे . तर ऋषिकेश रानडे याने गायलेलं गाणं कॉमेडीची मेजवानी असलेल्या चित्रपटात सुद्धा रोमॅंटीक माहोल तयार करत आहे.

    ‘आईच्या गावात मराठीत बोल ‘ चे शिर्षक गीत चित्रपटाला शोभेल असं विनोदी पण तितकंच अर्थपूर्ण असे आहे अशी भावना संगीतकार अविनाश विश्वजित यांनी व्यक्त केली .

    ओमी वैद्य आणि अमृता हर्डीकर यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहून चित्रपटाची आखणी सुरु केली आणि दोघांनी तेथूनच संचबांधणीही सुरु केली.सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी योगेश कोळी यांनी तर संकलन मयूर हरदास आणि ओमी वैद्य यांनी सांभाळले आहे. ओमी वैद्य आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटात दिग्दर्शक आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारतो आहे त्याची उत्तम अभिनयाची छाप कायम असतानाच चित्रपटाच्या ट्रेलरमधून त्याची दिग्दर्शनाची बाजू भक्कम आहे हेही दिसते आहे. त्याचा आणि सहकलाकारांचा चित्रपटातील सहज वावर प्रेक्षकांची मने निश्चित जिंकू शकेल असा आहे.


    ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटामढील प्रमुख भूमिका ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार, सायली राजाध्यक्ष आणि सुधीर जोगळेकर अशी दमदार आहे.

    या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान, डॉ.जलदीप दलूत, पीट टॉरमे, नंदिनी मिनॉशे, सामिया अश्रफ, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, मॉंटी आणि तनु पांडे, संतोष गोविंदराजू, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, जसलीन अहलुवालिया, राजन वासुदेवन, राजीव आणि शीतल शाह, संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे आणि उदय कुमार यांनी केली आहे.

    आता थोडीशीच वाट बघायची आहे..१९ जानेवारीची…
    तयार आहात ना…काहीतरी आगळं वेगळं मिंग्लिश ऐकायला आणि बघायला !!!

  • नानांची नाना रुपं

    ‘वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,’ हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर या कलंदर व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे. पण.. एखादे नाठाळ… खोडसाळ… प्रेमळ बाबा बहुधा प्रथमच आपण नानांच्या स्वरूपात पाहतोय. ‘ओले आले’ या चित्रपटातून नानांचे आणखी काही कलारंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘ओले आले’ हा चित्रपट नाना पाटेकरांच्या फॅन्ससाठी एक सरप्राईज पॅकेज असणार आहे हे नक्की.

    मुलाच्या मागे-मागे फिरणारे.. खोड्या काढणारे.. जीवापाड प्रेम करणारे.. आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारे नाना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत. शिस्तप्रिय बाबांच्या व्यक्तिरेखेच्या अगदी उलट अशी ही नानांची भूमिका आपल्याला पोट धरून हसायला लावतेय. आजवर नानांच्या विविध भूमिका आपण पाहिल्या आहेत. त्यांची प्रत्येक भूमिका आपल्याला काही ना काही तरी देऊनच जाते. अशीच ‘ओले आले’ चित्रपटातली नानांची भूमिका ”जगणं समृद्ध करायला शिकवणारी आहे” असं ते सांगतात.

    चला जगूया, हसूया, फिरूया म्हणणारे नाना पाटेकर कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘ओले आले’ या चित्रपटाद्वारे येत्या ५ जानेवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात आपल्याला भेटणार आहेत. या चित्रपटात नाना पाटेकरांसोबतच मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव यांच्या ही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.

  • छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची झलक प्रदर्शित

    अलीकडेच आलेल्या ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली होती. त्यातच आणखी एका नव्या पोस्टरने आपल्या उत्सुकतेमध्ये भर घातली आहे. दणकट शरीरयष्टी.. धारदार नाक… डोळ्यांत फुललेला अंगार.. ती मनाचा ठाव घेणारी भेदक नजर आणि मागे सिंहाच्या रुद्रावताराची छबी. अगदी सूचक अशा या पोस्टरमधून ‘शिवरायांचा छावा’ आपल्या समोर मोठया दिमाखात अवतरला आहे. पण.. अजूनही या कलाकाराची ओळख आपल्याला पटलेली नाही. शंभूराजेंच्या तेजाळत्या व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देणारा हा नवा चेहरा नेमका आहे तरी कोण..? यासाठी आपल्याला अजूनही वाट पहावी लागणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या या चित्रपटातील प्रमुख पात्र निभावणाऱ्या या कलाकाराचे नाव घोषित करण्यात येणार आहे.

    ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ नववर्षात म्हणजेच *१६ फेब्रुवारी २०२४* ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए . फिल्म्स सांभाळत आहे.

  • नव्या वर्षात करा ‘एन्जॉय एन्जॉय’

    नव्या वर्षाच्या स्वागताला नाचण्याचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचं एन्जॉय एन्जॉय हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात आहेत. ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

    उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी – सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथालेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत, तर अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे.

    ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट एका महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे. एन्जॉय एन्जॉय हे गाणं आयुष्य साजरं करण्याचा संदेश देते. गणेश निगडे यांनी लिहिलेल्या या गाण्याला सुहित अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केेलं आहे. तर आदर्श शिंदे आणि सुहित अभ्यंकर यांनी हे गाणं गायलं आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं हे गाणं आहे. त्यामुळे नव्या वर्षाचं स्वागत करताना एन्जॉय एन्जॉय तर व्हायलाच हवं.

    Song Link

    https://youtu.be/y1dX6Nh42ro

  • तंजावर येथे १०० व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ

    नाटककार शहाजी (शाहराज) राजे भोसले हे मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार असून , ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ हे पहिले मराठी नाटक होय, असे उद् गार ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी, तंजावर येथील सरस्वती महालात संपन्न झालेल्या कार्यक्रमात काढले.


    १०० व्या मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ शाहराज राजे भोसले यांच्या वाङमयाला वंदन करून व नटराज पूजन करण्यात आले. त्यावेळी नाटककार प्रेमानंद गज्वी बोलत होते. पुढे गज्वी म्हणाले, शाहराजांनी २२ मराठी,२० तेलगु, १ संस्कृत,१ तमिळ व ३ हिंदी नाटके लिहिली असून ते मराठी रंगभूमी बरोबरच तामिळ आणि हिंदी रंगभूमीचेही आद्य नाटककार होते. ते काव्य भाषा शास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी बारामास आणि षडरूतुवर्णन ही काव्ये लिहिली असून ते शूर, राजकारणपटू रसिक, कलाज्ञानी आणि नृत्य कलेचे मर्मज्ञ होते. असेही गज्वी म्हणाले.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला नटराजाचे पूजन करून आणि शाहराजाचे वाङमयाला पुष्पांजली वाहून करण्यात आली.
    यावेळी केलेल्या भाषणात शिवाजी राजे भोसले म्हणाले, “मी व्यंकोजी राजघराण्यातील आठवा वारसदार आहे याचा मला मोठा अभिमान आहे. राजांच्या मुळेच मला सन्मान मिळत आला. १०० व्या नाट्य संमेलनाचे निमित्ताने, महाराष्ट्रातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे पदाधिकारी इथं तंजावरला आले. ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी स्वत: शाहराजांना वंदन करायला इथं आले. नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके कार्यकारी समिती सदस्य गिरीश महाजन, नियामक मंडळ सदस्यआनंद कुलकर्णी तंजावर इथे आले याचा खूप आनंद झाला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामिळ विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. तुरूवेल्लुवन, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी दीपक जेकब उपस्थित होते.
    यानिमित्ताने नाट्य, नृत्य, गायन कार्यक्रम सादर करण्यात आले.

    नाटककार शहाजी (शाहराज) राजे भोसले यांच्या ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ या नाटकातील एक प्रवेश नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी व कोषाध्यक्ष सतीश लोटके सादर केला. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद गोपाळ यांनी केले.