Home

  • Urvashi Rautela Serves Major Kylie Jenner Vibes In A Red Hot Sizzling Bold Swimsuit

    Bollywood beauty Urvashi Rautela who has always amazed fans with her stunning looks and satroial choices once again has taken the internet on storm and left fans awestruck as she sizzled in a ravishing red swimsuit. The actress showcased her impeccable style, resembling none other than the international fashion icon, Kylie Jenner.

    Urvashi shared a video of herself from a brand shoot and in the video, we could see Urvashi’s daring outfit featured a plunging deep neckline that perfectly flaunted her curvaceous figure. The swimsuit was elevated with a long trail, net hand gloves, and a wet hair look, adding an extra touch of glamour. With her striking red lips and the allure of the eyewear she was promoting, Urvashi exuded sheer sensuousness and hotness

    https://www.instagram.com/p/C1RyMMcojJn/

    The poses struck by Urvashi in this eye-catching ensemble undeniably served major Kylie Jenner vibes, capturing the essence of the global fashion influencer. From the sultry gaze to the poised stances, Urvashi effortlessly embodied the chic and glamorous style reminiscent of Kylie Jenner.

    Fans just went crazy over Urvashi this red hot bold look, to which one fan wrote, “Most beautiful sexiest hot girl in the world ❤️”, “Queen For A reason 👑”, ” A December to Remember 🧜‍♀️🎄❤️” Undoubtedly, fans couldn’t help but agree that Urvashi’s sensational look served major Kylie Jenner vibes, making this eyewear promotion a visual treat for fashion enthusiasts.

  • Tips मराठी सादर करत आहे त्यांचा पहिला-वाहिला मराठी चित्रपट ‘श्रीदेवी प्रसन्न’

    नव्या वर्षात, एक नवी लव्ह स्टोरी आणि आपल्या लाडक्या जोडीसह Tips मराठी सादर करत आहे पहिला मराठी चित्रपट ‘श्रीदेवी प्रसन्न’. येतोय २फेब्रुवारी २०२४रोजी…

    टिप्स फिल्म्स प्रस्तुत आणि कुमार तौरानी यांची निर्मिती असलेला “श्री देवी प्रसन्न” हा येत्या ०२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले.

    “श्रीदेवी प्रसन्न” या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वासह बॉलीवूडलाही भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि स्मार्ट अँड डॅशिंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अशी भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आहे. आजवर अनेक हीट चित्रपट देणारे हे दोन्ही दमदार कलाकार एकत्र येऊन एक वेगळीच प्रेमकहाणी फुलवणार आहे. या निमित्ताने नव्या वर्षात, एक नवी आणि आगळीवेगळी लव्ह स्टोरी आपल्या लाडक्या जोडीसह प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

    सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिकेसह सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वांखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे अशी दमदार कास्ट या चित्रपटात आहे. त्यामुळे श्रीदेवी आणि प्रसन्न यांच्या लव्हस्टोरी सोबत हा एक कंप्लीट फॅमिली सिनेमा आहे.

    या चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले असून विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लवकरच हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे.

  • ‘सूर लागू दे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

    दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा ‘सूर लागू दे’ हा शेवटचा चित्रपट असल्याने कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर अल्पावधीत ‘सूर लागू दे’च्या ट्रेलरला तूफान प्रतिसाद मिळू लागला आहे. १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

    आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते अभिषेक ‘किंग’ कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची निर्मिती केली असून अश्विन पांचाळ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंट स्टुडिओज हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वितरीत करणार आहे. या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं आहे. ‘सूर लागू दे’चा ट्रेलर पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणारा आहे. चित्रपटात काय पाहायला मिळेल याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. विक्रम गोखले आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. त्यांची केमिस्ट्री, अभिनयातील परीपक्वपणा आणि देवाणघेवाण ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. चित्रपटातील गाणीही सुरेख असून, अर्थपूर्ण संवाद उत्सुकता वाढवणारे आहेत. रीना मधुकर प्रमुख भूमिकेत असून त्यांनी टेलिव्हिजन आणि हिंदी, मराठी सिनेमातून उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. मेघना नायडू यांची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यापूर्वी मराठीसाठी गाणं करणाऱ्या मेघनाने या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच भूमिका साकारली असून या चित्रपटात मेघना पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. एक अनमोल संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेज ठरणारा असल्याचं ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं. याबाबत दिग्दर्शक प्रवीण बिर्जे म्हणाले की, या चित्रपटाचं कथानक कालातीत आहे. हे जगाच्या पाठीवर कुठेही घडू शकणारं असल्याने कोणत्याही प्रेक्षकाला हे आपलंसं करणारं आहे. यातील कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी असून, यातील श्रवणीय गीत-संगीत मन मोहून टाकणारं आहे. संगीतकार पंकज पडघन यांचं संगीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.

    ‘सूर लागू दे’ हा चित्रपट समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब दाखवणारा आहे. मानवाने ठरवलं तर कर्माच्या बळावर तो नराचा नारायण होऊ शकतो. एखादी चांगली गोष्ट करताना वय केवळ आकडा बनून राहातं. आयुष्याच्या संध्याकाळीही इतरांसाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा संदेश ‘सूर लागू दे’द्वारे सर्वदूर पोहोचणार आहे. विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, रीना मधुकर, मेघना नायडू यांच्यासह आशिष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुक्के, नितीन जाधव, आशा ज्ञाते, मेरू वेरणेकर, अनुराधा मोरे, शेखर शुक्ला, संदीप गायकवाड, हितेंद्र उपासनी, प्रदीप पटवर्धन, अस्लम वाडकर, सोमनाथ तळवलकर, सुनील जाधव, दीपिका गोलीपकर, अलका परब, अतुल गानोरकर, दिलीप कराडे, संदीप जयगडे, अमोघ चव्हाण, औदुंबर बाबर आदी कलाकारांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.

  • चमत्कार’ सांगणार आयुष्याचा भावार्थ …’पंचक’मधील भावनिक गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला

    श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने निर्मित ‘पंचक’ चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘ज्याला त्याला उमगते, ज्याची त्याची भाषा, बाकी इथे जगण्याचा रोजचा तमाशा…’ असे बोल असलेले हे गाणे आयुष्याचा भावार्थ सांगत आहे. गुरु ठाकूर यांचे हृदयस्पर्शी शब्द लाभलेल्या या भावनिक गाण्याला मंगेश धाकडे यांनी संगीत दिले आहेत तर अभिजीत कोसंबी याचा जादुई आवाज या गाण्याला लाभला आहे. या गाण्याच्या शब्दांमध्ये अनेक भावना आहेत.

    गीतकार गुरु ठाकूर म्हणतात, ” अनेक घडामोडी घरात घडत आहेत आणि त्या सगळ्यांना अनुसरून या गाण्याचे बोल रचायचे होते. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात वेगवेगळ्या पातळीवर द्वंद्व सुरु आहेत. त्यामुळे या शब्दांमध्ये आर्तता खूप महत्वाची होती. अभिजीत कोसंबीने आपल्या आवाजाने हे गाणे एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. संगीतही त्याचा दर्जाचे आहे.”

    गाण्याबद्दल दिग्दर्शक राहुल आवटे म्हणतात, ” गुरु ठाकूर यांनी अत्यंत सुंदर शब्दात जीवनातील सफर मांडली आहे. ज्याला मंगेश धाकडे यांनी उत्तम संगीताची साथ लाभली आहे. खूप भावनिक आणि मनाला भिडणारे हे गाणे आहे. प्रत्येकाच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारे हे गाणे आहे.”

    जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

  • एंटरटेनमेंटची डिलिव्हरी करायला येतोय ‘डिलिव्हरी बॉय’

    काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक गिफ्ट रॅप केलेल्या एका बॉक्समधून एक गोंडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय आणि या बॉक्सचा नेमका संबंध काय? तर प्रेक्षकांची ही उत्सुकता थोड्या फार प्रमाणात कमी होणार आहे. कारण आता ‘डिलिव्हरी बॉय’चे एक जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून ते सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. पोस्टरमध्ये एका आलिशान खुर्चीवर प्रथमेश परब विराजमान झालेला दिसत असून त्याच्या मागे अंकिता लांडे पाटील डॉक्टरच्या ऍप्रनमध्ये दिसत आहे. तर प्रथमेशजवळ पृथ्वीक प्रताप आहे. या पोस्टरमध्ये विशेष लक्षवेधी ठरत आहेत त्या आठ गरोदर बायका… त्यामुळे आता नेमके काय आहे हे प्रकरण, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ९ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

    सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे मोहसीन खान दिग्दर्शक आहेत. डेव्हिड नादर निर्माते असून फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.

    चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, ” घेऊन येतोय एंटरटेनमेंटची डिलिव्हरी, अशी आमच्या चित्रपटाची टॅगलाईनच आहे. यावरून हा चित्रपट किती गंमतीशीर असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. चित्रपट अतिशय मजेशीर आहे. तरीही त्यातून थोडासा सामाजिक प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”

    निर्माते डेविड नादर म्हणतात, ‘’ चित्रपटाचा विषय खूप वेगळा आहे. या विषयाचे गांभीर्य घालवू न देता अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने तो मांडण्यात आला आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात नक्कीच यशस्वी होईल.’’

  • काळजाचा ठाव घेणार ‘काटा किर्र’‘लावण्यवती’अल्बमचे गाणे भेटीला

    एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘ गणराया’ , ‘करा ऊस मोठा’, ‘लावा फोन चार्जिंगला’ या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींना प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या अल्बममधील ‘काटा किर्र’ हे अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘लावणी नाही… कापणी’ या टॅगलाईननुसार या गाण्यातूनही आपल्या लोककलेचे दर्शन घडणार आहे. अवधूत गुप्ते यांनी शब्दबद्ध केलेल्या आणि संगीत दिलेल्या ‘काटा किर्र’ या गाण्याला मुग्धा कऱ्हाडेच्या ठसकेबाज आवाज लाभला आहे. तर अभिनेत्री पूर्वा शिंदेच्या बहारदार नृत्याला ऋषी देशपांडेची साथ लाभली आहे. त्यामुळे यात अधिकच रंगत आली आहे. ‘काटा किर्र’चे नृत्य दिग्दर्शन ‘सुंदरीकार’ आशिष पाटील यांचे असून चैतन्य पुराणिक यांनी याचे छायाचित्रीकरण केले आहे. नुकतीच या गाण्याचा प्रोमो भेटीला आला असून २६ डिसेंबरला हे लाजवाब गीत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

    ‘लावण्यवती’ अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “आपल्या महाराष्ट्राची लोककला जपली पाहिजे, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि म्हणून तुमच्यासाठी ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘काटा किर्र’ हे चौथे आणि शेवटचे गाणे तुमच्या भेटीला येत आहे. हे गाणे धमाल उडवून देणारे आणि प्रत्येकाला आवडेल अशी आहे.”

  • आंतरराष्ट्रीय प्रवास करून ‘मोऱ्या’ येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत रसिकांच्या भेटीला!

    लंडन येथील ‘सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा’ या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा ‘प्रीमियर शो’ करण्याचा मान “मोऱ्या” या मराठी चित्रपटाने मिळवून, युरोपमधील प्रेक्षकांची हाऊसफुल्ल पसंती मिळविली आहे. ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ “मोऱ्या”चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा पासूनच या चित्रपटाविषयी कुतूहल वाढू लागले होते. ‘एलएचआयएफएफ बार्सिलोना, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, ‘खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव’, ‘झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२’, ‘पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव’, ‘अयोध्या फिल्म फेस्टिव्हल’, ‘लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’, ‘बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ इत्यादी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय महोत्सवांत “मोऱ्या”ने ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळविला आहे. आता नव्या वर्षात येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

    कान्ससह विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आमच्या पहिली निर्मिती असलेल्या ‘मोऱ्या’ या चित्रपटाने जाणकार रसिक समीक्षकांचे लक्ष वेधले होते. युके मधील प्रीमियर शो पाहून बराच वेळ स्तब्ध होतो. चित्रपटाची कथा, मांडणी, अभिनय व सादरीकरण पाहून त्यांना गहिवरून आले होते. ‘मोऱ्या’ हे पात्र मनात अस्वस्थता, चलबिचल, काहूर निर्माण करते अशी प्रतिक्रिया तेथील अनेक प्रेक्षकांनी बोलून दाखविली. हाच अनुभव युरोपसह, महाराष्ट्रातील काही खाजगी शोज्’च्या वेळी येत असल्याचे अभिनेते लेखक दिग्दर्शक जितेंद्र बर्डे सांगतात.

    एका सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा ‘मोऱ्या’ या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी खास मेहनत घेतली आहे. त्यांनी केलेला सहज संयमी नैसर्गिक अभिनय रसिकांच्या मनात घर करीत आहे. विषयाच्या जातकुळीनुसार धुळे जिल्ह्यातील ‘पिंपळनेर या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीत करण्यात आहे. मूळ पिंपळनेरच्या जितेंद्र बर्डे यांची ही पहिलीच कलाकृती आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या परिसराचे सौंदर्य जगभर पोहचविल्याचे समाधान जितेंन्द्रसह सर्वांनाच असून या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे.

    ‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘मोऱ्या’मध्ये उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर आणि शीर्षक भूमिकेत जितेंद्र बर्डे यांनी काम केले आहे. सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा जीवनप्रवास नेमका आहे तरी कसा? हे जाणून घेण्यासाठी येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी मोऱ्या महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये नक्की भेट द्या.

  • नए साल का तोहफा ! बच्चन परिवार का 100 साल का इतिहास ! बच्चन्स: ए सागा ऑफ एक्सीलेंस किताब

    सदी के महानायक अमिताभ बच्चन के जीवन पर आधारित तो बहुत किताबे छप चुकी हैं। हर एक लेखक ने बिग बी के लिए अपनी दीवानगी किताब के जरिये जाहिर की हैं। लेकिन एक ऐसी किताब जिसमे फिल्मी दुनिया के सबसे बड़े  नाम और परिवार की 100 साल की कहानी बयां की गई हैं। एक- एक ऐसे अनछुए पहलू बताए गए हैं जिसे शायद ही बच्चन के चहेते जानते हैं।

    जी हां,लेखक एसएमएम औसाजा की किताब बच्चन्स: ए सागा ऑफ एक्सीलेंस में हरिवंशराय बच्चन के अद्भुत यात्रा से लेकर अगस्त्य नन्दा के फिल्मी पर्दे की शानदार पारी के किस्से को इस खूबसूरत किताब में शामिल किया गया हैं। यू कहे कि  द बच्चन्स: ए सागा ऑफ एक्सीलेंस, भारत के घरेलू नाम बच्चन परिवार के समृद्ध इतिहास का लेखन करती है।  1900 के दशक की शुरुआत में इलाहाबाद से, जहां हरिवंश राय बच्चन की यात्रा शुरू हुई जो अब तक चल रही अगस्त्य नंदा की फिल्मी शुरुआत तक का समावेश हैं। यह पुस्तक भारत के सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्र के साथ परिवार के सौ वर्षों से अधिक के जुड़ाव को दर्शाती है जो अपने आप मे बेजोड़ हैं।

    अमिताभ बच्चन ने अपने सोशल मीडिया पर भी इस किताब पर हस्ताक्षर करते हुए वीडियो शेयर किया।

    हाल ही सदी के महानायक, अमिताभ बच्चन ने इस किताब का अनावरण किया और अपनी खुशी जाहिर करते हुए कहा कि,” संग्रह और दस्तावेज़ीकरण के लिए एसएमएम औसाजा ने बहुत मेहनत की हैं जिसके जरिये ये किताब मुमकिन हो पाई है। मैं अपने बारे में नहीं बोल सकता और इसलिए मैं सिर्फ इतना कहूंगा कि मैं पुस्तक और दिग्गजों के जीवन को संग्रहीत करने और दस्तावेजीकरण करने के औसाजा के सभी प्रयासों का समर्थन करता हूं। हमारे देश में, भावी पीढ़ी के लिए सिनेमा के इतिहास का दस्तावेजीकरण करना महत्वपूर्ण है, और मैं इस उद्देश्य के प्रति उनके समर्पण और प्रतिबद्धता से उत्साहित हूं। हमें उनके जैसे और लोगों की जरूरत है,” भावुक होकर बच्चन ने कहा।

    ओम इंटरनॅशनल के अजय मागों द्वारा प्रकाशित इस किताब में हरिवंश राय बच्चन के जीवन, उनकी साहित्यिक उपलब्धियों, पारिवारिक त्रासदियों और बेटों अमिताभ और अजिताभ के जन्म का विवरण किया गया है।  इसके बाद यह अमिताभ बच्चन, जया भादुड़ी, अभिषेक बच्चन और ऐश्वर्या राय के शानदार फिल्मी करियर के बारीक कड़ी को भी दर्शाती हैं। इस पुस्तक में पहले कभी न देखे गए चित्र – पोस्टर, चित्र और तस्वीरें हैं – जो इस प्रतिष्ठित परिवार की उल्लेखनीय यात्रा में रुचि रखने वाले उत्साही लोगों के लिए एक चमकदार बहुरूप दर्शक प्रदान करती हैं।

    एसएमएम औसाजा ने कहा, “बच्चन परिवार के करियर से जुड़े महान कार्यों को ध्यान में रखते हुए उन पर किताब लिखना एक सम्मान की बात है। उनके जीवन और समय का वर्णन करने की अपनी चुनौतियाँ थीं, विशेष रूप से दृश्यों और अब तक के पहलुओं पर प्रामाणिक जानकारी के संबंध में।  सार्वजनिक स्थान पर जाना जाता है। अत्यंत कृतज्ञता के साथ मैं कहता हूं कि परिवार ने इस प्रयास का समर्थन किया और अपना भरोसा जताया। यह उनकी कला के सम्मान में 12 साल का एक विनम्र कार्य है जो वैश्विक स्तर पर भारतीयों की पीढ़ियों को गौरवान्वित और प्रभावित करेगा।”

  • डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा सुपरहिट चित्रपट ‘भिंगरी’ ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर!

    ‘भिंगरी’ चित्रपट २८ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर येत आहे.

    मराठी सिनेसृष्टीच्या चंदेरी दुनियेत आपलं नाव दिमाखात गाजवून प्रेक्षकांचं मन भारावून टाकणारे अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील ‘भिंगरी’ चित्रपट २८ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर येत आहे. चित्रपटात रमेश देव, सुषमा शिरोमणी, विजू खोटे आणि विक्रम गोखले हे सुप्रसिद्ध अभिनेते असून उषा मंगेशकर यांच्या आवाजातील गाणी अनुभवून प्रेक्षक जुन्या आठवणींमध्ये गुंग होणार आहेत.

    चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक दत्ता केशव यांनी केले असून कथा अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी स्वतः लिहिली आहे. दौलतराव पाटील आणि सदा जिवाभावाचे मित्र असून सदाच्या पत्नीसोबत दौलतने संबंध ठेवल्याचे सदाला कळते. तेव्हा संतप्त झालेला सदा दौलतचा बदला घेण्याच्या नादात काय काय करतो हे चित्रटातून कळणार आहे.

    “प्रेक्षकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमच्या संग्रहातील सुवर्ण चित्रपटांना अल्ट्रा झकासच्या माध्यमातून सादर करत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

  • तंजावर येथे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनचा प्रारंभ

    पिंपरी चिंचवड येथे दि. ५-६-७ जानेवारी २०२४ या काळात संपन्न होणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ, मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शाहराज राजे भोसले (१६७०-१७१२) यांच्या नाट्य वाङमयाला वंदन करून होणार आहे. तंजावर (तामिळनाडू) येथील सरस्वती महालात हे नाट्य वाङमय सुरक्षित असून, नाटककार शाहराज राजे भोसले यांनी एकूण २२ मराठी नाटके लिहिली असून, ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ (१६९०) हे पहिले मराठी नाटक मानले जाते. या नाटकात ‘लक्ष्मी नारायण’ यांच्या लग्नाची गोष्ट चित्रीत केलेली आहे.

    दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी, सायं. ६.०० वा. नाटककार शाहराज राजे भोसले यांच्या नाट्य वाङमयाला वंदन करून व नटराज पूजन करून शंभराव्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ केला जाणार आहे. शंभराव्या नाट्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ.जब्बार पटेल हे असून हा नाट्य ग्रंथ वंदन सोहळा ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी दीपक जेकब, तमीळ विद्यापीठ तंजावर कुलगुरू प्रो. थिरूवल्लूवम, छत्रपती शिवाजीं महाराजांचे आठवे वारसदार शहाजी राजे भोसले, नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, कार्यकारी समिती सदस्य गिरीश महाजन, ज्येष्ठ नाट्यकर्मी आनंद कुलकर्णी, विवेकानंद गोपाल आदी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने नांदी, गणेश वंदना, नटराज नृत्य व शाहराज राजे भोसले लिखीत ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ या नाटकातील प्रवेश नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी व कोषाध्यक्ष सतीश लोटके सादर करणार आहेत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी सांगली येथे ‘ सं. सीता स्वयंवर ‘ कार विष्णुदास भावे यांना अभिवादन करून नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात येईल. त्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शाखेकडे नटराज व नाट्य वाङमय सुपूर्द करण्यात येणार आहे.

    १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार असून सर्व कार्यक्रमांना रसिकांनी व नाट्यकर्मींनी उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.