
-
गौतमी पाटीलचा “इश्काचा मौका”

सप्तसूर म्युझिकचा नवा म्युझिक व्हिडिओ ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. मात्र आता गौतमी पाटील ‘इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका… आता कसं व्हायचं पावन, चीझ मी लई कडक’ म्हणत आहे. सप्तसूर म्युझिकच्या नव्याकोऱ्या गाण्यात गौतमी पाटील झळकली असून या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे.

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी चीझ लई कडक या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. विकी वाघ यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलेलं हे गाणं वैशाली सामंत यांनी गायलं आहे. तर या गाण्यात गौतमी पाटीलसह कुणाल पाटील, कुणाल मासले, मनोज कुंभार, आदम शेख यांनी भूमिका केली आहे. अतिशय धमाल शब्द, ठेका धरायला लावणारी उडती चाल असल्याने हे गाणं नक्कीच प्रेक्षकांची दाद मिळवणार यात काहीच शंका नाही.

चीझ लई कडक या गाण्यात एक गोष्ट सांगण्यात आली आहे. गुंडांच्या अड्ड्यावर होणाऱ्या या गाण्यात गौतमी पाटील नेमक काय करते हे जाणून घेण्यासाठी हा म्युझिक व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे. मात्र चीझ लई कडक हे गाणं प्रेक्षकांना वेड लावणार आयटम साँग ऑफ द ईअर ठरणार आहे.
Song Link
-
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा अनोखा कानमंत्र

सध्या चला फिरूया.. हसूया.. जगूया.. म्हणत, नाना पाटेकर एका धम्माल सहलीला निघालेत. हा प्रवास सिद्धार्थ आणि सायलीसोबत चालू आहेच पण यात मकरंद अनासपुरे सुद्धा त्यांच्या साथीला आहेत. दिग्गज कलाकारांची मैत्री आपल्याला चित्रपटाच्या प्रवासात पहिल्यांदाच एकत्र पाहता येणार आहे. बऱ्याच वर्षानंतर ही कलंदर जोडी ‘ओले आले’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. आपल्या अभिनयाचे आणि विनोदाचे चौकार आणि षट्कार मारायला नाना आणि मकरंद अनासपुरे सज्ज असून कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘ओले आले’ हा चित्रपट नववर्षात म्हणजे ५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘ओले आले’ चित्रपटात ‘व्यस्त रहा.. पण मस्त रहा..’ असं म्हणणारे नाना सिद्धार्थला जगण्याचे सूत्र सांगताना दिसताहेत. खरं तर हा मूलमंत्र ते स्वतःच्या दैनंदिन व्यवहारातून, कधी प्रेमाने तर कधी हट्टाने मुलाला शिकवू पाहताहेत. बाबा आणि मुलाच्या या मजेशीर जुगलबंदीमध्ये मकरंद अनासपुरे देखील सामील झालेले दिसणार आहेत. आपलं आयुष्य आनंदी, समाधानी असावं असं म्हणणारे मकरंद अनासपुरे या कुटुंबाचा महत्त्वाचा घटक झालेले आहेत.
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंची ही मजेशीर जोडगोळी ‘ओले आले’ मधून आपल्याला नक्कीच मनसोक्त हसवेल यात काही शंका नाही पण हा चित्रपट आपल्याला जगण्याचा एक अनोखा कानमंत्र सुद्धा देईल हे नक्की. -
नवरदेव (Bsc Agri.) सिनेमाची लग्नघटिका जवळ आली.. २६ जानेवारी रोजी होणार प्रदर्शित

‘शेतकरी राजा आणि या राजाला न मिळणारी नवरी’ या गंभीर प्रश्नावर प्रभावी भाष्य करणारा ‘नवरदेव (Bsc Agri.)’ हा चित्रपट २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय. आज (ता. २३) राष्ट्रीय कृषीदिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला.
आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी, तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला, कितीही प्रगत शेती केली, तरीही आज त्याला लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालंय. दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी अगदी योग्य पद्धतीने या विषयावर भाष्य करत हा विषय किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले आहे. शेतकरी लग्नाळू तरूणांची कथा सांगणाऱ्या ‘नवरदेव BSc. Agri.’ या चित्रपटाचं टिजर रिलीज झालं आणि प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेलं या चित्रपटातील ‘भेटणार कधी नवरदेवा नवरी’ हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं.
शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरूणालाही लग्नासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कथा या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे. क्षितीश दाते, प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आपल्याला दिसेल.
आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित नवरदेव या चित्रपटाचे क्रिएटीव्ह दिग्दर्शक विनोद वणवे हे आहेत, तर विनोद सातव हे क्रिएटीव्ह हेड आहेत. हा चित्रपट २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल. -
श्रेया बुगडेची हवा ‘जाऊ बाई गावात’ मध्ये

प्रेक्षकांची उत्कंठा वाढवायला आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करायला ह्या आठवड्याचा खास पाहुणा येत आहे गावात. मराठमोळी लाफ्टर क्वीन म्हणजेच श्रेया बुगडेचा धमाकेदार अंदाज ‘जाऊ बाई गावातच्या’ वीकएंड भागात बघायला मिळणार. हा नवीन पाहुणा ही रिकाम्या हातानी नाही आलाय एक गमतीदार कार्य घेऊन आला आहे. श्रेया बुगडे आली आहे तर टास्क ही काही तरी आगळा वेगळा असणार, हे तर खरं आहे. स्पर्धकांना गावातल्या लाजाळू मुलां बरोबर डांस करायचा आहे. जितकं सोप्प ऐकायला वाटतंय तितकाच अवघड हे कार्य असणार. आता मज्जा येणार जेव्हा शहरातल्या मुली, गावातल्या लाजाळू मुलांना आपल्या तालावर नाचवायचा प्रयत्न करणार.

कोण होईल ह्या कार्यचा विजेता आणि श्रेया कशी करेल ह्या स्पर्धकांची मदत बघायला खूप मज्जा येणार. तर पाहायला विसरू नका ‘जाऊ बाई गावात’ रात्री ९:३० वाजता आपल्या लाडक्या झी मराठी वाहिनी वर
-
रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे!

जेष्ठ नाट्य – चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत ‘रविकिरण मंडळाची ३७ व्या बालनाट्य स्पर्धा नुकतीच मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, संगीत, प्रकाश योजना तसेच अभिनय (मुलींमध्ये) तृतीय व अभिनय (मुलांमध्ये) उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावून हे बालनाट्य अव्वल ठरले. यासोबत द्वितीय क्रमांक सेक्रेड हार्ट, हायस्कुलच्या ‘को म की का’ या बालनाट्यास तर तृतीय पुरस्कार आर्टिस्ट प्लॅनेट, काळाचौकी शाळेच्या ‘जा रे जा, सारे जा’ पटकाविले. तसेच पहिले उत्तेजनार्थचे बक्षीस विलेपार्ले महिला संघ – मराठी माध्यम शाळेच्या ‘छोटा अंबानी’ या बालनाट्याला तर दुसरे उत्तेजनार्थ गुरुकुल द डे स्कूलच्या ‘अ-फेअर’ला देण्यात आले. या चुरशीच्या स्पर्धेत १७ बालनाट्यांचा समावेश होता, त्यातून हा अंतिम निकाल देण्यात आला आहे.

लालबाग, परळ या कामगार विभागातील डिलाईल रोड ‘रविकिरण मंडळ हे ‘दक्षिण मुंबईचं सांस्कृतिक केंद्र’ म्हणून ओळखले जाते. ते खेळाडू आणि कलावंतांचे आशेचे किरण असून गेली सहा दशके हे मंडळ अविरत कार्यरत आहे. लहान मुलांची शालेय जीवनापासून नाट्यकलेची आवड जोपासली जावी व त्यासोबतच त्यांची प्रशंसा व्हावी या उद्देशाने गेली ३६ वर्षे ही संस्था बालनाट्य स्पर्धांचे आयोजन करीत आहे. नुकतीच मुंबईच्या यशवंत नाट्य मंदिर येथे दिवंगत जेष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांना समर्पित करण्यात आलेली ३७ वी बालनाट्य स्पर्धा मुलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. विजेत्यांना पुरस्कार देण्यासाठी खास ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतील लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी, अभिनेता अभिषेक देशमुख, या मालिकेची लेखिका व कमलाकर नाडकर्णी यांची कन्या नमिता नाडकर्णी – वर्तक, केईएमच्या डॉ. नीना सावंत(मानोसोपचार तज्ञ), यांसह परीक्षक अभिनेत्री दीप्ती भागवत, जुई लागू – खोपकर व अरुण मडकईकर उपस्थित होते.

पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुलांशी दिलखुलास संवाद साधला. मुलांना यशाचा मंत्र सांगताना ते म्हणाले, “रूप, रंग यापेक्षा अभिनय महत्वाचा आहे. तो जमला तरच तुम्ही नायक – नायिका होऊ शकता, मलाही लहानपणी अभिनयात न्यूनगंड होता, मात्र जेष्ठ दिवंगत अभिनेते अरुण सरनाईक यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच मी आज यशस्वी अभिनेता झालो आहे. रविकिरण सारख्या संस्थेचा मला लाभ घेता आला नाही, पण आज तुमच्या सोबत ही संधी आहे, तुम्ही तिचा पुरेपूर लाभ घ्यावा.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश नामदेव वांद्रे मंडळाचे चिटणीस यांनी केले. ते म्हणाले जेष्ठ नाट्य – चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांना ही स्पर्धा समर्पित करण्यात आली असून नाडकर्णींचे रविकिरण मंडळासोबतचे दृढ आणि अत्यंत जिव्हाळ्याचे नातेसंबंध होते. बालरंगभूमीशी नाडकर्णींनीची नाळ जोडलेली होती, ते स्वतः बालकलाकार, लेखक, नाटककार असल्याने त्यांना बालकलाकारांच्या भावविश्वाची अचूक जाण होती, बालरंगभूमीबद्दल त्यांना कायम ममत्व होते.
मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय टाकळे त्यांच्या भाषणात म्हणाले, “रविकिरणचं हे ३७ वे वर्षे आहे. नाट्यकला सेवेतून संस्थेने अनेक प्रतिभावंत कलावंतांच्या जडणघडणीत विशेष भुमिका पार पाडली आहे. ३७ वर्षांच्या या संपूर्ण प्रवासात सुखद आठवणींसह दुःखद प्रसंग देखील आले, मात्र तरीही न डगमगता हा प्रवास असाच सुरू आहे व राहील.

या बालनाट्य स्पर्धेला एलआयसी, ओएनजीसी, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी आर्थिक भार उचलून सहाय्य केले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अशोक परब यांनी सांभाळली व पारितोषिक वितरण समारंभाला लागणाऱ्या क्रिएटिव्ह कामाची जबाबदारी विनीत देसाई, मंदार साटम, व रोशन वांद्रे यांनी सांभाळली.
-
सत्यशोधक चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च, ५ जानेवारीला होणार सर्वत्र प्रदर्शित

समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा ५ जानेवारीला ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. पण कल्पना करा, की सावित्रीमाई आणि ज्योतिराव खरोखर आपल्या समोर अवतरले तर? वेगळ्याच भावना असतील ना… हो.. असंच काहीसं घडलंय, ‘सत्यशोधक’च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान… ‘सत्यशोधक’चा ट्रेलर लॉन्च सोहळा अगदी थाटामाटात पार पडला, यावेळी ज्योतिरावांच्या भूमिकेतील अभिनेते संदीप कुलकर्णी आणि सावित्रीमाईंच्या भूमिकेतील अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी त्यांच्या चित्रपटातील लूकमध्ये एंट्री घेतली. यामुळे उपस्थितांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आणि साक्षात हे प्रेमळ जोडपं आपल्या समोर उभं राहिलं आहे असा भास उपस्थितांना झाला.

‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या यापूर्वी आलेल्या टिझर आणि लूक रिव्हीलमुळे आधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. आता रिलीज झालेल्या ट्रेलरमुळे म. फुले आणि सावित्रीमाईंच्या माहीत नसलेल्या पैलूंची उलगड या ट्रेलरमध्ये होते, यामुळे चित्रपट नक्की कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडेंसह गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. यावेळी इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. माननीय उद्योगमंत्री श्री. उदयजी सावंत, हॉटेल व्यावसायिक श्री. विठ्ठल कामत, रिलायन्स एंटरटेनमेंटचे डिजिटल मार्केटिंग प्रमुख श्री. संदीप यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. कलाकारांपैकी संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडे, गणेश यादव, मोनिका तायडे, जयंत पात्रीकर, बालकलाकार प्रथमेश आणि समृद्धी उपस्थित होते. तसेच चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अमितराज, गायिक वैशाली सामंत, गायिका आरती केळकर हेही उपस्थित होते. तर ज्यांनी पार्श्वसंगीत दिलं ते श्री. समीर फातर्फेकर आणि कास्टिंग डिरेक्टर संदीप जोशी उपस्थित होते. चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे, आप्पा बोराटे, सुनील शेळके, भीमराव पट्टेबहादूर उपस्थित होते, चित्रपटाचे सहनिर्माते राहुल वानखडे बाळासाहेब बांगर , रमेश बनसोडे, सेवानंद वानखडे मंडळी उपस्थित होते, तसेच उत्तम डुकरे, आश्विन वानखडे, निखिल हिवराळे या मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली, याशिवाय चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळीही या कार्यक्रमास आवर्जून आली होती.
समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित , संकल्पना – राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत. शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती मध्ये निखिल पडघन, देवानंद मोहोड, मंगला वानखडे आणि निता गवई याचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारी, २०२४ रोजी प्रदर्शित होईल.
ट्रेलर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👉 https://youtu.be/_edw2152nus
👉https://bit.ly/SatyashodhakTrailer -
CHRISTMAS 2023- Giorgia Andriani Serves Top 3 Posing Ideas and Last-Minute Outfit Inspirations

As the festive season approaches, we all seek inspiration to make our Christmas celebrations extra special. Whether you’re attending a Christmas Eve party, brunch, or dinner, getting the perfect outfit and striking the right pose is crucial for capturing the holiday spirit. Giorgia Andriani, known for her impeccable style and poise, serves as the perfect muse for your Christmas lookbook this year along with serving last-minute Christmas outfit ideas. Let’s explore the top 5 posing ideas and last-minute outfit inspirations that will undoubtedly make you shine on every festive occasion.

Giorgia Andriani flaunts a striking red bodycon dress, featuring an alluring knotted backless design that perfectly accentuates her silhouette. Her loose, center-parted curls and minimal makeup added a touch of glam to her chic look. This can be your perfect Christmas brunch inspiration outfit. To show off that sexy backless look posing with the support of a wall with direct eye contact or with hands folded up and flaunting your sexy figure can perfectly grab attention over the outfit as well as your toned figure. This classic move adds a dash of flirtatious charm while showcasing the details of your ensemble
Giorgia sizzles in a vibrant purple short dress featuring an off-shoulder neckline. Paired with dainty heels, the ensemble exudes a playful and flirtatious charm. Her mesmerizing appearance in the short dress channels a Barbie-esque allure, making a bold style statement. This can be your perfect Christmas bring-in outfit. If you want your heels to also grab the attention then pose like Giorgia, where she sits on the floor and poses like fixing her heels, this pose exudes sophistication and highlights the details of your festive attire.
In a jaw-dropping fashion moment, Giorgia Andriani captivates in a sizzling white corset ensemble. Her sultry look is accentuated by a bold nude lip and a sleek hairstyle, exuding pure glamour and irresistible allure. Giorgia Andriani sets the style bar high, leaving heads turning. These can be your perfect Christmas look, where you wish to skip red and add a subtle color to your look. Giorgia flaunting her perfect collarbone along with showcasing those bangles and posing with direct eye contact, flaunting your sexy curves, can surely make anyone go gaga over you.
With Giorgia Andriani as your style inspiration, this Christmas is the perfect opportunity to showcase your fashion flair. Incorporate these top 3 posing ideas into your festive photoshoots and choose from the last-minute outfit ideas to ensure you’re dressed to impress at every holiday event. Do let us know which one is your favorite look for Giorgia Andriani. -
झी मराठी वाहिनीचे कलाकार म्हणतायेत गुड बाय २०२३ !

२०२३ चा निरोप देण्याची वेळ आली आहे, परंतु २०२३ ने दिलेल्या आठवणींसाठी त्याचे आभार मानल्या शिवाय त्याला गुड बाय करणं शक्य नाही.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मधील अधिपती म्हणजेच ऋषिकेश शेलार ने २०२३ ला निरोप देताना सांगितले, २०२३ ने मला बेस्ट भेट दिली माझ्या मुलीच्या रूपात, १२ जानेवारी माझ्या घरी लक्ष्मीच्या आली. त्याच सोबत पहिल्यांदा मला नायकाची भूमिका साकारायची संधी मिळाली. २०२३ ने मला हे शिकवलं की जर आपली स्वप्न पूर्णकारण्यासाठी मेहनत घेतली आणि त्याच्यावर ठाम विश्वास ठेवला तर ते नक्कीच सत्यात उतरतं. २०२३ तुझे आभार मानतो आयुष्यभर लक्षात राहतील अश्या आठवणी दिल्यास. येणार वर्षसुद्धा असंच असुदे अशी आशा आहे

‘तुला शिवकीनं चांगलाच धडा’ मधली अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळे म्हणाली २०२३ची माझी आवडती आठवण तेव्हाची आहे जेव्हा माझी मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सुरु झाली. अक्षराची भूमिका एका शिक्षिकेची आहे आणि योगायोग असा की माझी आई शिक्षिका होती म्हणून हे पात्र माझ्या खूप जवळच आहे. या मालिकेची टीम इतकी मजेशीर आहे की काम करता करता खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला ही मिळतात.
२०२३ मला स्वतःची काळजी कशी घ्यायची हे शिवकून जात आहे. काम आणि कुटुंब संतुलन कसं ठेवायचं हे ही त्यांनी मला शिकवले. २०२३ माझ्यासाठी खूप अविस्मरणीय वर्ष आहे मनासारखा प्रोजेक्ट, आवडणारी माणसं आयुष्यात आली. २०२३ला निरोप देताना येणारं नवीन वर्ष सुद्धा सुखाचं असुदे.
दक्षता जोईल म्हणजेच ‘सारं काही तिच्यासाठीची’ निशी, २०२३ला निरोप देताना हेच सांगेन की खूप छान छान आठवणी तू मला दिल्या. २०२३ मध्ये मी आई बाबांच्या आणि प्रेक्षकांच्या आशिर्वादाने अनपेक्षित गोष्टी घडल्या. माझ्या कडून ज्या चुका झाल्याआहेत, ज्यागोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत त्या करायला २०२३ नी एक ऊर्जा दिली. २०२३ मध्ये खूप चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली, मला एक भव्य संधी मिळाली. मला झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यात अवॉर्ड मिळाला. २०२३ कडून मी हे शिकले की प्रत्येक दिवस सारखा नसतो पण जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही तुमचा दिवस घडवू शकता.

सातव्या मुलीची सातवी मुलगी मधली रुपाली म्हणजेच ऐश्वर्या नारकर, २०२३ मधली माझी आवडती आठवण म्हणजे एका बोक्याला पुष्कळ दुखापत झाली होती आणि मी त्याला दवाखान्यात नेऊन त्याचा जीव वाचवला. त्याला झालेली इजा इतकी गंभीर होती की त्याच वाचणं मुश्किल होतं. पण वेळेत उपचार मिळाला म्हणून तो ठणठणीत झाला. मग मी त्याला त्याच्या घराच्या इथे पोहचवून आली. मला असा वाटतं मुक्या जनावरांना आपल्या साथीची गरज आहे आणि त्यांची मदत करून माझं मन प्रसन्न होतं. २०२३ मला हे शिकवून जात आहे की आपण एक मेकांचा विचार केला पाहिजे. ह्या वर्षी मी नवीन कार्यांशी जोडली गेली जे प्राण्यांची खळजी घेतात . २०२३ ला निरोप देताना हेच सांगेन खूप समाधान दिलेस तू म्हणून तुझे मना पासून आभार.

तितिक्षा तावडे म्हणजेच सातव्या मुलीची सातवी मुलगी मधली नेत्रा, म्हणाली २०२३ मधली बेस्ट आठवण म्हणजे माझा वाढदिवस खूप छान साजरा झाला. आई, बाबा, माझी बहीण, भाऊजी, भाचा आणि माझ्या काही महत्वाच्या माणसांनी माझा दिवस संस्मरणीय बनवला . २०२३ ने मला संयम ठेवायला शिकवले. २०२२ मध्ये ज्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या त्या मला २०२३ नी दिल्या आणि तीच खूप मोठी शिकवण होती. २०२३ ने मला शिकवले की थोडा संयम ठेवलास तर जे हवं ते तुझ्या पर्यंत येणार. २०२३ चे फक्त आभार मानीन त्यांनी मला खूप काही दिले ज्यासाठी मी प्रार्थना करायचे त्यागोष्टी आता माझ्या आहेत. २०२३ नी मला भरपूर प्रसिद्धी, सातव्या मुलीची सातवी मुलगी सारखा शो आणि प्रेक्षकांचे अपार प्रेम दिले
तर बघायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ संध्या ७:३० वाजता, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ रात्री ८:०० वाजता आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ रात्री १०:३० वाजता फक्त झी मराठीवर. -
आनंद एल राय यांच्या “फिर आयी हसीन दिलरुबा” चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

कलर येलो प्रॉडक्शन ने आजवर अनेक उत्तम कलाकृती दिल्या “तनु वेड्स मनू, रांझना, गुड लक जेरी आणि तुंबाड यांसारख्या गाजलेल्या चित्रपटा ची पर्वणी त्यांनी प्रेक्षकांना दिली. त्यांच्या आगामी प्रोजेक्ट ” फिर आयी हसीन दिलरुबा ” च शूट नुकतच पूर्ण झालं. यशस्वीरित्या शूट पूर्ण झाल्याची खास घोषणा त्यांनी सोशल मीडिया वर दिली. हा चित्रपट आता पोस्ट-प्रॉडक्शनच्या टप्प्यात दाखल झाला आहे.
निर्माते आनंद एल राय यांच्या घरी हे खास रॅप-अप सेलिब्रेशन दणक्यात झालं ज्यात चित्रपटाची कास्ट आणि क्रू सोबतीने त्यांचे जवळचे काही मित्र मंडळी उपस्थित होते.
हसीन दिलरुबा हा OTT मनोरंजनाच्या क्षेत्रात एक ट्रेलब्लेझर ठरला आणि सर्वाधिक पाहिलेला चित्रपट म्हणून सलग अनेक आठवडे आपला दबदबा कायम ठेवत त्याने आपल स्थान निर्माण केले. आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन ने OTT वर आपल्या कामाची जादू कायम दाखवली.
2024 मध्ये Netflix वर फिर आयी हसीन दिलरुबाच्या OTT रिलीजच्या घोषणेने या प्रतिष्ठित प्रॉडक्शन हाऊस ने अजून वेगळी उंची गाठली आहे.
फिर आयी हसीन दिलरुबा व्यतिरिक्त, कलर यलो प्रॉडक्शन्स तेरे इश्क में आणि नखरेवाली असे अनेक रोमांचक प्रोजेक्ट करत आहेत. -
झी मराठी वाहिनीचे कलाकार म्हणतायेत गुड बाय २०२३ !

२०२३ चा निरोप देण्याची वेळ आली आहे, परंतु २०२३ ने दिलेल्या आठवणींसाठी त्याचे आभार मानल्या शिवाय त्याला गुड बाय करणं शक्य नाही.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मधील अधिपती म्हणजेच ऋषिकेश शेलार ने २०२३ ला निरोप देताना सांगितले, २०२३ ने मला बेस्ट भेट दिली माझ्या मुलीच्या रूपात, १२ जानेवारी माझ्या घरी लक्ष्मीच्या आली. त्याच सोबत पहिल्यांदा मला नायकाची भूमिका साकारायची संधी मिळाली. २०२३ ने मला हे शिकवलं की जर आपली स्वप्न पूर्णकारण्यासाठी मेहनत घेतली आणि त्याच्यावर ठाम विश्वास ठेवला तर ते नक्कीच सत्यात उतरतं. २०२३ तुझे आभार मानतो आयुष्यभर लक्षात राहतील अश्या आठवणी दिल्यास. येणार वर्षसुद्धा असंच असुदे अशी आशा आहे

‘तुला शिवकीनं चांगलाच धडा’ मधली अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळे म्हणाली २०२३ची माझी आवडती आठवण तेव्हाची आहे जेव्हा माझी मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सुरु झाली. अक्षराची भूमिका एका शिक्षिकेची आहे आणि योगायोग असा की माझी आई शिक्षिका होती म्हणून हे पात्र माझ्या खूप जवळच आहे. या मालिकेची टीम इतकी मजेशीर आहे की काम करता करता खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला ही मिळतात.
२०२३ मला स्वतःची काळजी कशी घ्यायची हे शिवकून जात आहे. काम आणि कुटुंब संतुलन कसं ठेवायचं हे ही त्यांनी मला शिकवले. २०२३ माझ्यासाठी खूप अविस्मरणीय वर्ष आहे मनासारखा प्रोजेक्ट, आवडणारी माणसं आयुष्यात आली. २०२३ला निरोप देताना येणारं नवीन वर्ष सुद्धा सुखाचं असुदे.
दक्षता जोईल म्हणजेच ‘सारं काही तिच्यासाठीची’ निशी, २०२३ला निरोप देताना हेच सांगेन की खूप छान छान आठवणी तू मला दिल्या. २०२३ मध्ये मी आई बाबांच्या आणि प्रेक्षकांच्या आशिर्वादाने अनपेक्षित गोष्टी घडल्या. माझ्या कडून ज्या चुका झाल्याआहेत, ज्यागोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत त्या करायला २०२३ नी एक ऊर्जा दिली. २०२३ मध्ये खूप चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली, मला एक भव्य संधी मिळाली. मला झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यात अवॉर्ड मिळाला. २०२३ कडून मी हे शिकले की प्रत्येक दिवस सारखा नसतो पण जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही तुमचा दिवस घडवू शकता.

सातव्या मुलीची सातवी मुलगी मधली रुपाली म्हणजेच ऐश्वर्या नारकर, २०२३ मधली माझी आवडती आठवण म्हणजे एका बोक्याला पुष्कळ दुखापत झाली होती आणि मी त्याला दवाखान्यात नेऊन त्याचा जीव वाचवला. त्याला झालेली इजा इतकी गंभीर होती की त्याच वाचणं मुश्किल होतं. पण वेळेत उपचार मिळाला म्हणून तो ठणठणीत झाला. मग मी त्याला त्याच्या घराच्या इथे पोहचवून आली. मला असा वाटतं मुक्या जनावरांना आपल्या साथीची गरज आहे आणि त्यांची मदत करून माझं मन प्रसन्न होतं. २०२३ मला हे शिकवून जात आहे की आपण एक मेकांचा विचार केला पाहिजे. ह्या वर्षी मी नवीन कार्यांशी जोडली गेली जे प्राण्यांची खळजी घेतात . २०२३ ला निरोप देताना हेच सांगेन खूप समाधान दिलेस तू म्हणून तुझे मना पासून आभार.

तितिक्षा तावडे म्हणजेच सातव्या मुलीची सातवी मुलगी मधली नेत्रा, म्हणाली २०२३ मधली बेस्ट आठवण म्हणजे माझा वाढदिवस खूप छान साजरा झाला. आई, बाबा, माझी बहीण, भाऊजी, भाचा आणि माझ्या काही महत्वाच्या माणसांनी माझा दिवस संस्मरणीय बनवला . २०२३ ने मला संयम ठेवायला शिकवले. २०२२ मध्ये ज्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या त्या मला २०२३ नी दिल्या आणि तीच खूप मोठी शिकवण होती. २०२३ ने मला शिकवले की थोडा संयम ठेवलास तर जे हवं ते तुझ्या पर्यंत येणार. २०२३ चे फक्त आभार मानीन त्यांनी मला खूप काही दिले ज्यासाठी मी प्रार्थना करायचे त्यागोष्टी आता माझ्या आहेत. २०२३ नी मला भरपूर प्रसिद्धी, सातव्या मुलीची सातवी मुलगी सारखा शो आणि प्रेक्षकांचे अपार प्रेम दिले
तर बघायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ संध्या ७:३० वाजता, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ रात्री ८:०० वाजता आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ रात्री १०:३० वाजता फक्त झी मराठीवर.
