
-
Giorgia A Slaying in style with Good Hair Day

Giorgia Andriani is a dancer and model from Italy who mostly appears in Bollywood films and commercials. She has also collaborated with a number of reputable modeling agencies.
-
Sunny Leone’s ‘Kennedy’ Stuns Globally, Sets Sights On MAMI Premiere !

Sunny Leone’s ‘Kennedy’ To Dazzle At MAMI Film Festival With A Stellar Debut! Sunny Leone’s film, Kennedy, will make its highly expected debut at the prestigious Mumbai Academy of the Moving Image (MAMI) film festival on October 29th, following a stellar global performance. Directed by Anurag Kashyap and featuring Rahul Bhatt, the movie seamlessly weaves together elements of drama, suspense, and intrigue. Sunny’s portrayal of the enigmatic character Charlie, a femme fatale, serves as a proof to her remarkable versatility as an actress.

Anticipation Soars As Sunny Leone’s ‘Kennedy’ Set To Premiere At MAMI We found the actress saying, “I am overjoyed as ‘Kennedy’ makes its debut on Indian screen! It’s a truly special moment, and I’m ready to present this film to my Indian fans and audience. This project holds a special place in my heart, and I genuinely hope that you like it as I did while being a part of its creation.” In May 2023, “Kennedy” launched a worldwide tour at various international film festivals after a successful premiere at Cannes’ ‘Midnight Screening,’ garnering acclaim and anticipation for its MAMI debut.
Sunny Leone is not just a fashion icon and a star but also a versatile artist prepared to embrace challenging roles. She is soon to debut in the Tamil film industry with ‘Quotation Gang’ featuring notable actors like Jackie Shroff, Priyamani, and Sara Arjun. -
‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातील ‘आली आली गं भागाबाई’ गाणं आलं भेटीला

एखाद्या गीताची जादूअथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण करून देत असते. अनेक चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात असल्याचे आपण बघतो. असंच एक जोरदार गीत आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ या धमाल चित्रपटातून आपल्या भेटीला आलं आहे.
प्रसाद खांडेकर दिग्दर्शित‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात ‘आली आली गं भागाबाई’ हे पारंपरिक गीत नव्या ढंगात सादरकेलं आहे. नुकतंच हे गीत प्रदर्शित झालं असून या गीतालाप्रेक्षक पसंतीची पावती मिळाली आहे. हे गीतरोहन प्रधान यांनी गायलं आहे. मंदार चोळकर यांच्या गीतलेखनाला रोहन-रोहनयांचं संगीत लाभलं आहे. या गीतातून चित्रपटातील सर्व कलाकारांचा ढिंच्याक अंदाजपहायला मिळतोय. या गीताची आणि चित्रपटाच्या कथेची गंमत चित्रपट पाहिल्यानंतरचउलगडेल. चित्रपटाच्या गीताचे हक्क सारेगम कडे आहेत.
२४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदायेऊन तर बघा’या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमारमोहंती,दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपकपेंटर यांचीअसून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायणमूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. गिरीश कुलकर्णी,सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने,प्रसादखांडेकर, राजेंद्रशिसातकर, नम्रतासंभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर,रोहित माने,सुशील इनामदार आदि चित्रपटसृष्टीती लकसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्तानेदिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. -
स्त्री संघर्षाचा वेध घेणारा ‘सोंग्या’

रूढी परंपरांच्या जोखडात अडकलेल्या स्त्री वेदनेचा वेध परखडपणे घेत त्यांच्या दृष्टीकोनातून समाजपरिवर्तनाचा प्रामाणिक प्रयत्न ‘सोंग्या’ चित्रपटाच्या माध्यमातून केला असल्याचे दिग्दर्शक मिलिंद इनामदार सांगतात आपल्या समाजात अनेक प्रथा परंपरा आहेत त्या जशा चांगल्या आहेत तशाच काही कुप्रथाही आहेतच. ज्या स्त्रियांवर अन्याय करतात केवळ अशिक्षित स्त्रिया नाही तर शिक्षित स्त्रिया ही त्यात भरडल्या जातात. मुलींची स्वप्न धुळीला मिळतात. अशाच एका कुप्रथेविरुद्ध उभी राहते एक तरुणी, तिचं प्रेम, तिची स्वप्न, इच्छा सर्व मोडून सुरु करते एक नवा संघर्ष. या संघर्षातून तिचं अपेक्षित ध्येय साध्य होतं का? या धीरोदत्त संघर्षाची कथा सांगणारा निरामि फिल्म्सची निर्मिती असलेला मिलिंद इनामदार दिग्दर्शित ‘सोंग्या’ हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याआधी या चित्रपटाचं अत्यंत समर्पक पोस्टर आपल्या भेटीला आलं आहे.
‘सोंग्या’ चित्रपटातील मुख्य भूमिकेत ऋतुजा बागवे, अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदि कलाकार दिसणार आहेत. निशांत काकिर्डे, राहुल पाटील, मिलिंद इनामदार ‘सोंग्या’ चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले आहे. संगीत विजय गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, योगेश चिकटगावकर, स्वप्नजा लेले, अमिता घुंगरी यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. छायांकन अरविंद कुमार तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. -
सोनू सूद आणि झी स्टुडिओच्या अँक्शन पॅक्ड चित्रपट “फतेह “च शूटिंग पूर्ण !

जादुई प्रवासाची फक्त सुरुवात आहे आणि मी या चित्रपटाचं शूट पूर्ण केल आहे. जॅकी मी तुझ्या नम्रतेची परिश्रमाची आणि समर्पणाची मनापासून प्रशंसा करतो सोनू सूदने त्याच्या डेब्यू प्रोडक्शन ‘फतेह’ साठी चित्रीकरण पूर्ण केल असून त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या पडद्यामागील एक खास झलक बघायला मिळाली. सोनू ने त्याची सह-अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या सोबत पडद्यामागील फोटो शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली. या निमित्ताने या कलाकारांमधील निर्विवाद केमिस्ट्री बघायला मिळाली. या दोघांची ऑन-स्क्रीन जादू मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत.
“फतेह” त्याच्या अॅक्शन चित्रपट असणार असून हॉलीवूड-प्रेरित स्टंट्ससह उत्साह वाढवणारा असणार आहे. अलीकडेच सोनू ने काही खास फोटो शेयर केले असून पडद्यामागील या फोटो ची सोनू ने खास झलक दाखवली आहे. सूद आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या आकर्षक ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची एक आकर्षक झलक दिली आहे. भारतीय सिनेमात हॉलीवूड-शैलीचा थरार अनुभवण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत. झी स्टुडिओज, शक्ती सागर प्रॉडक्शनच्या सहकार्याने, “फतेह” प्रतिभा, केमिस्ट्री, हाय-ऑक्टेन स्टंट्स ची पर्वणी असणार आहे.
-
‘सेक्स्टॅार्शन’वर भाष्य करणारी ‘कांड’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

सेक्स्टॅार्शन म्हणजेच लैंगिक खंडणी. सध्या समाजात खंडणीचा हा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावतोय. समाजातील विविध स्तरातील लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरातीतून, फोनवर, सोशल मीडियावर सेक्स संदर्भातील व्हिडीओज, जाहिराती बघतात आणि एका वेगळ्याच चक्रव्युहात अडकतात. समाजाच्या भीतीपोटी,शरमेखातर या महाजालमध्ये अडकलेले अनेक जण योग्य पाऊल उचलत नाहीत. समाजातील याच भयाण वास्तवावर भाष्य करणारी ‘कांड’ ही वेबसीरिज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. भिमराव काशिनाथ मुडे दिग्दर्शित ‘कांड’ या वेबसीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच झळकले असून मनवा नाईक, हरीश दुधाडे, भिमराव काशिनाथ मुडे यांनी या सीरिजचे लेखन केले आहे. प्लॅनेट मराठी आणि मॅन्यूएला क्रिएशन्स निर्मित या वेबसीरिजचे अक्षय विलास बर्दापूरकर आणि मनवा नाईक निर्माते आहेत. आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती यात कोणते चेहरे झळकणार आहेत याची.
‘कांड’बद्दल दिग्दर्शक भिमराव काशिनाथ मुडे म्हणतात, ‘’लैंगिक खंडणी हा एक गंभीर विषय आहे. लैंगिक खंडणीला बळी पडलेले अनेकदा लाजेखातर, भीतीमुळे या विषयावर भाष्य करणे टाळतात आणि शेवटी टोकाचा निर्णय घेतात. हे अत्यंत चुकीचे आहे. समाजाला जागरूक करणारी ही वेबसीरिज प्रत्येकाने पाहावी, अशी आहे.”
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” सेक्स्टॅार्शनच्या गुन्ह्यामध्ये मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. समाजात होणारी बदनामी, ही खंडणीदाराची मोठी ताकद असते. हीच ताकद मोडून काढायचा प्रयत्न ‘कांड’मध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाला बळी पडल्यावर न घाबरता काय करावे, हे या वेबसीरिजच्या माध्यमातून दाखवून प्रेक्षकांना सजग राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.” -
अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा

अभिनय आणि प्रथमेश हे दोघेही ‘सिंगल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत.
‘दोस्त दोस्त ना रहा’ असं म्हणत अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब या दोन जिवलग मित्रांच्या नात्यात सध्या दुरावा निर्माण झाला आहे. प्रत्येकजण कधी ना कधी हा प्रेमात पडतोच. आपल्या मित्राला त्याचं प्रेम मिळावं यासाठी जीवाचं रान करणारे मित्र आपण पाहिले आहेत. मात्र अभिनयला त्याच प्रेम मिळू नये यासाठी चक्क प्रथमेशने खोडा घातला आहे. असं कोणतं कारण आहे की, अभिनयच्या प्रेमाच्या आड प्रथमेश येत असेल? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. याचं उत्तर ३ नोव्हेंबरला चित्रपटगृहात मिळणार असून त्यासाठी प्रथमेश आणि अभिनय या जोडीचा ‘सिंगल’ हा चित्रपट तुम्हाला पहावा लागेल.
अभिनय आणि प्रथमेश हे दोघेही ‘सिंगल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. हा एक धमाल चित्रपट असून एक मित्र प्रेमाच्या बाजूने तर दुसरा मित्र प्रेमाच्या विरोधात काय काय करामती करतो याची गंमत पहायला मिळणार आहे. पोरीपायी दोस्तीत कुस्ती होईल की प्रेम जिंकेल यावर भाष्य करणारा ‘सिंगल’ हा चित्रपट प्रेक्षकांच फूल टू मनोरंजन करेल असा विश्वास अभिनय आणि प्रथमेश व्यक्त करतात. या दोघांसोबत या चित्रपटात रमेश परदेशी, प्राजक्ता गायकवाड, राजेश्वरी खरात, सुरेश विश्वकर्मा आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी ‘सिंगल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक, ‘सिंगल’ हे या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे यांची आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे. -
लंडन मिसळ, ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज…

चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत तर भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहेत ए बी इंटरनॅशनल,म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट प्रेरित आहे, हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य.
‘लंडन मिसळ’ या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत तर सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत. दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे, तर सह-दिग्दर्शन वैशाली पाटील यांनी केले आहे.पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. वैशाली सामंत,रोहित राऊत,वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे तर ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या संगीताच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या साई-पियुष या संगीतकारांच्या जोडीनं ‘लंडन मिसळ’ चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे. तसेच, चित्रपटाची गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि समीर सामंत यांनी लिहिली आहेत. वैशाली सामंंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.
चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत तर भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहेत आणि ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असेल. आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची ही कथा आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो,आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे लंडन मिसळ. नाटक, अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी आपल्याला या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे.चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन फ़िल्मअस्त्रा स्टुडिओज करत आहेत . -
Ajay Bhupathi’s ‘Mangalavaar’ is a dark, rooted, rustic thriller

The trailer for this November 17th release is nail-biting After ‘RX 100’ and ‘Maha Samudram’, super-talented Tollywood director Ajay Bhupathi is returning to the big screen with ‘Mangalavaar’. Produced by Swathi Reddy Gunupati and Suresh Varma under the banner of Mudhra Media Works, the film has Payal Rajput in the lead role. The creators of the thriller drama have announced that the film will be released on November 17th in Hindi, Telugu, Malayalam, Kannada, and Tamil. Ajaneesh B Loknath of ‘Kantara’ fame is the music director. Payal Rajput has a strong protagonist’s role in this dark thriller.
Ajay Bhupathi, speaking on the occasion, said, “‘Mangalavaar’ is a dark thriller, which has been made as a different genre film. I can’t say anything more than that for now. It is still difficult to make a dark thriller in a rural background and strong nativity. Editing and sound design should be kept in mind while shooting. We have touched a point that no one has touched before. I hope you will support this movie like you backed ‘RX 100’. There is a reason behind the title ‘Mangalavaar’. You will know that by watching the movie. Producer Swati is very classy. My film will become a success when the masses accept it. I don’t say it is a female-oriented movie. We have touched on a point related to women, something the producer liked a lot. All the shooting was done outside Hyderabad. The budget did go up. She knew this was going to be a huge film. Thanks to my elder brother Suresh Varma and Swathi Reddy.”
Swathi Reddy said, “I am very happy to be making this movie on Mudhra Media Works with Ajay Bhupathi’s story. Since the time the story was first narrated to us, its span only increased. We trusted the director and made the film. All the artists who have acted in the movie have nailed it. The movie would not have been made without Suresh. There is no film without Ajaneesh B Loknath’s songs and background music.”
Ajay Bhupathi is the production partner at A Creative Works for ‘Mangalavaar’.
Cast:
Payal Rajput, Shritej, Ajmal Amir, Chaitanya Krishna, Ajay Ghosh, Laxman and others.
Crew:
Story, Screenplay, Direction: Ajay Bhupathi.
Cinematographer: Dasaradhi Sivendra
Music Director: B Ajaneesh Loknath
Executive Producer: Saikumar Yadavilli
Editor: Gullapalli Madhav Kumar
Dialogue writers: Tajuddin Syed, Raghav
Art Director: Mohan Talluri
Production Designer: Raghu Kulkarni
Fight Masters: Real Satish, Prithvi
Sound Designer & Audiography: National Award winner Raja Krishnan
Choreographer: Bhanu
Costume Designer: Mudasar Mohammad
PRO: Pulagam Chinnarayana
Digital Marketing: Trendy Tolly PR -
मानाचि लेखक संघटनेने सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या राजेश देशपांडे, श्रीकांत बोजेवार, श्याम पेठकर, राहुल वैद्य व विवेक आपटे या प्रतिनिधींच्या मंडळाने माननीय सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
१. लेखकाला आपल्या नाटकाचे किंवा चित्रपटाचे शीर्षक स्वतःच्या नावाने रजिस्टर करता यावे,
२. कविता गीते व संवादातील विशिष्ट शब्दरचना मालिकेचे शीर्षक म्हणून वापरली गेली तर मूळ लेखकाला त्याचे उचित श्रेय व वन टाइम पेमेंट स्वरूपात मानधन मिळावे,
३. चित्रपटाच्या दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि मुख्य कलाकारांप्रमाणेच लेखकाचेही, ना हरकत प्रमाणपत्र (NOC) असल्याशिवाय या चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट दिले जाऊ नये, या अस्तित्वात असलेल्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,
४. कॉपीराईट रजिस्ट्रेशन दिल्लीप्रमाणेच मुंबईतही व्हावे,
५. वृद्ध व विकलांग लेखकांसाठी पेन्शन योजना असावी, व
६. मानाचि लेखक संघटनेला त्यांच्या कार्यालयासाठी व त्यांचे विविध उपक्रम राबवण्यासाठी सरकारी आस्थापनात जागा मिळावी,
या लेखकांच्या प्रमुख मागण्या होत्या. या मुद्द्यांवर माननीय सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा झाली. माननीय मंत्र्यांनी यातील काही मुद्द्यांवर चित्रपट महामंडळ, चित्रनगरीचे संचालक व रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी वरीलपैकी काही समस्या सोडवण्यासाठी यथायोग्य मार्ग काढावा, असे सुचवले. त्याबाबत मानाचि लेखक संघटना आवश्यक ती पावले उचलेल.
