
-
गजेंद्र अहिरे यांना ‘कमल शेंडगे रंगकर्मी पुरस्कार’

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुलुंड शाखेचा अकरावा वर्धापन दिन विशेष सोहळ्यात दिग्दर्शक आणि लेखक गजेंद्र अहिरे यांना ‘स्व. श्री. कमल शेंडगे रंगकर्मी पुरस्कार’ ABP माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा सोहळा सु. ल. गद्रे सभागृह, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड (पश्चिम) येथे पार पडला.
मराठी रंगभूमीतील गजेंद्र अहिरे यांचा वाटा
गेल्या काही दशकांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी भावभावनांचा वेध घेणाऱ्या गजेंद्र अहिरे यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला नवे परिमाण दिले आहे. सध्या रंगभूमीवर गाजत असलेले त्यांचे “शेवग्याच्या शेंगा” हे नाटक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, सूक्ष्म मानवी नातेसंबंध आणि हळुवार विनोद यांच्या सुरेख मिश्रणामुळे या नाटकाने रंगभूमीला नवचैतन्य दिले आहे.
इतर रंगकर्मींचाही गौरव
या सोहळ्यात अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेत्री अंजली वालसणकर यांनाही समान पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार वितरणाची जबाबदारी ABP माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी पार पाडली.गजेंद्र अहिरे यांची प्रतिक्रिया
पुरस्कार स्वीकारताना गजेंद्र अहिरे म्हणाले, “मराठी रंगभूमी ही केवळ करमणुकीचं साधन नसून ती समाजाशी थेट संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे.” त्यांच्या या वक्तव्याने आणि सन्मानामुळे मराठी नाट्यवर्तुळात आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. -
“स्मार्ट सुनबाई” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

“स्मार्ट सुनबाई” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
रहस्य, हास्य आणि भावबंधांचा मेळ साधणारा शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित नवीन मराठी चित्रपट “स्मार्ट सुनबाई” २१ नोव्हेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. कार्तिक दोलताडे पाटील सहनिर्मित हा सिनेमा एक आगळावेगळा अनुभव देईल अशी चर्चा रंगत आहे. नुकतेच या चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यानेच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.पोस्टरने वाढवली उत्सुकता
प्रेक्षकांच्या मनात औत्सुक्याची ठिणगी पेटवणाऱ्या पोस्टरवरून हे स्पष्ट होते की कथेत गूढतेसोबतच थरार आणि विनोदाचा सुंदर संगम आहे. काही कलाकार शहरी लुकमध्ये तर काही ग्रामीण लुकमध्ये दिसत आहेत. या वैविध्यामुळे एकच प्रश्न सर्वत्र उपस्थित होतोय – “ही स्मार्ट सुनबाई नक्की कोण? आणि तिच्या आयुष्यात असं काय घडणार आहे?”दिग्गज कलाकारांचा ताफा
या सिनेमात रोहन पाटील, संतोष जुवेकर, भाऊ कदम, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, प्राजक्ता हनमगर, स्नेहल शिदम, किशोरी शहाणे, उषा नाईक, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे, आर्या सकुंडे, वैशाली चौधरी, सपना पवार आणि कांचन चौधरी यांसारखे दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीमुळेच चित्रपट अधिक रंगतदार ठरणार आहे. दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्या मते, प्रत्येक सुनेला “स्मार्ट सुनबाई” होण्यासाठी हा सिनेमा नक्कीच प्रेरणादायी ठरेल.कथालेखन आणि संगीताची जादू
चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी केले असून, संगीतकार विजय नारायण गवंडे आणि साई–पियुष यांनी या सिनेमाला बहारदार संगीत दिले आहे. गीतकार वैभव देशमुख आणि अदिती द्रविड यांच्या लेखणीतून उमटलेली गाणी अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र आणि उर्मिला धनगर यांच्या सुरेल आवाजात सजली आहेत.२१ नोव्हेंबरपासून थिएटर्समध्ये
प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची लाट निर्माण करणारा “स्मार्ट सुनबाई” हा सिनेमा २१ नोव्हेंबर २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, रहस्य, थरार, हास्य आणि नात्यांच्या भावबंधांचा संगम मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.“स्मार्ट सुनबाई” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
रहस्य, हास्य आणि भावबंधांचा मेळ साधणारा शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित नवीन मराठी चित्रपट “स्मार्ट सुनबाई” २१ नोव्हेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. कार्तिक दोलताडे पाटील सहनिर्मित हा सिनेमा एक आगळावेगळा अनुभव देईल अशी चर्चा रंगत आहे. नुकतेच या चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यानेच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.पोस्टरने वाढवली उत्सुकता
प्रेक्षकांच्या मनात औत्सुक्याची ठिणगी पेटवणाऱ्या पोस्टरवरून हे स्पष्ट होते की कथेत गूढतेसोबतच थरार आणि विनोदाचा सुंदर संगम आहे. काही कलाकार शहरी लुकमध्ये तर काही ग्रामीण लुकमध्ये दिसत आहेत. या वैविध्यामुळे एकच प्रश्न सर्वत्र उपस्थित होतोय – “ही स्मार्ट सुनबाई नक्की कोण? आणि तिच्या आयुष्यात असं काय घडणार आहे?”दिग्गज कलाकारांचा ताफा
या सिनेमात रोहन पाटील, संतोष जुवेकर, भाऊ कदम, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, प्राजक्ता हनमगर, स्नेहल शिदम, किशोरी शहाणे, उषा नाईक, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे, आर्या सकुंडे, वैशाली चौधरी, सपना पवार आणि कांचन चौधरी यांसारखे दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीमुळेच चित्रपट अधिक रंगतदार ठरणार आहे. दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्या मते, प्रत्येक सुनेला “स्मार्ट सुनबाई” होण्यासाठी हा सिनेमा नक्कीच प्रेरणादायी ठरेल.कथालेखन आणि संगीताची जादू
चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी केले असून, संगीतकार विजय नारायण गवंडे आणि साई–पियुष यांनी या सिनेमाला बहारदार संगीत दिले आहे. गीतकार वैभव देशमुख आणि अदिती द्रविड यांच्या लेखणीतून उमटलेली गाणी अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र आणि उर्मिला धनगर यांच्या सुरेल आवाजात सजली आहेत.२१ नोव्हेंबरपासून थिएटर्समध्ये
प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची लाट निर्माण करणारा “स्मार्ट सुनबाई” हा सिनेमा २१ नोव्हेंबर २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, रहस्य, थरार, हास्य आणि नात्यांच्या भावबंधांचा संगम मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.पोस्टरने वाढवली उत्सुकता
प्रेक्षकांच्या मनात औत्सुक्याची ठिणगी पेटवणाऱ्या पोस्टरवरून हे स्पष्ट होते की कथेत गूढतेसोबतच थरार आणि विनोदाचा सुंदर संगम आहे. काही कलाकार शहरी लुकमध्ये तर काही ग्रामीण लुकमध्ये दिसत आहेत. या वैविध्यामुळे एकच प्रश्न सर्वत्र उपस्थित होतोय – “ही स्मार्ट सुनबाई नक्की कोण? आणि तिच्या आयुष्यात असं काय घडणार आहे?”दिग्गज कलाकारांचा ताफा
या सिनेमात रोहन पाटील, संतोष जुवेकर, भाऊ कदम, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, प्राजक्ता हनमगर, स्नेहल शिदम, किशोरी शहाणे, उषा नाईक, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे, आर्या सकुंडे, वैशाली चौधरी, सपना पवार आणि कांचन चौधरी यांसारखे दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीमुळेच चित्रपट अधिक रंगतदार ठरणार आहे. दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्या मते, प्रत्येक सुनेला “स्मार्ट सुनबाई” होण्यासाठी हा सिनेमा नक्कीच प्रेरणादायी ठरेल.कथालेखन आणि संगीताची जादू
चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी केले असून, संगीतकार विजय नारायण गवंडे आणि साई–पियुष यांनी या सिनेमाला बहारदार संगीत दिले आहे. गीतकार वैभव देशमुख आणि अदिती द्रविड यांच्या लेखणीतून उमटलेली गाणी अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र आणि उर्मिला धनगर यांच्या सुरेल आवाजात सजली आहेत.२१ नोव्हेंबरपासून थिएटर्समध्ये
प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची लाट निर्माण करणारा “स्मार्ट सुनबाई” हा सिनेमा २१ नोव्हेंबर २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, रहस्य, थरार, हास्य आणि नात्यांच्या भावबंधांचा संगम मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. -
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘नाट्यशृंगार, पुणे’ या संस्थेची ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ ही एकांकिका प्रथम

नाट्य परिषदेचा करंडक महोत्सव
शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्रातील १९ केंद्रांवर प्राथमिक फेरी झाली. त्यानंतर निवडक २५ एकांकिकांची अंतिम फेरी १५ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा, मुंबई येथे रंगली.
कलावंतांसाठी विशेष कार्यशाळा
अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य परिषदेने त्यांच्या गावी जाऊन कार्यशाळांचे आयोजन केले. या कार्यशाळांना कुमार सोहोनी, संतोष पवार, राजीव तुलालवार, अद्वैत दादरकर, संतोष वेरुळकर, विजू माने, गणेश रेवडेकर, अमेय दक्षिणदास, प्रताप फड, मंगेश सातपुते, महेंद्र तेरेदेसाई, सचिन शिंदे, प्रदीप वैद्य आणि विश्वास सोहोनी अशा दिग्गज दिग्दर्शक व अभिनेत्यांनी मार्गदर्शन केले.
अंतिम फेरी व परीक्षक मंडळ
अंतिम फेरी उत्साहपूर्ण वातावरणात झाली. परीक्षक म्हणून विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, सुहास जोशी, रविंद्र पाथरे आणि सौरभ पारखे यांनी काम पाहिले. स्पर्धा समन्वयक म्हणून सतिश लोटके आणि डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी जबाबदारी पार पाडली.
मान्यवरांची उपस्थिती
या महोत्सवात सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, विजय गोखले, संजय मोने आणि निर्माते दिलीप जाधव उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले. उद्घाटन समारंभ अजित भुरे, सतिश लोटके, विजय गोखले, सयाजी शिंदे, उदय राजेशिर्के, चंद्रशेखर पाटील, शिवाजी शिंदे व विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाला. पारितोषिक वितरण सोहळा मोहन जोशी, प्रशांत दामले, भाऊसाहेब भोईर, विजय गोखले, संजय मोने, दिलीप जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
विजेते एकांकिका आणि कलावंत
- प्रथम क्रमांक : नाट्यशृंगार, पुणे – चिरंजीव परफेक्ट बिघडलाय
- द्वितीय क्रमांक : रंगायन, नागपूर – स्वतःची सावली
- तृतीय क्रमांक : नाट्यमय, कोल्हापूर – पारधी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राहुल कुलकर्णी (चिरंजीव परफेक्ट बिघडलाय)
सर्वोत्कृष्ट लेखक : अमेय जगताप (स्वतःची सावली)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : गौरी पवार (पारधी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अनिकेत देशमुख (चिरंजीव परफेक्ट बिघडलाय)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य : नाट्यशृंगार, पुणे (चिरंजीव परफेक्ट बिघडलाय)
सर्वोत्कृष्ट संगीत : रंगायन, नागपूर (स्वतःची सावली)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : नाट्यमय, कोल्हापूर (पारधी)प्रशांत दामले यांचा संदेश
परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले की, नाटकात काम करण्यासाठी चिकाटी, शिकण्याची जिद्द आणि व्यसनांपासून लांब राहणे गरजेचे आहे. सहकाऱ्यांसोबत काम केल्यावरच नाटक सुंदर होते. फक्त बक्षीस मिळालं म्हणून यश ठरत नाही, तर चांगले काम करणाऱ्यांनाच व्यावसायिक रंगभूमीवर स्थान मिळते.
-
‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’मध्ये ‘वडापाव’ टीमचा सहभाग

आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या (इंटरनॅशनल कोस्टल क्लिन अप डे) निमित्ताने मार्वे बीचवर आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’मध्ये ‘वडापाव’ चित्रपटाच्या टीमने उत्साहाने सहभाग घेतला. समुद्रकिनाऱ्यावरील कचरा साफ करून पाण्याचं प्रदूषण कमी करणे, सागरी जलसृष्टीचं रक्षण करणे आणि लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कलाकार आणि विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग
या उपक्रमात दिग्दर्शक-अभिनेते प्रसाद ओक, अभिनेत्री गौरी नलावडे, रितिका श्रोत्री, अभिनेता शाल्व किंजवडेकर, निर्माते निनाद बत्तीन यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेनंतर उपस्थितांनी ‘वडापाव’ या चित्रपटाशी निगडित उपक्रमाचा आनंद घेत चित्रपटाचं प्रमोशन वेगळ्या पद्धतीने अनुभवला.प्रसाद ओक यांची भावना
या उपक्रमादरम्यान प्रसाद ओक म्हणाले, “या उपक्रमामुळे ‘वडापाव’च्या टीमला एक अनोखी संधी मिळाली. शूटिंग आणि प्रमोशनच्या गडबडीत अशा सामाजिक ॲक्टिव्हिटीसाठी वेळ मिळत नाही. पण या निमित्ताने ती संधी मिळाली. त्यासाठी निर्मात्यांचे, टीमचे आणि या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार.”‘वडापाव’ चित्रपटाची माहिती
एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनरअंतर्गत ‘वडापाव’ची निर्मिती झाली आहे. या चित्रपटाचे निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन आहेत. सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल तर छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे आहेत. लेखन सिद्धार्थ साळवी यांचं असून, चित्रपटात प्रसाद ओक, गौरी नलावडे, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत.वडापाव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
येणाऱ्या २ ऑक्टोबर रोजी ‘वडापाव’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सामाजिक भान आणि मनोरंजनाचा संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. -
‘दशावतार’ कथा कोकणची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची – उद्धव ठाकरे

विशेष शोमध्ये ठाकरे कुटुंबीयांची उपस्थिती
‘दशावतार’ चित्रपटाचा विशेष शो उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धवजींसह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले, ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी आणि जागतिक कीर्तीच्या अभिनेत्री छाया कदम उपस्थित होत्या.कलाकार आणि दिग्दर्शकांचे कौतुक
या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या कामाचं विशेष कौतुक केलं. तसेच चित्रपटातील कलाकार सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, अजित भुरे यांच्यासह संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं.
रूपेरी पडद्यावर अनुभवायला हवी भव्यता
मराठीत अनेक वर्षांनंतर असा भव्य चित्रपट पाहायला मिळाल्याचे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, ही भव्यता आणि सौंदर्य रसिकांनी रूपेरी पडद्यावरच अनुभवायला हवी. केवळ कोकणातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहावा, असं आवाहनही त्यांनी प्रेक्षकांना केलं.निर्मात्यांचे अभिनंदन
‘दशावतार’ ने मराठी चित्रपटाला जी भव्यता मिळवून दिली त्याबद्दल झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर, निर्माता सुजय हांडे, दिग्दर्शक सुबोध खानोलकर, ओंकार काटे आणि इतर सर्व निर्मात्यांचं उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं. -
अभिजीत सावंतचं पहिलं गुजराती गाणं

इंडियन आयडॉलपासून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला गायक अभिजीत सावंत आपल्या गायन प्रवासाला २० वर्ष पूर्ण करताना नवनव्या प्रयोगांना हात घालत आहे. या वेळी त्याने गुजराती भाषेत पहिलं वहिलं गाणं गाऊन प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज दिलं आहे.
नवरात्रीसाठी खास गिफ्ट
नवरात्री उत्सव अगदी तोंडावर असताना अभिजीतचं ‘प्रेमरंग सनेडो अस’ हे गुजराती गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात गरब्याचा ठेका आणि उत्सवाची रंगत अनुभवायला मिळत असून, मराठीसोबतच गुजराती प्रेक्षकांनाही अभिजीतच्या आवाजाची जादू अनुभवता येणार आहे.गायकाचा अनुभव
या नव्या गाण्याबद्दल बोलताना अभिजीत सावंत म्हणतो, “एखादं छान गुजराती फेस्टिवल गाणं करण्याची माझी आधीपासून इच्छा होती. ‘प्रेमरंग सनेडो अस’ सारखं गरब्याचं गाणं करताना वेगळाच आनंद मिळाला. सोबतच नव्या भाषेत प्रयोग करण्याची संधी मिळाली. गुजराती गाण्याला थोडा मराठमोळा ठसका देत दोन वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती एकत्र गुंफण्याचा अनुभव घेताना खूप मजा आली.”गुजराती प्रेक्षकांसाठी नवा अध्याय
आजवर अनेक सदाबहार गाणी देऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या अभिजीत सावंतने आता गुजराती प्रेक्षकांना देखील आपला मोहिनीमय आवाज सादर करण्यासाठी पाऊल टाकलं आहे. या नव्या गाण्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आणखी आनंद आणि उत्सुकता वाढली आहे. -
रीलॉइडच्या 1-दिवसीय वर्टिकल फिल्ममेकिंग वर्कशॉपमुळे वर्टिकल एंटरटेनमेंटमध्ये भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल

वर्कशॉपची यशस्वी मांडणी
मुंबई, 16 सप्टेंबर 2025 – रीलॉइडने यशस्वीपणे 1-दिवसीय वर्टिकल फिल्ममेकिंग वर्कशॉप आयोजित केले. या वर्कशॉपमध्ये नवोदित दिग्दर्शक, फिल्म विद्यार्थी आणि उद्योगातील तज्ञांनी भाग घेतला. अभिनय, लेखन, सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंगच्या माध्यमातून वर्टिकल स्टोरीटेलिंगवर मार्गदर्शन झाले.
वर्टिकल मायक्रोड्रामाच्या भविष्यावर चर्चा
शेवटी झालेल्या पॅनेल चर्चेत चित्रपट, लेखन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी वर्टिकल मायक्रोड्रामाच्या भविष्यावर चर्चा केली. रीलॉइडचे सीईओ श्री रोहित गुप्ता म्हणाले, “चीननंतर भारत पुढच्या मोठ्या एंटरटेनमेंट वेव्हसाठी सज्ज आहे. अब्जावधी मोबाईल-प्रथम प्रेक्षकांसह, भारत वर्टिकल रिव्होल्यूशनमध्ये आघाडीवर राहणार आहे.”लेखन आणि मायक्रोड्रामा अनुभव
मिर्झापूर वेब सीरिजचे सहलेखक श्री विनीत कृष्णा यांनी आपला अनुभव सांगितला. त्यांनी ओटीटीपासून मायक्रोड्रामा लेखनाकडे कसे वळले ते स्पष्ट केले. “60–90 सेकंदांच्या छोट्या वर्टिकल कथेत प्रभाव टाकणे हे आव्हान असून संधी देखील आहे,” असे त्यांनी नमूद केले.
सोनी इंडियाच्या टीमकडून प्रात्यक्षिक
सोनी इंडियाचे श्री सुनील गवई, श्री संधीव नायर आणि श्री इशान सिंग यांनी थेट प्रात्यक्षिकातून दाखवले की वर्टिकल शूटिंग, लाईटिंग आणि वस्तूंची मांडणी मोबाईल स्क्रीनवर किती महत्त्वाची आहे. त्यांनी सांगितले की सोनीच्या मिररलेस कॅमेऱ्यांसारखी आधुनिक साधने वापरून वर्टिकल फिल्म्सची क्वालिटी अधिक चांगली होऊ शकते.विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग
वर्कशॉपमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतःची स्क्रिप्ट लिहून, अभिनय करून, शूटिंग व एडिटिंग करून स्वतःचे वर्टिकल मायक्रोड्रामा तयार केले.रीलॉइडचा दृष्टीकोन
श्री गुप्ता म्हणाले, “अशा वर्कशॉप्समुळे नव्या कथाकारांना बळ मिळते. आमच्यासाठी वर्टिकल हा फक्त फॉर्मेट नाही तर सिनेमा बोलण्याची नवी भाषा आहे. रीलॉइड हे भारताचे आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म आहे.”रीलॉइड बद्दल
रीलॉइड हे नवीन पिढीचे एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म आहे. वर्टिकल मायक्रोड्रामा आणि क्रिएटिव्ह फॉरमॅट्स यावर लक्ष केंद्रित करून हे प्लॅटफॉर्म मोबाइल-फर्स्ट जगासाठी नवे सिनेमा साकारते. -
राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये आदितीला खास संदेश

‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये सुपर क्लासिक आठवडा
या आठवड्यात ‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये ‘सुपर क्लासिक’ हा खास आठवडा साजरा होत आहे, ज्या अंतर्गत मनोरंजनाच्या सुवर्णयुगाला मानाचा मुजरा केला जाणार आहे. या विशेष भागात आदितीने पुन्हा एकदा आपल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली.आदितीला उपेंद्र लिमये यांचा संदेश
आदितीचा प्रवास अधिकच प्रेरणादायी ठरतो, कारण या आठवड्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि ‘जोगवा’ चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले मराठी सिनेअभिनेते उपेंद्र लिमये यांच्याकडून तिला खास संदेश प्राप्त झाला आहे.सातारहून आलेले शुभेच्छा संदेश
सातारहून पाठवलेल्या या संदेशात उपेंद्र लिमये लिहितात – “ही माझी खास शुभेच्छा आहे त्या एकासाठी — जिला साताऱ्याने घडवलंय आणि जिला आज संपूर्ण भारत पाहतोय सुपर डान्सरमध्ये. आपल्या साताऱ्याचीच लेक – आदिती – कमाल, अप्रतिम, सुंदर! तुझं १००% देणं प्रत्येकवेळी दिसतं. तुला खूप खूप शुभेच्छा. साताराही तुझ्यासोबत आहे, आणि आता संपूर्ण महाराष्ट्रही! ऑल द बेस्ट!”आदिती ठरली प्रेरणास्थान
आपल्या गावाचं नाव उज्वल करणारी आदिती आज महाराष्ट्रभरातील लहानग्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. उपेंद्र लिमये यांच्या शब्दांनी तिच्या नृत्ययात्रेला नवे बळ मिळाले आहे.कार्यक्रम पाहण्याची संधी गमावू नका
हा खास भाग चुकवू नका! ‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ पाहा, शनिवार आणि रविवार, रात्री ८ वाजता – फक्त Sony Entertainment Television आणि SonyLIV वर. -
‘शेवग्याच्या शेंगा’ नाटक पुन्हा रंगभूमीवर

मराठी रंगभूमीची वाढती लोकप्रियता
मागील काही वर्षांमध्ये मराठी रंगभूमी पुन्हा बहरू लागली आहे. नवीन नाटकांच्या जोडीला जुनी गाजलेली मराठी नाटके पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. नाट्यगृहांसमोर ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड दिमाखात झळकत असून, बाल्कनीही उघडल्या जात आहेत. यामध्ये नव्या संचात पुन्हा रंगभूमीवर आलेल्या जुन्या नाटकांचा मोलाचा वाटा आहे.सदाबहार नाटकाची पुनर्रचना
या यादीत आता आणखी एका आशयघन नाटकाचे नाव जोडले जाणार आहे. मराठी रसिकांच्या मनात घर केलेले ‘शेवग्याच्या शेंगा’ हे सदाबहार नाटक नवीन संचात पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दाखल होणार आहे.गजेंद्र अहिरे यांची संकल्पना
देश-विदेशांतील प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठी लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी १० एप्रिल २०१५ रोजी सर्वप्रथम ‘शेवग्याच्या शेंगा’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणले होते. त्यात स्वाती चिटणीस आणि संजय मोने यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आता १० वर्षांनंतर “मिलाप थिएटर्स” या रॉमकॉम नाटकाची पुनःनिर्मिती करत आहे. या नाटकाचे लेखन गजेंद्र अहिरे यांनी केले असून, त्यांनीच पुन्हा नव्याने दिग्दर्शनही केले आहे.२७ सप्टेंबरला पुण्यात शुभारंभ
या नवीन संचातील ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकाची जोरदार तालीम सुरू असून, २७ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यात नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन रिअल लाईफ जोडी या नाटकात मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यांच्या सोबत नंदीता पाटकर, अपूर्वा गोरे, अंकिता दिप्ती, साकार देसाई हे कलाकारही नाटकात आहेत.निर्मिती आणि तांत्रिक बाजू
दिप्ती प्रणव जोशी या नाटकाच्या निर्मात्या असून, राहुल कर्णिक, पुलकेशी जपे, डॉ. मंदार जोशी सहनिर्माते आहेत. अथर्व थिएटर्स चे संतोष भरत काणेकर या नाटकाचे प्रस्तुतकर्ता आहेत. फिक्शन फॉक्स या नाटकाचे जाहीरात संकल्पक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार तन्मय नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे. नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले आहे. नितीन नेरूरकर यांनी नेपथ्य केले असून, शितल तळपदे यांची प्रकाशयोजना नाटकामध्ये रंजक दृष्यपरिणाम साधते. -
‘आरपार’ पाहायलाच हवा – राजकुमार राव यांचा खास संदेश

बॉलिवूड अभिनेत्याचा मराठी सिनेमाला पाठिंबा
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट आरपार ला सोशल मीडियावरून खास पाठिंबा दिला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले – “Running in theatres. Must watch guys. #AarPar”.कलाकारांना दिला टॅग
या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटातील प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, ह्रुता दुर्गुळे आणि दिग्दर्शक गौरव पाटकी यांना टॅग केलं.१२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट
१२ सप्टेंबर रोजी रिलीज झालेला आरपार हा प्रेम, विश्वास आणि भावनिक संघर्ष यांवर आधारित चित्रपट असून सध्या थिएटर्समध्ये चांगल्या प्रतिसादासह झळकत आहे.पाठींब्यामुळे वाढणार चित्रपटाची पोहोच
राजकुमार राव यांच्यासारख्या लोकप्रिय अभिनेत्याने दिलेल्या या पाठींब्यामुळे चित्रपटाला अधिक व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.मराठी सिनेमाची दमदार परंपरा
मराठी चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षांत दमदार कथा सांगण्याची परंपरा जपली असून, बॉलिवूडमधील मोठ्या नावांचा पाठिंबा मिळाल्याने आरपार सारखे चित्रपट अधिक चर्चेत येत आहेत.
