
-
‘सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित

८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार सती प्रथेवर आधारित चित्रपट
‘सत्यभामा – अ फरगॉटन सागा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांना आपल्या समाजाच्या भूतकाळातील विचारसरणीचे आणि सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवणार आहे. एकोणिसाव्या शतकातील सती प्रथेवर आधारलेला हा चित्रपट त्या काळातील सामाजिक अन्याय आणि स्त्रीशोषणावर भाष्य करतो. चित्रपटात निस्वार्थ प्रेम, बंधनांची सुंदर वीण आणि सामाजिक लढ्याचा भावनिक प्रवास एकत्र गुंफला आहे.
प्रेक्षकांच्या भेटीला आलेला भावस्पर्शी टिझर
या चित्रपटाचा टिझर अलीकडेच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण केली आहे. हिरवा शालू घेऊन नटलेला निसर्ग, पांढऱ्या धुक्याच्या कुशीतली रम्य सकाळ, मंदिरात राखी बांधण्याचा भावनिक क्षण – हे सारे दृश्य टिझरमध्ये प्रभावीपणे टिपले गेले आहेत. यातून सतीप्रथेच्या पाशवी वास्तवाची झलकही दिसते. “एक असहाय्य स्त्री समाजाशी एकटी कशी लढू शकेल” आणि “मी सती प्रथेविरोधात लढा देणार” यांसारख्या संवादांमधून चित्रपटाचा आशय ठळकपणे समोर येतो.
भाऊ-बहिणीच्या नात्याला कलात्मक सलामी

९ ऑगस्टला रक्षाबंधन असताना त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ८ ऑगस्टला ‘सत्यभामा’ प्रदर्शित होत आहे. त्यामुळे हा चित्रपट भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम, समर्पण आणि त्याग अधोरेखित करणार आहे. दिग्दर्शकांच्या मते, हा चित्रपट केवळ नात्याची गोष्ट सांगणारा नसून, सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आहे.
दिग्दर्शक-द्वयी आणि तगडी निर्मिती टीम
श्री साई सृष्टी फिल्म्स एलएलपी प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती मनीषा पेखळे, सारंग मनोज, अंकुर सचदेव आणि वीरल दवे यांनी केली आहे. दिग्दर्शन सारंग मनोज आणि अभिजीत झाडगावकर यांनी संयुक्तपणे केलं असून, कथा-पटकथा-संवाद लेखन मनीषा पेखळे यांचं आहे. चित्रपट सामाजिक वास्तव आणि ऐतिहासिक सत्य यांच्या आधारावर तयार करण्यात आला आहे.
तगडी स्टारकास्ट आणि तांत्रिक बाजू
या चित्रपटात माधव अभ्यंकर, अभिजीत आमकर, भाविका निकम, सृष्टी मालवंडे, ज्योती पाटील, सारंग मनोज, ज्ञानेश्वर शिंदे, मुकुंद कुलकर्णी, दिपाली आणि योगेश कंठाळे आदी कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ऋषिका सूर्यवंशी, अर्नव शिंदे, लोकेश देवकर, अर्नव तेलंग हे बालकलाकार देखील दिसणार आहेत. संगीत निखिल महामुनी यांचं असून, गीतं मनीषा पेखळे यांनी लिहिली आहेत.
दृश्य आणि तांत्रिक सौंदर्याचं कसब
चित्रपटाचे छायांकन जितेंद्र रामचंद्र आचरेकर, संकलन निलेश गावंड, कला दिग्दर्शन सचिन एच. पाटील, कोरिओग्राफी नरेंद्र पंडीत, पार्श्वसंगीत हनी सातमकर, वीएफएक्स सुमीत ओझा यांनी सांभाळले आहे. मेकअप नितीन दांडेकर, कॉस्च्युम डिझायनिंग शीतल लीना पावसकर, स्टाईलिंगही त्यांचं आहे. साहसदृश्ये मोहित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रीत करण्यात आली आहेत. प्रोडक्शन कंट्रोलर अकबर शेख, कास्टिंग समन्वयक कुंडलिक कचले आहेत.
इतिहासातील जळजळीत सत्य रुपेरी पडद्यावर
‘सत्यभामा’ हा चित्रपट समाजातील विस्मरणात गेलेल्या एका वास्तव घटनाक्रमावर आधारित असून, तो प्रेक्षकांना एका वेगळ्या भावनिक प्रवासावर घेऊन जाणार आहे. सती प्रथेचा विरोध, भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं सामर्थ्य आणि एका स्त्रीचा आत्मशोध यांची अनोखी गुंफण असलेला ‘सत्यभामा’ ८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात पाहायला विसरू नका.
-
स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेचे ११०० भाग पूर्ण

शशांक केतकरच्या कारकिर्दीतील सर्वाधिक भागांची मालिका
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’ने नुकताच ११०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. रमा-अक्षय या प्रेक्षकप्रिय जोडीसह मुकादम कुटुंबानेही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मालिकेच्या यशामध्ये प्रेक्षकांच्या प्रेमासोबतच कलाकारांच्या समर्पित कामाचा मोलाचा वाटा आहे.
शशांक केतकरचा खास अनुभव
अक्षय मुकादमची भूमिका साकारणारा शशांक केतकर याने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केलं असलं तरी ‘मुरांबा’ ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक भागांची मालिका ठरली आहे. या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना शशांक म्हणतो, “कोणताही नवा प्रोजेक्ट सुरू करताना कलाकाराच्या मनात धाकधूक असते. पण स्टार प्रवाहसारख्या विश्वासार्ह वाहिनीचं आणि अनुभवी दिग्दर्शकांचं पाठबळ असल्यामुळे आमचं काम सहजतेने सुरू झालं. उत्कृष्ट संवाद आणि टीमचा समजूतदारपणा यामुळे मालिकेचं रूप वेगळं झालं.”
मुकादम कुटुंब आणि मुरांबाची टीम
शशांक पुढे म्हणतो, “मुकादम कुटुंब म्हणजे केवळ काल्पनिक पात्र नव्हे, तर आमचं खऱ्या अर्थाने कुटुंब बनलं. यात जीव लावणारे, हसवणारे, रडवणारे, प्रेम देणारे आणि कठोरपणे कानपिट्टी करणारे सगळेच जण होते. अशा टीममधून काम करताना पुरस्कार मिळणं सहज शक्य होतं, पण आम्हाला मिळालं ते म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम – हेच आमचं खरं यश.”
प्रेक्षकांचा विश्वास आणि वाहिनीचे योगदान
‘मुरांबा’ मालिकेची सुरुवात १४ फेब्रुवारी २०२२ रोजी झाली होती आणि त्याच दिवशी प्रेक्षकांना एक नव्या धाटणीचं कौटुंबिक नातं भेटलं. शशांकने आपल्या भावना शेवटी अशा शब्दांत व्यक्त केल्या, “पहिल्या दिवसाची धाकधूक आणि आजचा आत्मविश्वास – दोन्ही आठवतायत. स्टार प्रवाह वाहिनी, आमचे दिग्दर्शक, लेखक, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षक – त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हतं.”
रमा-अक्षयच्या आयुष्यात नवा वळण
११०० भागांचं यश साजरं केल्यानंतर आता मुरांबा मालिकेच्या पुढच्या टप्प्यात आणखी रंजक घडामोडी घडणार आहेत. रमा-अक्षयच्या नात्यात नवे बदल, नवे आव्हानं आणि नवे वळणं लवकरच पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या प्रवासात अजूनही भरभरून मनोरंजन अनुभवता येणार आहे.
दररोज दुपारी १.३० वाजता – फक्त स्टार प्रवाहवर
‘मुरांबा’ ही मालिका दररोज दुपारी १.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारित होत आहे. मालिकेच्या या यशोप्राप्त प्रवासात सहभागी होण्यासाठी आणि पुढील घडामोडी पाहण्यासाठी, आपल्या आवडत्या पात्रांसोबत जोडले राहा.
-
Sangram Singh Appeals for Support to Provide Free Education and Lead Anti-Tobacco Campaign

On the eve of his birthday, celebrated Indian wrestler and MMA champion Sangram Singh made an emotional appeal on social media, urging people across the country to join hands with his charitable trust. Through the Sangram Singh Charitable Foundation, the wrestler-turned-actor is on a mission to expand free education for underprivileged children and lead impactful anti-tobacco awareness campaigns across India.
Sangram Singh: Athlete, Actor, and Active Philanthropist
Known for his inspiring journey from wrestling arenas to television screens, Sangram Singh has always carried a deep sense of social responsibility. Beyond the spotlight, he remains committed to causes that uplift and empower the next generation. Recently, the foundation saw a leadership change when actress Payal Rohatgi stepped down from the position of director. In her place, Sangram Singh’s elder sister Sunita Devi was appointed as the new director of the trust.
Nationwide Call to Action for a Healthier and Educated India
Through his heartfelt message, Sangram Singh has urged people from all walks of life to contribute their time, skills, or resources to strengthen the foundation’s vision. His goal is clear – to build a stronger network that can reach more children with free education and create nationwide awareness through Anti-Tobacco Campaigns, especially among youth.
A Voice Echoing Across States
From Mumbai to Gujarat and several other Indian states, Sangram’s voice is resonating with young citizens and health advocates alike. His call has already begun to receive encouraging responses, as people align with his belief that collective effort can bring lasting change.
Upcoming Role in Nagraj Manjule’s Film
Adding to the excitement, Sangram Singh is all set to feature in an important role in an upcoming film directed by Nagraj Manjule, known for his socially driven cinema. This collaboration is expected to blend Sangram’s real-life social mission with powerful on-screen storytelling.
A Birthday Wish Beyond Self
As he prepares to celebrate another year of his life, Sangram Singh’s birthday wish is not for gifts or fame, but for more people to come forward and walk with him in creating a healthier, educated, and tobacco-free India.
-
सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे व रिंकू राजगुरचा लव्ह ट्रायंगल

२२ ऑगस्टला होणार ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ प्रदर्शित
हास्याने भरलेली, धमाल प्रसंगांनी नटलेली आणि नात्यांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारी एक हटके प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ हा चित्रपट एक मजेशीर लव्ह ट्रायंगल घेऊन येत आहे, ज्यात नात्यांमधील गैरसमज, गोंधळ आणि त्यातून उगम पावणारे हास्य यांचा सुरेख मिलाप पाहायला मिळेल.
मजेशीर मोशन पोस्टरमुळे वाढलेली उत्सुकता
या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे, रिंकू राजगुरू आणि अनिकेत विश्वासराव यांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. येत्या २२ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात एका वेगळ्या आणि मजेशीर लव्ह ट्रायंगलची गोष्ट उलगडणार आहे.
दिग्दर्शक संजय अमर यांची हटके संकल्पना
दिग्दर्शक संजय अमर सांगतात, “मराठी प्रेक्षकांसाठी एक हटके संकल्पना असलेला चित्रपट घेऊन येत आहोत. ज्यामध्ये नात्यांमधल्या चढ-उताराची गोष्ट हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल.”
निर्माते रजत अग्रवाल यांचा अनुभव
निर्माते रजत अग्रवाल म्हणतात, “प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळा व मजेशीर आशय असलेला चित्रपट घेऊन येत आहोत. सुबोध भावे, रिंकू राजगुरू आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांसोबत काम करणं हा अत्यंत खास अनुभव होता. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल याची मला खात्री आहे.”
दर्जेदार निर्मिती आणि तांत्रिक बाजू
सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटाचे लेखन, छायांकन व दिग्दर्शन संजय अमर यांनी केले असून रजत अग्रवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाला साजन पटेल आणि अमेय नरे यांचे संगीत लाभले आहे.
-
‘परिणती – बदल स्वतःसाठी’ : दोन सशक्त स्त्रियांच्या मैत्रीचा भावनिक प्रवास

जबरदस्त ट्रेलरने प्रेक्षकांची वाढवली उत्सुकता
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. मराठी सिनेविश्वातील दोन ताकदवान अभिनेत्री अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांना एकत्र पाहण्याची उत्सुकता वाढली असतानाच, नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारा ठरतोय. चित्रपटाच्या शीर्षकातून आणि पोस्टरमधूनच हा स्त्रीप्रधान सिनेमा असल्याचे सूचित होते.
भिन्न पार्श्वभूमीतील दोन स्त्रिया

ही कथा आहे दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या स्त्रियांची. त्यांची अनपेक्षित भेट, वाढत गेलेली मैत्री, आणि संघर्षातून सशक्तपणे उभ्या राहिलेल्या त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास आहे. ट्रेलरमध्ये अमृता सुभाष एका डॉक्टरच्या भूमिकेत असून, ती नवऱ्यासोबत आणि मुलासोबत सुखी आयुष्य जगताना दिसते. पण अचानक तिच्या आयुष्यात काही तरी गंभीर घटना घडते आणि तिचं मानसिक संतुलन ढासळतं.
बार डान्सरची आव्हानात्मक भूमिका

याचवेळी सोनाली कुलकर्णी बार डान्सरच्या भूमिकेत समोर येते. तिचं सकारात्मक दृष्टिकोन आणि नैसर्गिक सहानुभूती यामुळे ती अमृताच्या आयुष्यात आधारस्तंभ बनते. त्यांच्या मैत्रीची ही सुरुवात अत्यंत हळुवार आणि प्रभावीपणे सादर केली गेली आहे.
दिग्दर्शक अक्षय बाळसराफ यांचं मनोगत
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अक्षय बाळसराफ सांगतात, “‘परिणती’ ही केवळ दोन स्त्रियांची कथा नाही, तर ती त्यांच्या आत्मशोधाची कहाणी आहे. वेगळ्या स्वभावाच्या आणि पार्श्वभूमीच्या या दोन स्त्रिया एकमेकींमध्ये जे बळ शोधतात, तीच खरी परिणती आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी स्वतःवर विश्वास असेल तर पुन्हा उभं राहणं शक्य आहे, हे हा चित्रपट सांगतो.”
दर्जेदार निर्मितीसंस्था आणि कलाकारांची तगडी फळी
पीएच फिल्म्स, फिनिक्स फिल्म्स आणि इनसिंक मोशन पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते पराग मेहता आणि हर्ष नरूला असून, अमित डोगरा, मोना नरूला, आशिष त्रिवेदी, शारदा नरूला, मनोज जैन, मोहित लालवानी, कांचन शाह आणि शांता जैन यांनी सहनिर्मितीची जबाबदारी घेतली आहे.
दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकार
चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अक्षय बाळसराफ यांनी केलं असून, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अक्षर कोठारी प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. चित्रपटातील सखोल भावना, स्त्री-पुरुष संबंधातील गुंतागुंत आणि मैत्रीची हळुवार अनुभूती यामुळे ‘परिणती’ हा चित्रपट भावनिक स्तरावर प्रेक्षकांना भिडणार आहे.
प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवणारा अनुभव
१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा चित्रपट एक भावनिक अनुभव देणारा ठरणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेली दृश्यं आणि संवाद यावरून हे स्पष्टपणे जाणवतं की, हा चित्रपट फक्त मैत्रीबद्दलच नाही, तर आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या नात्यांविषयी आहे.
-
“कुर्ला टू वेंगुर्ला”मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’

१९ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार
तंत्रज्ञान, दळणवळण, शिक्षण आणि आर्थिक स्थिती या सगळ्या बाबतीत गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. या बदलांमुळे नव्या पिढीच्या अपेक्षा आणि दृष्टिकोनही लक्षणीय रीतीने बदलले आहेत. ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट एका लग्नाच्या गोष्टीवर आधारित रंजक प्रवास दाखवणार आहे.
प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले यांची प्रमुख भूमिका
या चित्रपटात प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर आणि वैभव मांगले प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. त्यांच्यासोबत सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर आणि साईंकित कामत यांसारखी दमदार स्टारकास्टही आहे. या कलाकारांच्या सशक्त अभिनयातून ही गोष्ट अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
दर्जेदार सिनेनिर्मितीसाठी प्रयत्नशील टीम
सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रोडक्शन्स या बॅनरखाली ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ची निर्मिती करण्यात आली आहे. अमरजित आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे आणि एम. व्ही. शरतचंद्र हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
दिग्दर्शन, लेखन आणि तांत्रिक बाजू
चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केलं असून कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजित आमले यांनी केलं आहे. रंगनाथ बाबू गोगीनेनी यांचं छायांकन, विजय कलमकर यांचं संकलन, तर अविनाश सोनावणे यांनी ध्वनी मुद्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. चंचल काळे आणि अमरजित आमले यांनी लिहिलेली गीते अक्षय खोत यांच्या संगीत दिग्दर्शनात सजली आहेत. पार्श्वसंगीतही अक्षय खोत यांनीच दिलं आहे. चित्रपटाचे वितरण पिकल इंटरटेनमेंट करणार आहे.
गावाकडील लग्नसंस्थेतील बदलांचा आरसा
गेल्या काही वर्षांत गावातील तरुणांची लग्नं जुळवणे ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. या संकल्पनेचा वेध घेऊन ‘कुर्ला टू वेंगुर्ला’मध्ये शहर आणि गाव यांच्या जीवनशैलीतील फरक, पालकांच्या अपेक्षा आणि तरुणांच्या आकांक्षा यांच्यातील संघर्ष अत्यंत मनोरंजक शैलीत सादर केला आहे.
मालवणी भाषेचा गोडवा आणि लोकजीवनाची झलक
चित्रपटात मालवणी भाषेचा तडका आणि ग्रामीण भागातील जीवनशैलीचं चित्रण पाहायला मिळणार आहे. प्रत्येक घराशी नातं सांगणारी, हलकीफुलकी आणि तरीही विचारप्रवृत्त करणारी कथा या चित्रपटात पाहायला मिळेल.
१९ सप्टेंबरपासून चित्रपटगृहात
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ नावापासूनच उत्सुकता निर्माण करणारा हा चित्रपट १९ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. गाव-शहराच्या पुलावर उभा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान नक्कीच निर्माण करेल.
-
पथनाट्याने रंगला ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

सामाजिक भान जपणारे दिग्दर्शक अरविंद भोसले यांची नवी कलाकृती
स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी मांडणी झाली ती नाट्य सादरीकरणातून. रवींद्र नाट्यमंदिरातल्या रंगमंचावर रंगलेल्या बहारदार पथनाट्याने रसिकांची मने जिंकली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वच्छतेचं पथनाट्य सादर करीत पहिल्यांदाच अनोख्या पद्धतीने ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा रंगला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक मा. श्री. कृष्णप्रकाशजी आवर्जून उपस्थित होते.
‘अवकारीका’ चित्रपट १ ऑगस्टला होतोय प्रदर्शित

रेडबड मोशन पिक्चर या बॅनर अंतर्गत ‘अवकारीका’ हा मराठी चित्रपट येत्या १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांनी केलं असून निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली आहे. सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे.
मनोरंजनातून समाजप्रबोधनाचा प्रयत्न
चित्रपट मनोरंजनाचे माध्यम असले तरी त्यातून समाजप्रबोधन होणे आवश्यक असतं. देशातील सामाजिक समस्यांबाबत लोकांना जागरूक करणे हे साहित्यिक, कलाकार यांचे आद्य कर्तव्य आहे. आपल्यासमोर उभ्या ठाकणाऱ्या प्रश्नांना आपणच तोंड द्यायचं आहे, हे लक्षात येऊन एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाची जाणीव करून देण्यासाठी एकत्र आलेल्या ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमच्या विलक्षण प्रयत्नांना दाद देत अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. कृष्णप्रकाश यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
स्वच्छतादूतांच्या वेदना पडद्यावर
स्वच्छते बाबतच्या अनास्थेच्या प्रश्नावर फक्त हळहळण्या व्यतिरिक्त समाजात फारशी कृती घडताना दिसत नाही. व्यथित करणारी हीच गोष्ट दिग्दर्शक अरविंद भोसले यांच्या मनात खोलवर रुजली आणि त्यातून या चित्रपटाची संकल्पना साकार झाली. समाजाकडून दुर्लक्षित झालेल्या स्वच्छतादूतांच्या आयुष्यावर भाष्य करणारा ‘अवकारीका’ हा चित्रपट त्यांनी समाजासमोर सादर केला आहे. सफाई कामगारांच्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा, या उद्देशाने हा चित्रपट निर्माण झाल्याचं भोसले यांनी सांगितलं.
जागतिक प्रश्न झालेल्या स्वच्छतेचा संदर्भ
‘स्वच्छता हा आज जागतिक प्रश्न आहे. वेळीच आपण आपली जबाबदारी घेतली नाही तर मोठ्या संकटांना सामोरं जावं लागेल. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी ही जबाबदारी घेतली आणि मला ती महत्त्वाची वाटली,’ असे मत अभिनेता विराट मडके यांनी व्यक्त केले. सामाजिक भान जपण्याचा आणि चांगल्या प्रोजेक्टचा भाग होण्याचा आनंद त्यांनी शेअर केला.
दैनंदिन वास्तवाशी जोडलेली कथा
‘अवकारीका’ चित्रपटामार्फत अत्यंत महत्त्वाचा विषय प्रेक्षकांसमोर मांडला जातो आहे. समाजाला नवा दृष्टिकोन मिळावा, या उद्देशाने हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येत असून प्रेक्षक नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
कलाकारांची दमदार टीम
या चित्रपटात अभिनेता विराट मडके स्वच्छतादूताच्या भूमिकेत झळकणार असून त्याच्यासोबत राहुल फलटणकर, रोहित पवार, विनोद खुरंगळे, पिया कोसुम्बकर, नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, स्नेहा बालपांडे तसेच बालकलाकार वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.
तांत्रिक टीम आणि संगीतविभाग
चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते अरविंद भोसले यांनी लिहिली असून छायांकन करण तांदळे यांचे आहे. संकलन अथर्व मुळे यांनी केलं असून सहदिग्दर्शक रेहमान पठाण आहेत. कार्यकारी निर्माता चेतन परदेशी असून संगीत श्रेयस देशपांडे यांचं आहे. चित्रपटातील गीते कैलास खेर, सुनिधी चौहान आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायली आहेत. कलादिग्दर्शन शैलेश रणदिवे यांचं आहे.
१ ऑगस्टपासून ‘अवकारीका’ चित्रपटगृहात
रेडबड मोशन पिक्चर प्रस्तुत, दिग्दर्शक अरविंद भोसले यांचा ‘अवकारीका’ हा चित्रपट १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. समाजासाठी आणि स्वतःच्या अंतर्मनासाठी काहीतरी विचार करायला भाग पाडणारा हा सिनेमा प्रेक्षकांना निश्चित भावेल.
-
जीवा-नंदिनीचा भावनिक सीन प्रेक्षकांच्या मनात घर करतोय

कवितेच्या माध्यमातून मन जिंकणारा समुद्रकिनाऱ्यावरील क्षण व्हायरल
‘तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं…’ या ओळींनी सध्या सोशल मीडियावर मराठी प्रेक्षकांना भावनिक केलं आहे. स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील जीवा-नंदिनीच्या नात्याचा एक नाजूक क्षण सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.प्रेम, वाद आणि समजुतींचा अनोखा प्रवास
सध्या मालिकेत जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याच्या नात्यांमध्ये ताण निर्माण झालेला आहे. घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आलेल्या या नात्यांमध्ये मनधरणीचा एक हळवा क्षण दाखवण्यात आला. जीवा नंदिनीसमोर कवितेतून आपल्या भावना व्यक्त करतो, आणि त्यातून नात्याचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करतो.
सजग लेखन आणि प्रभावी सादरीकरण
या सीनसाठी वापरलेली कविता अश्विनी शेंडे आणि गौरव शिरीष यांच्या लेखणीतून उतरलेली आहे. कवितेतील ओळी मनाला थेट भिडणाऱ्या आहेत.कलाकारांच्या अभिनयाची प्रेक्षकांकडून प्रशंसा
जीवा आणि नंदिनीची भूमिका साकारणारे विवेक सांगळे आणि मृणाल दुसानिस यांनी या दृश्यातला प्रत्येक भाव उत्कटतेने सादर केला आहे. त्यांचा सहज आणि सच्चा अभिनय या सीनला भावनिक खोली देतो.मनाला भिडणारी कविता – नात्यांचं कोडं उलगडण्याचा प्रयत्न
“तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं…
सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं…”
या आणि अशा अनेक ओळींमधून एका पतीची पश्चात्तापाची भावना, नात्याला नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न आणि प्रेमातली गोंधळलेली गोडी उलगडते.प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला – नात्याचा पुढचा टप्पा कसा असेल?
जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याच्या नात्याचं भविष्य काय असेल, हे पाहण्यासाठी प्रेक्षक मालिकेकडे अधिकच ओढले गेले आहेत.दररोज संध्याकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाह’वर मिळवा उत्तर
या गोंधळलेल्या आणि तरीही प्रेममय नात्यांचं कोडं नक्की कसं सुटतं हे पाहायचं असेल, तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका दररोज संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर नक्की पहा. -
‘अवकारीका’ टीमचं सिद्धिविनायक दर्शन – चित्रपटाच्या यशासाठी गणरायाला साकडे

१ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘अवकारीका’च्या टीमकडून बाप्पाला वंदन
रेडबड मोशन पिक्चर प्रस्तुत ‘अवकारीका’ हा मराठी चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता विराट मडके प्रमुख भूमिकेत दिसणार असून चित्रपटाच्या यशासाठी संपूर्ण टीमने मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं.दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार श्रद्धेनं एकत्र
या विशेष प्रसंगी दिग्दर्शक अरविंद भोसले, अभिनेता आणि निर्माता विराट मडके, सहनिर्माते रोहित पवार आणि अन्य टीम सदस्य उपस्थित होते. चित्रपटाच्या यशासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रेमासाठी सर्वांनी गणपती चरणी प्रार्थना केली.
सफाई कामगाराच्या संघर्षावर आधारित कथा
‘अवकारीका’ या चित्रपटात ‘सत्या’ नावाच्या सफाई कामगाराच्या जीवनावर आधारित कथा सादर करण्यात आली आहे. ही कथा एका अशा व्यक्तीभोवती फिरते जी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि आरोग्याच्या समस्या यांच्याशी झुंज देत आपलं जीवन जगतो.दैनंदिन जीवनातील उपेक्षित वर्गाला केंद्रस्थानी ठेवून लिहीलेली कहाणी
स्वच्छतादूत म्हणून काम करणाऱ्या श्रमिकांचा संघर्ष, त्यांची दुःखं, आणि समाजाच्या नजरेआड गेलेल्या गोष्टींवर चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटातून समाजाच्या संवेदनशीलतेला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा सहभाग
चित्रपटाचं दिग्दर्शन अरविंद भोसले यांनी केलं असून, निर्मिती भारत टिळेकर आणि अरुण जाधव यांची आहे. सहनिर्माते म्हणून मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे आणि गीता सिंग यांनी भूमिका बजावली आहे.चित्रपटातून सामाजिक संदेश आणि भावनिक स्पर्श
‘अवकारीका’ केवळ एक कथा नाही तर समाजातील दुर्लक्षित घटकांचं वास्तव उलगडणारा सशक्त आणि भावनिक अनुभव आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा टीमने व्यक्त केली आहे. -
प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकरच्या ‘सखे गं साजणी’च्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला

‘रेडबल्ब स्टुडिओ’ प्रस्तुत नव्या चित्रपटाचा पहिला लूक चर्चेत
सोशल मीडियावर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे ‘सखे गं साजणी’ या नव्या मराठी चित्रपटाचं पोस्टर. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या रेडबल्ब प्रॉडक्शन हाऊसतर्फे तयार होणारा हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.मुहूर्ताचे फोटो ते टिझरपर्यंतचा प्रवास
प्रार्थना बेहेरेने काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. आता तिने चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आणि टिझरही शेअर केल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झालं आहे.पाठमोऱ्या उभ्या कलाकारांची स्टाईल – रहस्य अधिकच गडद
पोस्टरमध्ये समुद्र किनारी दोन मुली आणि एक मुलगा पाठमोरे उभे असून त्यांनी हाताने हार्ट ईमोजी तयार केलेला दाखवला आहे. मात्र कलाकारांचे चेहरे न दाखवल्याने ‘कोण आहे हे तिघं?’ या प्रश्नाने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.कथाविषय अजूनही गुलदस्त्यात
चित्रपटातील कलाकारांची नावे किंवा कथाविषयाबद्दल अद्याप काहीही अधिकृत माहिती दिलेली नसून, त्यामुळे संपूर्ण कथानक आणि पात्रांविषयी उत्सुकता अजून वाढली आहे.प्रसिद्ध जोडीच्या प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती
‘सखे गं साजणी’ हा चित्रपट प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर यांच्या रेडबल्ब प्रॉडक्शन हाऊसचा विशेष प्रकल्प आहे. मराठी सिनेविश्वात ही लोकप्रिय जोडी आता निर्मितीच्या क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवण्याच्या तयारीत आहे.निर्मिती टीममध्ये ओळखीची नावं
चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जावकर करीत असून, निर्माते अभिषेक जावकर आणि आदित्य वासुदेव घरत आहेत. सहनिर्माते म्हणून अभिजीत खांडकेकर आणि अभिषेक दिलीप वाकचौरे यांचा समावेश आहे.संगीताची धुरा विजय भटे यांच्याकडे
चित्रपटातील संगीत विजय भटे यांनी दिलं असून, त्यांचं संगीत नेहमीच प्रेक्षकांमध्ये वेगळा ठसा उमटवतं हे मराठी रसिकांना माहिती आहे.पोस्टरनंतर आता कलाकारांची ओळख आणि कथाविषय उलगडण्याची प्रतीक्षा
‘सखे गं साजणी’च्या पोस्टरनंतर आता चित्रपटातील प्रमुख कलाकार कोण असतील आणि कथाविषय नेमका कशावर आधारित आहे, याबाबत अधिकृत माहिती लवकरच समोर येणार असल्याची शक्यता आहे. प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली ही उत्सुकता लवकरच शमवली जाणार आहे.
