
-
“मुंबई लोकल”मध्ये फुललेली प्रेमकथा १ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार

ज्ञानदा रामतीर्थकर आणि प्रथमेश परब यांची फ्रेश जोडी
मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता मुंबई लोकल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून, १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी
मुंबई लोकल या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित यांनी केलं असून, बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी आणि आनंदी एंटरटेनमेंटच्या प्राची अग्रवाल, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी निर्मिती केली आहे. त्र्यंबक डागा हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
कलाकारांची तगडी फौज
या चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांच्यासह मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे यांचा समावेश असून सर्वांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
तांत्रिक बाजू आणि संगीत विभाग
चित्रपटाचं छायांकन योगेश कोळी यांनी केलं असून, संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे. विनोद शिंदे हे असोसिएट डिरेक्टर असून, कलादिग्दर्शनाची जबाबदारी डॉ. सुमित पाटील यांनी सांभाळली आहे. गाणी अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांनी लिहिली असून संगीत देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी आणि हर्षवर्धन वावरे यांचं आहे. पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचे आहे, तर नृत्यदिग्दर्शक राहुल ठोंबरे आहेत.
लोकल प्रवासात फुललेलं प्रेम मोठ्या पडद्यावर
मुंबई लोकल हे केवळ एक प्रवासाचे साधन नाही, तर अनेक मुंबईकरांचं कुटुंब आहे. इथेच मैत्री फुलते, संवाद होतात, आणि कधी प्रेमही उगम पावते. अशीच एक अनोखी प्रेमकहाणी मुंबई लोकल या चित्रपटातून पाहता येणार आहे. जरी मराठी चित्रपटांतून याआधीही लोकल दाखवली गेली असली, तरी प्रेमकहाणीच्या केंद्रस्थानी लोकल असलेला हा पहिलाच मराठी सिनेमा ठरणार आहे.
प्रेक्षकांसाठी खास भेट
टाइमपास, टकाटक, बालक पालक सारख्या लोकप्रिय चित्रपटांतून लक्षवेधी ठरलेला प्रथमेश परब आणि सख्या रे, ठिपक्यांची रांगोळीसारख्या मालिका व धुरळासारख्या चित्रपटात झळकलेली ज्ञानदा रामतीर्थकर यांची ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर नव्या रूपात येणार आहे. त्यामुळे मुंबई लोकलचा हा अनोखा अनुभव मोठ्या पडद्यावर १ ऑगस्टपासून आवर्जून घ्यावा लागेल.
-
‘संगीत संन्यस्त खड्ग’ नव्या स्वरूपात

सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव आणि नाटकाचे निर्माते रवींद्र माधव साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सावरकर दर्शन प्रतिष्ठानचा उपक्रम
स्व. सुधीर फडके यांनी स्थापन केलेली ही संस्था सावरकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत असून याच उद्देशाने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्यात येत आहे. आजच्या पिढीसमोर सावरकरांचे विचार आणि साहित्य सादर करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असून या नाटकाचे १०० प्रयोग महाराष्ट्रभर करण्याचा मानस आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी तिकीट दर ३००, २०० आणि १०० रुपये असे ठेवण्यात आले आहेत.
नव्या पिढीचा सहभाग आणि दिग्दर्शकीय बाजू
या नाटकात नव्या पिढीतील तरुण कलाकार सहभागी असून, नाट्यसंपदा कला मंचाचे अनंत पणशीकर सहनिर्माते आहेत. दिग्दर्शन आणि रंगावृत्ती ऋषीकेश जोशी यांनी सांभाळले आहे. संगीत कौशल इनामदार यांचे आहे. नाटकाच्या निर्मितीत प्रतिष्ठानच्या सहकार्यामुळे व्यावसायिक गणित सुलभ झाले असल्याचे पणशीकर यांनी सांगितले.
विचार आणि द्वंद्वाचा ऐतिहासिक नाट्यसंग्रह

‘अहिंसेचे तत्वज्ञान’ आणि ‘राष्ट्रहित’ यातील द्वंद्व मांडणारे हे नाटक अडीच हजार वर्षांपूर्वीचे विचार आजही लागू पडतात, असे ऋषीकेश जोशी यांनी नमूद केले. सावरकरांचे भाषासौंदर्य आणि भव्य दृकश्राव्य अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कलाकार, तांत्रिक बाजू आणि नाट्यवैशिष्ट्ये
या नाटकात मयुरा रानडे, ओंकार कुलकर्णी, केतकी चैतन्य, ओमप्रकाश शिंदे आणि ऋषीकेश जोशी यांच्या भूमिका आहेत. भव्य नेपथ्य, देखणी वेशभूषा, उत्कृष्ट अभिनय, आणि सावरकरांचे तेजस्वी विचार ही या नाटकाची वैशिष्ट्ये आहेत. नेपथ्य – संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना – अमोघ फडके, नृत्ये – सोनिया परचुरे, वेशभूषा – मयूरा रानडे, रंगभूषा – श्रीकांत देसाई यांची असून सूत्रधार दीपक गोडबोले आहेत.
ऐतिहासिक संदर्भ आणि शुभारंभ दिनविशेष
१९३१ साली पंडित दीनानाथ मंगेशकर यांनी या नाटकाचे पहिले सादरीकरण केले होते. त्यातील “शतजन्म शोधताना”, “मर्मबंधातली ठेव ही”, “सुकतात ही जगी या” ही गाणी त्यांनी अजरामर केली. ८ जुलै १९१० रोजी सावरकरांनी मार्सेलिस येथे दिलेली जगप्रसिद्ध उडी लक्षात घेऊन, त्या दिवसाचे औचित्य साधून हे नाटक सादर करण्यात येत आहे.
प्रेक्षकांसाठी विशेष आवाहन
देशभरातील मराठी समाजापर्यंत हे नाटक पोहोचवण्याचा संकल्प असून, प्रत्येक प्रयोगातून सावरकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, ही प्रतिष्ठानची भूमिका आहे. प्रेक्षकांनी या नाटकाला उदंड प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
-
Netflix Unveils Trailer for ‘Aap Jaisa Koi’ – A Quietly Powerful Tale of Love and Liberation

Netflix has released the official trailer for Aap Jaisa Koi, an evocative new family drama starring R. Madhavan and Fatima Sana Shaikh. The film tells the story of Shrirenu Tripathi, a 42-year-old man from Jamshedpur, whose quiet life is upended when he meets Madhu Bose, a spirited woman from Kolkata. What begins as a chance encounter transforms into a journey of emotional rediscovery, companionship, and what the creators call “Barabari Wala Pyaar” — an equal and liberating kind of love.
Set across the culturally rich backdrops of Jamshedpur and Kolkata, the film explores how tradition, family, and societal expectations shape one’s understanding of masculinity and emotional expression. Shrirenu, deeply rooted in routine and restraint, finds in Madhu a mirror that forces him to examine his beliefs. As their bond deepens, Aap Jaisa Koi evolves into a story not just of romance, but of personal awakening and emotional courage.
Madhu is far from a conventional romantic lead. She refuses to shrink to fit societal molds, embodying confidence and strength with a quiet grace. Her presence challenges Shrirenu’s worldview, becoming a catalyst for his transformation. The film reimagines feminine power not through aggression, but through vulnerability, empathy, and authenticity.
For Madhavan, Aap Jaisa Koi marks a compelling return to the romance genre, but with a refreshingly mature twist. As Shrirenu, he delivers a layered performance—of a man learning to ask for love, to be seen, and to open his heart despite years of conditioning. “Shrirenu is one of the most complex roles I’ve played,” Madhavan says, describing the film as “gentle, affecting, and deeply human.”
Fatima Sana Shaikh, who plays Madhu, calls the experience “therapeutic.” She shares, “Through this film, I explored new shades of love and strength. Madhu is bold without being loud, and confident without sacrificing her softness.” Working with Madhavan and director Vivek Soni, she says, was “a deeply fulfilling experience.”
Directed by Vivek Soni (of Meenakshi Sundareshwar fame) and produced by Dharmatic Entertainment, the film features a powerful ensemble cast including Ayesha Raza, Manish Chaudhari, and Namit Das. With Karan Johar, Adar Poonawalla, Apoorva Mehta, and Somen Mishra backing the production, the film blends heartfelt storytelling with emotional nuance.
Aap Jaisa Koi is more than just a love story. It’s a meditation on companionship, courage, and the quiet power of emotional honesty. As Shrirenu and Madhu navigate family expectations and their own inner doubts, the film emerges as a tender portrait of two people daring to redefine love on their own terms.
Streaming exclusively on Netflix from July 11, Aap Jaisa Koi promises to be a heartwarming experience — thoughtful, introspective, and gently transformative.
-
‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना

‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’ ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेने केवळ महिलांचं किंवा तरुणांचंच नव्हे, तर वयोवृद्ध प्रेक्षकांचंही मन जिंकलं आहे. त्याचंच एक जिवंत उदाहरण नुकतंच मालिकेच्या सेटवर पाहायला मिळालं. सध्या मालिकेत सत्या निवडणुकीत विजयी झाला असून, विजयानंतरच्या मिरवणुकीत मंजूला गोळी लागते आणि तिची प्रकृती गंभीर होते. हा एपिसोड पाहून अनेक प्रेक्षक भावूक झाले. मंजूला गोळी लागल्याच्या प्रसंगाने ८४ वर्षांचे दत्तू कर्णे यांच्या मनात इतकी अस्वस्थता निर्माण झाली की, त्यांनी घरात कोणालाही न सांगता सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी गावातून थेट साताऱ्यात पोहोचले.
पोलीस स्टेशनमध्ये थेट विचारणा – “मंजू कशी आहे?”

आजोबांनी सातारा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं – “मंजू कशी आहे? ती बरी आहे ना?” त्यांच्या चेहऱ्यावरून मंजूबद्दल काळजी, प्रेम, आपुलकी, आणि तीव्र भावना स्पष्ट जाणवत होत्या. साताऱ्यातील पोलीस उप निरीक्षक अशोक सावंजी, कॉन्स्टेबल अनिल सावंत यांनी या आजोबांच्या भावना समजून घेत, त्यांना ‘कॉन्स्टेबल मंजू’च्या सेटवर नेण्याची विशेष व्यवस्था केली.
मंजूचा हात धरून विचारपूस – सेटवर भावूक क्षण
सेटवर पोहोचताच आजोबांनी अभिनेत्री ‘मंजू’ म्हणजेच मोनिका राठीचा हात पकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सत्याला आईच्या चुकीसाठी थेट सुनावलं आणि इतर कलाकारांनाही खरीखुरी पात्रं समजून स्पष्ट शब्दांत आपली मतं मांडली. हा क्षण इतका भावूक होता की, संपूर्ण युनिटच्या डोळ्यांत पाणी आलं.
कुटुंबाच्या काळजीतून पोलीस आणि टीमचा तत्पर प्रतिसाद
याचदरम्यान, आजोबा घरच्यांना न सांगता निघून गेल्यामुळे त्याचं कुटुंब काळजीत होतं. आजोबा साताऱ्यात पोहोचताच पोलिसांनी दत्तू कर्णे यांच्या कुटुंबाला ते साताऱ्यात असल्याचं कळवलं. मात्र, मालिकेच्या टीमने त्या गोष्टीची तत्काळ दखल घेतली, आजोबांशी प्रेमपूर्वक संवाद साधला आणि त्यांना आदरातिथ्यासह सुखरूप घरी परत पाठवण्याची व्यवस्था केली.
मोनिका राठींचा भावनिक अनुभव – हेच खरं यश
या भावस्पर्शी घटनेबाबत अभिनेत्री मोनिका राठी म्हणाली की, “मंजू या पात्राला मिळणारं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही. मला गोळी लागली म्हणून ८४ वर्षांचे आजोबा थेट सेटवर आले, हे आमच्यासाठी धक्कादायक आणि अतिशय भावूक होतं. सोशल मीडियावर प्रेक्षक नेहमी प्रतिक्रिया देतात, पण प्रत्यक्ष कोणीतरी, तेही एवढ्या वयात, एवढा मोठा प्रवास करून, केवळ मालिकेतील पात्राची काळजी घेऊन पोहोचतो ही फारच मोठी गोष्ट आहे. त्यांच्या डोळ्यांतली काळजी पाहून आम्ही सारे भारावून गेलो.”
‘कॉन्स्टेबल मंजू’ – केवळ कथा नाही, तर नाळ जोडलेली मालिका
‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका आज फक्त एक कथा न राहता, मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयाशी नाळ जोडली आहे. मालिकेतील पात्र, प्रसंग, आणि भावना इतक्या जिवंतपणे पोहोचत आहेत की, प्रेक्षक त्यात गुंतून जात आहेत, त्यात जगू लागले आहेत. प्रेक्षकांचं हे निखळ प्रेम पाहता ‘सन मराठी’ व ‘कॉन्स्टेबल मंजू’च्या संपूर्ण टीमसाठी खऱ्या अर्थाने सर्वात मोठा पुरस्कार आहे.
-
कमळीच्या मदतीनं सोप्पी झाली १०० मुलींच्या शिक्षणाची वाट

शिक्षणाचं स्वप्न पेरणाऱ्या ‘कमळी’ची सायकल गिफ्ट इनिशिएटिव्ह
मुलगी शिकली, प्रगती झाली… किती सहज रुळलंय हे वाक्य आपल्या जिभेवर. शिक्षणाचं महत्व माहित नाही असं एकही घर महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. पण अजूनही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात अश्या दुर्गम जागा आहेत, जिथे शिक्षणाच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत, पण गावच्या मुलींमध्ये उच्च शिक्षणाचं स्वप्न मात्र पेरलं गेलंय. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी गरज असते ती संधीची आणि प्रोत्साहनाची आणि हीच गरज लक्षात घेऊन ‘कमळी’ने एक स्तुत्य पाऊल उचललं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमधील मुलींना सायकलचा आधार
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड मधील शाळेत जाऊन त्या १०० मुलींना सायकलींचं वाटप केलं. ह्या मुली दररोज शाळेत ८ ते १० किमीचं अंतर कापून शाळेत येतात. त्या भागात शाळेत पोहोचायला सार्वजनिक वाहतूक म्हणजे ST बसचाच एकमेव आधार, पण त्याही फेऱ्या मर्यादित. त्यामुळे शाळेत वेळेवर पोहोचणं, परत येणं हे या मुलींसाठी एक दिवसभराचं आव्हान बनतं. अशा परिस्थितीत या मुलींना शाळेची वाट सोपी करायची असेल, तर एक साधन हवं होतं आणि ते साधन ठरल्या या सायकली.
कमळीचा खारीचा वाटा, डोळ्यांत स्वप्न, चेहऱ्यावर हास्य

आपला आनंद व्यक्त करताना विजया बाबर म्हणजे आपल्या सर्वांची कमळी म्हणाली, “या मुलींच्या डोळ्यांत शिक्षणाचं स्वप्न पाहिलं, आणि त्या स्वप्नपूर्तीत आपला खारीचा वाटा असणार आहे याचं सुख मला मिळालं. सायकल ही फक्त एक वाहन नाही, ती त्या मुलींच्या शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात आहे. रोजची धावपळ, अंतर, आणि अडचणी पाहिल्यावर मला जाणवलं की शिक्षणाच्या दिशेने त्यांची प्रत्येक पावलं थोडी सोपी करणं, हीच खरी साथ आहे. सायकल हातात घेतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटलं, ते पाहून डोळ्यांत नकळत पाणी आलं.”
कमळीचं स्वप्न — गावातच उभं करायचं शिक्षणाचं महाविद्यालय

या उपक्रमामागे असलेली कमळीची भावना ही केवळ एकतर्फी मदत नव्हे, तर शिक्षणाची खरी गरज आणि त्यामागचं स्वप्न ओळखणारी आहे. कारण कमळी स्वतः शिकून इथं पर्यंत आली आहे आणि शिक्षणामुळे तिचं आयुष्य घडत आहे. म्हणूनच ती स्वतःच्या गावात एक महाविद्यालय सुरू करण्याचं स्वप्न बाळगते, जिथे तिच्यासारख्या शिकायची जिद्द असणाऱ्या अनेक मुलींना शिकता येईल.
३० जूनपासून ‘कमळी’ दररोज रात्री ९ वाजता, झी मराठीवर
कमळीचा हा प्रवास आणि तिचं कर्तृत्व हे केवळ कौतुकास्पद नाही, तर प्रेरणादायी देखील आहे. जिथे परिस्थितीचा डोंगर वाटेवर असतो, तिथे अशी एखादी साथ मिळाली, की मुलींची पावलं शिक्षणाच्या दिशेने झपाट्याने चालू लागतात. तर, या प्रेरणादायी वाटचालीचा साक्षीदार व्हा — ‘कमळी’, ३० जूनपासून दररोज रात्री ९ वाजता, झी मराठीवर.
-
‘गाडी नंबर १७६०’मध्ये सुहास जोशींनी साकारले ॲक्शन सीन्स

ट्रेलरमधून वाढली रहस्याची आणि ॲक्शनची उत्सुकता
तन्वी फिल्म्स प्रस्तुत ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यातील रहस्य, ट्विस्ट्स आणि टर्न्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरमध्ये वेधक दृश्यांबरोबरच एक खास गोष्ट लक्ष वेधून घेते, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचे ॲक्शन सीन्स. ७७ वर्षीय सुहास जोशी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून विशेष म्हणजे काही ॲक्शन सीन्स त्यांनी स्वतः साकारले आहेत.
“जिद्द आणि अभिनयावरील प्रेमामुळेच हे शक्य झालं” – सुहास जोशी
याबद्दल सुहास जोशी म्हणतात, ”वय कितीही असो, जेव्हा भूमिका मनापासून आवडते, तेव्हा तिच्यात पूर्णपणे झोकून देणं गरजेचं वाटतं. ‘गाडी नंबर १७६०’ मधील माझी भूमिका वेगळी आहे आणि त्यासाठी ॲक्शन सीन करणे हा एक नवीन आणि उत्साही अनुभव होता. मनातली जिद्द आणि अभिनयावरील प्रेम हेच मला पुन्हा कॅमेऱ्यासमोर घेऊन येतं. टीमचा पाठिंबा आणि वातावरण इतकं सकारात्मक होतं की, ॲक्शन सीन करायला भीतीच वाटली नाही.”
“त्या आमच्यासाठी अभिनेत्री नाहीत, प्रेरणाच आहेत” – दिग्दर्शक

दिग्दर्शक म्हणतात, ‘’सुहास मॅडम म्हणजे एक प्रेरणा आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता आम्ही बॉडी डबल वापरण्याचा पर्याय ठेवला होता. पण त्यांनी तो साफ नाकारला. ‘मी स्वतः अॅक्शन सीन करणार.’ त्यांच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता की आम्हाला काही क्षण अवाक व्हायला झालं. या वयातही त्यांची ऊर्जा, मेहनतीची तयारी आणि कामाबद्दलचा आदर पाहून आम्हा सर्वांना एक नवीच प्रेरणा मिळाली. खरंच, त्या आमच्यासाठी केवळ एक अभिनेत्री नाहीत, तर एक आदर्श आहेत.”
४ जुलैला येतोय रहस्यमय थरारपट
या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी असून, लेखन व दिग्दर्शनाची धुरा योगिराज संजय गायकवाड यांनी सांभाळली आहे. प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सुहास जोशींच्या समर्पणातून मिळतेय नव्या पिढीसाठी प्रेरणा
सुहास जोशींच्या अशा समर्पणातून त्यांची अभिनयावरील निष्ठा अधोरेखित होते आणि नव्या पिढीसमोरही एक प्रेरणादायी उदाहरण ठरते. आता चित्रपटात त्यांची नेमकी भूमिका काय असेल, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
-
आमिर खानची दमदार पुनरागमन – ‘सितारे जमीन पर’मधून दिली मास्टरक्लास परतफेड

बॉलिवूडमध्ये परत ‘परफेक्शनिस्ट’चा जलवा, ट्रेंड्सच्या विरुद्ध जाऊन बॉक्स ऑफिसवर केली प्रभावी पुनरागमन
‘लाल सिंग चड्ढा’च्या माफक प्रतिसादानंतर आणि काही काळाच्या विश्रांतीनंतर आमिर खान पुन्हा एकदा आपल्या शैलीत मोठ्या पडद्यावर परतले आहेत. त्यांच्या नवीन चित्रपट ‘सितारे जमीन पर’ द्वारे त्यांनी केवळ सशक्त पुनरागमन केलं नाही, तर हेही दाखवून दिलं की ते आजही भारतीय सिनेमातील सर्वात धाडसी आणि सच्चे कथाकथन करणाऱ्यांपैकी एक आहेत.
मनाला भिडणाऱ्या भूमिकेत आमिर पुन्हा एकदा ठसठशीत
हळूहळू आणि अभ्यासपूर्ण अभिनयासाठी ओळखले जाणारे आमिर खान पुन्हा एकदा आपल्या ठसठशीत शैलीत प्रेक्षकांसमोर आले आहेत. ‘तारे जमीन पर’चा एक प्रकारचा आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणता येईल अशा या नव्या चित्रपटात त्यांनी नव्या दृष्टिकोनातून सामाजिक विषय मांडला आहे. त्यांची भूमिका पुन्हा एकदा मनाला भिडणारी असून, त्यांनी सिनेमा या माध्यमाचा प्रभावीपणे उपयोग करून समाजाशी संवाद साधला आहे.
प्रवाहाविरुद्ध जाण्याची परंपरा कायम
आमिर खानने नेहमीच मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन वेगळा मार्ग निवडला आहे. मग ती ‘लगान’ (२००१) असो, ‘तारे जमीन पर’ (२००७) असो किंवा ‘दंगल’ (२०१६) – त्यांनी प्रत्येक वेळी बॉक्स ऑफिसच्या पारंपरिक फॉर्म्युल्यांना धक्का देत आशयप्रधान सिनेमे दिले आहेत. ‘सितारे जमीन पर’ देखील अशाच प्रवृत्तीचा एक भाग आहे, जिथे कंटेंटला सर्वोच्च स्थान दिलं गेलं आहे.
आशय आणि प्रामाणिकपणाला मिळतेय दाद
या चित्रपटाच्या यशामुळे एक गोष्ट स्पष्ट होते – आमिर खान पुन्हा ‘गेम’मध्ये परतले आहेत. आज जेव्हा बहुतांश निर्माते ट्रेंड्सच्या मागे धावत आहेत, तेव्हा आमिरने दाखवून दिलं आहे की प्रामाणिक कथा आणि दर्जेदार आशय आजही प्रेक्षकांना भिडतात. समीक्षकांची वाहवा आणि थिएटरमध्ये गर्दी करणारे प्रेक्षक हेच सिद्ध करत आहेत की ‘सितारे जमीन पर’ ही केवळ एक फिल्म नसून, ती एक ठाम आणि सशक्त विधान आहे.
शिकवण आणि दुसऱ्या इनिंगची सुरुवात
ज्यांनी आमिर खानकडून अपेक्षा ठेवणं सोडलं होतं, त्यांच्यासाठी हे पुनरागमन एक शिकवण आहे – संयमाची, स्वतःला पुन्हा शोधण्याची आणि धाडसाची. आणि जर आमिर याच मार्गावर आपल्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात करत असतील, तर संपूर्ण बॉलिवूडला सज्ज व्हावं लागेल – कारण ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ केवळ परतलेले नाहीत, तर त्यांनी एक धमाकेदार पुनरागमन केलं आहे.
-
‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

मैत्रीची अनोखी गोष्ट
मैत्री ही कोणाशीही, कोणत्याही काळात जुळू शकते. अशाच एका निरागस मैत्रीची गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही धमाल गोष्ट रुपेरी पडद्यावर रंगणार आहे.
मनोरंजन आणि मस्ती यांचा ट्रिपल डोस
दिग्दर्शन योगेश जाधव यांचे असून लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आणि सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी यांनी हा चित्रपट सादर केला आहे. ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट २७ जून २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
हास्याची मेजवानी
हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी हास्याने भरलेली मेजवानी ठरणार आहे, असा विश्वास निर्माते अमोद मुचंडीकर यांनी व्यक्त केला आहे. यातील पात्रांच्या गमतीशीर प्रसंगांमधून प्रेक्षकांना मनमुराद हसायला मिळणार आहे.
त्रिकुटाची धमाल

या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर हे तिघं पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यांच्या जोडीला सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर यांच्यासह अनेक कलाकारांची मांदियाळी आहे.
मैत्रीतला संघर्ष आणि सच्चाई
या तिघा मित्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या धक्कादायक घटनांमुळे त्यांच्या मैत्रीची परीक्षा घेतली जाते. मात्र ते आपल्या नात्याला प्रामाणिक राहून परिस्थितीला कसे सामोरे जातात, हे या चित्रपटातून पाहायला मिळेल.
तांत्रिक बाजूंचे देखणं सादरीकरण
कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत चिनार-महेश आणि अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी, संकलन अथश्री ठुबे यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे, साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा कीर्ती जंगम, रंगभूषा अतुल शिधये यांची असून गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत आणि गायिका अपेक्षा दांडेकर यांनी गाणी गायली आहेत. कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे.
भाव-भावनांना साद घालणारी कहाणी
‘ऑल इज वेल’ हा तरुणाईच्या मनाला भिडणारा चित्रपट असून त्यात मैत्री, भावना, संघर्ष आणि संगीत यांचा सुरेख मिलाफ आहे. चित्रपटाचा अनुभव नेत्रसुखद आणि मनोरंजनाने परिपूर्ण ठरणार आहे.
-
रीलॉइडचे भव्य उद्घाटन: भारतातील पहिले व्हर्टिकल ओटीटी प्लॅटफॉर्म, मोबाईल-फर्स्ट स्टोरीटेलिंगचा नवा युगारंभ

नव्या युगाला सुरुवात करणारे रीलॉइड
भारतीय डिजिटल मनोरंजन क्षेत्रात आता एक नवे नाव झळकले आहे — रीलॉइड. हे भारतातील पहिले व्हर्टिकल फॉरमॅट ओटीटी प्लॅटफॉर्म असून याची स्थापना चित्रपट निर्माते आणि टेक उद्योजक रोहित गुप्ता यांनी केली आहे. सिनेमॅटिक स्टोरीटेलिंग आणि टेक्नोलॉजी यांचा अनोखा संगम साधणारा हा प्लॅटफॉर्म, मोबाईलसाठी खास डिझारीलॉइडचे भव्य उद्घाटन: भारतातील पहिले व्हर्टिकल ओटीटी प्लॅटफॉर्म, मोबाईल-फर्स्ट स्टोरीटेलिंगचा नवा युगारंभइन केला आहे.
४० हून अधिक ओरिजिनल शोजसह दमदार सुरुवात

रीलॉइडने लाँचिंगच्या वेळीच ४० पेक्षा जास्त ओरिजिनल शोजची घोषणा केली असून हे सर्व कंटेंट भारतीय संस्कृतीशी घट्ट जोडलेले आहेत. विविध भाषांतील आणि स्थानिकतेला भिडणाऱ्या या कथांनी प्रेक्षकांना नवा अनुभव देण्याचे वचन दिले आहे.
मोबाईल-नेटिव्ह प्लॅटफॉर्म: वापरण्यास सुलभ, पाहण्यात सहज
आजच्या काळात बहुतेक व्हिडीओ कंटेंट मोबाईलवरच पाहिला जातो. हे लक्षात घेऊन रीलॉइडने पूर्णपणे व्हर्टिकल फॉरमॅट स्वीकारला आहे. शॉर्ट फॉर्मेट एपिसोड्स, ब्रेकमध्ये पाहता येतील असे कंटेंट, आणि उच्च दर्जाची निर्मिती हे याचे वैशिष्ट्य आहे.
क्रिएटर्ससाठी खुले व्यासपीठ
रोहित गुप्ता यांनी रीलॉइडविषयी सांगितले की, हे एक स्टेज, एक कॅनव्हास आणि एक चळवळ आहे. सर्व प्रकारच्या क्रिएटर्सना येथे आपली कहाणी मांडण्यासाठी संधी दिली जाते. स्टुडिओ असो की स्वतंत्र क्रिएटर — सगळ्यांना एकसमान टूल्स आणि सपोर्ट मिळतो.
हॉरिझॉन्टल कंटेंटचे व्हर्टिकलमध्ये रूपांतर

रीलॉइडची पोस्ट-प्रोडक्शन टीम जुना कंटेंट नव्या व्हर्टिकल फॉरमॅटमध्ये रूपांतरित करते. त्यामुळे पूर्वीची गुंतवणूकही वाया न जाता नव्या स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.
कथांचे विविध रंग: प्रेरणादायी ते विनोदी
थ्रिलर, ड्रामा, विनोदी स्किट्स, रिअल-लाइफ हीरोजच्या कथा – रीलॉइडवर सर्व प्रकारचा कंटेंट आहे. हे जॉनर-फ्लूइड प्लॅटफॉर्म असून एकाच स्वरूपात अडकलेले नाही. भारतातील विविधतेला मांडण्याचा यामागचा प्रयत्न आहे.
प्रेक्षकांचा सहभाग — प्लॅटफॉर्मसाठी केंद्रस्थानी
प्रेक्षक फक्त कंटेंट पाहत नाहीत, तर तो घडवतातही. त्यांचे फीडबॅक, रेटिंग्स आणि सहभाग रीलॉइडच्या इकोसिस्टमचा भाग आहेत. यामुळे हे भारतातील सर्वांत इंटरऍक्टिव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म ठरते.
रीलॉइडचे पुढचे टप्पे
आता रीलॉइडवर पहिले शोज लाँच होणार असून अनेक नवीन प्रोजेक्ट्स सुरू झाले आहेत. AI-सहाय्यित व्हिडीओ प्रक्रिया, नवे पार्टनरशिप्स आणि मोबाइल कंटेंटचे क्रांतिकारी बदल हे पुढचे लक्ष आहे.
क्रिएटर्ससाठी ओपन इन्विटेशन
आजच reeloid.app किंवा Android App वर जाऊन रीलॉइडचा भाग व्हा. नवीन शो पिच करा, जुना कंटेंट रूपांतरित करा किंवा रीलॉइड टीमसोबत सहनिर्मितीत सहभागी व्हा.
रीलॉइडचा हेतू

रोहित गुप्ता यांनी स्थापन केलेले रीलॉइड हे केवळ ओटीटी प्लॅटफॉर्म नाही, तर भारतीय कथांना नव्या पिढीसाठी नव्या फॉरमॅटमध्ये मांडणारी एक चळवळ आहे. मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनमध्ये मोठ्या कल्पनांना जागा देणारे हे व्यासपीठ आता सुरू झाले आहे.
-
आज्जीबाई निघाली शाळेला…

मराठी रंगभूमीवर AI महाबालनाट्याची यशस्वी धडक
जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित, क्षितीज पटवर्धन लिखित व दिग्दर्शित “आज्जी बाई जोरात” हे म मराठी प्रस्तुत मराठीतील पहिलं AI महाबालनाट्य ठरले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत या नाटकाने मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण केली आणि प्रेक्षकांना हसवत, गात, नाचवत एक वेगळा अनुभव दिला.
बालकांसोबत पालकही झाले आज्जीचे चाहते
निर्मिती सावंत, अभिनय बेर्डे, मुग्धा गोडबोले, अभिजीत केळकर, जयवंत वाडकर यांसह ११ कलाकारांच्या चमकदार कामगिरीने नाटकाने सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मनं जिंकली. अनेक पालकांनी “मोबाईलच्या दुनियेत गुंतलेल्या मुलांना पुन्हा पुस्तकांकडे वळवण्याचे काम या नाटकाने केले आहे,” अशा प्रतिक्रिया दिल्या.
पुस्तक विक्रीत वाढ, मराठीला नवा चेहरा
या नाटकामुळे उन्हाळी सुट्टीत पुस्तकांची विक्रीही लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करतानाच AI च्या साहाय्याने रंगभूमीवर एक नवा प्रयोग पाहायला मिळत आहे.
मराठीसाठी आज्जी शाळेच्या दिशेने निघाली
महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये मराठी सक्तीची न राहिल्याने, आज्जी आता शाळांमध्ये पोहोचण्याच्या मोहिमेवर निघाली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे सांगतानाच, तिला आपल्या घरातून, शाळांमधून बाहेर ठेवण्याची प्रक्रिया दुर्दैवी असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.
६ जुलैला यशवंत नाट्यमंदिरात विशेष प्रयोग
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी साने गुरुजी इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे दुपारी ४ वाजता “आज्जी बाई जोरात” या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
शाळांसाठी सवलतीत तिकीट उपलब्ध
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी या प्रयोगाची तिकीट दर सवलतीत ठेवण्यात आली आहेत. घराघरात पोहोचलेली आज्जी आता आपल्या नातवंडांसोबत शाळेत पोहोचते आहे. चला, आपण सुद्धा या मराठीच्या मोहिमेत सहभागी होऊया!
