
-
ब्राम्हण सेवा मंडळाच्या शतकोत्सवी गणेशोत्सवात ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील यांचे ‘वारकरी कीर्तन’

भक्तिमय वातावरणात साजरा होतोय शतकोत्सवी उत्सव
मुंबईतील दादर परिसरातील ख्यातनाम ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव २०२५ यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. या सोहळ्यात विविधतेने नटलेले सांस्कृतिक, ज्ञानप्रद आणि मनोरंजनपर कार्यक्रम सादर होत असून, रसिक गणेशभक्तांना एक आगळावेगळा अनुभव मिळत आहे.कीर्तनाने होणार कार्यक्रममालेचा समारोप
या कार्यक्रममालेचा समारोप भक्तिरसाने ओथंबून वाहणाऱ्या कीर्तनाने होणार असून, लोकप्रिय कीर्तनकार ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील यांच्या वाणीतून रसिक गणेशभक्तांना ते ऐकायला मिळणार आहे. शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड, दादर (प) येथे हे कीर्तन पार पडणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून अधिकाधिक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.श्री. पाटील यांचे कार्य आणि वारकरी परंपरेसाठी योगदान
श्री. जगन्नाथ महाराज पाटील सध्या सोनी मराठीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे मुख्य परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुंबईजवळील सरलांबे येथे श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय सुरू करून वारकरी परंपरेच्या प्रसारासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे.मंडळाच्या परंपरेचा ऐतिहासिक मागोवा
ब्राह्मण सेवा मंडळाचा पहिला श्री गणेशोत्सव ११ ते २० सप्टेंबर १९२६ रोजी ‘मुकुंद मॅन्शन’ येथे संपन्न झाला होता. स्थापनेपासून मंडळाने अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम, स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले आहेत. अनेक दिग्गज कलाकार, नामवंत व्याख्याते आणि मान्यवरांनी या मंचावर आपली कला आणि विचार मांडले आहेत.शतकोत्सवी उत्सवात मान्यवरांची उपस्थिती
यंदाच्या शतकोत्सवी उत्सवात लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे, स्पृहा जोशी, संकर्षण कऱ्हाडे, अमित वझे, मानसी वझे, निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्य, अंजली मराठे, विनय चौलकऱे, गंधार जोग, प्रद्योत पेंढारकर आणि सर्वेश देशपांडे यांसारख्या कलाकारांनी आपली कला सादर केली. तसेच माजी लष्कर अधिकारी ले. ज. विनायक पाटणकर (नि.) व ले. ज. एस. एस. हसबनीस (नि.) यांची ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी विशेष मुलाखत घेतली.राजकीय, सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग
प्रख्यात गायिका राणी वर्मा, संगीतकार कौशल इनामदार तसेच अनेक राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी या मंडळाच्या श्री गणेशाचे दर्शन घेतले व शतकोत्सवी उत्सवाला आपली उपस्थिती लावली. यामुळे शतकभराच्या या परंपरेत यंदाचा उत्सव अधिकच ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरला आहे. -
या दिवाळीत रीलस्टार येत आहे…

सामान्य माणसांची स्वप्ने आणि जीवन सांगणारा ‘रील स्टार’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर ट्रेंड
‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट एक प्रभावी थीम घेऊन प्रेक्षकांसमोर आला आहे. या चित्रपटात श्रीमंत व उच्चभ्रू लोकांची नीतिमत्ता आणि ते सामान्य लोकांशी कसे वागतात याचे वास्तवदर्शी चित्रण केले आहे. ‘रील स्टार’ मराठीतील प्रचलित साहित्यिक सिद्धांत आणि सिनेमॅटिक संकल्पनांना आव्हान देत, एक नवा प्रवाह निर्माण करणारा सिनेमा घडवण्याचा प्रयत्न करतो आहे.भानुदास आणि त्याच्या कुटुंबाची हृदयस्पर्शी कथा
हा चित्रपट भानुदास नावाच्या रस्त्यावरील विक्रेत्याची आणि त्याच्या कुटुंबाची कथा मांडतो. आयुष्यातील छोट्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झगडताना ते अनपेक्षित संकटात अडकतात आणि त्यांची कहाणी समकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय वास्तवाशी जोडली जाते. या कौटुंबिक कथेला सस्पेन्स-थ्रिलरची जोड देत प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी स्वतःच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्यांविरुद्ध अस्तित्वासाठी भानुदास उभा ठाकतो.प्रसाद ओक आणि भूषण मंजुळे यांची दमदार भूमिका
या चित्रपटात सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयासह प्रसाद ओक पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. तो एका ख्यातनाम न्यायाधीशाच्या मृत्यूमागील सत्य उलगडणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळे देखील एका प्रभावी भूमिकेत आहे. मिलिंद शिंदे, उर्मिला जगताप, कैलाश वाघमारे, अनंत महादेवन, स्वप्नील राजशेखर, अभिनव पाटेकर, रुचिरा जाधव, तनिष्का मानसी आणि मास्टर अर्जुन यांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत.मल्याळम तंत्रज्ञांची निर्मिती आणि हृदयस्पर्शी गाणी
भारतातील काही सर्वोत्तम चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या मल्याळम चित्रपट उद्योगातील तंत्रज्ञांची निर्मिती असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. कथेला अनुरूप असलेली हृदयस्पर्शी गाणी या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण आहे. ‘दृश्यम’चे संगीत दिग्दर्शक विनू थॉमस यांनी गुरु ठाकूर आणि मंदार चोळकर यांच्या गीतांना संगीत दिले आहे. आदर्श शिंदे, मनीष राजगिरी, रोहित श्याम राऊत, अभिजित कोसंबी, सायली कांबळे आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी ही गाणी सादर केली आहेत.दिग्दर्शन आणि निर्मिती
हा चित्रपट सुधीर कुलकुर्णी यांच्या लेखणीतून आकारला आहे, तर दिग्दर्शन सिम्मी आणि रॉबिन यांनी केले आहे. ‘अन्य’ या हिंदी-मराठी चित्रपटानंतर त्यांचा हा महत्वाचा प्रयत्न आहे. जे-फाइव्हज एंटरटेनमेंट्स, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली जोस अब्राहम, मोनिका आणि निशील कंबाती यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.प्रदर्शनाची तारीख
‘रील स्टार’ हा चित्रपट या दिवाळीत संपूर्ण महाराष्ट्रभर थिएटरमध्ये दाखल होणार असून, प्रेक्षकांसाठी एक प्रभावी सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. -
Behind Every Mask is a Player: ‘The Game: You Never Play Alone’ Drops this October 2 on Netflix

A Thrilling New Tamil Original
The most dangerous players never show their faces. They hide behind masks and watch the chaos unfold. Premiering on October 2, The Game: You Never Play Alone marks Netflix India’s first Tamil series of 2025 — a character-driven thriller that delves into the hidden costs of living in a hyper-connected world. What begins as a mystery soon becomes a profound exploration of identity, power, and the choices that shape human lives.A Strong Creative Collaboration
Following the success of Black Warrant earlier this year, The Game: You Never Play Alone continues the partnership between Netflix and Applause Entertainment. Directed by Rajesh M. Selva, the series features Shraddha Srinath in the lead role, alongside Santhosh Prathap, Chandini, Syama Harini, Bala Hasan, Subash Selvam, Viviya Santh, Dheeraj, and Hema. The show blends gripping storytelling with timely themes, expanding Netflix’s growing slate of Tamil originals.Netflix’s Vision for South Originals
Monika Shergill, Vice President, India Content at Netflix, highlighted the importance of this launch: “With The Game: You Never Play Alone, our first Tamil series of the year, we are bringing a story that is both fresh and relevant. It’s a gripping mystery thriller that follows a female game developer on a mission to track down those behind a coordinated attack against her. Our collaboration with Applause Entertainment has delivered remarkable titles, and we’re thrilled to join forces again for our South slate.”Applause Entertainment on Storytelling
Sameer Nair, Managing Director at Applause Entertainment, shared his thoughts: “The Game is a timely story capturing the realities of our digital age, where every choice can alter relationships. It blends strong writing with Rajesh Selva’s directorial vision to create something both thought-provoking and entertaining. Our partnership with Netflix ensures that such stories reach audiences across India and worldwide.”A Director’s Perspective
Director Rajesh M. Selva described the series as more than just a thriller: “It’s a reflection of the world we live in, where our lives are intertwined with screens, secrets, and shifting loyalties. At its heart, it’s about people, their choices, and the fragile line between truth and deception. Collaborating with Netflix and Applause allowed us to push creative boundaries, and I can’t wait for audiences to not just watch the show, but to step into its world and feel its pulse.”A Story of Secrets and Survival
Blending the intrigue of a thriller with the emotional weight of family conflicts and concealed truths, The Game: You Never Play Alone asks viewers to look beyond the screen — into the lives we create, hide, and protect.You Don’t Just Join the Game — You’re Already In It
Watch ‘The Game: You Never Play Alone’ streaming on Netflix from October 2, 2025. -
“दुर्गे दुर्घट भारी” – भक्ती, श्रद्धा आणि उर्जेचा सुरेल गजर आता रसिकांसमोर

‘’पुन्हा शिवाजी राजे भोसले’’ या चित्रपटातील पहिले गीत ‘दुर्गे दुर्घट भारी’ नुकतेच प्रदर्शित झाले असून हे गीत रसिकांच्या मनात भक्तीचा, नवचैतन्याचा संचार करत आहे. पारंपरिक स्तोत्राला आधुनिक संगीताची नवी छटा देत हे गीत महाराष्ट्रभर गुंजत आहे.
या गीतातून दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी पहिल्यांदाच संगीतकार म्हणून पदार्पण केले आहे. श्रद्धा आणि संगीतरसाचा सुंदर संगम साधत त्यांनी या आराधनागीताला वेगळाच आविष्कार दिला आहे.
या गीताला शंकर महादेवन यांच्या प्रभावी आणि दैवी आवाजाची साथ लाभली असून ढोल-ताशांचा दणदणाट (वरद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, रुंल सावंत) देवीच्या जयघोषाची अनुभूती देतो. आयडी राव यांच्या हॉर्न्सनी गाण्याला भव्यता दिली आहे.
याशिवाय यशराज स्टुडिओमधील विजय दयाल यांनी केलेल्या मिक्सिंग आणि मास्टरिंगमुळे गीत अधिक प्रभावी बनलं आहे.
‘दुर्गे दुर्घट भारी’ हे केवळ गाणं नसून देवीच्या आराधनेतून निर्माण होणारा भक्तिरसाचा झरा आहे. सध्या हे गीत प्रत्येक घराघरात, प्रत्येक मनामनात भक्तीचा आणि उर्जेचा जयघोष घुमवत आहे.
महेश मांजरेकरांचे संगीतकार म्हणून पदार्पण
या गीतातून दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पहिल्यांदाच संगीतकार म्हणून पदार्पण केले आहे. श्रद्धा आणि संगीतरसाचा सुंदर संगम साधत त्यांनी या आराधनागीताला वेगळाच आविष्कार दिला आहे. त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे गीताला एक अनोखा आणि प्रभावी स्वरूप लाभले आहे.शंकर महादेवन यांचा दैवी आवाज
या गीताला शंकर महादेवन यांच्या प्रभावी आणि दैवी आवाजाची साथ लाभली आहे. गौरव चाटी यांच्या दमदार सादरीकरणामुळे गाणं अधिक भावपूर्ण झालं आहे. ढोल-ताशांचा दणदणाट (वरद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, रुंल सावंत) देवीच्या जयघोषाची अनुभूती देतो. आयडी राव यांच्या हॉर्न्सनी गाण्याला अधिक भव्यता प्राप्त झाली आहे.संगीतनिर्मितीतील तांत्रिक परिपूर्णता
यशराज स्टुडिओमधील विजय दयाल यांनी केलेल्या मिक्सिंग आणि मास्टरिंगमुळे गीत अधिक प्रभावी आणि सशक्त बनले आहे. गीतातील प्रत्येक सूर आणि प्रत्येक ठेका श्रोत्यांच्या मनात ऊर्जा जागवतो.भक्तिरसाचा झरा निर्माण करणारे गीत
‘दुर्गे दुर्घट भारी’ हे केवळ एक गाणं नसून देवीच्या आराधनेतून निर्माण होणारा भक्तिरसाचा झरा आहे. सध्या हे गीत प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक मनामनात भक्तीचा आणि उर्जेचा जयघोष घुमवत आहे. -
श्री चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

२८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
असंख्य गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील चिंचपोकळीच्या श्री चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर मोठ्या थाटात प्रदर्शित करण्यात आला. शीर्षकामुळे मनात उत्सुकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाच्या टिमने चिंतामणीचे दर्शन घेतले आणि गणरायाच्या आशीर्वादाने टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या प्रसंगी कलाकार, निर्माते, दिग्दर्शक व तंत्रज्ञ उपस्थित होते. हा चित्रपट येत्या २८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.आध्यात्माशी सांगड घालणारी कथा
राधाकृष्ण प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. दिग्दर्शन स्वरूप सावंत यांनी केले असून कथालेखन त्यांनी स्वतः पूनम चौधरी पाटील यांच्यासह केले आहे. पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे तर अतिरिक्त पटकथा विशाल सुदाम जाधव यांनी लिहिली आहे. ‘देवघर ऑन रेंट’ या शीर्षकावरूनच हा चित्रपट आध्यात्माची वर्तमानाशी सांगड घालणारा असल्याचे स्पष्ट होते. टिझरमधूनही हा विचार अधोरेखित होतो की बेभान जीवनात आपल्या आतल्या आवाजाला शरण गेलो तर आयुष्याचे मार्ग सोपे होतात.दिग्दर्शक व निर्मात्यांचे विचार
दिग्दर्शक स्वरूप सावंत म्हणाले की, “देवघर ऑन रेंट या शीर्षकातच देव दडला असल्याने श्री चिंतामणीच्या दरबारात टिझर प्रदर्शित झाल्याचा विशेष आनंद आहे. हा चित्रपट जरी आजच्या काळातील गोष्ट सांगणारा असला तरी त्यातील आध्यात्माचा धागा महत्त्वाचा आहे. देवाचे अस्तित्व कोणी नाकारू शकत नाही. गरीब असो वा श्रीमंत, ती दैवी शक्ती सर्वांचा सांभाळ करते.”* निर्मात्या पूनम चौधरी पाटील यांनी सांगितले की, या चित्रपटात नाट्यमय कथानकासोबत मनोरंजनपर सर्व घटक आहेत, जे प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवतील.कलाकार व तांत्रिक बाजू
या चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चावरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, चेतन रायकर, सिद्धेश्वर झाडबुके आणि गौतमी पाटील यांच्या भूमिका आहेत. छायाचित्रण चैतन्य साळुंखे, कला दिग्दर्शन दिलीप कंधारे यांनी केले आहे. संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी गीतांना संगीत दिले आहे. अपेक्षा गांधी सोनी वेशभूषा डिझायनर असून सुजीत सुरवसे यांनी मेकअप केला आहे. प्रकाशयोजना शर्मा यांच्या टिमने सांभाळली आहे. कार्यकारी निर्माती अनुनेहा घोडके, निर्मिती व्यवस्थापक यश सणस असून नृत्य दिग्दर्शन किशोर दळवी यांनी केले आहे. प्रॉडक्शन हेड विजय म्हस्के आहेत. -
चित्रनगरीच्या `बाप्पा’च्या मंडपात मराठी कलाकारांचा सन्मान!

दादासाहेब फाळके चित्रनगरीत रंगला चित्रसंवाद
मुंबई, ता. ३ : दादासाहेब फाळके चित्रनगरीची परंपरा असलेल्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या चित्रसंवाद कार्यक्रमात व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते मराठी कलाकार व माध्यमकर्मींचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम चित्रनगरीच्या `बाप्पा’च्या मंडपात मोठ्या उत्साहात पार पडला.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा
यंदाच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने राज्यभरात गणपती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. चित्रनगरीत `चित्रनगरीच्या राजा’ची प्राणप्रतिष्ठापना करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून चित्रसंवाद या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कलाकार व मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला सिनेक्षेत्रातील अभिनेता सुशांत शेलार, प्रमोद पवार, संदीप पाठक, महेश लिमये, दिग्दर्शक दीपक पाटील, गायक रोहित राऊत, अभिनेत्री मेघा धाडे, श्रेया बुगडे, भार्गवी चिरमुले, तेजस्विनी लोणारे, अक्षया गुरव, दैवता पाटील, निवेदिका मानसी सोनटक्के, तसेच घरत गणपती चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर आणि कलाकार उपस्थित होते.
माध्यमकर्मी आणि संस्थांचा सन्मान
कलाकारांसोबतच सिने समीक्षक डॉ. संतोष पाठारे, ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर, संपादक सचिन परब, नीला टेलिफिल्मचे असिद मोदी, विस्लिंग वूडसचे चैतन्य चिंचलीकर, फ्राइम फोकसचे सुनील धैया, बॉलिवूड पार्कचे संतोष मिजगर, निर्माता महामंडळाचे बाळासाहेब गोरे, देवेंद्र मोरे, कलादिग्दर्शक डॉ. सुमीत पाटील यांचा सन्मान करण्यात आला.चित्रनगरी व्यवस्थापनाची उपस्थिती
या सोहळ्यात चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. कलाकार, माध्यमकर्मी आणि संस्थांचा सन्मान करून या शताब्दी वर्षीचा गणेशोत्सव अधिक संस्मरणीय ठरला. -
‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा काव्यमय टिझर प्रदर्शित

नेत्रसुखद दृश्ये आणि काव्यमय संवादांचा संगम
मातब्बर कलाकारांचा अभिनय, सुमधूर संगीत आणि दर्जेदार सादरीकरणाने सजलेला ‘सकाळ तर होऊ द्या’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज आहे. ‘नाच मोरा…’ या गाण्याने रसिकांना भुरळ घातल्यानंतर आता या बहुचर्चित चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर टिझरला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, नेत्रसुखद दृश्यांना काव्यमय संवादांची किनार जोडलेला हा टिझर प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरत आहे.सुबोध भावेचा प्रभावी संवाद आणि मानसी नाईकची एन्ट्री
श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत आणि नम्रता सिन्हा निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन आलोक जैन यांनी केले आहे. सुबोध भावेच्या व्यक्तिरेखेच्या मुखातून उमटणारा “जन्म आपल्या हातात नसतं, असतं ते फक्त जगणं…” हा संवाद टिझरची सुरुवात करतो आणि जीवनाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी मांडतो. त्याचदरम्यान मानसी नाईकची एन्ट्री होते आणि तिच्या संवादातून नायकाला सकारात्मकतेने जगण्याची प्रेरणा मिळते. उत्कंठावर्धक शेवटामुळे टिझर अधिक प्रभावी ठरतो. सुबोध-मानसीची केमिस्ट्री, सुबोधचा नवा लुक आणि मानसीचे ग्लॅमर यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.संगीत, संवाद आणि तांत्रिक बाजू
या चित्रपटाचे संगीत गायक-संगीतकार रोहित राऊत यांनी दिले असून, गीतकार अभिषेक खणकर यांच्या रचना हिमेश रेशमिया मेलोडीज या लेबलखाली संगीतप्रेमींना सादर होत आहेत. ओंकार बर्वे आणि अंकुश मारोडे यांनी संवादलेखन केले आहे, तर छायांकन सुनील पटेल यांनी केले आहे. चित्रपटाचे वितरण सिनेपोलीस करणार आहे.१० ऑक्टोबरला प्रेक्षकांसमोर काव्यमय अनुभव
या टिझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरता अधिक वाढली आहे. ‘सकाळ तर होऊ द्या’ १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट केवळ कथानक नाही तर भावनांचा प्रवास, जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी आणि पडद्यावर घडणारा काव्यमय अनुभव प्रेक्षकांना देईल, असा विश्वास अधिक दृढ झाला आहे. -
झी मराठी अवॉर्ड्स २०२५ – “सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा!”

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मतदान प्रक्रियेचा शुभारंभ
महाराष्ट्रातील प्रत्येक घराचा अविभाज्य भाग बनलेली झी मराठी घेऊन आली आहे वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित सोहळा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५!’ या वर्षाची थीम आहे “सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा!”, ज्यात प्रेक्षक आणि कलाकार यांचं खास नातं साजरं होणार आहे. या भव्य सोहळ्याच्या मतदान प्रक्रियेचा शुभारंभ गणपती बाप्पाच्या चरणी, ढोल-ताशाच्या गजरात भक्तिभावपूर्ण वातावरणात करण्यात आला.लाडक्या कलाकारांच्या उपस्थितीत पारंपरिक आरती

झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांनी या शुभारंभाला हजेरी लावली. जयंत-वेंकी (लक्ष्मी निवास), कमळी-ऋषी (कमळी), अंबिका-अथर्व (तुला जपणार आहे) यांनी गणरायाची आरती करून आपल्या मालिकेला आणि सहकलाकारांना विजयी करण्यासाठी आशीर्वाद घेतले. पारंपरिक सजावट, मंगल वातावरण आणि कलाकारांची उपस्थिती या सर्वामुळे सोहळ्याची शोभा वाढली.
प्रेक्षकांना मतदानाचे आवाहन
कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधत आपल्या आवडत्या कलाकारांना आणि मालिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यांनी नमूद केलं की ही केवळ स्पर्धा नाही, तर प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील प्रेमाचं आणि विश्वासाचं सुंदर प्रतिबिंब आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर मतपत्रिकेद्वारे मतदान होणार असून, झी५ अॅपवरही प्रेक्षकांना आपलं मत नोंदवता येईल.संस्कृती, नाती आणि भावनांचा उत्सव
‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ हा केवळ एक अवॉर्ड शो नसून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा, कुटुंबातील नात्यांचा आणि प्रेक्षकांच्या भावनांचा एक भव्य उत्सव आहे. प्रेक्षकांना आपल्या मतांद्वारे आपल्या लाडक्या कलाकारांचा सन्मान करण्याची संधी मिळणार आहे.तेव्हा पाहायला विसरू नका ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ – लवकरच सदैव तुमच्या झी मराठीवर.
-
सूर्याच्या आयुष्यात नात्यांचं मोठं संकट!

“लाखात एक आमचा दादा” मालिकेत गाजत असलेल्या शालन निंबाळकर खून प्रकरणातील न्यायालयीन लढाईला अधिकृत सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच दिवशी खटल्याला नवे वळण मिळालं आहे. पीडित पक्षाच्या वतीने काम पाहणाऱ्या प्रसिद्ध वकिल कालिंदी धर्माधिकारी यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपी जालिंदर सरनाईकची बाजू कमकुवत झाली असून त्याला अटक अवस्थेतच ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाने पोलिसांना स्पॉट पंचनामा आणि चार्जशीट तातडीने दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जालिंदरच्या जामिन अर्जावर सुनावणीदरम्यान, त्याने पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
जालिंदरवर वाढतं संकट
जालिंदर चारही बाजूंनी अडकलेला दिसत असताना, पीडित शालनची मैत्रीण आशा तुरुंगात भेट देऊन त्याला थेट इशारा देते. त्यामुळे त्याच्यावर आणखी दबाव वाढतो आणि पुढील कारवाईत अनेक नवे खुलासे होण्याची शक्यता निर्माण होते.
स्पॉट पंचनाम्यात उलगडलेला पुरावा
स्पॉट पंचनाम्याच्या वेळी पोलिसांनी जालिंदर, मालन, सूर्या आणि तुळजाला घटनास्थळी बोलावले. या वेळी मालनने संपूर्ण घटना पोलिसांसमोर मांडली. त्याच वेळी जालिंदरच्या परफ्यूमच्या बाटलीचा महत्त्वाचा पुरावा सापडतो. पंचनाम्यादरम्यान जालिंदर सतत मालनकडे पाहत असल्याचे लक्षात येताच, सूर्या आणि तुळजाला तिच्या सुरक्षेची चिंता वाटते आणि ते तिला आपल्या घरी नेतात.मालन-तुळजाची भावनिक भेट
मालन आणि तुळजाच्या भावनिक भेटीने वातावरण भारावून जाते. याचदरम्यान शशिकांत सरनाईक प्रसादला ठार मारण्याची योजना आखतो, परंतु नर्मदाच्या मदतीने प्रसाद पळून जाण्यात यशस्वी होतो. मात्र पळताना त्याचा अपघात होतो. सुदैवाने राजू वेळेवर पोहोचतो आणि प्रसादचे प्राण वाचवतो.नात्यांचा आणि न्यायाचा संघर्ष
हा खटला आता केवळ एका खुनाचा नसून, अनेक वर्षांपासून दडपून ठेवलेल्या सत्यांचा, गुंतागुंतीच्या नात्यांचा आणि न्यायासाठी सुरू असलेल्या संघर्षाचा झाला आहे. पुढे या कहाणीला कोणते वळण मिळणार, याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.तेव्हा बघायला विसरू नका ‘लाखात एक आमचा दादा’, दररोज संध्याकाळी ६:०० वा. फक्त झी मराठीवर.
-
अनुराग कश्यप यांचा “निशानची” चा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

ट्रेलर लाँचसह सुरू होणार सिनेमॅटिक धमाका
अनुराग कश्यप आणि अॅमेझॉन MGM स्टुडिओज इंडिया यांच्या “निशानची” चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरमुळे खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक धमाका सुरू होणार असून, आधीच प्रदर्शित झालेल्या टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. दमदार डायलॉग्स, अॅक्शन आणि ड्रामाने भरलेला हा ट्रेलर मसाला एंटरटेनरची खरी झलक देणार आहे.ऐश्वर्य ठाकरेची दुहेरी भूमिका आकर्षणाचा केंद्रबिंदू
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत डेब्यूटंट ऐश्वर्य ठाकरे दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत. तर वेदिका पिंटो, मोनिका पनवार, मोहम्मद झीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांच्यासारखे दमदार कलाकार कथेला अधिक ताकद आणि खोलपणा देणार आहेत. फ्रेश कास्टिंग आणि दमदार अभिनयामुळे “निशानची”ला आधीपासूनच विशेष ओळख मिळाली आहे.गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित रॉ आणि एनर्जेटिक कथा
“निशानची” ही दोन भावांच्या गुंतागुंतीच्या कहाणीवर आधारित आहे. वेगवेगळ्या वाटा निवडलेले हे दोन भाऊ आपल्या निर्णयांमुळे नशिब घडवतात. गावाच्या पार्श्वभूमीवर उभी असलेली ही कथा रॉ, एनर्जेटिक आणि देसी फ्लेवरने भरलेली आहे, जी फक्त थिएटरमधील अनुभवातूनच खरी खुलून दिसणार आहे.अनुराग कश्यपची दमदार स्टोरीटेलिंग शैली
दिग्दर्शक अनुराग कश्यप हे त्यांच्या बोल्ड आणि प्रभावी स्टोरीटेलिंगसाठी ओळखले जातात. “निशानची”चं कथालेखन प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी एकत्र केलं आहे. प्रेक्षकांना यात अॅक्शन, ह्यूमर आणि ड्रामाचा अफलातून मिलाफ पाहायला मिळणार आहे.१९ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार “निशानची”
अजय राय आणि रंजन सिंग यांच्या “जार पिक्चर्स” या प्रोडक्शन हाउसच्या बॅनरखाली, “फ्लिप फिल्म्स”सोबतच्या असोसिएशनमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. उत्सुकता वाढवणारा हा मसाला एंटरटेनर येत्या १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
