
-
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर महेश मांजरेकर यांची विठुरायाला साद

सेलेब्रिटीही भारावले भक्तिरसाने
महाराष्ट्रातील सर्वोत्तम कीर्तनकारांच्या शोधासाठी सुरू असलेल्या सोनी मराठीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोने रसिकांच्या मनात ठसठशीत स्थान निर्माण केले आहे. आता या मंचाची भुरळ थेट सेलिब्रिटींनाही पडू लागली आहे. नुकतेच महेश मांजरेकर यांनी या मंचावर खास उपस्थिती लावून प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातले.परंपरेला साजेसा पोशाख आणि मनापासूनचा आदर
या वेळी महेश मांजरेकर यांनी पारंपरिक धोतर-कुर्ता असा पोशाख परिधान केला होता. या कार्यक्रमातील संकल्पना किती खास आहे याचा अनुभव घेताना त्यांनी सांगितले की, “अशा प्रकारचा भक्तिरसात न्हालेला शो करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे.”विठ्ठलाच्या नामस्मरणात रंगले मंच

या कीर्तनकारांच्या दमदार सादरीकरणाने भारावलेल्या मांजरेकर यांनी स्वतः ‘विठूचं नाव मनी जोडलं’ हे गाणं सादर केलं. त्यांची ही आर्त साद परीक्षकांसह उपस्थितांनाही भावली. “या कलाकारांकडून जेव्हा मी विठ्ठलनामाचं कीर्तन ऐकलं, तेव्हा माझ्याही मनात विठ्ठलाला साद घालावीशी वाटली,” असं ते भावूक होत म्हणाले.
स्पर्धकांचा हर्षोल्हास आणि प्रेक्षकांची उत्सुकता
महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने स्पर्धकही हरखून गेले. त्यांच्या भेटीने साऱ्या सेटवर एक वेगळाच भक्तिपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरण तयार झालं.लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला हा खास भाग
सोनी मराठीवर प्रसारित होणाऱ्या या शोचा हा विशेष भाग लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा रिअॅलिटी शो सोमवार ते शनिवार, रात्री ८ वाजता सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. -
Ramira Taneja’s Short Film ‘Wild Flowers’ Selected at 15th Dadasaheb Phalke Film Festival 2025

Mumbai | Correspondent – Pranav Birje
Renowned film personality and co-producer of Love You Shankar (2024), Ramira Taneja has made a remarkable directorial debut with her short film Wild Flowers, which has been officially selected at the 15th Dadasaheb Phalke Film Festival 2025 (New Delhi).Spanning just 6 minutes and 30 seconds, this emotional short film has garnered attention not only for its storytelling but also for its unique and innovative promotional campaign.
A Revolutionary Promotional Strategy
Ramira Taneja introduced a bold new approach to short film marketing. She launched what is arguably the shortest trailer ever at just 30 seconds, accompanied by striking posters, a YouTube premiere, and testimonial bites from industry professionals. While such strategies are generally used for feature films, Ramira adapted them successfully for her short film, thereby setting a new industry benchmark.A Passion-Driven Journey
Expressing her gratitude, Ramira said, “I’m overwhelmed with the love Wild Flowers has received. I am deeply thankful to all my collaborators who supported this project with open hearts.”With over 15 years in the film industry, Ramira entered filmmaking with immense confidence and sincerity. Despite being advised by peers to avoid short films, she chose to stay true to her vision, embracing value-driven cinema over commercial compromise.
“If you truly believe in something, take that first step. Wild Flowers was shot and edited within 24 hours, using non-actors, natural locations, and a small crew under minimal resources,” she revealed.
From Yash Chopra’s Stage to the Director’s Chair

Ramira’s cinematic journey began when legendary filmmaker Yash Chopra noticed her dance-drama performance in Delhi. That brief encounter at Yash Raj Studios ignited a lifelong passion for storytelling through cinema.
Validation Through Festivals
Sharing her experience at the festival, Ramira added, “The environment at such festivals is very welcoming—it values hard work and intent. The official selection of Wild Flowers at the Dadasaheb Phalke Film Festival is proof that we’re on the right path.”Recognized by Industry Veterans
Ramira was recently invited as a jury member at another prestigious film festival organized by the Om Puri Foundation, where she shared the stage with notable personalities like Nandita Puri, Aseem Bajaj, Brahmanand Singh, Sanjay Khanduri, and Bobby Vats. “They were so impressed by my promotion strategy that they invited me to collaborate with them—an honor I deeply cherish,” she shared.Future Endeavors on the Horizon
With several scripts ready and upcoming projects in the pipeline, Ramira is currently exploring collaborations with new partners, funders, and creative allies to further elevate her cinematic vision.Wild Flowers is not just a film—it’s a declaration that short films too can carry depth, innovation, and industry-changing potential.
-
“बुंगा फाईट” गाण्यानं केला सोशल मीडियावर धुमाकूळ!

शशिकांत धोत्रे दिग्दर्शित “सजना” या आगामी मराठी चित्रपटातील “बुंगा फाईट” हे धमाकेदार गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. मराठमोळ्या गावरान भाषेचा आणि लोकसंगीताचा बहारदार संगम असलेलं हे गाणं प्रेक्षकांच्या तोंडपाठ झालंय. डान्स फ्लोअरपासून ते स्पर्धांपर्यंत सगळीकडेच हे गाणं वाजताना आणि त्यावर थिरकताना प्रेक्षक दिसत आहेत.
आनंद शिंदेंचा लाईव्ह परफॉर्मन्स, प्रेक्षकांचा टाळ्यांचा वर्षाव
या गाण्याला लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांचा दमदार आवाज लाभला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये आनंद शिंदे यांनी हे गाणं सादर करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव करत स्वागत केलं.२.५ मिलियन व्यूजचा टप्पा पार
गाण्याचं आकर्षण इतकं आहे की “बुंगा फाईट” या गाण्याने केवळ काहीच दिवसांत २.५ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.ओंकारस्वरूप – सुहास मुंडेची हिट जोडी
या गाण्याचं संगीत ओंकारस्वरूप यांचं आहे तर शब्द सुहास मुंडे यांनी लिहिले आहेत. गाण्यात लोकगीतातील थेटपणा आणि सणासुदीची उर्जा जाणवते.सजना चित्रपट २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित
‘सजना’ चित्रपटाचं लेखन, संवाद, पटकथा, दिग्दर्शन आणि निर्मितीही शशिकांत धोत्रे यांनीच केली आहे. या चित्रपटाची कथा जितकी ग्रामीण, तितकीच ती दमदार आणि नाट्यमय आहे.“सजना”चा माहोल आता ‘बुंगा फाईट’मुळे तापलाय!
हे गाणं ऐकल्यावर एकच शब्द आठवतो – “नादच नाय करायचा!”
सिनेमागृहात २३ मे रोजी भेट द्या ‘सजना’ला – आणि अनुभवा गावरान रांगडेपणातला नवा थरार! -
‘एप्रिल मे ९९’ मध्ये ‘जाई’ची एंट्री, यंदाची उन्हाळ्याची सुट्टी होणार अविस्मरणीय

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटात कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या खट्याळ तिघांच्या मैत्रीत आता एक नवीन मैत्रीण जाईची भर पडली आहे.
चित्रपटाच्या टीझरमध्ये सतत दिसणारा पाठमोरा चेहरा कोणी असेल, याबाबतची उत्कंठा अखेर संपली आहे. ही व्यक्तिरेखा साकारतेय अभिनेत्री साजिरी जोशी, जी प्रसिद्ध अभिनेत्री ऋजुता देशमुख यांची कन्या आहे. ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातून साजिरी मोठ्या पडद्यावर पदार्पण करत असून तिची ‘जाई’ ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण करेल, असा विश्वास दिग्दर्शक आणि निर्मात्यांना आहे.
निरागस, खट्याळ आणि दिलखुलास ‘जाई’
जाई ही हुशार, गोड, समजूतदार मुलगी असून ती कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेशसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप मजा करताना दिसणार आहे. तिच्या एन्ट्रीनं कथेला एक नवं वळण मिळणार असून ही गँग आता अधिक धम्माल करणार, हे निश्चित.दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांची कल्पक निवड
“साजिरीचं निरागस हास्य, बोलके डोळे आणि अभिनयातील सहजता लक्षात घेऊन मी तिच्यासाठीच ‘जाई’ ही व्यक्तिरेखा लिहिली,” असं सांगत दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांनी तिच्या निवडीमागचं कारण स्पष्ट केलं.निर्माते राजेश मापुस्कर यांचं मत
“’एप्रिल मे ९९’ हा चित्रपट सगळ्यांना त्यांच्या बालपणात घेऊन जाणारा आहे. या अनुभवासाठी आम्हाला तितक्याच निरागस चेहऱ्यांची गरज होती. साजिरीचं हास्य आणि सहज अभिनय या चित्रपटाला फ्रेशनेस देतात,” असं त्यांनी नमूद केलं.‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाची टीम आणि प्रदर्शन
मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केलं आहे. निर्मात्यांमध्ये राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी, मॉरिस नून आणि लॉरेन्स डिसोझा यांचा समावेश आहे.हा चित्रपट येत्या १६ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
गेल्या काळातील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मजा पुन्हा अनुभवण्यासाठी ‘एप्रिल मे ९९’ नक्की पाहा! -
कुमार मंगलम बिर्ला यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित

२४ एप्रिल रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात भव्य सोहळा
महान गायक मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्याची यंदा अधिक भव्य सजावट करण्यात आली असून या प्रसंगी देशाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव होणार आहे.देशाच्या विकासगाथेत योगदान दिल्याबद्दल कुमार मंगलम बिर्ला यांना सन्मान
२०२२ साली भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यंदा आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल.चित्रपट, संगीत, साहित्य व सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान
• श्रद्धा कपूर – भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रभावी योगदानाबद्दल
• सोनाली कुलकर्णी – रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल
• सुनील शेट्टी – हिंदी चित्रपटातील योगदानासाठी
• रीवा राठोड – संगीत क्षेत्रातल्या उल्लेखनीय उभरत्या योगदानाबद्दल
• सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे – मराठी चित्रपट व रंगभूमीतील दिग्गज कलाकार म्हणून
• डॉ. एन. राजम – शास्त्रीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कारकीर्दसाहित्य, सामाजिक कार्य आणि रंगभूमी क्षेत्रालाही गौरव
• श्रीपाल सबनीस – वाग्विलासिनी पुरस्कार, साहित्य आणि वक्तृत्वासाठी
• आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लो लर्नर चिल्ड्रन – सामाजिक कार्याबद्दल
• ‘असेन मी नसेन मी’ नाटक – वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक म्हणूनभावपूर्ण संगीतमय श्रद्धांजली आणि कलाविष्कारांची सादरीकरणे
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संकल्पनेतून “सारं काही अभिजात” ही संगीतमय श्रद्धांजली सादर केली जाईल. विभावरी आपटे-जोशी, मधुरा दातार आणि इतर कलाकारांच्या सादरीकरणांनी या सांस्कृतिक संध्याकाळेला शृंगार चढेल. यासोबत विद्यावाचस्पती शंकरराव अभ्यंकर यांचे अनोखे व्याख्यानही रंगणार आहे.मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्स यांचा संयुक्त उपक्रम
गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळापासून श्रद्धा, कृतज्ञता आणि समर्पण यांची परंपरा जपणाऱ्या या प्रतिष्ठानद्वारे कला, संस्कृती आणि सेवेच्या मूल्यांना उजाळा दिला जातो. यंदाचा पुरस्कार सोहळा हा एक सुसंवादी श्रद्धांजली आणि कालातीत सांस्कृतिक वारशाचा उत्सव ठरणार आहे. -
२१ एप्रिलपासून ‘सन मराठी’वर ‘हुकुमाची राणी ही’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

खऱ्या फॅक्टरीतलं कथानक, खरी माणसं आणि माणुसकीचा ठसा
‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांच्या यशस्वी परंपरेत आता ‘हुकुमाची राणी ही’ ही नवी मालिका २१ एप्रिलपासून दररोज सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेचं चित्रीकरण मुंबईतील नव्हे तर थेट साताऱ्यातील खऱ्या फॅक्टरीत होत आहे. मालिकेच्या पत्रकार परिषदेसाठीही फॅक्टरीचंच ठिकाण निवडण्यात आलं आणि पत्रकारांनाही कामगारांच्या वेशात फॅक्टरीच्या दिवसाचा अनुभव देण्यात आला.
वैभवी चव्हाण आणि अक्षय पाटील मुख्य भूमिकेत
या मालिकेत अभिनेत्री वैभवी चव्हाण ‘राणी’ची भूमिका साकारत आहे, तर ‘इंद्रजीत’च्या भूमिकेत अक्षय पाटील झळकणार आहेत. त्यांच्यासोबत राहुल मेहंदळे जयसिंगराव महाडिक या प्रभावशाली भूमिकेत दिसणार आहेत. महाडिक इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा जयसिंगराव आपल्या नंतरचा कारभार आपल्या मुलाकडे सुपूर्त करतात आणि याच निर्णयामुळे राणी महाडिक इंडस्ट्रीमध्ये येते. पुढे माणुसकीची किंमत ओळखणारी राणी आणि पैशाला सर्वस्व मानणारा इंद्रजीत यांच्यात संघर्ष उभा राहतो.
खऱ्या अनुभवातून साकारलेली गोष्ट
या मालिकेची निर्माती श्वेता शिंदे म्हणाल्या की, “पहिल्यांदाच एका खरीखुऱ्या फॅक्टरीमध्ये चित्रीकरण करत आहोत. यामागे माझ्या आईची फॅक्टरी ही खरी प्रेरणा आहे. जशी महाडिक इंडस्ट्रीत राणी आहे, तशीच एक राणी माझ्या फॅक्टरीत होती. तिच्याकडून प्रेरणा घेत ही गोष्ट लिहिण्यात आली आहे. ही मालिका केवळ मनोरंजन देणार नाही, तर माणुसकी जपण्याचा संदेश देईल.”
मालिकेची मातीशी नाळ आणि वास्तवाशी जोड
‘हुकुमाची राणी ही’ ही मालिका केवळ प्रेमकथा किंवा औद्योगिक सत्तासंघर्ष दाखवणारी मालिका नसून ती माणसांमधल्या मूल्यांचं प्रतिबिंब ठरणार आहे. सत्य घटनांवर आधारित सादरीकरण, थेट फॅक्टरीचं वातावरण आणि मजबूत कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करेल, यात शंका नाही.
प्रेक्षकांनी प्रोमोवर जसं भरभरून प्रेम केलं, तसंच प्रेम आता मालिकेलाही मिळेल, अशी निर्मात्यांना आशा आहे.
पाहा ‘हुकुमाची राणी ही’ – २१ एप्रिलपासून दररोज सायं. ७ वाजता फक्त ‘सन मराठी’वर.
-
गूढकथांच्या चाहत्यांसाठी खास मेजवानी, ‘जारण’ सिनेमातील प्रमुख भूमिकेत अमृता सुभाष

हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित ‘जारण’ या मराठी भयपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आणि प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. आता या चित्रपटातील पहिला प्रमुख चेहरा समोर आला आहे — अमृता सुभाष. आपल्या वेगळ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अमृता या चित्रपटातही एक गूढ, आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.
गूढतेचा वेध घेणारी कथा
‘जारण’ ही केवळ एक भयपट कथा नसून मानवी भावनांचे अनेक पदर, दुहेरी आयुष्याचे ताणेबाणे आणि गूढतेच्या छटांनी भरलेली एक कलात्मक अभिव्यक्ती आहे. ही कथा प्रेक्षकांना सतत अनपेक्षित वळणांवर घेऊन जाईल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.
पोस्टरने वाढवली कुतूहलता
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता सुभाष एका अनोख्या लूकमध्ये दिसते — तिच्या चेहऱ्यावर टोचलेल्या टाचण्या, तीव्र भाव आणि डोळ्यांत दडलेली वेदना, हे सर्व पाहून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे रहस्य नेमकं काय आहे, याचं उत्तर मात्र चित्रपटगृहातच मिळणार आहे.
अमृता सुभाष यांची प्रतिक्रिया

या भूमिकेबाबत अमृता म्हणते, “मी नेहमीच चौकटीबाहेरच्या भूमिका स्वीकारायला उत्सुक असते. ‘जारण’मध्ये मी आजवर न केलेली, थोडीशी धैर्याची आणि मानसिक दृष्ट्या खोलवर जाणारी भूमिका साकारली आहे. स्क्रिप्ट वाचल्यावरच मला वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे. दिग्दर्शक आणि सहकलाकारांच्या सहकार्यामुळे ही भूमिका शक्य झाली.”
चित्रपटाची माहिती आणि प्रदर्शनाची तारीख
ए अँड सिनेमाज एलएलपी प्रस्तुत, आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिसेस निर्मित ‘जारण’ हा चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांचे असून निर्माते अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी आहेत.
गूढकथांच्या चाहत्यांसाठी एक थरारक अनुभव
रहस्य, भय आणि मानवी भावनांची गुंतागुंत या सगळ्यांचा सुरेख संगम असलेला ‘जारण’ हा चित्रपट गूढकथांच्या प्रेमींसाठी एक अनोखा अनुभव ठरेल, यात शंका नाही. अमृता सुभाषचा सशक्त अभिनय आणि गूढतेने भरलेली कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.
-
केम छो स्वप्नील भाय…. गुजराती सिनेमाच्या पोस्टरवर स्वप्नील जोशीचा डॅशिंग लूक

गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधीच अभिनेता-निर्माता स्वप्नील जोशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शुभचिंतक या आगामी गुजराती चित्रपटाच्या नव्या पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, स्वप्नीलचा करारी आणि डॅशिंग लूक प्रेक्षकांच्या लक्षात ठसतोय.
प्रेक्षकांच्या मनात एकच सवाल – काय असणार स्वप्नीलची भूमिका?
‘सुशीला सुजीत’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना देखील शुभचिंतकमुळे स्वप्नील पुन्हा चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत विविध पात्रांद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वप्नीलसाठी हा पहिलाच गुजराती चित्रपट असला तरी त्याच्या नावावरूनच अपेक्षा उंचावल्या आहेत.
बहुभाषिक अभिनय कारकीर्दीतला नवा अध्याय

निर्माता आणि अभिनेता अशा दोन्ही भूमिकांतून रसिकांशी संवाद साधणारा स्वप्नील जोशी आता गुजरातीतही आपली छाप उमटवणार आहे. ‘शुभचिंतक’मध्ये त्याचं पात्र नेमकं कोणतं आहे हे गुलदस्त्यात असलं तरी पोस्टरवरील आत्मविश्वासू चेहरा आणि डोळ्यांतली चमक काहीतरी खास सुचवतेय!
स्वप्नील जोशी म्हणतो – “शुभचिंतक माझ्यासाठी एक नवीन आणि रोमांचक अनुभव”
स्वप्नील सांगतो, “सुशीला सुजीतच्या प्रमोशनदरम्यान ‘शुभचिंतक’चं शूट आणि तयारी सुरू होती. हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. गुजराती भाषेत काम करणं ही एक वेगळी मजा आहे. प्रेक्षकांना एकाच वर्षात दोन वेगळ्या आणि दमदार भूमिकांमध्ये भेटायला मिळणं, हे माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे.”
मराठीसह गुजराती प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी स्वप्नील सज्ज
स्वप्नील जोशीने आजवर साकारलेल्या प्रत्येक पात्रात स्वतःचं वेगळं अस्तित्व सिद्ध केलं आहे. आता तो *‘शुभचिंतक’*च्या माध्यमातून गुजराती चित्रपट विश्वातही तितक्याच ताकदीनं प्रवेश करतोय.
प्रेक्षक आता उत्सुक आहेत — स्वप्नील या नव्या भाषेत कशी जादू उधळतो?
-
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात ४१ चित्रपटांची मेजवानी- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची अधिकृत घोषणा

मुंबई, १५ एप्रिल २०२५ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव २१ ते २४ एप्रिल २०२५ दरम्यान पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.
या महोत्सवात ४१ निवडक चित्रपट दाखवण्यात येणार असून यामध्ये सामाजिक, ऐतिहासिक, ग्रामीण, स्त्रीजीवन, पर्यावरण, बालविषयक, विनोदी, व्यावसायिक आणि ॲक्शन चित्रपटांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट विनामूल्य पाहता येणार असून प्रेक्षकांना ऑनलाईन आणि ऑफलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.
उद्घाटन आणि समारोप सोहळा :
२१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट ओपनिंग फिल्म म्हणून दाखवण्यात येणार आहे.
२४ एप्रिल रोजी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल.
ठिकाण :
रविंद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर आणि प्रायोगिक रंगमंच, पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई.ठळक चित्रपट (निवडक वेळापत्रकानुसार) :
- २२ एप्रिल: बाईपण भारी देवा, गोदाकाठ, पाणी, झॉलिवूड, पॉंडीचेरी, चोरीचा मामला
- २३ एप्रिल: तेरव, बार्डे, पोटरा, जयंती, फनरल, गोदावरी, मी वसंतराव
- २४ एप्रिल: वाळवी, पावनखिंड, जुन फर्निचर, वाय, मदार, कारखानिसांची वारी
परिसंवाद, कार्यशाळा आणि मुलाखती :
- २२ एप्रिल: कौशल इनामदार यांची संगीत कार्यशाळा, हंसल मेहता यांची मुलाखत, चित्रपट तंत्रावर परिसंवाद
- २३ एप्रिल: चित्रपट पत्रकार कार्यशाळा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मराठी चित्रपटांचे स्थान, चित्रपट वितरण प्रणाली
- २४ एप्रिल: मराठी चित्रपटांचे व्यावसायिक गणित, ओटीटी आणि मराठी चित्रपटांचे भविष्य
या महोत्सवामध्ये चर्चासत्रांपासून ते दर्जेदार चित्रपटांचं दर्शन घेता येणार आहे. हे एक सांस्कृतिक पर्व असून मराठी चित्रपट रसिकांसाठी एक सुवर्णसंधी आहे.
नोंदणी लिंक : https://evnts.info/chitrapatakafest2025
प्रवेश विनामूल्य | नोंदणी अनिवार्य -
High Stakes, Higher Thrills: Netflix’s ‘Jewel Thief – The Heist Begins’ Trailer Sets Heart Racing

A Heist Full of Danger, Drama and Deception
Netflix has dropped the adrenaline-charged trailer for Jewel Thief – The Heist Begins, a high-stakes action thriller that promises to keep viewers on the edge of their seats. Streaming from April 25, the film blends fast-paced storytelling with cinematic flair.Saif Ali Khan Leads an Ensemble Cast
Saif Ali Khan takes center stage as Rehan Roy, a sharp, charismatic thief. Jaideep Ahlawat plays his rival, Rajan Aulakh — a powerful mafia boss with icy resolve. Supporting them are Kunal Kapoor as a dogged detective and Nikita Dutta as Farah, whose heart Rehan steals along with jewels.The Chase for the African Red Sun Begins
As personal loyalties blur and motives twist, the hunt intensifies for the priceless African Red Sun jewel. This action-packed caper weaves together power, passion, and pride in a slick game of cat and mouse.Streaming Debut for Marflix Productions
Produced by Siddharth Anand and Mamta Anand’s Marflix Productions, and directed by Kookie Gulati and Robbie Grewal, Jewel Thief – The Heist Begins marks the production house’s first foray into the streaming world.Bold Vision Meets Blockbuster Execution
The makers say the film combines classic heist elements with modern emotional storytelling. Ruchikaa Kapoor Sheikh of Netflix India calls it “an ode to the classic Bollywood heist” and praises the star-studded cast and cinematic execution.
All Eyes on April 25
With its fast-paced narrative, strong performances, and glossy visuals, Jewel Thief – The Heist Begins promises to be one of the most exciting releases of the year.Streaming exclusively on Netflix from April 25, 2025.
