नागेश मोरवेकर आणि आदित्य जी नायर यांच्या सुमधूर आवाजात गणेश वंदना

गणपती बाप्पाच्या आगमनाने वातावरण भक्तीमय होतं आणि प्रत्येक घरात बाप्पाची गाणी घुमू लागतात. अशा गाण्यांना प्रेक्षक कायम स्मरणात ठेवतात. यंदाच्या गणेशोत्सवातही रसिकांसाठी स्मरणरंजनाचा आनंद आणि भक्तीची अनुभूती देणारी नवी गणेश वंदना ‘आदित्य नायर प्रॉडक्शन’तर्फे सादर करण्यात आली आहे. “तुला आम्ही पुजितो गौरी गणा” या वंदनेचा नवा आविष्कार सुमारे पंचावन्न वर्षांपूर्वी जेष्ठ गीतकार हरेंद्र जाधव यांनी… Read More नागेश मोरवेकर आणि आदित्य जी नायर यांच्या सुमधूर आवाजात गणेश वंदना

इंद्रायणीच्या सख्यांचा जल्लोष अनोखा, गणरायासंगे दुमदुमेल जागर गौराईचा

कलर्स मराठी वाहिनीवर “गौराई माझी नवसाची” हा विशेष भाग ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजता प्रसारित होणार आहे. गणेशोत्सव आणि गौराईच्या आगमनाचा जल्लोष या भागातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. दिग्रसकर वाड्यातील खास गणेशोत्सव लग्नानंतरचा पहिला गणपती आणि पहिल्यांदाच घरात येणारी गौराई यामुळे इंद्रायणीसाठी हा उत्सव भावनिक आणि खास ठरणार आहे. ‘ज्ञान आणि… Read More इंद्रायणीच्या सख्यांचा जल्लोष अनोखा, गणरायासंगे दुमदुमेल जागर गौराईचा

‘वेल डन आई’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रदर्शित

आईच्या नात्याला केंद्रस्थानी ठेवून बनवलेला ‘वेल डन आई’ हा आगामी मराठी चित्रपट आता आणखी चर्चेत आला आहे. या विनोदी चित्रपटाचे आकर्षक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, १४ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आईची ममता आणि कणखरपणा दाखवणारी कथा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दीपाली प्रोडक्शनची प्रस्तुती आणि दमदार निर्मितीमूल्यं ‘वेल डन… Read More ‘वेल डन आई’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रदर्शित

‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत योगेश सोमण

‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… अशा भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र देहू येथे ‘अभंग तुकाराम’ चित्रपटाच्या कलाकारांनी संत तुकाराम महाराजांचे सगुण साकार रूप उभे केले. ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी डोक्यावर वारकरी पगडी, कपाळावर टिळा, गळ्यात माळा आणि हातात चिपळ्या घेऊन संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या पत्नी आवलीच्या भूमिकेत… Read More ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत योगेश सोमण

तेजश्री प्रधान आणि शिवानी सोनारने व्यक्त केला गणपती आगमनाचा उत्साह !

तेजश्री प्रधानची खास आठवण ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेतील स्वानंदी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ह्यावर्षीचा गणेशोत्सव कसा आणि कुठे साजरा करणार याबद्दल सांगितले. “आमच्या घरचा गणपती हा फिरता असतो. या वर्षी माझ्या सख्या काकाच्या घरी म्हणजे गोरेगावला गणपती आहे आणि आम्ही सर्व तिकडे गणेशोत्सव साजरा करणार आहोत. माझ्या जन्मापासून गणपती स्थापना प्रधानांच्या घरी होत… Read More तेजश्री प्रधान आणि शिवानी सोनारने व्यक्त केला गणपती आगमनाचा उत्साह !

श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत ‘सकाळ तर होऊ द्या’ मधील ‘नाच मोरा…’ गाणे प्रदर्शित

श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत आणि नम्रता सिन्हा निर्मित बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘सकाळ तर होऊ द्या’ मधील पहिले गाणे ‘नाच मोरा…’ प्रदर्शित झाले आहे. हिमेश रेशमिया मेलोडीजच्या लेबलखाली सादर झालेले हे गाणे प्रेक्षकांची पावले थिरकवेल, यात शंका नाही. मराठी सिनेसृष्टीत संगीत प्रस्तुतकर्ता म्हणून पदार्पण करणाऱ्या हिमेश रेशमिया यांच्यासाठी हा एक विशेष टप्पा असून, या चित्रपटाबाबतची उत्सुकता… Read More श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत ‘सकाळ तर होऊ द्या’ मधील ‘नाच मोरा…’ गाणे प्रदर्शित

‘कढीपत्ता’मध्ये रिद्धी कुमार बनली भूषण पाटीलची नायिका

पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या आणि सिनेसृष्टीच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘कढीपत्ता’ हा आगामी मराठी चित्रपट आता आणखी चर्चेत आला आहे. नव्या पोस्टरद्वारे या चित्रपटाची नायिका रिद्धी कुमार असल्याचे उघड झाले असून, ७ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शनाची नवी जोडी युवान प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी… Read More ‘कढीपत्ता’मध्ये रिद्धी कुमार बनली भूषण पाटीलची नायिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच ‘अरण्य’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले. अमोल दिगांबर करंबे लिखित व दिग्दर्शित हा चित्रपट सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणारी प्रभावी कहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ‘अरण्य’ हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहांत झळकणार आहे. मानवी नात्यांचा हृदयस्पर्शी प्रवास सामान्य कुटुंबातील एका बापाची आणि त्याच्या मुलीच्या नात्यावर… Read More मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण