‘एप्रिल मे ९९’ मध्ये ‘जाई’ची एंट्री, यंदाची उन्हाळ्याची सुट्टी होणार अविस्मरणीय

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटात कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या खट्याळ तिघांच्या मैत्रीत आता एक नवीन मैत्रीण जाईची भर पडली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये सतत दिसणारा पाठमोरा चेहरा कोणी असेल, याबाबतची उत्कंठा अखेर संपली आहे. ही व्यक्तिरेखा साकारतेय अभिनेत्री साजिरी जोशी, जी प्रसिद्ध अभिनेत्री ऋजुता देशमुख यांची कन्या आहे. ‘एप्रिल मे ९९’ या… Read More ‘एप्रिल मे ९९’ मध्ये ‘जाई’ची एंट्री, यंदाची उन्हाळ्याची सुट्टी होणार अविस्मरणीय

कुमार मंगलम बिर्ला यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित

२४ एप्रिल रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात भव्य सोहळामहान गायक मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्याची यंदा अधिक भव्य सजावट करण्यात आली असून या प्रसंगी देशाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव होणार आहे. देशाच्या विकासगाथेत योगदान दिल्याबद्दल कुमार मंगलम बिर्ला यांना सन्मान२०२२ साली भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार… Read More कुमार मंगलम बिर्ला यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित

२१ एप्रिलपासून ‘सन मराठी’वर ‘हुकुमाची राणी ही’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

खऱ्या फॅक्टरीतलं कथानक, खरी माणसं आणि माणुसकीचा ठसा ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांच्या यशस्वी परंपरेत आता ‘हुकुमाची राणी ही’ ही नवी मालिका २१ एप्रिलपासून दररोज सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेचं चित्रीकरण मुंबईतील नव्हे तर थेट साताऱ्यातील खऱ्या फॅक्टरीत होत आहे. मालिकेच्या पत्रकार परिषदेसाठीही फॅक्टरीचंच ठिकाण निवडण्यात आलं… Read More २१ एप्रिलपासून ‘सन मराठी’वर ‘हुकुमाची राणी ही’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

गूढकथांच्या चाहत्यांसाठी खास मेजवानी, ‘जारण’ सिनेमातील प्रमुख भूमिकेत अमृता सुभाष

हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित ‘जारण’ या मराठी भयपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आणि प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. आता या चित्रपटातील पहिला प्रमुख चेहरा समोर आला आहे — अमृता सुभाष. आपल्या वेगळ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अमृता या चित्रपटातही एक गूढ, आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. गूढतेचा वेध घेणारी कथा ‘जारण’ ही केवळ एक… Read More गूढकथांच्या चाहत्यांसाठी खास मेजवानी, ‘जारण’ सिनेमातील प्रमुख भूमिकेत अमृता सुभाष

केम छो स्वप्नील भाय….  गुजराती सिनेमाच्या पोस्टरवर स्वप्नील जोशीचा डॅशिंग लूक

गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधीच अभिनेता-निर्माता स्वप्नील जोशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शुभचिंतक या आगामी गुजराती चित्रपटाच्या नव्या पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, स्वप्नीलचा करारी आणि डॅशिंग लूक प्रेक्षकांच्या लक्षात ठसतोय. प्रेक्षकांच्या मनात एकच सवाल – काय असणार स्वप्नीलची भूमिका? ‘सुशीला सुजीत’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना देखील शुभचिंतकमुळे स्वप्नील पुन्हा चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. मराठी… Read More केम छो स्वप्नील भाय….  गुजराती सिनेमाच्या पोस्टरवर स्वप्नील जोशीचा डॅशिंग लूक

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात ४१ चित्रपटांची मेजवानी- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची अधिकृत घोषणा

मुंबई, १५ एप्रिल २०२५ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव २१ ते २४ एप्रिल २०२५ दरम्यान पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवात… Read More आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात ४१ चित्रपटांची मेजवानी- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची अधिकृत घोषणा

High Stakes, Higher Thrills: Netflix’s ‘Jewel Thief – The Heist Begins’ Trailer Sets Heart Racing

A Heist Full of Danger, Drama and DeceptionNetflix has dropped the adrenaline-charged trailer for Jewel Thief – The Heist Begins, a high-stakes action thriller that promises to keep viewers on the edge of their seats. Streaming from April 25, the film blends fast-paced storytelling with cinematic flair. Saif Ali Khan Leads an Ensemble CastSaif Ali… Read More High Stakes, Higher Thrills: Netflix’s ‘Jewel Thief – The Heist Begins’ Trailer Sets Heart Racing

अलका कुबल यांचे रंगभूमीवर ‘वजनदार’ भूमिकेतून पुनरागमन

लठ्ठपणावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणाऱ्या ‘वजनदार’ या नव्या नाटकातून अलका कुबल तब्बल २७ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. ‘अष्टविनायक’ आणि ‘विप्रा क्रिएशन्स’ निर्मित या नाटकाच्या माध्यमातून अलका कुबल यांनी पुन्हा एकदा थेट प्रेक्षकांशी रंगभूमीवरून संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. सशक्त विषय, वजनदार भूमिका ‘वजनदार’ नाटक हे फक्त एका लठ्ठ स्त्रीची कथा नाही, तर समाजाच्या सौंदर्यदृष्टीच्या… Read More अलका कुबल यांचे रंगभूमीवर ‘वजनदार’ भूमिकेतून पुनरागमन