मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार ‘गुलकंद’

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, वेलक्लाऊड प्रॅाडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट नवीन वर्षात १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल माडियाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात फॅमिली एंटरटेनमेंट आणि कॅामेडीचे अनोखे कॅाम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे,… Read More मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार ‘गुलकंद’

भारतातील नंबर १ ‘बॉडी बिल्डर’ सुहास खामकर यांच्या “राजवीर” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट ‘राजवीर’ या चित्रपटातून उलगडणार आहे. ॲक्शनपॅक्ड या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स, … Read More भारतातील नंबर १ ‘बॉडी बिल्डर’ सुहास खामकर यांच्या “राजवीर” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

प्रथमेश परब आणि शशांक शेंडेच्या नव्या लुकचा ‘श्री गणेशा’

‘येड्यांची जत्रा’ तसेच ‘टकाटक’सारखे सुपरडुपर हिट चित्रपट बनवणारे मिलिंद झुंबर कवडे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आले आहेत. निर्माते संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांची निर्मिती असलेल्या तसेच मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या आगामी चित्रपटाची घोषणा मोशन पोस्टर प्रदर्शित करून करण्यात आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांची मांदियाळी आणि त्यांची धमाल ‘श्री… Read More प्रथमेश परब आणि शशांक शेंडेच्या नव्या लुकचा ‘श्री गणेशा’

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…

१५ नोव्हेंबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांच्या कक्षा रुंदावणारा ठरणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला संगीतप्रधान रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेद्वारे महाराष्ट्राच्या घरोघरी लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड… Read More धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…

यवतमाळची गीत बागडे ठरली मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ ची महाविजेती

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. विरार येथील जुई चव्हाण, पलाक्षी दीक्षित, पुणे येथील देवांश भाटे, स्वरा किंबहुने, यवतमाळची गीत बागडे आणि संगमनेरच्या सारंग भालके या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत यवतमाळच्या गीत बागडेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेता… Read More यवतमाळची गीत बागडे ठरली मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ ची महाविजेती

बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. गुलाबी थीम असणाऱ्या या सोहळ्यात चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. यावेळी ‘गुलाबी’च्या मॅशअपवर लहानग्यांनी सुंदर सादरीकरणही केले. गुलाबी नगरी, जयपूरच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या तीन स्त्रियांच्या मैत्रीचा हा प्रवास प्रेक्षकांच्या हृदयाला… Read More बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

“अशोक मामांसोबत काम करण्याचं स्वप्न साकार झालं” : रसिका वाखारकर

महाराष्ट्राच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय काटेकोरपणे वागणारे अशोक मामा या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ‘कलर्स मराठी’च्याच ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली सावी म्हणजेच रसिका वाखारकरदेखील ‘अशोक मा.मा’ या मालिकेत एका… Read More “अशोक मामांसोबत काम करण्याचं स्वप्न साकार झालं” : रसिका वाखारकर

येक नंबर’ या मराठी ब्लॉकबस्टरचा वर्ल्ड प्रीमिअर ८ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची ZEE5 तर्फे घोषणा*

धैर्य घोलप आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘येक नंबर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे आणि निर्मिती तेजस्विनी पंडित व वरदा नाडियादवाला यांनी केली आहे. ZEE5 हा भारतात स्थापन झालेला सर्वात मोठा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि बहुभाषिक कथाकथनकार असून ८ नोव्हेंबर रोजी ‘येक नंबर’ या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल… Read More येक नंबर’ या मराठी ब्लॉकबस्टरचा वर्ल्ड प्रीमिअर ८ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची ZEE5 तर्फे घोषणा*