‘लाईक आणि सबस्क्राईब’ सिनेमातून जुई भागवतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण

काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर एका चित्रपटाचे उत्सुकता वाढवणारे पोस्टर झळकले होते. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, अमेय वाघ आणि आणखी एक चेहरा झळकला होता. काहींनी हा चेहरा ओळखला. तर काहींना हा नवीन चेहरा कोणाचा, असा प्रश्न पडला होता.  तर ही अभिनेत्री आहे, ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेत महत्वपूर्ण… Read More ‘लाईक आणि सबस्क्राईब’ सिनेमातून जुई भागवतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण

सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार ‘एक डाव भुताचा’

मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत. “दे धक्का” सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. आता “एक डाव भूताचा” या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपूरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले असून, येत्या ४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च… Read More सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार ‘एक डाव भुताचा’

‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर

सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ उपक्रमांतर्गत काही अभिजात नाटकांचे २५ प्रयोग रंगभूमीवर सादर केले होते. त्यापैकीच एक वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकली. इतके प्रेम नाट्यरसिकांनी या नाटकावर केले.  याच प्रेमाखातर ‘सूर्याची पिल्ले’ हे तीन अंकी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. सुबक निर्मित नवनित प्रकाशित… Read More ‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर

धडाकेबाज ‘फौजी’ १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात

देशभक्तीने प्रेरीत अनेक चित्रपट  पडद्यावर येत असतात. त्यातल्या अनेकांना  प्रेक्षकांचाही  जोरदार पाठिंबा मिळत असतो. आपल्या प्राणांची  बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांप्रती आपलीही निष्ठा तेवढीच मोलाची असते. असाच एक  स्फूर्तीदायक मराठी चित्रपट ‘फौजी’ येत्या १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होत आहे. मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’चित्रपटात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शौर्याची स्फूर्तीदायक कथा पहायला मिळणार आहे.… Read More धडाकेबाज ‘फौजी’ १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात

१८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. तर आता हा रोहित चौहान कोण आहे, याचा १८ ॲाक्टोबरला लाईक आणि सबस्क्राईब’मधून उलगडा होणार असून या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय… Read More १८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

‘येक नंबर’ सिनेमा येतोय…

चतुरस्त्र अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या सह्याद्री फिल्म्स आणि बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणारे नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने हातमिळवणी केल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून होत होती. या दोघांच्या एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीत धमाका उडणार, याची कल्पना आधीपासून प्रेक्षकांना आली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’… Read More ‘येक नंबर’ सिनेमा येतोय…

नवरा माझा नवसाचा 2″ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच”

“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.    “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने… Read More नवरा माझा नवसाचा 2″ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच”

खतरनाक खलनायक मराठीत

चित्रपटामध्ये नायकाप्रमाणेच खलनायकालाही तितकेच महत्त्व आहे. खरंतर या खलनायकांमुळेच नायकाचे अस्तित्व असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. आगामी ‘फौजी’ या मराठी चित्रपटात हिंदीतील शाहबाज खान आणि टिनू वर्मा या… Read More खतरनाक खलनायक मराठीत