सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच गाण्यासाठी एकत्र

महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या सर्वांना परिचित असलेल गणपती बाप्पाचं “डम डम डम डम डमरू वाजे….” हे गाजलेलं गाणं “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटात नव्या ढंगात आपल्या भेटीला येणार असून, सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे यांनी हे गाणं पहिल्यांदाच एकत्रित गायलं आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती  असलेल्या… Read More सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच गाण्यासाठी एकत्र

स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका!

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमध्ये चतुरस्त्र अभिनेते भरत जाधव यांनी स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. स्वतःचा एक प्रचंड मोठा चाहता वर्गही त्यांनी  निर्माण केला. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही त्यांनी पाऊल ठेवले. मराठी रंगभूमीवर ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘ऑल दि बेस्ट’, ‘आमच्या सारखे आम्हीच’ अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली असून काहीतरी… Read More स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका!

रोमँटिक-ऍक्शन लव्हस्टोरी ”नाद’चे कडक मोशन पोस्टर प्रदर्शित…

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतच्या आजवरच्या प्रवासात नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा, तसेच महाराष्ट्रातल्या घरोघरी आपली ‘देवमाणूस’ ही ओळख निर्माण करणारा किरण गायकवाड एका नव्या रूपात समोर येणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’  या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटात किरणचं कडक रूप पाहायला मिळणार आहे. ‘नाद’ हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत देत… Read More रोमँटिक-ऍक्शन लव्हस्टोरी ”नाद’चे कडक मोशन पोस्टर प्रदर्शित…

नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’

आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्ष दाखवणारा, ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘लाईफलाईन’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अवयवदानावर एका अनोख्या पद्धतीनं भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी झाला आहे. प्रेक्षकांकडून, अनेक प्रख्यात डॉक्टरांकडून या चित्रपटाचे, दिग्दर्शकाचे कौतुक होत आहे. अवयवदानासारखा संवेदनशील विषय अतिशय उत्तमरित्या पडद्यावर मांडण्यात आले आहे. डॉक्टर आणि किरवंतामधील ही… Read More नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’

धर्मवीर – २” २७ सप्टेंबरला जगभरात प्रदर्शनासाठी सज्ज!!

गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. काही गाव पाण्याखाली गेली तर काही गावांचा संपर्कही तुटला होता. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहून “धर्मवीर – २” ह्या ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हा चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल ह्यांनी घेतला. ह्या अनोख्या निर्णयाचे सगळीकडे विशेष… Read More धर्मवीर – २” २७ सप्टेंबरला जगभरात प्रदर्शनासाठी सज्ज!!

स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ रंगभूमीवर करणार विश्वविक्रम

प्रायोगिक, व्यावसायिक नाटय़सृष्टीच्या युगात सध्याच्या घडीला लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर आली आणि या नाटकांनी लहानांसोबत मोठ्यांचीही मने जिंकली. ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटकही त्यापैकीच एक. रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक रंगभूमीवर आणण्याचं शिवधनुष्य निर्माते राहुल भंडारे यांनी उचलले आणि या बालनाट्यानं इतिहास घ़डवला. तुफान लोकप्रियता मिळवणारं ‘अलबत्या गलबत्या’ नाटक आता एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज… Read More स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ रंगभूमीवर करणार विश्वविक्रम

बिग बॉस मराठी’चा नवा सीझन 28 जुलैपासून कलर्स मराठीवर

मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार  आहे.. 100 हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतांवर आपली नजर रोखायला सज्ज झालेयत.. 100 दिवसांच्या या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग रसिकांना पाहायला मिळणार… Read More बिग बॉस मराठी’चा नवा सीझन 28 जुलैपासून कलर्स मराठीवर

सोशल मीडियावर होणार फक्त तात्यांची चर्चा, जी एम ई म्युझिकवर ‘तात्या सोडाना’ गाण प्रदर्शित

मराठी संगीत इंडस्ट्रीमध्ये नवनवीन गाणी व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात तात्यांचे व्हिडाओ व्हायरल होताना दिसत आहेत.ते तात्या नेमके कोण ? याचा खुलासा झाला आहे. जी एम ई म्युझिक रेकॉर्ड लेबल ‘तात्या सोडाना’ हे भन्नाट कॉमेडी तसेच डान्सीकल गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या गाण्याचे गीतकार… Read More सोशल मीडियावर होणार फक्त तात्यांची चर्चा, जी एम ई म्युझिकवर ‘तात्या सोडाना’ गाण प्रदर्शित