३००० शाळकरी मुलांमुलींसोबत ‘शिवस्तुती’ पठणाचा विक्रम – ‘कमळी’ मालिकेचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

‘कमळी’ मालिकेचं अनोखं प्रमोशन — थेट वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद प्रेक्षकांना नेहमीच दर्जेदार आणि आशयसंपन्न मालिका देणाऱ्या झी मराठी वाहिनीवर आता ‘कमळी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका खेड्यातून उगम पावलेली, शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगणारी आणि ते सत्यात उतरवण्यासाठी मुंबईकडे वाटचाल करणारी ‘कमळी’ प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. तिचं स्वप्न… Read More ३००० शाळकरी मुलांमुलींसोबत ‘शिवस्तुती’ पठणाचा विक्रम – ‘कमळी’ मालिकेचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

कमळीच्या मदतीनं सोप्पी झाली १०० मुलींच्या शिक्षणाची वाट

शिक्षणाचं स्वप्न पेरणाऱ्या ‘कमळी’ची सायकल गिफ्ट इनिशिएटिव्ह मुलगी शिकली, प्रगती झाली… किती सहज रुळलंय हे वाक्य आपल्या जिभेवर. शिक्षणाचं महत्व माहित नाही असं एकही घर महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. पण अजूनही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात अश्या दुर्गम जागा आहेत, जिथे शिक्षणाच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत, पण गावच्या मुलींमध्ये उच्च शिक्षणाचं स्वप्न मात्र पेरलं गेलंय. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी… Read More कमळीच्या मदतीनं सोप्पी झाली १०० मुलींच्या शिक्षणाची वाट

‘कमळी’ मालिकेसाठी विजया बाबरने शिकली शिवस्तुती – सांगितला खास अनुभव

झी मराठीवरील आगामी मालिका ‘कमळी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये विजया बाबर यांनी सादर केलेली शिवस्तुती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रोमोमधील त्यांचा जोशपूर्ण आणि भावनिक सादरीकरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. शिवस्तुतीचा प्रभाव आणि आठवणी विजया बाबर सांगतात, “मी जेव्हा ढोल-ताशा पथक पाहायचे, तेव्हा ते सुरुवातीला शिवस्तुती म्हणायचे आणि मला… Read More ‘कमळी’ मालिकेसाठी विजया बाबरने शिकली शिवस्तुती – सांगितला खास अनुभव

“सदैव तुमची झी मराठी” – एक नवं रूप, नव्या नात्यांसह

गेली २६ वर्ष महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेम मिळवणारी, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ‘मी मराठी झी मराठी’ असं अभिमानाने म्हणत झी मराठीने देशविदेशात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे आपला ठसा उमटवला आहे. नवीन अध्यायाची सुरुवात आता हीच झी मराठी एक नवा अध्याय सुरू करत आहे – ‘सदैव तुमची झी मराठी’. या ओळींमध्ये आहे आपल्या नात्यांमधील गहिरेपणा, एकोप्याची… Read More “सदैव तुमची झी मराठी” – एक नवं रूप, नव्या नात्यांसह

‘देवमाणूस – मधला अध्याय’ मध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करणारी हिम्मतराव देशमुख यांची भूमिका

झी मराठीवरील ‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये तिची उत्सुकता वाढताना दिसते आहे. मालिकेतील अनेक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे, पण विशेषत: ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांची हिम्मतराव देशमुख ही व्यक्तिरेखा विशेष चर्चेत आहे. हिम्मतराव देशमुख म्हणजे कोण? माधव अभ्यंकर सांगतात, “या मालिकेत मी हिम्मतराव देशमुख ही भूमिका साकारत असून तो… Read More ‘देवमाणूस – मधला अध्याय’ मध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करणारी हिम्मतराव देशमुख यांची भूमिका

देवमाणूसमध्ये नवा वळण – ‘माहेरची साडी’ घेऊन आली अलका कुबल!

झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेचा नवा अध्याय प्रेक्षकांची मने जिंकणारी ‘देवमाणूस’ ही मालिका पुन्हा एकदा नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘देवमाणूस – मधला अध्याय’ हे नवीन पर्व येत्या २ जूनपासून रात्री १० वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता एका नव्या प्रोमोमुळे मालिकेबाबत आणखी उत्सुकता वाढली आहे. सई… Read More देवमाणूसमध्ये नवा वळण – ‘माहेरची साडी’ घेऊन आली अलका कुबल!

स्वाती देवल यांच्या उन्हाळी सुट्टीच्या आठवणी

शाळा, कथक, झोप आणि स्वयंपाक – सुट्टीच्या खास आठवणी ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत मंगलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती देवल हिने आपल्या बालपणीच्या उन्हाळा सुट्टीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ती सांगते की तिच्या सुट्ट्या फारशा गावी जात नसत, पण घरात आणि बिल्डिंगमध्येच खूप मजा असायची. सकाळच्या शाळेमुळे बाबा तिला लवकर उठायची सवय लावायचे आणि त्यामुळेच सुट्टीतही… Read More स्वाती देवल यांच्या उन्हाळी सुट्टीच्या आठवणी

रिअल लाइफ रिक्षाचालकांसोबत ‘लक्ष्मी निवास’चं १०० भागांचं खास सेलिब्रेशन

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ ने नुकतेच आपल्या १०० व्या भागाचं यशस्वी पर्व पार केलं. मात्र या आनंदाला एका अनोख्या भेटीने अधिक गहिरेपण मिळालं – कारण मालिकेतील श्रीनिवासच्या भूमिकेसोबत जोडलेली खरी प्रेरणा असलेल्या मुंबईतील रिक्षाचालक बांधवांनाही या सेलिब्रेशनसाठी खास आमंत्रित करण्यात आलं होतं. सेटवर रिक्षाचालकांसोबत मनमोकळ्या गप्पा आणि भावनांचा ओलावा या खास प्रसंगी रिक्षाचालकांनी… Read More रिअल लाइफ रिक्षाचालकांसोबत ‘लक्ष्मी निवास’चं १०० भागांचं खास सेलिब्रेशन