गालिब अनुभवायचा असेल तर…सोळा डिसेंबरची संध्याकाळ राखून ठेवा….

इश्क ने ग़ालिब निकम्मा कर दिया
वरना हम भी आदमी थे काम के
– मिर्ज़ा ग़ालिब
गालिबला करी ही बेकाम प्रेमव्याधी
अमुच्यातही उभारी होती बरीच आधी
– कुसुमाग्रज

‘ग़ालिब’… आठराव्या शतकात जन्मलेला कवी…

स्वतःच्या कल्पनांना.. “सोमनाथी खयाल” (भारतीय संस्कृतीतला विचार) म्हणणारा … वाराणसी-नगरीच्या प्रेमात “चराग ए दैर” (देवालयातील दीप) हे फारसी काव्य लिहीणारा.. आयुष्यातील दुःखांवर मनस्वी हास्याची फुंकर मारणारा.. “सारे संप्रदाय मिटतील तेव्हा माणसं खऱ्या धर्मतत्वाशी जोडली जातील” (मिल्लतें जो मिट गयी अज्जा ए ईमां हो गयी) असं थेट धर्मतत्व मांडणारा… मुगल सत्तेचा अस्त आणि इंग्रजी सत्तेचा प्रारंभ पाहणारा… सत्तावन्नच्या बंडात राजधानी दिल्लीची झालेली वाताहात पाहून उद्विग्न होणारा… मदिरा आणि मदिराक्षीचे शौक बाळगताना ‘मिसरी की मख्खी बनो शहद की मख्खी ना बनो’ हे जाणून आसक्ती आणि विरक्ती दोन्ही उपभोगणारा.. आंबा आणि कारलं हे दोन्ही प्रीय असणारा.. बादशहाच्या नोकरीत असतानाही.. राजकवीची माफी मागण्याच्या प्रसंगी..
सौ पुश्त से है पेशा ए आबा सिपहगिरी,
कोई शायरी ज़रिया ए इज्ज़त नहीं मुझे !!
(शंभर पिढ्या माझे वाडवडील शिपाईगिरी गाजवून गेलेत… माझ्यासाठी काव्यलेखन हा काही सन्मान मिळवण्याचा एकमेव मार्ग नाही) असं ऐकवणारा…
कुसुमाग्रजांनाही ज्याच्या काही गजलांचा ‘गालिबगीते’ म्हणून मराठी अनुवाद करावासा वाटला..

असा हा महाकवी… असदउल्लाह खां ग़ालिब ….

तुम्ही साहित्यप्रेमी असा.. भाषाप्रेमी असा.. संस्कृतीप्रेमी असा.. इतिहासप्रेमी असा.. तत्वज्ञानप्रेमी असा… मदिराप्रेमी असा..
किंवा फक्त ‘प्रेमी’ असा…
ग़ालिब तुमच्याचसाठी आहे…

आणि सादरकर्ते आहेत, कट्यार काळजात घुसली, उबंटु, बंदिश बॅंडिट्स अशा अनेक प्रसिद्ध कलाकृतींना आपल्या गीतलेखनाने सजवणारे कवी, शायर, गीतकार समीर सामंत आणि ह्या कार्यक्रमात ग़ालिबच्या गजलांना आपल्या अर्थवाही सुरांनी सजवणार आहेत सुप्रसिद्ध गायिका गायत्री सप्रे ढवळे.
साजसंगिताची सोबत करणार आहेत हार्मोनियम वर निनाद सोलापूरकर, तबल्यावर अरूण गवई आणि कीबोर्ड वर अन्य गाडगीळ …

November 2022 मध्ये मुंबईचे तत्कालीन रेल्वे पोलीस कमिशनर कैसर खलिदसर यांच्या प्रोत्साहनाने ‘निजात का तालिब ..ग़ालिब’ ह्या कार्यक्रमाची संहिता लिहीली.. गायत्रीजींसोबत चर्चा करून गजल ठरवल्या .. झूम मिटिंगवरच रिहर्सल केली आणि 27 नोव्हेंबरला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पासबान-ए-अदबच्या ‘मिराज’ या उर्दू महोत्सवात पहिला प्रयोग झाला…

त्या प्रयोगाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता ह्या कार्यक्रमाची ताकद लक्षात आली होती.. पण तेव्हा हार्ट सर्जरीच्या कारणाने चार महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली…

एप्रील च्या महिन्यात पुन्हा सारे जमा झालो .. तयारीला लागलो आणि १३ मे २०२३ रोजी पुण्यात घोले रोडला शो लावला… पुणेकरांचं प्रेम आणि प्रतिसाद .. आहाहा… कमाल…

इतका कमाल.. की त्यानंतर सातत्याने तीन शो पुण्यातच केले… वैभवदादा जोशी.. अश्वीन चितळे.. भगवान रामपुरे सर.. मंदार कमलापूरकर.. अक्षय शिंपी.. वेदश्री ओक .. श्रृती भावे.. अशा अनेक नामवंत कलाकारांनी हा कार्यक्रम बघून कौतुक केलं…

ह्या कार्यक्रमाला राजेश गाडगीळ आणि त्याच्या जाई काजळ ची साथ लाभली… आणि आम्हालाही नवी उभारी मिळाली …



जवळजवळ एक वर्षाने.. ‘निजात का तालिब ग़ालिब’ चा प्रयोग आपल्या मुंबईत होत आहे.. सोळा डिसेंबरला सायंकाळी सात वाजता..

गोरेगाव हायवे जवळच..

“Natanam Studio For Performing Arts”
Gala No 6, Jagat Satguru Industrial Estate, Vishveshwar Nagar Rd, Hanuman Tekdi, Goregaon-East, Mumbai, Maharashtra 400063

Leave a comment