
प्रसिध्द अभिनेते क्षितीज झारापकर यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले, गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाने आजारी होते. ते ५८ वयाचे होते.त्यांचे अंत्यदर्शन त्यांच्या राहत्या घरी पत्ता – क्षितिज झारापकर, ३६ भवानी भवन, भवानीशंकर रोड, दादर, मुंबई ४०००२८, शारदाश्रम शाळेसमोर. २.०० ते ३.०० वा. वाजता होईल आणि अंत्यविधी
३.३० वा. शिवाजी पार्क स्मशानभूमी
विद्युत दाहिनी येथे करण्यात येईल.
क्षितिज यांनी करूया उद्याची बात, ठेंगा,गोळाबेरीज,
धुरंधर भाटवडेकर ह्या चित्रपटांचे लेखनर दिग्दर्शन केलं होतं.
सुंदरा मनामध्ये भरली ह्या नाटकाच्या चमू बरोबर शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेले क्षितीज भारतात आले आणि इथेच मनोरंजन क्षेत्रात रमले, स्थिरावले. सुंदरा मनामध्ये भरली आणि चर्चा तर होणारंच या नाटकातून त्यांना प्रेक्षकांची पसंती मिळली होती. घडलंय बिघडलंय, राजा शिवछत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी स्वराज्य जननी जिजामाता इत्यादी मालिकांमधून क्षितिज यांनी समर्थ अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं.
