कोण म्हणतं येणार नाही!’.. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक

भद्रकाली प्रॉडक्शन्स’ तर्फे आतापर्यंत ५८ वैविध्यपूर्ण नाट्यकृतींची निर्मिती झाली. आता नुकतीच ‘भद्रकाली ‘ तर्फे ५९ वी नाट्यकृती जाहीर केली. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक….” कोण म्हणतं येणार नाही! “ २०२५ मध्ये रंगभूमीवर दाखल होणार आहे.

या विनोदी नाटकाचे लेखन चैतन्य सरदेशपांडे याचे असून दिग्दर्शन गणेश पंडित करणार आहेत.
याविषयी सांगताना ‘ भद्रकाली ‘ चे प्रसाद कांबळी म्हणाले की, ‘ चैतन्य सरदेशपांडे याने या नाटकाचे खूप चांगले crafting केले आहे, एक धमाल विनोदी नाटकाची मेजवानी या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे ‘.

या नाटकात सुनील तावडे, किशोरी अंबिये, पुष्कराज चिरपुटकर, केतकी थत्ते, विक्रांत कोळपे हे कलाकार काम करीत आहेत. तसेच याचे संगीत साई – पियूष, नेपथ्य हर्षद – विशाल आणि प्रकाशयोजना सुनील देवळेकर यांची आहे.

Leave a comment