
अंकुश चौधरीचा डॅशिंग वर्दीतील अंदाज
बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ अंकुश चौधरी याचा फुल ॲक्शन लूक आणि कमाल डायलॉग्स यामुळे प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती. ट्रेलर लाँचचा भव्य सोहळा नवापूर पोलीस स्टेशनच्या रिक्रिएटेड सेटवर पार पडला, जिथे अंकुशला बेड्यांसह जेलमध्ये आणत पोलिसांची एंट्री सादर करण्यात आली.
ट्रेलरमधील रहस्य आणि थरार
ट्रेलरमध्ये अंकुशची व्यक्तिरेखा पोलिस आहे की चोर? हा संभ्रम निर्माण करणारा आहे. ॲक्शन, रोमान्स, सस्पेन्स आणि थराराने भरलेला हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये कथा जाणून घेण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरमध्ये बिनधास्त डायलॉग्स आणि भेदक सीन्स यामुळे चित्रपटाची झलक अधिक प्रभावी वाटते.
दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे विचार

दिग्दर्शक भूषण पटेल म्हणतात, “मराठी प्रेक्षकांसाठी काहीतरी दमदार करायचं होतं. अंकुश चौधरीसारखा स्टार, सशक्त कथा आणि ताकदीची टीम यामुळे ‘पीएसआय अर्जुन’ हे परिपूर्ण मनोरंजन आहे.”
तर निर्माता विक्रम शंकर म्हणतात, “ट्रेलर लाँच जेलमध्ये करण्याचा प्रयोग खूप वेगळा ठरला. डायलॉग्स आणि गाण्यांना मिळणारा प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देतो आहे.”
भक्कम स्टारकास्ट आणि जबरदस्त टीम
या चित्रपटात अंकुश चौधरीसोबत किशोर कदम, राजेंद्र शिसटकर, नंदू माधव, कमलाकर सातपुते आणि अक्षया हिंदळकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शक भूषण पटेल, निर्माते विक्रम शंकर आणि ध्रुव दास, प्रस्तुतकर्ता व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा आणि ड्रीमविव्हर एंटरटेनमेंट.
‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपट ९ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हे सिनेमॅटिक ॲक्शन आणि सस्पेन्सचं परिपूर्ण पॅकेज असल्याने यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ठरणार आहे, यात शंका नाही.
