‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर

जीवनगौरव पुरस्कार विजेते : नीना कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर

प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केला जाणारा पुरस्कार सोहळा यंदा १४ जून २०२५ रोजी सायं. ४ वाजता यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे होणार आहे. यंदाच्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

‘गोविंदायन’ – एक रंगमंचीय अभिवादन

या पुरस्कार समारंभात “गंधर्व भूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट” प्रस्तुत “गोविंदायन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक या नाटकांतील प्रसिद्ध प्रवेशांचे सादरीकरण या वेळी होणार आहे. या सादरीकरणात निनाद जाधव, श्रद्धा सबनीस, वैभवी जोगळेकर, सुदीप सबनीस, चिन्मय जोगळेकर आणि अस्मिता चिंचाळकर सहभागी होणार आहेत.

मुख्य अतिथींची उपस्थिती

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा. ना. श्री. आशिष शेलार (सांस्कृतिक कार्यमंत्री) असतील. सोबतच मा. ना. श्री. उदय सामंत (उद्योगमंत्री व नाट्य परिषदेचे विश्वस्त), मा. श्री. शशी प्रभू, मा. श्री. मोहन जोशी, व मा. श्री. अशोक हांडे हे मान्यवरही या प्रसंगी उपस्थित राहतील.

व्यावसायिक नाट्य पुरस्कार विजेते

  • सर्वोत्कृष्ट नाटक: असेन मी नसेन मी (संस्था: स्क्रीप्टज क्रिएशन)
  • सर्वोत्कृष्ट लेखक: सुनिल हरिश्चंद्र व स्मिता दातार (उर्मिलायन)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: अद्वैत दादरकर (शिकायला गेलो एक)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता: सुव्रत जोशी (वरवरचे वधुवर)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: नीना कुलकर्णी (असेन मी नसेन मी)
  • सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता: प्रशांत दामले (शिकायला गेलो एक)
  • सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री: शर्मिला शिंदे (ज्याची त्याची लव स्टोरी)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: हृषीकेश शेलार (शिकायला गेलो एक)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: शुभांगी गोखले (असेन मी नसेन मी)
  • विशेष अभिनय पुरस्कार: निहारिका राजदत्त (उर्मिलायन)
  • युवा नाट्य पुरस्कार: सुशांत शेलार

तांत्रिक व कलात्मक विभाग पुरस्कार

  • नेपथ्य: प्रदीप मुळे (असेन मी नसेन मी)
  • प्रकाश योजना: शीतल तळपदे (मास्टर माइंड)
  • पार्श्वसंगीत: निषाद गोलांबरे (वरवरचे वधुवर)
  • रंगभूषा: राजेश परब (गोष्ट संयुक्त मानापमानाची)

इतर विशेष पुरस्कार

  • नाट्य परिषद कार्यकर्ता पुरस्कार: महेश कापडोसकर
  • शाखा कार्यकर्ता पुरस्कार: सागर मेहेत्रे
  • एकपात्री अभिनय: विक्रांत शिंदे
  • निवेदक: संतोष लिंबोरे (पाटील)
  • गुणी रंगमंच कामगार: सतीश काळबांडे
  • नाट्य समीक्षक: अनिल पुरी
  • बाल रंगभूमी कार्य: मीनल कुलकर्णी
  • उत्कृष्ट प्रायोगिक संस्था: विजय नाट्य मंदिर, नाशिक
  • व्यवस्थापक: अजय कासुर्डे
  • रंगभूमी व्यतिरिक्त कार्यासाठी: विद्याधर निमकर, विष्णु मनोहर, प्रसाद कार्ले
  • लोककलावंत पुरस्कार: डॉ. गणेश चंदनशिवे, भावेश कोटांगले, शाहिर राजेंद्र कांबळे, आसराम कसबे
  • कामगार रंगभूमी लेखक: डॉ. चंद्रकांत शिंदे

प्रायोगिक नाट्य विभाग पुरस्कार

  • संगीत नाटक: संगीत आनंदमठ (संस्था: कल्पक ग्रुप, पुणे)
  • नाटक: मिडिआ (संस्था: रुद्रेश्वर, गोवा)
  • दिग्दर्शन: मुकुल ढेकळे (मून विदाऊट स्काय)
  • पुरुष कलाकार: यशवंत चोपडे (ब्लँक इक्वेशन)
  • अभिनेत्री: पूनम सरोदे (वेटलॉस)
  • गायक अभिनेता: अभिषेक काळे (संगीत अतृप्ता)
  • गायक अभिनेत्री: अनुष्का आपटे (संगीत आनंदमठ)
  • लेखक: डॉ. सोमनाथ सोनवळकर (द फिलिंग पॅरोडॉक्स)

विशेष गौरव पुरस्कार

  • वृषाली शेट्ये (प्रशासकीय अधिकारी, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह)
  • अनुराग, कल्याण संस्था – ५१ वर्ष प्रायोगिक रंगभूमीवरील कार्यासाठी

प्रवेश विनामूल्य, जागा मर्यादित

सदर सोहळा नाट्य रसिकांसाठी विनामूल्य खुला असला तरी काही जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे रसिकांनी वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.

Leave a comment