वल्लरी मनोजला घटस्फोट देईल का?

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ आता एका महत्त्वपूर्ण वळणावर आली आहे. घरामध्ये गणपतीची आरती सुरू असताना वल्लरी आणि मनोजमध्ये झालेला वाद एवढा तीव्र होतो की त्याने संपूर्ण घरच्यांच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं आहे. भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांचा तीव्र निषेध करत वल्लरी मनोजविरुद्ध केस दाखल करण्याचा धाडसी निर्णय घेते. यामुळे संपूर्ण घर तिच्या विरोधात उभं राहतं, पण तरीही न्यायासाठी एकटी उभी राहणारी वल्लरी निडर स्त्रीचं चित्र प्रेक्षकांसमोर आणते. मात्र इंदुमतीच्या सांगण्यावरून वल्लरी मनोजला घटस्फोट देणार का, हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.

घरातील मतभेद आणि वल्लरीचा ठामपणा

मनोजच्या बाजूने घरातील सगळे जण उभे राहतात, मात्र वल्लरी स्वतःच्या कर्तव्याला प्राधान्य देते. इंदु आणि वल्लरीमध्ये मनोजवरून मोठा वाद होतो. गुरूस्थानी असलेल्या नानावटी सरांनी वल्लरीला घरातील ऐक्य जपण्याचा सल्ला दिला; पण तिच्या ठाम भूमिकेमुळे ते तिच्यावर रागावण्याऐवजी अभिमान व्यक्त करतात. याच काळात वल्लरीला धक्का बसतो जेव्हा तिला समजतं की सानिकाकडून घरातल्या काही लोकांनी पैसे घेतले आहेत. “माझ्या अशिलकडून कोणीही पैसे घ्यायचे नाहीत!” या तिच्या ठाम विधानाने घरातील तणाव अधिकच वाढतो.

मनोजच्या आयुष्यातील कठोर वास्तव

दरम्यान, मनोजच्या आयुष्यात एक मोठं सत्य समोर येतं—त्याला असा आजार झाला आहे की जो कधीच बरा होऊ शकणार नाही. या परिस्थितीत तो प्रचंड खचतो आणि शेवटी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करतो. मात्र हा निर्णय त्याने स्वतःच्या इच्छेने घेतला का, की इंदुमतीच्या सांगण्यावरून घेतला, हा नवीन गोंधळ कथानकात निर्माण होतो.

समांतर प्रवाहातून निर्माण होणारा ताणतणाव

वल्लरीच्या आयुष्यात संकट, अश्रू आणि संघर्ष भरलेले आहेत, तर दुसरीकडे प्रेरणाच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि सकारात्मकतेचं वातावरण आहे. या दोन समांतर प्रवाहांच्या संगमातून प्रेक्षकांसमोर नाट्यमय ताणतणाव उभा राहत आहे.

पुढील घडामोडींवर प्रेक्षकांचे लक्ष

हा खटला आणि कौटुंबिक संघर्ष आता कथानकाला कोणत्या टप्प्यावर नेईल, याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नक्कीच पाहतील ‘पिंगा गं पोरी पिंगा-Reunion’ संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर.

Leave a comment