‘फुला’तून उलगडणार मुरळीच्या आयुष्याची संघर्षमय कथा

मराठी मातीतल्या लोकपरंपरा, लोककला आणि त्यामागील वास्तव जीवनातील संघर्ष यांचे चित्रण करणारा ‘फुला’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वाघ्या-मुरळी परंपरेच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटातून एका निरागस मुलीची वेदनादायी आणि संघर्षमय कहाणी मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. हा चित्रपट १७ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना ग्रामीण संस्कृतीचा आणि वास्तवाचा वेगळा अनुभव… Read More ‘फुला’तून उलगडणार मुरळीच्या आयुष्याची संघर्षमय कथा

उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणारा ‘पिक्चर बॉईज’ १५ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. आता उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हलक्याफुलक्या मनोरंजनाची मेजवानी देण्यासाठी ‘पिक्चर बॉईज’ हा नवा चित्रपट येत आहे. चित्रपटात हिरो बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी धडपड करणाऱ्या काही तरुणांची कथा विनोदी आणि मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आली आहे. त्यामुळे कॉमेडीचा भरपूर डोस देणारा हा चित्रपट १५ मे पासून संपूर्ण… Read More उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणारा ‘पिक्चर बॉईज’ १५ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बोरीवलीत ‘अजित कडकडे संगीत रजनी’!

गुढीपाडव्याच्या उत्सवी वातावरणात संगीताची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. भक्तिगीतांच्या सुमधुर सादरीकरणाने आणि भावस्पर्शी गायनशैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात ज्येष्ठ गायक, गानसम्राट गोमंतक विभूषण पुरस्काराने सन्मानित अजित कडकडे यांची विशेष ‘अजित कडकडे संगीत रजनी’ बुधवार, १८ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे आयोजित करण्यात आली आहे. भक्तिगीत, नाट्यसंगीत आणि… Read More गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बोरीवलीत ‘अजित कडकडे संगीत रजनी’!

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाने पूर्ण केले गौरवशाली पन्नास दिवस

प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आठव्या आठवड्यातही थिएटरमध्ये गर्दी मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करणारा आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवणारा झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित, तसेच केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाने आपला गौरवशाली पन्नासावा दिवस पूर्ण केला आहे. आठव्या आठवड्यातही हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचत असून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर,… Read More ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाने पूर्ण केले गौरवशाली पन्नास दिवस

“ही होळी माझ्यासाठी अतिशय खास आहे कारण…” – मेघना एरंडे जोशी

‘सनई चौघडे’ मालिकेतील पमा परबच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मेघनाच्या होळीच्या खास आठवणी होळीच्या रंगांनी आणि नव्या सुरुवातीच्या उत्साहाने नटलेल्या या वातावरणात अभिनेत्री मेघना एरंडे जोशी आपल्या आवडत्या सणाविषयीच्या गोड आठवणींना उजाळा देत आहेत. ‘सनई चौघडे’ मालिकेत पमा परब ही व्यक्तिरेखा साकारत असलेल्या मेघना होळीच्या आठवणी आणि यावर्षीच्या खास कारणांबद्दल मनमोकळेपणाने व्यक्त झाल्या. रंग, संगीत… Read More “ही होळी माझ्यासाठी अतिशय खास आहे कारण…” – मेघना एरंडे जोशी

‘सनई चौघडे’ मधील रुबाबदार जय खानोलकर – शिस्त, स्वॅग आणि भावनांचा अनोखा संगम

स्टायलिश आणि दमदार नायकाच्या भूमिकेत राज हंचनाळे झी मराठीवरील नव्या ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज हंचनाळे एका दमदार आणि स्टायलिश नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. जय खानोलकर ही त्याची व्यक्तिरेखा कणखर, शिस्तप्रिय आणि तितकीच भावनिक आहे. बाहेरून पाहता तो थोडा कठोर आणि अॅटिट्युड असलेला वाटतो; मात्र मनाने तो अतिशय संवेदनशील आहे. त्याच्या आयुष्यात त्याची आजी,… Read More ‘सनई चौघडे’ मधील रुबाबदार जय खानोलकर – शिस्त, स्वॅग आणि भावनांचा अनोखा संगम

पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणे तसं दुर्मिळच मानलं जातं. मात्र आगामी ‘सालबर्डी’ या चित्रपटात ही चौकट मोडत अभिनेत्री पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पी.आय. मनोरमा प्रधान असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा दमदार टिझर आणि कलाकारांचे प्रभावी… Read More पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज

स्वतंत्र, सक्षम स्त्रीचा संदेश देत ‘तिघी’ टीमची कॅन्सर प्रतिबंध मोहिमेत भागीदारी

स्त्री सशक्तीकरणाचा ठाम संदेश देत ‘तिघी’चे महाराष्ट्रभर जोरदार प्रमोशन स्त्रीच्या भावविश्वाचा, तिच्या स्वाभिमानाचा आणि तिच्या अंतर्गत ताकदीचा वेध घेणाऱ्या ‘तिघी’ या चित्रपटाचे महाराष्ट्रभर जोरदार प्रमोशन सुरू आहे. आई-मुलींच्या नात्याची भावनिक कथा सांगणारा हा चित्रपट केवळ नात्यांचा प्रवास नाही, तर तो स्त्री सशक्तीकरणाचा ठाम संदेश देणारा आहे. याच विचारांशी सुसंगत पाऊल टाकत *‘तिघी’*च्या टीमने पुण्यातील रूबी… Read More स्वतंत्र, सक्षम स्त्रीचा संदेश देत ‘तिघी’ टीमची कॅन्सर प्रतिबंध मोहिमेत भागीदारी