म्यूझिक मंत्रच्या मंचावर ख्यातनाम सिनेदिग्दर्शक श्री राजदत्त यांचा ९२वा वाढदिवस सोहळा संपन्न

मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त यांच्या ९२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून म्यूझिक मंत्रने गप्पा गोष्टी आणि राजदत्त यांच्या चित्रपटातील गाणी सादर करून व त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवासाचा आढावा घेत, एका आगळया वेगळया पद्धतीने त्यांचा जन्मदिवस राजदत्त यांच्या नातेवाईक व मित्र परिवारा सोबत साजरा केला. या कार्यक्रमात म्यूझिक मंत्रच्या संचालिका डॉ. स्मिता डोंगरे यांनी राजदत्त यांची… Read More म्यूझिक मंत्रच्या मंचावर ख्यातनाम सिनेदिग्दर्शक श्री राजदत्त यांचा ९२वा वाढदिवस सोहळा संपन्न

‘तुझ्याविना’ व्यक्त करणार मनातील प्रेमभावना

अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियावर ‘विश्वामित्र’ या अल्बममधील दुसऱ्या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘तुझ्याविना’ असे ह्या गाण्याचे बोल असून, तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगणाऱ्या ह्या गाण्यातून प्रेमाची आणखी एक कथा पाहायला मिळणार आहे. ही प्रेमकथा आपल्याला येत्या २ फेब्रुवारीला समजणार आहे. अवधूत गुप्ते यांचे संगीत, बोल असलेल्या या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे.… Read More ‘तुझ्याविना’ व्यक्त करणार मनातील प्रेमभावना

हसू आणि आसूने भरलेल्या ‘कन्नी’चा प्री टिझर भेटीला

मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्यात घनिष्ट मैत्री दिसत असून त्यात… Read More हसू आणि आसूने भरलेल्या ‘कन्नी’चा प्री टिझर भेटीला

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय बळीराजाचा ‘नवरदेव Bsc Agri.’

शेतीवर प्रेम करणाऱ्या आणि अन्नदात्याचा मनापासून सन्मान करणाऱ्या प्रत्येकासाठी असा ‘नवरदेव Bsc Agri.’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, आणि काही कालावधीतच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी असलेले आणि शेतीचा काहीही संबंध नसलेले असे दोन्ही प्रकारचे प्रेक्षक हा चित्रपट आनंदाने बघायला जात आहेत, आणि चित्रपट पसंतीस पडल्याने भरभरून प्रतिसादही देत आहेत. शहरी तसेच… Read More प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय बळीराजाचा ‘नवरदेव Bsc Agri.’

‘डिलिव्हरी बॉय’च्या ट्रेलर लाँचला साजरे झाले ‘डोहाळे जेवण’

सरोगसी हा शब्द आता आपल्याला बऱ्यापैकी परिचित झाला आहे. हा शब्द जरी आपण आत्मसात केला असला तरी याची प्रक्रिया अनेकांच्या पचनी पडत नाही. याचे वैज्ञानिक आणि भावनिक महत्व आजही अनेक जण मान्यच करत नाहीत. याच संकल्पनेवर आधारित ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा… Read More ‘डिलिव्हरी बॉय’च्या ट्रेलर लाँचला साजरे झाले ‘डोहाळे जेवण’

‘ॲड. यशवंत जमादार’  या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

आयोध्येत श्री राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा होत असल्याच्या वेळेचा मुहूर्त  साधत एका संवेदनशील विषयावरील मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. ‘ॲड. यशवंत जमादार’ असे या मराठी चित्रपटाचे नाव असून एस.के. प्रॉडक्शन च्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटांचे निर्माते संजय अग्रवाल असून दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी सांभाळत आहेत.  ‘ॲड. यशवंत जमादार’  चित्रपटाच्या… Read More ‘ॲड. यशवंत जमादार’  या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

‘सृजन द क्रियेशन’च्या कलाकारांचं स्वप्न शिवाजी मंदिर येथे साकार होणार

नव्या कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘सृजन’ ने एक मिशन सुरू केलं. ‘सृजन द क्रियेशन’ ही फक्त कार्यशाळा नसून एक संस्था आहे.आणि एक सृजनशील संवेदनशील माणसांचे एक जागतिक कुटुंब आहे. ‘आपली स्पर्धा स्वतःशीच करावी’ हा मंत्र प्रत्येकाच्या मनावर बिंबवत आजवर वेगवेगळया उपक्रमांच्या माध्यमातून सृजन द क्रियेशनच्या कलाकारांनी अनेक स्पर्धांमध्ये जवळपास ३० च्या… Read More ‘सृजन द क्रियेशन’च्या कलाकारांचं स्वप्न शिवाजी मंदिर येथे साकार होणार

लग्नकल्लोळ’चे धमाकेदार टिझर प्रदर्शित

मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटाचा जबरदस्त टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टिझर पाहून प्रेक्षक या धमाकेदार चित्रपटाची आतुरतेने वाट पाहाणार, हे नक्की! टिझरमध्ये सिद्धार्थ सोबत मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर दुसऱ्या क्षणी भूषण मयुरीला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. यावरून मयुरी नक्की कोणासोबत लग्न करणार आणि… Read More लग्नकल्लोळ’चे धमाकेदार टिझर प्रदर्शित