झी मराठी कलाकारांचे क्रिकेट प्रेम

इंडिया ! इंडिया ! हा गजर ऐकला की कळून येतं की मॅच चालू आहे. भारतात क्रिकेट हा श्वास, तर काहींचा धर्म आहे. येणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी आणि विश्वचषक आपल्या भारतात परत आणण्यासाठी रोहित आणि संघ तयार आहे. भारताने या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. या निमित्ताने झी मराठीचे आवडते कलाकार तुमच्या समोर… Read More झी मराठी कलाकारांचे क्रिकेट प्रेम

मर्डरवाले कुलकर्णी’ रंगमंचावर येण्यास सज्ज

विनोदाच्या अफलातून टायमिंगने रसिकांचे मनोरंजन करणारे अभिनेते वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार हे विनोदाचे दोन हुकमी एक्के रंगमंचावर एकत्र येत धमाल उडविण्यास सज्ज झाले आहेत. ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या आगामी नाटकात हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. येत्या २४ नोव्हेंबरला हे नाटक रंगभूमीवर दाखल होतंय. वैभव मांगले यात मध्यवर्ती भूमिकेत असून संतोष पवार… Read More मर्डरवाले कुलकर्णी’ रंगमंचावर येण्यास सज्ज

‘लेडी डॉन आणि पापा की परीचं’ गावरान धुमशान ‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या कार्यक्रमात !

झी मराठीवर काही दिवसांपूर्वी एक टिझर रिलीझ झाला होता, ‘करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार’ आणि चर्चा सुरु झाली हा कार्यक्रम नक्की आहे तरी काय. ‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या रिऍलिटी शोचा आज एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालाय ज्यात ‘हार्दिक जोशीने’ दोन दमदार स्पर्धकांशी ओळख करून दिली आहे. एक आहे पापा की परी ‘संस्कृती साळुंखे’… Read More ‘लेडी डॉन आणि पापा की परीचं’ गावरान धुमशान ‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या कार्यक्रमात !

झी मराठीवर सुरु होत आहे मनोरंजनाचा महासंगम

उमाची होणारी तारेवरची कसरत आणि अक्षराच्या मनात होणारी घालमेल तुम्हाला आवडणाऱ्या दोघींच्या विभिन्न विश्वाचा होत आहे सुरेख मेळ प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेल्या झी मराठीवरील दोन मालिका म्हणजे ‘सारं काही तिच्यासाठी’ आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. ह्या दोन्ही मालिकांचा कधी न पाहिलेला असा महासंगम येत्या २० ते २५ नोव्हेंबरपर्यंत प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. अक्षरा आणि… Read More झी मराठीवर सुरु होत आहे मनोरंजनाचा महासंगम

लंडन मिसळ’ चित्रपटाचा झक्कास टिजर प्रदर्शित !

ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसल लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून भरत जाधव एका अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. चित्रपटाचा धमाकेदार टिजर नुकताच लाँच करण्यात आला आहे. जगन्नाथरावांच्या भूमिकेत भरत… Read More लंडन मिसळ’ चित्रपटाचा झक्कास टिजर प्रदर्शित !

नाळ भाग २’सोबत जोडली गेली कलाकारांची नाळ

सध्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता मराठी कलाकारांचीही या चित्रपटासोबत नाळ जोडली जात आहे. अनेक कलाकार आपल्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. महेश मांजरेकर, विजू माने, आदिनाथ कोठारे, स्मिता तांबे… Read More नाळ भाग २’सोबत जोडली गेली कलाकारांची नाळ

दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘मृदगंध पुरस्कारा’ची घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेत फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. नंदेश विठ्ठल उमप यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यंदाचा १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला… Read More दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मधुरा वेलणकर-साटम, तुषार दळवी यांच मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन

अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम आणि अभिनेते तुषार दळवी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नव्याकोऱ्या नाटकात मधुरा आणि तुषार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. वरदा-वैध निर्मित प्रवेश प्रकाशित या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. आपल्या… Read More मधुरा वेलणकर-साटम, तुषार दळवी यांच मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन