पंचपिटिकाच्या दुसऱ्या पेटीत इंद्राणी आणि नेत्राच्या तत्वांचे रहस्य !

झी मराठीच्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’* मालिकेत पंचपिटिका रहस्य मध्ये पुढे काय होणार ह्याची सर्वानाच उत्सुकता आहे. पहिल्या पेटीच रहस्य सर्वांसमोर उलघडले आहे, पण दुसरी पेटी कोणाच्या हाती लागणार आणि त्यातून काय रहस्य बाहेर येणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असेल. वावोशी गावातील स्मशानात दुसरी पेटी आहे पण तिथे प्रेत जळत असल्यामुळे त्या दोघींना पेटी… Read More पंचपिटिकाच्या दुसऱ्या पेटीत इंद्राणी आणि नेत्राच्या तत्वांचे रहस्य !

भाऊबीजेच्या दिवशी निशीसाठी आली लग्नाची मागणी

‘सारं काही तिच्यासाठी’* ह्या मालिकेत निशीचा संघर्ष चालूच आहे. आपले बॅडमिंटन खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरीता तिचे सगळे प्रयत्न सुरु आहेत. दिवाळीच्या दिवशी ही निशाला सरावासाठी जावं लागणार म्हणून निशी आणि ओवी टेन्शन मध्ये आहेत. त्यात लक्ष्मीपूजनच्या दिवशी निशी घरातून गायब असल्याने घरात गोंधळ होणे आणि ती पकडली जाता जाता वाचणे ह्या सर्व गोष्टी वादळ येण्यापूर्वीची… Read More भाऊबीजेच्या दिवशी निशीसाठी आली लग्नाची मागणी

नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा खास*

दिवाळी पाडवा जवळ आली की घरच्या नवरे मंडळीत एक वेगळीच चर्चा रंगते, बायकोला पाडव्याला काय गिफ्ट द्यावं याची. अभिनेत्री नम्रता संभेरावला तिच्या नवऱ्याने यंदा भारी गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे नम्रता सध्या चांगलीच खुश आहे. तुम्हाला ही उत्सुकता असेलच की, असं काय गिफ्ट आहे की ज्यामुळे नम्रताचा यंदाचा पाडवा विशेष ठरणार आहे. ८ डिसेंबरला नम्रताचा ‘एकदा… Read More नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा खास*

दिवाळीतील उत्साह द्विगुणित करणारा ‘झिम्मा २’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा सण. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय, चलचित्र मंडळी घेऊन आले आहेत ‘झिम्मा २’चा धमाकेदार ट्रेलर. दिवाळीचे औचित्य साधत ‘झिम्मा २’चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या वेळी निर्माते आनंद एल राय यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याला दिग्दर्शक हेमंत ढोमे, सुहास… Read More दिवाळीतील उत्साह द्विगुणित करणारा ‘झिम्मा २’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

… आणि भार्गव जगतापची ‘नाळ भाग २’शी नाळ जोडली गेली

सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ चित्रपटाची. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच यातील कलाकारांचेही प्रेक्षक प्रचंड कौतुक करत आहेत. चैतू, चिमी आणि त्यांच्या साथीला असणाऱ्या ‘मणी’च्या अभिनयालाही विशेष दाद मिळत आहे. ‘मणी’ म्हणजेच भार्गव जगताप. चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी लाभलेल्या भार्गवची ‘नाळ भाग २’ साठी अगदी योगायोगाने निवड… Read More … आणि भार्गव जगतापची ‘नाळ भाग २’शी नाळ जोडली गेली

एकदा येऊन तर बघा’ ८ डिसेंबरला तुमच्या भेटीला

‘एकदा येऊन तर बघा’ या मराठी चित्रपटाची रसिक प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. १४ विनोदवीर एकत्र आणत दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी विनोदाची जबरदस्त मेजवानी रसिकांसाठी आणली आहे. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता ,पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. ‘एकदा… Read More एकदा येऊन तर बघा’ ८ डिसेंबरला तुमच्या भेटीला

अक्षराला,अधिपतीकडून पाडव्याची विलक्षण भेट !

नव्या जोडप्याला लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची जितकी उत्सुकता असते तितकीच आवर्जून प्रतीक्षा असते दिवाळीतल्या पाडव्याची. झी मराठीवर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेत ही अक्षरा- अधिपतीची पहिली दिवाळी आहे आणि अक्षरा ही दिवाळी खास बनविण्या करिता स्वतः आकाश कंदील बनवतेय, जो पाहून अधिपती तिच्या पुन्हा प्रेमात पडतो. अक्षराने बनवलेला आकाश कंदील अधिपती कौतुकाने घरासमोर लावतो. भुवनेश्वरी… Read More अक्षराला,अधिपतीकडून पाडव्याची विलक्षण भेट !

मानसी नाईक म्हणतेय ‘लावा फोन चार्जिंगला’

एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘गणराया’ आणि ‘करा ऊस मोठा’ या दोन गाण्यांनंतर आता ‘लावा फोन चार्जिंगला’ ही ठसकेबाज लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सर्वांनाच ठेका धरायला लावणाऱ्या ‘लावण्यवती’ च्या गाण्यांमध्ये ‘लावा फ़ोन चार्जिंगला’ या अजून एक ठसकेदार लावणीचा समावेश झाला आहे. नुकताच या लावणीचा टीझर प्रदर्शित झाला असून टीझरवर मिळालेला प्रतिसाद पाहून प्रेक्षक… Read More मानसी नाईक म्हणतेय ‘लावा फोन चार्जिंगला’