१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२५: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त प्रथमच विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी नाट्यसृष्टीच्या या ऐतिहासिक टप्प्याला साजरे करताना, भारतीय भाषांतील विविध नाटकांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. या महोत्सवाबाबत नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेला नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष… Read More १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन

सोनी मराठी शोधत आहे मराठी परंपरेचा वारसदार – ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’

सोनी मराठी वाहिनी गेल्या ६ वर्षांपासून सतत नवनवीन विषयांवर आधारित मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. हे कार्यक्रम नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, त्यांना एक वेगळा अनुभव देत आहेत. आता सोनी मराठी आणत आहे ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?’ – टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच होणारा कीर्तनकारांवर आधारित रिऍलिटी शो! महाराष्ट्राची समृद्ध कीर्तनपरंपरा महाराष्ट्राला संतांची भूमी… Read More सोनी मराठी शोधत आहे मराठी परंपरेचा वारसदार – ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’

स्त्रीशक्तीचा जागर: आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर!

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२५ – कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत बाल गणेशाच्या लीला आणि देवी भवानीचा दृष्टिकोन अधिक विस्ताराने उलगडला जाणार आहे. मालिकेच्या पुढील भागांमध्ये स्त्रीशक्ती आणि तिच्या स्थानाविषयी देवी भवानीने व्यक्त केलेले विचार अधिक ठळकपणे समोर येणार आहेत. बालगणेश आपल्या गावी परत जाण्याचा विचार करतो, मात्र भवानीशंकर यांना देवी सांगण्याचा प्रयत्न करते की… Read More स्त्रीशक्तीचा जागर: आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर!

अंगावर ६ किलो वजन बांधून शूटसाठी ११-१२ तास मी पाण्यात होते…महिमा म्हात्रे

हल्लीच “तुला जपणार आहे” मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आणि प्रोमो पाहून नेटिझन्समध्ये चर्चा रंगली की टेलिव्हिजनवर काही तरी वेगळं पहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये एका लहान मुलीला एक महिला पाण्यात ढकलते आणि तिची आई असहाय्यपणे बघत राहते. पण तिकडे एक तरुणी येते आणि विचार न करता पाण्यात उडी मारते व त्या लहान मुलीचा जीव वाचवते.… Read More अंगावर ६ किलो वजन बांधून शूटसाठी ११-१२ तास मी पाण्यात होते…महिमा म्हात्रे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “सुनबाई लय भारी” चित्रपटाचं पोस्टर लाँच

दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आता “सुनबाई लय भारी” हा चित्रपट घेऊन येणार आहेत. महिला सक्षमीकरण या विषयावर बेतलेल्या आणि धमाल मनोरंजन देणाऱ्या या चित्रपटाचं पहिलं पोस्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाँच करण्यात आलं. विशेष म्हणजे, या चित्रपटाचं चित्रीकरण मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होणार आहे. चित्रपट निर्मिती आणि प्रमुख आधारस्तंभ सोनाई फिल्म क्रिएशन तर्फे “सुनबाई… Read More मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “सुनबाई लय भारी” चित्रपटाचं पोस्टर लाँच

हार्दिक शुभेच्छा … कुणी कुणास दिल्या ?

मुंबई, २ फेब्रुवारी २०२५: मराठी चित्रपटसृष्टीतील नाविन्यपूर्ण विचारांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा एका हटके विषयावर भाष्य करणारा चित्रपट घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ असून लैंगिक सुसंगतता या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यात नवविवाहित दाम्पत्य पाहायला मिळते.… Read More हार्दिक शुभेच्छा … कुणी कुणास दिल्या ?

बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा मनोरंजक टीजर लाँच

मुंबई, २ फेब्रुवारी २०२५: अॅरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर आधारित आणि ग्रामीण भागातील लग्नाच्या गोष्टीला स्पर्श करणाऱ्या ‘स्थळ’ या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. टीझर लॉन्चच्या आधी प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट करत, ‘स्थळ’ चा टीझर येत असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या या घोषणेमुळे टीझर… Read More बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा मनोरंजक टीजर लाँच

विश्व मराठी संमेलन २०२५  सांगता समारंभ दिमाखात संपन्न

पुणे, फेब्रुवारी २०२५ – मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ चा सांगता समारंभ दिमाखात पार पडला. या संमेलनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक, आणि कलाक्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थित राहून मराठी अभिमानाची मशाल अधिक तेजस्वी केली. या भव्य सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय… Read More विश्व मराठी संमेलन २०२५  सांगता समारंभ दिमाखात संपन्न