छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अजिंक्य राऊत

अभिनयाच्या नव्या पर्वाची सुरुवातइतिहासातील महान व्यक्तिमत्त्व साकारताना कलाकाराला अभिनयापेक्षा मन, श्रद्धा आणि जबाबदारी या तीन गोष्टी जपू लागतात. हीच परंपरा पुढे नेत अभिनेता अजिंक्य राऊत आता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एका ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे. ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात तो तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘अभंग तुकाराम’चा भव्य आविष्कारदिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा चित्रपट… Read More छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अजिंक्य राऊत

“ठरलंय फॉरेवर” — संगीत, भावना आणि नव्या रंगमंचाचा प्रवास!

नव्या पिढीचा नाट्यमय सुरुवात“ठरलंय फॉरेवर” — या नावातच उब आहे. प्रेम, आठवणी, सोबत आणि नव्या सुरुवातींचं वचन आहे. जेव्हा या सगळ्या भावनांना संगीत, अभिनय आणि आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळते, तेव्हा मराठी रंगभूमीवर एक नवं पर्व उगवतं. संगीत प्रकाशन सोहळ्यातून रंगला नवा अध्यायया नाटकाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यातून या प्रवासाला पहिलं सुंदर पाऊल मिळालं. ऋता दुर्गुळे, कपिल… Read More “ठरलंय फॉरेवर” — संगीत, भावना आणि नव्या रंगमंचाचा प्रवास!

आईच्या हस्ते ‘वेल डन आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 🎬

महाराष्ट्राच्या घरोघरी हशा आणि आनंदाचा वर्षाव करणारी कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार आता एका नव्या आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या मुख्य भूमिकेतील ‘वेल डन आई’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या उत्सुकतेला नवा उधाण आलं आहे. मुहूर्तापासूनच चर्चेत असलेला हा सिनेमा ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. आईंच्या उपस्थितीत साजरा झालेला… Read More आईच्या हस्ते ‘वेल डन आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 🎬

पूर्णा आजी परत येणार! ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

रोहिणी हट्टंगडींची एण्ट्री ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली तीन वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं निधन झालं होतं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक हळहळले. मालिकेच्या टीमलाही ज्योती ताईंच्या जाण्याचं दु:ख आजही पचवणं अवघड जात आहे.… Read More पूर्णा आजी परत येणार! ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

फ्रेश लुक असलेला ‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा टीझर लाँच

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटाचा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नव्या दमाच्या कलाकारांसह आणि आधुनिक सादरीकरणात मांडलेली ही प्रेमकथा २१ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. फ्रेश जोडी, वेगळा आशय आणि हृदयाला भिडणारी कथा ❤️ शिवम फिल्म क्रिएशन, सिग्नेचर ट्यून्स आणि स्नेहा प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लास्ट स्टॉप खांदा… प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट’… Read More फ्रेश लुक असलेला ‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा टीझर लाँच

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं दहा वर्षांनंतर स्टार प्रवाहवर दमदार पुनरागमन

‘काजळमाया’ मालिकेत साकारणार चेटकीणीची गूढ व्यक्तिरेखा आपल्या अभिनयाच्या सहजतेने आणि प्रभावी उपस्थितीने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी छाप पाडणाऱ्या प्रिया बेर्डे या अनुभवी अभिनेत्री आता दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. स्टार प्रवाहवरील नव्या गूढ मालिकेत ‘काजळमाया’ त्या कनकदत्ता या चेटकीणीच्या दमदार भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या पुनरागमनाने मालिकेची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. काजळमाया… Read More सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं दहा वर्षांनंतर स्टार प्रवाहवर दमदार पुनरागमन

गोव्यात भावना-सिद्धू, जयंत-जान्हवीच्या नात्यांमध्ये एकीकडे जवळीक तर दुसरीकडे अनपेक्षित वळण!

लोकप्रिय आणि प्रेक्षकप्रिय महामालिका ‘लक्ष्मी निवास’ सध्या आपल्या कथानकाच्या अत्युच्च टप्प्यावर पोहोचली आहे. गोव्यात सुरू असलेल्या या विशेष ट्रॅकमध्ये एका बाजूला भावना आणि सिद्धूच्या नात्यात जवळीक वाढताना दिसते आहे, तर दुसऱ्या बाजूला जयंत आणि जान्हवीच्या आयुष्यात अनपेक्षित वादळ येताना दिसत आहे. गोव्याच्या पार्श्वभूमीवर रंगणार रोमांचक ट्रॅक संपतराव भावना आणि सिद्धूला हनीमूनसाठी गोव्याला पाठवण्याचा निर्णय घेतात.… Read More गोव्यात भावना-सिद्धू, जयंत-जान्हवीच्या नात्यांमध्ये एकीकडे जवळीक तर दुसरीकडे अनपेक्षित वळण!

‘तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।’‘अभंग तुकाराम’ चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा भक्तिरसात संपन्न!

‘तुझा पाहूनी सोहळा, माझा रंगला अभंग…’ या ओवीसारख्याच भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष होत, दिंडीच्या रूपाने भक्तीरसाचा महासंगम अनुभवायला मिळाला. कलाकार, गायक आणि प्रेक्षकांनी मिळून एक दिव्य क्षण साकारला. आशिष शेलार यांच्या हस्ते संगीत लोकार्पण राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी… Read More ‘तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।’‘अभंग तुकाराम’ चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा भक्तिरसात संपन्न!