अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित राज्यस्तरीय ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेची घोषणा

शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ उपक्रम यंदा राज्यभर साजरा होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा ‘नाट्य परिषद करंडक’ आयोजित करण्यात आली असून याची घोषणा नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केली. कलावंतांना राज्यव्यापी मंच देण्याचा उपक्रममहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील नाट्यकर्मींसाठी ही स्पर्धा खुली असून अधिकाधिक कलाकारांनी… Read More अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित राज्यस्तरीय ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेची घोषणा

‘श्श… घाबरायचं नाही’ नाटकातून पुन्हा एकत्र येणार डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे

रत्नाकर मतकरींच्या गूढकथांना रंगमंचीय सलामीमराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेविश्वात अष्टपैलू योगदान देणाऱ्या रत्नाकर मतकरी यांनी गूढकथांच्या माध्यमातून एक स्वतंत्र परंपरा निर्माण केली. मानवी मनाच्या खोलगट कोपऱ्यात डोकावणाऱ्या, सूक्ष्म सामाजिक निरीक्षण असलेल्या त्यांच्या भयकथा आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ या कथांचा नाट्य साजबदाम राजा प्रॉडक्शन सादर करत असलेल्या ‘श्श… घाबरायचं नाही’… Read More ‘श्श… घाबरायचं नाही’ नाटकातून पुन्हा एकत्र येणार डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे

‘संगीत संन्यस्त खड्ग’ नव्या स्वरूपात

सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव आणि नाटकाचे निर्माते रवींद्र माधव साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावरकर दर्शन प्रतिष्ठानचा उपक्रम स्व. सुधीर फडके यांनी स्थापन… Read More ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नव्या स्वरूपात

रंगभूमीवर पुन्हा जोशात – विद्याधर जोशींचं ‘सुंदर’ पुनरागमन

‘सुंदर मी होणार’च्या निमित्ताने विद्याधर जोशी पुन्हा रंगमंचावर दीर्घ आजार, हॉस्पिटलायझेशन आणि थकव्यानंतर काही काळ रंगभूमीपासून दूर गेलेले ज्येष्ठ अभिनेते विद्याधर (बाप्पा) जोशी आता पुन्हा रंगमंचावर परतले आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’ या गाजलेल्या नाटकाच्या नव्या सादरीकरणात ते प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही पुनरागमनाची क्षणभर थबकवणारी पण आश्वासक गोष्ट आहे. पुलंचं नाटक… Read More रंगभूमीवर पुन्हा जोशात – विद्याधर जोशींचं ‘सुंदर’ पुनरागमन

‘तिची गोष्ट’ सांगण्यासाठी आले एकत्र

कलाक्षेत्रात नव्या प्रयोगांची नांदी कलेचे माध्यम कोणतेही असो, नवीन आणि सर्जनशील विचारांची देवाणघेवाण ही सृजनशीलतेसाठी अत्यावश्यक असते. अशाच नव्या प्रयोगशील विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी काही कलामनस्वी मंडळी एकत्र आली आहेत. कै. मधुसूदन कालेलकर यांच्या वारशातून निर्मितीचा संकल्प ख्यातनाम लेखक, गीतकार, नाट्य व चित्रपट निर्माते कै. मधुसूदन कालेलकर यांच्या वारशाला पुढे नेण्यासाठी त्यांच्या नात गौरी कालेलकर-चौधरी आणि… Read More ‘तिची गोष्ट’ सांगण्यासाठी आले एकत्र

बेबीराजेच्या वाटेवरून पुन्हा रंगभूमीकडे – स्वानंदी टिकेकरला लागला ‘सुंदर मी होणार’चा ध्यास

मराठी रंगभूमीवर पुन्हा ‘सुंदर मी होणार’मराठी रंगभूमीवरचा एक अविस्मरणीय ठेवा – पु. ल. देशपांडे यांचं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर येत आहे. निमित्त आहे पुलंचा २५ वा स्मृतिदिन आणि त्यांच्या पत्नी, लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष. या खास पर्वावर सादर होणाऱ्या नव्या प्रयोगात ‘बेबीराजे’ ही महत्त्वाची भूमिका साकारतेय अभिनेत्री… Read More बेबीराजेच्या वाटेवरून पुन्हा रंगभूमीकडे – स्वानंदी टिकेकरला लागला ‘सुंदर मी होणार’चा ध्यास

अलका कुबल यांचे रंगभूमीवर ‘वजनदार’ भूमिकेतून पुनरागमन

लठ्ठपणावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणाऱ्या ‘वजनदार’ या नव्या नाटकातून अलका कुबल तब्बल २७ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. ‘अष्टविनायक’ आणि ‘विप्रा क्रिएशन्स’ निर्मित या नाटकाच्या माध्यमातून अलका कुबल यांनी पुन्हा एकदा थेट प्रेक्षकांशी रंगभूमीवरून संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. सशक्त विषय, वजनदार भूमिका ‘वजनदार’ नाटक हे फक्त एका लठ्ठ स्त्रीची कथा नाही, तर समाजाच्या सौंदर्यदृष्टीच्या… Read More अलका कुबल यांचे रंगभूमीवर ‘वजनदार’ भूमिकेतून पुनरागमन

‘भूमिका’ नाटकात समिधा गुरु एका महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या सशक्त भूमिकेत दिसणार

‘भूमिका’ नाटकातून अभिनेत्री नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला मनोरंजन क्षेत्रात नेहमीच विचारपूर्वक आणि आशयघन भूमिका साकारणारी समिधा गुरु आता ‘भूमिका’ या नव्या नाटकात ‘उल्का’ या महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या भूमिकेत झळकणार आहे. क्षितीज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हे नाटक जिगिषा अष्टविनायक निर्मित असून याचा शुभारंभ २८ मार्चपासून रंगमंचावर होतो आहे. उल्का – एक गृहिणी, पण स्वतंत्र… Read More ‘भूमिका’ नाटकात समिधा गुरु एका महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या सशक्त भूमिकेत दिसणार