‘महापूर’ नाटकाचा भव्य प्रीमियर

सत्य घटनांशी नातं सांगणाऱ्या आणि आजही तितक्याच ताकदीने भिडणाऱ्या नाटकांच्या यादीत ‘महापूर’ या नाटकाचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. सतीश आळेकर यांच्या लेखणीतून साकारलेलं हे नाटक आता सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नव्या स्वरूपात रंगभूमीवर सादर होत आहे. यानिमित्ताने १५ ऑगस्ट रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात भव्य प्रीमियर आयोजित करण्यात आला आहे. नव्या पिढीकडून जुन्या संहितेला नवा चेहरा या… Read More ‘महापूर’ नाटकाचा भव्य प्रीमियर

‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर, ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा मध्यवर्ती भूमिकेत

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे मराठी आणि भारतीय रंगभूमीवरील अत्यंत महत्त्वाचं नाटक आहे. १६ डिसेंबर १९७२ रोजी पहिल्या प्रयोगापासून या नाटकाने ५२ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. आतापर्यंत दहा भारतीय भाषांमध्ये आणि तीन आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये या नाटकाची सादरीकरणं झाली असली तरी, हिंदीत मात्र ते व्यावसायिकदृष्ट्या सादर झालं नव्हतं. याच अभिजात कलाकृतीला हिंदी… Read More ‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर, ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा मध्यवर्ती भूमिकेत

पुष्कर श्रोत्री सांगतोय ‘श्श… घाबरायचं नाही’ पण…

गूढतेच्या रंगभूमीवर पुन्हा एकदा नव्या रूपात पुष्कर श्रोत्री मराठी रंगभूमीने अनेक प्रयोगशीलतेचे सोनेरी पर्व पाहिले आहे. अशाच एका प्रयोगशील सादरीकरणात अभिनेता पुष्कर श्रोत्री पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे येत आहे. ‘श्श… घाबरायचं नाही’ या आगामी नाट्यप्रयोगाविषयी बोलताना त्याने प्रेक्षकांच्या मानसिकतेबद्दल आणि रंगभूमीवरील आशयघनतेविषयी महत्त्वाचे विचार मांडले. “मी काय वेगळं करू शकतो?” – या प्रश्नातून साकारलेलं… Read More पुष्कर श्रोत्री सांगतोय ‘श्श… घाबरायचं नाही’ पण…

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित राज्यस्तरीय ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेची घोषणा

शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ उपक्रम यंदा राज्यभर साजरा होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा ‘नाट्य परिषद करंडक’ आयोजित करण्यात आली असून याची घोषणा नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केली. कलावंतांना राज्यव्यापी मंच देण्याचा उपक्रममहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील नाट्यकर्मींसाठी ही स्पर्धा खुली असून अधिकाधिक कलाकारांनी… Read More अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित राज्यस्तरीय ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेची घोषणा

‘श्श… घाबरायचं नाही’ नाटकातून पुन्हा एकत्र येणार डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे

रत्नाकर मतकरींच्या गूढकथांना रंगमंचीय सलामीमराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेविश्वात अष्टपैलू योगदान देणाऱ्या रत्नाकर मतकरी यांनी गूढकथांच्या माध्यमातून एक स्वतंत्र परंपरा निर्माण केली. मानवी मनाच्या खोलगट कोपऱ्यात डोकावणाऱ्या, सूक्ष्म सामाजिक निरीक्षण असलेल्या त्यांच्या भयकथा आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ या कथांचा नाट्य साजबदाम राजा प्रॉडक्शन सादर करत असलेल्या ‘श्श… घाबरायचं नाही’… Read More ‘श्श… घाबरायचं नाही’ नाटकातून पुन्हा एकत्र येणार डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे

‘संगीत संन्यस्त खड्ग’ नव्या स्वरूपात

सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव आणि नाटकाचे निर्माते रवींद्र माधव साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावरकर दर्शन प्रतिष्ठानचा उपक्रम स्व. सुधीर फडके यांनी स्थापन… Read More ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नव्या स्वरूपात

रंगभूमीवर पुन्हा जोशात – विद्याधर जोशींचं ‘सुंदर’ पुनरागमन

‘सुंदर मी होणार’च्या निमित्ताने विद्याधर जोशी पुन्हा रंगमंचावर दीर्घ आजार, हॉस्पिटलायझेशन आणि थकव्यानंतर काही काळ रंगभूमीपासून दूर गेलेले ज्येष्ठ अभिनेते विद्याधर (बाप्पा) जोशी आता पुन्हा रंगमंचावर परतले आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’ या गाजलेल्या नाटकाच्या नव्या सादरीकरणात ते प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही पुनरागमनाची क्षणभर थबकवणारी पण आश्वासक गोष्ट आहे. पुलंचं नाटक… Read More रंगभूमीवर पुन्हा जोशात – विद्याधर जोशींचं ‘सुंदर’ पुनरागमन

‘तिची गोष्ट’ सांगण्यासाठी आले एकत्र

कलाक्षेत्रात नव्या प्रयोगांची नांदी कलेचे माध्यम कोणतेही असो, नवीन आणि सर्जनशील विचारांची देवाणघेवाण ही सृजनशीलतेसाठी अत्यावश्यक असते. अशाच नव्या प्रयोगशील विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी काही कलामनस्वी मंडळी एकत्र आली आहेत. कै. मधुसूदन कालेलकर यांच्या वारशातून निर्मितीचा संकल्प ख्यातनाम लेखक, गीतकार, नाट्य व चित्रपट निर्माते कै. मधुसूदन कालेलकर यांच्या वारशाला पुढे नेण्यासाठी त्यांच्या नात गौरी कालेलकर-चौधरी आणि… Read More ‘तिची गोष्ट’ सांगण्यासाठी आले एकत्र