१०० व्या नाट्य संमेलनाची मान्यवरांच्या हस्ते मुहुर्तमेढ

मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य तथा वने, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल शुक्रवारी सांगली येथे केले. शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाच्या मुहुर्तमेढ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ना. श्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मोठे आहे. मराठी नाट्यपरंपरा प्रगल्भ आहे. १०० व्या नाट्य संमेलनासाठी शासनाने ९ कोटी,… Read More १०० व्या नाट्य संमेलनाची मान्यवरांच्या हस्ते मुहुर्तमेढ

तंजावर येथे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनचा प्रारंभ

पिंपरी चिंचवड येथे दि. ५-६-७ जानेवारी २०२४ या काळात संपन्न होणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ, मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शाहराज राजे भोसले (१६७०-१७१२) यांच्या नाट्य वाङमयाला वंदन करून होणार आहे. तंजावर (तामिळनाडू) येथील सरस्वती महालात हे नाट्य वाङमय सुरक्षित असून, नाटककार शाहराज राजे भोसले यांनी एकूण २२ मराठी नाटके लिहिली असून, ‘लक्ष्मी नारायण कल्याण’… Read More तंजावर येथे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनचा प्रारंभ

रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे!

जेष्ठ नाट्य – चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत ‘रविकिरण मंडळाची ३७ व्या बालनाट्य स्पर्धा नुकतीच मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, संगीत, प्रकाश योजना तसेच अभिनय (मुलींमध्ये) तृतीय व अभिनय (मुलांमध्ये) उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावून हे बालनाट्य अव्वल ठरले. यासोबत द्वितीय क्रमांक सेक्रेड हार्ट, हायस्कुलच्या… Read More रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे!

२४ डिसेंबरला ‘माझ्या बायकोचा नवरा’ नाटकाचा शुभारंभ….

प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्राॅडक्शन्सची ५९ वी धमाकेदार नाट्यकृती ‘माझ्या बायकोचा नवरा’ ही आता लवकरच रंगभूमीवर येण्यास सज्ज झाली असून या नाटकाचा शुभरंभाचा प्रयोग येत्या रविवारी म्हणजेच २४ डिसेंबरला आचार्य अत्रे रंगमंदिर,कल्याण येथे होणार आहे. या धमाल विनोदी नाटकाची निर्मिति श्रीमती कविता मच्छिन्द्र कांबळी, दिनू पेडणेकर, अभिजित देशपांडे, राहुल कर्णिक यांनी केली आहे.या नाटकाचे लेखन,… Read More २४ डिसेंबरला ‘माझ्या बायकोचा नवरा’ नाटकाचा शुभारंभ….

१०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’ कार्यक्रम.

रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित, नाट्य संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी २०२४ ते मे २०२४ याकालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात आणि धुमधडाक्यात साजरे होणार आहे. या संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दिनांक १५ जानेवारी… Read More १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’ कार्यक्रम.

शतक महोत्सवी नाट्यसंमेलन महाराष्ट्रभर संपन्न होणार

शंभरावे नाट्यसंमेलन महाराष्ट्रात विविध ठिकाणी संपन्न होणार आहे या संमेलनाचा उद्घाटन सोहळा ५ जानेवारीला होणार असून मे महिन्यात याची सांगता करण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ‘प्रशांत दामले’ यांनी केली शंभराव्या नाट्यसंमेलनाची सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रशांत दामले यांच्यासोबत नाट्य संमेलनाचे मुख्य निमंत्रण… Read More शतक महोत्सवी नाट्यसंमेलन महाराष्ट्रभर संपन्न होणार

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘यदा कदाचित रिटर्न्स’ नाटकाचा शंभरावा प्रयोग

लेखन-दिग्दर्शनासोबतच विविध व्यक्तिरेखा साकारत रसिकांचे मनोरंजन करणारा रंगकर्मी संतोष पवारच्या ‘यदा कदाचित’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर विक्रमी घोडदौड केली होती. मागील काही दिवसांपासून संतोषच्या ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाने रसिकांवर मोहिनी घातली आहे. नुकताच या नाटकाने शंभर प्रयोगांचा टप्पा पार केला. या नाटकाने शंभराव्या प्रयोगाचे औचित्य साधत ऐतिहासिक कलाकृतींचे साक्षीदार असलेल्या रॉयल ऑपेरा हाऊस या… Read More मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘यदा कदाचित रिटर्न्स’ नाटकाचा शंभरावा प्रयोग

दुबईत रंगला सुवर्णपर्व एकांकिका करंडक !

एम.पी.एफ.एस म्हणजेच महाराष्ट्र मंडळ दुबई, यंदा सुवर्णपर्व दिमाखात साजरे करत आहे. गेली दोन वर्षे करोनाच्या प्रादुर्भावामुळे एकांकिका स्पर्धा होऊ शकली नाही, पण यंदा मात्र ही स्पर्धा म्हणजेच सुवर्णपर्व एकांकिका करंडक २०२३ मंडळाच्या ५० व्या वर्षात जल्लोषात पार पडला. प्राथमिक फेरीत पूर्ण युएई तून सहभागी झालेल्या११ एकांकिका सादर झाल्या आणि त्यातून विनोदी, कौटुंबिक, सामाजिक अशा विविध… Read More दुबईत रंगला सुवर्णपर्व एकांकिका करंडक !