इंद्रायणी मालिकेने केले ३०० भाग पूर्ण

इंद्रायणी मालिकेचा प्रवास – ३०० भागांचा टप्पा गाठत प्रेक्षकांच्या मनात स्थान

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आनंदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, व्यंकू महाराजांची शिकवण आणि संस्कार यामुळेच ही मालिका रसिकांच्या मनाला भावत आहे.

इंदूच्या प्रवासातील नवीन ट्विस्ट

आनंदीबाई इंदूच्या बाजूने उभी राहते, पण का? स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आणि पैशाच्या हव्यासापोटी आनंदी इंदूचा वापर करत आहेत, हे व्यंकू महाराजांना गोपाळने समजावले. आता आनंदीबाईचा खरा चेहरा इंदूच्या समोर आणता येईल का? इंदू त्यावर विश्वास ठेवेल का? हे बघणे रंजक असणार आहे.

३०० भागांचे यश – वृक्षारोपणाचा सुंदर उपक्रम

पाहा ‘इंद्रायणी’ दररोज संध्या. ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर!

३०० भागांच्या निमित्ताने संपूर्ण टीमने सेटवर वृक्षारोपण केले. लहान मुलांना शाळेमध्ये झाडांचे, पर्यावरणाचे महत्त्व हे नेहमी सांगितले जाते. त्यामुळेच सेटवरील बच्चेकंपनीने झाडे लावली आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून इंद्रायणी मालिकेच्या संपूर्ण टीमने पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश दिला आहे.

स्वानंद बर्वे – “व्यंकू महाराजांची भूमिका खूप शिकवून गेली”

व्यंकू महाराजांची भूमिका साकारणारा स्वानंद बर्वे म्हणाला, “इंद्रायणी मालिकेचे ३०० भाग पूर्ण होत आहेत, याचा खूप आनंद आहे. या भूमिकेने मला वारकरी संप्रदाय, कीर्तन आणि अभंग यांचा जवळून अनुभव दिला. लहान इंदूसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे व्यंकू महाराज हे पात्र उभं करता आलं. प्रेक्षकांना हे पात्र आणि मालिका आवडते आहे, त्याची पावती मिळते आहे, ही माझ्यासाठी खूप समाधानकारक बाब आहे.”

Leave a comment