Home

  • आता पुन्हा कल्ला होणार… कारण तो परतोय !

    रितेश देशमुखसोबत होणार बिग बॉस मराठीचा खास धमाका !

    संपूर्ण महाराष्ट्रात मनोरंजनाचा बाप म्हणून ओळखला जाणारा एकमेव मराठी नॉन-फिक्शन शो म्हणजे  बिग बॉस मराठी ! जगभरात खळबळ माजवणारा, अनेक देशांमधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला आणि संपूर्ण भारतात हुकुमत गाजवणारा हा कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या दमाने येतोय. बिग बॉस मराठी येत असल्याचं जाहीर झाल्यावर प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच चर्चांना उधाण आलं आहे.

    पहिल्या पर्वापासून महाराष्ट्राला लागलं वेड !

    या रिऍलिटी शोने पहिल्याच पर्वापासून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. मग तो बिग बॉसचा दमदार आवाज असो, घरातील छोटे-मोठे वाद असोत, नाट्यमय घडामोडी असोत किंवा अनोखे टास्क – बिग बॉस मराठी हा लोकांच्या दैनंदिन गप्पांमध्ये कायम चर्चेचा विषय राहिला आहे.

    बिग बॉस मराठी सिझन ५ ने गाजवला टीआरपी खेळ

    बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाने अपार लोकप्रियता मिळवली. हा सिझन सुरु होण्याआधी अनेक चर्चा रंगल्या होत्या –
    स्पर्धक कोण असतील?
    बिग बॉसचे घर यावेळी कसं असेल?
    आणि सर्वात महत्वाचा प्रश्न – सूत्रसंचालन कोण करणार?

    रितेश देशमुख – बिग बॉस मराठीचा भाऊ!

    कोणताही रिऍलिटी शो यशस्वी करण्यासाठी त्याचा सूत्रसंचालक हा महत्वाचा दुवा असतो. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यातील हा दुवा यंदाही हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख असणार आहे.

    बिग बॉस मराठीच्या मागील सीझनमध्ये रितेशने सूत्रसंचालन करताच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. त्याची लयभारी स्टाईल, विनोदबुद्धी, थेट प्रश्न विचारण्याची पद्धत आणि शोमध्ये टाकलेले भन्नाट ट्विस्ट यामुळे हा सिझन गाजला. ‘भाऊच्या धक्क्या’ने बिग बॉस मराठीच्या टीआरपीने उच्चांक गाठला होता.

    रितेश पुन्हा घेऊन येतोय धमाका!

    आता बिग बॉस मराठी पुन्हा सुरू होत आहे आणि सोबतच रितेश भाऊही परततोय! यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

    कोणते सेलिब्रिटी यावेळी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार? कोणता नवा वाद रंगणार? कोणता सदस्य प्रेक्षकांची मने जिंकणार? आणि सगळ्यात महत्वाचं – भाऊचा धक्का यावेळी कोणाला बसणार?

    हे जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी १० फेब्रुवारीपासून दररोज दु. ३ वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!

  • Shah Rukh Khan Announces Aryan Khan’s Netflix Debut Series ‘The BADS of Bollywood’ at Next on Netflix Event

    A Bold and Adventurous Dive into Bollywood

    Shah Rukh Khan took the global stage at the Next on Netflix event with a grand revelation—Aryan Khan’s debut Netflix series, ‘The BADS of Bollywood’.

    This highly anticipated series follows an ambitious outsider and his friends as they navigate the larger-than-life yet unpredictable world of Bollywood. The series masterfully blends self-aware humor with a gripping high-stakes narrative, offering audiences a fresh and entertaining perspective on the Indian film industry.

    With unforgettable cameos, blockbuster action, and a thrilling ride through the heart of Bollywood, Aryan Khan’s directorial debut is already setting high expectations.

    A Story Beyond Bollywood’s Glitz & Glamour

    The team behind the series shared their vision, stating:

    > “Behind the glamour of Bollywood lies a world just as dramatic as the films themselves—and that is where the Netflix series, The BA***DS of Bollywood begins. Through Aryan Khan’s distinct lens, this series dives into the glitz, the chaos, the comedy, and the high stakes of an industry built on dreams. From the house of Red Chillies Entertainment, this collaboration with Netflix brings to life a story that is as bold and entertaining as the movies we have come to love. We can’t wait for audiences to experience this with us.”

    With Aryan Khan taking the reins as creator and director, alongside a powerhouse writing team, the series is set to deliver an unfiltered, inside look at Bollywood’s charm and chaos.


    Why This Series Is a Game-Changer

    1️⃣ Aryan Khan’s Vision: Making his directorial debut, Aryan is set to bring an authentic, modern, and witty take on Bollywood’s inner workings.
    2️⃣ Netflix’s Global Reach: With Netflix backing the project, the series is poised to be an int

    ernational spectacle.
    3️⃣ A Unique Genre Blend: Mixing comedy, drama, and thrilling storytelling, this series promises to offer something fresh and unfiltered.
    4️⃣ A Star-Studded Affair: With Bollywood’s biggest names likely making cameos, the show guarantees a high entertainment quotient.

    The Big Question: Will This Redefine Bollywood Storytelling?

    With Aryan Khan’s unique perspective, a power-packed creative team, and Netflix’s global platform, ‘The BA***DS of Bollywood’ is shaping up to be one of the most exciting and anticipated series of the year.

    Stay tuned for more updates as Bollywood’s next big thing gets ready to take center stage!

  • नोरा फतेही ने जेसन डेरुलो के साथ अपने टॉप 4 रैंक वाले ग्लोबल हिट ‘स्नेक’ का बीटीएस मोमेंट्स किया साझा

    ग्लोबल हिट ‘स्नेक’ के निर्माण की झलक साझा करते हुए नोरा फतेही ने अपने डांस और परफॉर्मेंस के पीछे की मेहनत को दिखाया।

    बीटीएस: रिहर्सल से परफेक्शन तक का सफर

    ग्लोबल सेंसेशन नोरा फतेही और इंटरनेशनल पॉप स्टार जेसन डेरुलो का लेटेस्ट ट्रैक ‘स्नेक’ इंटरनेट पर तहलका मचा रहा है। टॉप 4 ग्लोबल ट्रेंडिंग म्यूजिक वीडियोज़ में जगह बनाने के बाद, नोरा ने अब प्रशंसकों को एक एक्सक्लूसिव बिहाइंड-द-सीन (BTS) झलक दी है।

    इस बीटीएस क्लिप में, नोरा अपने परफॉर्मेंस को फिनिशिंग टच देते हुए, जटिल डांस मूव्स परफेक्ट करते हुए और डेरुलो के साथ शानदार सहयोग दिखाते हुए नज़र आ रही हैं। उन्होंने सोशल मीडिया पर लिखा:

    “कैमरा 🤩 हम चार्ट पर ऊपर चढ़ रहे हैं, दोस्तों! चलो इसे और आगे बढ़ाते हैं! वी लव यू ❤️ #स्नेक #बीटीएस”

    स्नेक ने ग्लोबल चार्ट पर मचाया तहलका

    हाल ही में, स्नेक ने मात्र 24 घंटों में 80 मिलियन से अधिक व्यूज़ हासिल कर, दुनिया भर में सबसे अधिक देखे जाने वाले वीडियो में #2 स्थान प्राप्त किया। इस वायरल हिट के आगे केवल एप्ट बाय रोज़ और ब्रूनो मार्स का नया चार्ट-टॉपिंग गीत है, जो इसके वैश्विक प्रभाव को और मजबूत कर रहा है।

    नोरा की शानदार स्क्रीन उपस्थिति और डेरुलो के साथ उनकी परफेक्ट केमिस्ट्री को लेकर फैंस जमकर तारीफ कर रहे हैं।

    नोरा फतेही और जेसन डेरुलो का धमाकेदार ग्लोबल कनेक्शन

    ‘स्नेक’ न सिर्फ एक म्यूजिक वीडियो है, बल्कि बॉलीवुड की ट्रेंडिंग क्वीन नोरा फतेही और ग्लोबल पॉप स्टार जेसन डेरुलो के बीच एक ऐतिहासिक सहयोग भी है।

    इस गाने की जोशीली बीट्स, हाई-एनर्जी विज़ुअल्स और ग्लोबल अपील इसे अंतरराष्ट्रीय सनसनी बना रही है।

    जैसे-जैसे स्नेक नए रिकॉर्ड्स कायम कर रहा है, फैंस अब यह जानने के लिए उत्सुक हैं कि नोरा और डेरुलो आगे क्या धमाका करने वाले हैं!

    क्या यह पॉप सेंसेशन्स की नई सुपरहिट जोड़ी बन रही है?

    फिलहाल, स्नेक लगातार ग्लोबल चार्ट्स पर राज कर रहा है, और यह गाना नोरा को एक अंतरराष्ट्रीय स्टार के रूप में और डेरुलो को एक चार्ट-टॉपिंग हिटमेकर के रूप में स्थापित कर रहा है।

    बने रहिए अपडेट्स के लिए और देखें ग्लोबल सेंसेशन ‘स्नेक’!

  • हार्दिक शुभेच्छा … कुणी कुणास दिल्या ?

    प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

    मुंबई, २ फेब्रुवारी २०२५: मराठी चित्रपटसृष्टीतील नाविन्यपूर्ण विचारांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा एका हटके विषयावर भाष्य करणारा चित्रपट घेऊन येत आहे.

    त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ असून लैंगिक सुसंगतता या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यात नवविवाहित दाम्पत्य पाहायला मिळते. हा चित्रपट नातेसंबंधातील महत्त्वाच्या पैलूशी जोडलेला असून तो प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे.

    वैवाहिक जीवनातील लैंगिक सुसंगतीवर भाष्य करणारा चित्रपट

    “हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?” हा चित्रपट वैवाहिक जीवनातील लैंगिक सुसंगतीचे महत्त्व अधोरेखीत करतो. पुष्कर जोगच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच, या चित्रपटातही नात्यातील गुंतागुंत, भावनिक संघर्ष आणि जीवनातील काही वेगळे पैलू मांडण्यात आले आहेत.

    हा चित्रपट २१ मार्च २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून यात पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

    दुबई, ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये चित्रीकरण

    या चित्रपटाचे चित्रीकरण दुबई, ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये झाले असून विशेष म्हणजे ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये चित्रीकरण होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे.

    दिग्दर्शक पुष्कर जोग यांचे मत

    पुष्कर जोग म्हणतात,
    “आजच्या आधुनिक काळातही लैंगिक सुसंगतता हा विषय अनेकदा दुर्लक्षित केला जातो. नातेसंबंधांना फक्त भावनिक किंवा मानसिक बळ पुरेसं नसतं, तर शारीरिक सुसंगतता देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही हा विषय एका सहज पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.”

    चित्रपटाच्या निर्मितीमध्ये प्रमुख योगदान

    आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपट २१ मार्च २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांचे असून या सिनेमाचे निर्माते आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग हे आहेत. सिनेमाच्या वितरणाची जबाबदारी प्रख्यात वितरक पॅनोरमा स्टुडिओज यांनी घेतली आहे.

    प्रेक्षकांसाठी एक विचार करायला लावणारा सिनेमा

    हा चित्रपट मनोरंजनाच्या चौकटीत राहून समाजाला विचार करायला लावणारा ठरणार आहे. त्याच्या हटके विषयामुळे आणि नावीन्यपूर्ण मांडणीमुळे ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण करेल.

    २१ मार्चला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायला विसरू नका!

  • बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा मनोरंजक टीजर लाँच

    ७ मार्च रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

    मुंबई, २ फेब्रुवारी २०२५: अॅरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर आधारित आणि ग्रामीण भागातील लग्नाच्या गोष्टीला स्पर्श करणाऱ्या ‘स्थळ’ या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे.

    टीझर लॉन्चच्या आधी प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट करत, ‘स्थळ’ चा टीझर येत असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या या घोषणेमुळे टीझर आणि एकूणच चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली. महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्च रोजी ‘स्थळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    अनोखी कथा, वेगळी मांडणी

    सर्वसाधारणपणे लग्नासाठी स्थळ पाहायला गेल्यावर मुलगा आणि त्याचे कुटुंबीय मुलीला प्रश्न विचारतात. त्या वेळी बावरलेली मुलगी उत्तर देण्याचा प्रयत्न करते, तिच्या उत्तरात काही चूक होऊ नये म्हणून धडपड करते. मात्र, मुलीऐवजी जर मुलाला प्रश्न विचारले गेले, तर काय होईल? हा नवा विचार ‘स्थळ’ चित्रपटाच्या टीझरमध्ये मांडण्यात आला आहे.

    ‘स्थळ’ हा चित्रपट अॅरेंज्ड मॅरेज आणि स्थळ पाहण्याच्या संकल्पनेवर आधारित असला, तरी तोचतोचपणा टाळत मनोरंजक आणि हटके पद्धतीने या विषयाला हाताळण्यात आले आहे.

    प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालं विशेष स्थान

    ‘स्थळ’ हा चित्रपट आतापर्यंत टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह तब्बल २९ महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे. तसेच, या चित्रपटाने १६ पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत.

    दिग्दर्शन आणि स्टारकास्ट

    चित्रपटाची निर्मिती जयंत दिगंबर सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर आणि रिगा मल्होत्रा यांनी केली असून, जयंत दिगंबर सोमलकर यांनीच चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

    चित्रपटात नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी, मानसी पवार यांसारख्या नव्या दमाच्या कलाकारांचा समावेश आहे.

    ७ मार्चला ‘स्थळ’ येणार तुमच्या भेटीला!

    आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवलेला ‘स्थळ’ हा चित्रपट आता ७ मार्च रोजी थेट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    लग्नसंस्थेतील रूढी, सध्या बदलत चाललेली मानसिकता, तसेच एक वेगळ्या दृष्टीकोनातून स्थळ पाहण्याची प्रक्रिया अनुभवायची असेल, तर हा चित्रपट नक्की पाहा!

  • विश्व मराठी संमेलन २०२५  सांगता समारंभ दिमाखात संपन्न

    पुणे – मराठी संस्कृतीचा भव्य सोहळा संपन्न

    पुणे, फेब्रुवारी २०२५ – मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ चा सांगता समारंभ दिमाखात पार पडला. या संमेलनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक, आणि कलाक्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थित राहून मराठी अभिमानाची मशाल अधिक तेजस्वी केली.

    या भव्य सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अभिनेते रितेश देशमुख, अभिनेते सयाजी शिंदे, साहित्यिक सदानंद मोरे, उल्लासदादा पवार, लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, राजेश पांडे, रवींद्र शोभणे यांसारखे नामवंत उपस्थित होते.

    राज ठाकरे यांच्या हस्ते ‘कलारत्न’ पुरस्कार प्रदान

    मा. राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना ‘कलारत्न’ पुरस्कार प्रदान

    समारंभात अभिनेते रितेश देशमुख यांना “कलारत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो. पुरस्कार स्वीकारताना रितेश देशमुख म्हणाले,

    “मराठी भाषा आणि सिनेविश्वाने मला खूप काही दिलं आहे. आज हा सन्मान स्वीकारताना मी प्रचंड कृतज्ञ आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याला पुढे नेण्यासाठी मी कायम प्रयत्न करत राहीन.”

    राज ठाकरे यांचे साहित्यिकांना मार्गदर्शनाचे आवाहन

    यावेळी मा. राज ठाकरे यांनी साहित्यिक व लेखकांना समाजप्रबोधनाची जबाबदारी उचलण्याचे आवाहन केले. ते म्हणाले,

    “पूर्वी साहित्यिक राजकीय आणि सामाजिक विषयांवर स्पष्ट मत मांडत असत. मात्र, आज तसे दिसत नाही. केवळ पुस्तके लिहून उपयोग नाही, तर साहित्यिकांनी समाजाला मार्गदर्शन केले पाहिजे. मराठी पुस्तकांमधील ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राने पुढे जाणे गरजेचे आहे.”

    मराठी भाषा संवर्धनासाठी ठोस पावले उचलणार – मंत्री उदय सामंत

    राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सरकारच्या आगामी योजनांची माहिती दिली.

    “राज साहेबांच्या हस्ते रितेशचा सत्कार व्हावा, ही आमची इच्छा होती. आज व्यासपीठावरून राज साहेबांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी विशेष क्षण आहे. मराठीच्या भल्यासाठी आणि संवर्धनासाठी ज्या काही सूचना येतील, त्या पूर्ण करण्याची ग्वाही मी मराठी भाषा मंत्री म्हणून देतो.”

    पुणेकरांची उत्स्फूर्त उपस्थिती

    या भव्य संमेलनाच्या सांगता सोहळ्यास हजारो पुणेकरांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. संपूर्ण संमेलनात मराठी भाषेचा अभिमान, साहित्यिकांचा सन्मान, आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा दृढ निश्चय दिसून आला.

  • झी मराठीवर नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित – रहस्य, प्रेम आणि आईच्या मायेची अनोखी गोष्ट

    आईचं प्रेम मरणानंतरही संपत नाही – ‘तुला जपणार आहे’

    झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे’ या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, यामध्ये आईच्या अतूट प्रेमाची आणि त्यागाची कथा सांगण्यात येणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री शर्वरी लोहोकरे झी मराठीवर कमबॅक करत आहे. तसेच, नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

    आईच्या मायेची अलौकिक गोष्ट

    ‘तुला जपणार आहे’ ही एका आईच्या निस्वार्थ प्रेमाची कथा आहे – अंबिकाची, जिने आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी स्वतःला वाहून घेतलं आहे. तिच्या मृत्यूनंतरही ती आत्मारूपात आपल्या कुटुंबाच्या भोवती असते.

    मात्र, मृत्यूनंतर तिला घरातील बदललेले फासे, तिच्या मुलीच्या आयुष्याला मिळालेला धोक्याचा इशारा, आणि वडिल-मुलीच्या नात्यात निर्माण झालेली दरी दिसू लागते.

    अंबिकाच्या हृदयातील व्याकूळ साद देवी ऐकते आणि तिच्या मुलीच्या रक्षणासाठी मीराला पाठवते – एक अशी मुलगी, जिला देवीवर विश्वास नाही, जी तिच्या नियतीवर नाराज आहे.

    परंतु, या गूढ घटनेत एक रहस्य दडले आहे – कारण मीरा ही एकमेव व्यक्ती आहे, जी आत्मारूपातील अंबिकाला पाहू शकते, तिला स्पर्श करू शकते आणि तिच्यासोबत देवळाच्या पायऱ्याही चढू शकते.

    या दोघींच्या नात्यामागील गूढ काय आहे? अंबिकाच्या मदतीने मीरा तिच्या मुलीचे जीवन कसे वाचवणार?

    हॉरर, थ्रिलर आणि कौटुंबिक नाट्याचा संगम

    ‘तुला जपणार आहे’ ही मालिका फक्त कौटुंबिक नात्यांची गोष्ट नसून, यात थरार, रहस्य आणि अलौकिक घटना यांचा रोमांचकारी प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

    मालिकेतील दृश्य larger-than-life असणार आहेत, ज्यात VFX चा प्रभावी वापर प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे.

    कलात्मक टीम आणि निर्मिती

    या मालिकेच्या कथा-पटकथेचे लेखन चेतन सैंदाणे यांनी केले असून, संवाद लेखन पूर्णानंद वांढेकर यांनी केले आहे. मालिकेचे निर्माते आयरिस प्रोडक्शन्सचे विद्याधर पाठारे आहेत.

    आईच्या प्रेमाची अलौकिक ताकद अनुभवण्यासाठी तयार व्हा

    “जेव्हा आईच्या प्रेमाची साद देवी ऐकते, तेव्हा फक्त संरक्षण नाही, तर चमत्कार घडतो!”
    ही प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावना सांगणारी कथा आहे.

    या अद्भुत प्रवासाचा साक्षीदार होण्यासाठी पाहायला विसरू नका –

    📺 ‘तुला जपणार आहे’, १७ फेब्रुवारीपासून, रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर!

  • इंद्रायणी मालिकेने केले ३०० भाग पूर्ण

    इंद्रायणी मालिकेचा प्रवास – ३०० भागांचा टप्पा गाठत प्रेक्षकांच्या मनात स्थान

    कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आनंदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, व्यंकू महाराजांची शिकवण आणि संस्कार यामुळेच ही मालिका रसिकांच्या मनाला भावत आहे.

    इंदूच्या प्रवासातील नवीन ट्विस्ट

    आनंदीबाई इंदूच्या बाजूने उभी राहते, पण का? स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आणि पैशाच्या हव्यासापोटी आनंदी इंदूचा वापर करत आहेत, हे व्यंकू महाराजांना गोपाळने समजावले. आता आनंदीबाईचा खरा चेहरा इंदूच्या समोर आणता येईल का? इंदू त्यावर विश्वास ठेवेल का? हे बघणे रंजक असणार आहे.

    ३०० भागांचे यश – वृक्षारोपणाचा सुंदर उपक्रम

    पाहा ‘इंद्रायणी’ दररोज संध्या. ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर!

    ३०० भागांच्या निमित्ताने संपूर्ण टीमने सेटवर वृक्षारोपण केले. लहान मुलांना शाळेमध्ये झाडांचे, पर्यावरणाचे महत्त्व हे नेहमी सांगितले जाते. त्यामुळेच सेटवरील बच्चेकंपनीने झाडे लावली आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून इंद्रायणी मालिकेच्या संपूर्ण टीमने पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश दिला आहे.

    स्वानंद बर्वे – “व्यंकू महाराजांची भूमिका खूप शिकवून गेली”

    व्यंकू महाराजांची भूमिका साकारणारा स्वानंद बर्वे म्हणाला, “इंद्रायणी मालिकेचे ३०० भाग पूर्ण होत आहेत, याचा खूप आनंद आहे. या भूमिकेने मला वारकरी संप्रदाय, कीर्तन आणि अभंग यांचा जवळून अनुभव दिला. लहान इंदूसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे व्यंकू महाराज हे पात्र उभं करता आलं. प्रेक्षकांना हे पात्र आणि मालिका आवडते आहे, त्याची पावती मिळते आहे, ही माझ्यासाठी खूप समाधानकारक बाब आहे.”

  • ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रदर्शित!

    बॅकबेंचर्सच्या धमाल रियुनियनची झलक – हास्याचा जबरदस्त डोज देणारा चित्रपट

    रियुनियन म्हणजे धमाल-मस्ती! आणि जेव्हा बॅकबेंचर्स एकत्र येतात, तेव्हा गोंधळ, मजा आणि हास्य यांचा स्फोट होतो. अशाच एका धमाल रियुनियनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, ज्यात ‘इकडे आड तिकडे विहीर’, ‘आगीतून फुफाट्यात’, ‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणींमधून बॅकबेंचर्सची मजेशीर ओळख करून देण्यात आली आहे.

    या भन्नाट रियुनियनची गंमत प्रत्यक्ष अनुभवायची असेल, तर ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट २८ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर येत आहे.

    वेगळ्या शीर्षकासह एक हटके धमाका!

    चित्रपटाच्या अनोख्या शीर्षकामुळेच याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या पोस्टरने चाहत्यांच्या अपेक्षा आणखी वाढवल्या होत्या आणि आता चित्रपटाचा धमाल टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

    टिझरमध्ये दिसणारा पार्टीतला गोंधळ, खुमासदार संवाद, आणि कलाकारांची कमाल केमिस्ट्री काहीतरी जबरदस्त मनोरंजन आणणार आहे, हे नक्कीच.

    तगडी कलाकारांची भट्टी – स्वप्नील जोशी ते प्रार्थना बेहरे पर्यंत धमाल टीम

    या चित्रपटात अनेक दमदार कलाकारांची तगडी फौज दिसणार आहे:

    🎭 स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रभाकर मोरे – यांचा जबरदस्त अभिनय आणि केमिस्ट्री प्रेक्षकांना पोट धरून हसवेल.

    💃 नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे – हे सर्व कलाकार या धमाल पार्टीत हास्याचा तडका लावणार आहेत.

    प्रेक्षकांसाठी धमाल मनोरंजनाची ट्रीट!

    ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक हटके मनोरंजनाचा डोस ठरणार आहे. धमाल-मस्ती, नॉस्टॅल्जिक आठवणी, आणि अफलातून संवाद यांचा मिलाफ असलेला हा चित्रपट २८ फेब्रुवारीला थिएटरमध्ये आपल्याला भरपूर हसवायला आणि आनंद द्यायला येतोय.

    📅 तारीख लक्षात ठेवा – २८ फेब्रुवारी २०२५!
    🎬 तुम्ही ‘चिकी चिकी बुबूम बुम’ बघण्यासाठी उत्सुक आहात का? कमेंट करून सांगा! 😃🍿

  • नागा चैतन्य और साई पल्लवी की फिल्म ‘तंडेल’ का ट्रेलर हुआ रिलीज़

    देशभक्ति, रोमांस और जबरदस्त एक्शन से भरपूर ‘तंडेल’ का ट्रेलर दर्शकों को कर रहा है रोमांचित

    ‘तंडेल’ का बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज़ हो चुका है और यह धमाकेदार एक्शन, इमोशन और रोमांच से भरपूर नज़र आ रहा है। नागा चैतन्य और साई पल्लवी की जोड़ी इस बार एक ऐसी कहानी लेकर आ रही है, जो एक मछुआरे की ज़िंदगी और उसकी संघर्षपूर्ण यात्रा को दिखाएगी। फिल्म की कहानी एक भारतीय मछुआरे (नागा चैतन्य) के इर्द-गिर्द घूमती है, जिसे अंतरराष्ट्रीय जल में पाकिस्तान की सेना द्वारा पकड़ लिया जाता है।

    ट्रेलर में फिल्म की भावनात्मक गहराई और रोमांचक एक्शन की झलक साफ दिखती है। इसमें नागा चैतन्य और साई पल्लवी के ऑन-स्क्रीन रिश्ते की कोमलता, संघर्ष की कड़वाहट और देशभक्ति का जज़्बा बखूबी उभरकर सामने आता है। इसके अलावा, ट्रेलर के एक्शन सीक्वेंस, एड्रेनालाईन-पंपिंग दृश्यों और दमदार संवादों ने इसे 2025 की सबसे बड़ी ब्लॉकबस्टर फिल्मों में से एक के रूप में स्थापित कर दिया है।

    शानदार परफॉर्मेंस और जबरदस्त स्क्रीन प्रेजेंस

    नागा चैतन्य अपनी सहज लेकिन दमदार स्क्रीन प्रेजेंस के साथ ट्रेलर में छा गए हैं। उनकी गंभीरता, देशभक्ति से ओत-प्रोत संवाद और जबरदस्त एक्शन सीन्स देखकर यह कहना गलत नहीं होगा कि यह उनकी अब तक की सबसे बेहतरीन परफॉर्मेंस में से एक हो सकती है। वहीं, साई पल्लवी ने अपनी भावनात्मक गहराई से किरदार में जान डाल दी है। उनकी और नागा चैतन्य की ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पहले भी ‘लव स्टोरी’ में दर्शकों को खूब पसंद आई थी और अब ‘तंडेल’ में यह जोड़ी फिर से जादू बिखेरने के लिए तैयार है।

    ग्रैंड प्रोडक्शन वैल्यू और सिनेमैटिक अनुभव

    ‘तंडेल’ केवल एक रोमांटिक-थ्रिलर नहीं, बल्कि एक इमोशनल और विस्मयकारी सिनेमैटिक अनुभव है। फिल्म की भव्यता, शानदार सिनेमैटोग्राफी और प्रोडक्शन डिज़ाइन इसे एक बेहतरीन विज़ुअल ट्रीट बनाते हैं। फिल्म के सेट, स्ट्रक्चर और बैकग्राउंड डिज़ाइन पर दिया गया ध्यान काबिले तारीफ है, जो कहानी को और ज्यादा इंटेंस और रियलिस्टिक बनाता है।

    फिल्म की दमदार टीम

    इस फिल्म में केवल बेहतरीन कलाकार ही नहीं, बल्कि तकनीकी रूप से भी मजबूत टीम मौजूद है:

    🎵 संगीत: राष्ट्रीय पुरस्कार विजेता देवी श्री प्रसाद
    🎥 सिनेमैटोग्राफी: शमदत
    ✂️ संपादन: राष्ट्रीय पुरस्कार विजेता नवीन नूली
    🎨 कला निर्देशन: श्रीनागेंद्र तंगला


    निर्देशक चंदू मोंडेती के निर्देशन में बनी यह फिल्म गीता आर्ट्स के बैनर तले बनी वासु द्वारा निर्मित है, जबकि इसे अल्लू अरविंद प्रस्तुत कर रहे हैं।

    कब रिलीज़ होगी ‘तंडेल’?

    ‘तंडेल’ 7 फरवरी 2025 को बड़े पर्दे पर धमाका करने के लिए तैयार है।

    यह फिल्म देशभक्ति, रोमांस, एक्शन और इमोशनल ड्रामा का बेहतरीन मिश्रण होने वाली है। यदि आप थ्रिलिंग और हार्ट-टचिंग सिनेमा के शौकीन हैं, तो इस फिल्म को सिनेमाघरों में देखना न भूलें!

    🔥 क्या आप ‘तंडेल’ देखने के लिए उत्साहित हैं? नीचे कमेंट करके हमें बताएं! 🎬💥