‘देऊळ बंद २’ चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज; आता होणार थेट ‘देवाची परीक्षा’!

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवरून देवालाच आव्हान; प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद २’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवणाऱ्या ‘देऊळ बंद’ चित्रपटानंतर प्रेक्षक ज्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. ‘वटवृक्ष एण्टरटेन्मेंट’ निर्मित आणि प्रविण विठ्ठल तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा थरारक, भावनिक आणि… Read More ‘देऊळ बंद २’ चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज; आता होणार थेट ‘देवाची परीक्षा’!

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये ‘अभिजात मराठी OTT’चे जागतिक लाँच

भारत पॅव्हेलियनमध्ये मराठी OTT चे जागतिक स्तरावर दमदार प्रतिनिधित्वमराठी सिनेमा, संस्कृती आणि डिजिटल कथाकथनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जाणारा *‘अभिजात मराठी OTT’*चा जागतिक लाँच सोहळा १६ मे २०२६ रोजी कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील भारत पॅव्हेलियन येथे पार पडणार आहे. मराठी मनोरंजनविश्वासाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जात असून, जागतिक स्तरावर मराठी डिजिटल कंटेंटला नवी ओळख मिळवून देण्याच्या… Read More कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये ‘अभिजात मराठी OTT’चे जागतिक लाँच

क्षितिज पटवर्धन यांच्या ‘भूमिका’ नाटकाचा मोठा गौरव; मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समावेश!

२२ मे रोजी ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’मधील ‘द ग्रँड थिएटर’ येथे विशेष प्रयोगाचे निमंत्रण समकालीन मराठी रंगभूमीवर गेल्या काही काळात विशेष चर्चेत राहिलेलं ‘भूमिका’ हे नाटक आता एका नव्या आणि अभिमानास्पद टप्प्यावर पोहोचलं आहे. लेखक क्षितिज पटवर्धन लिखित या गाजलेल्या नाटकाचा अधिकृतपणे मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. व्यावसायिक यश… Read More क्षितिज पटवर्धन यांच्या ‘भूमिका’ नाटकाचा मोठा गौरव; मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समावेश!

राधिका सुभेदारची ‘सनई चौघडे’मध्ये एन्ट्री; जय खानोलकरच्या ऑफिसमध्ये घडणार मोठे बदल

झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. जय आणि शर्वरी यांच्या आयुष्यात आता एका अशा व्यक्तीची एन्ट्री होणार आहे, जिने संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून लोकप्रिय झालेली राधिका सुभेदार आता *‘सनई चौघडे’*मध्ये दिसणार असून अभिनेत्री अनिता दाते पुन्हा एकदा ही गाजलेली भूमिका… Read More राधिका सुभेदारची ‘सनई चौघडे’मध्ये एन्ट्री; जय खानोलकरच्या ऑफिसमध्ये घडणार मोठे बदल

स्वानंदीचा भाबडेपणा जपत तेजश्री प्रधानने साकारला ‘ड्रंक सीन’

मराठी मालिकांमधील नायिकांच्या भूमिका अनेकदा ठरावीक चौकटीत अडकलेल्या दिसतात. मात्र आता झी मराठीवरील ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत प्रेक्षकांना एक वेगळं वळण पाहायला मिळणार आहे. मालिकेतील स्वानंदी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकताच एक खास ‘ड्रंक सीन’ शूट केला असून, त्यामागचा अनुभव तिने अत्यंत मोकळेपणाने शेअर केला आहे. ‘नायिकेची प्रतिमा जपत हा सीन करणं… Read More स्वानंदीचा भाबडेपणा जपत तेजश्री प्रधानने साकारला ‘ड्रंक सीन’

पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका देणारा ‘कप बशी’

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगळ्या आणि मनोरंजक कथानकांवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच आता पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक विचारांची जोड देणारा ‘कप बशी’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामधून एक वेगळी आणि खुसखुशीत कौटुंबिक कथा पाहायला मिळणार असल्याची झलक समोर आली… Read More पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका देणारा ‘कप बशी’

नव्या दमाच्या कलाकारांसह रंगणार ‘जोडीचा मामला’

मराठी रंगभूमी सध्या नव्या विचारांनी, तरुण ऊर्जेने आणि समकालीन विषयांनी समृद्ध होताना दिसत आहे. बदलत्या काळानुसार नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि आजच्या पिढीच्या भावविश्वावर आधारित नवे प्रयोग रंगभूमीवर पाहायला मिळत आहेत. जुन्या-जाणत्या कलाकारांसोबत नव्या कलाकारांनाही व्यासपीठ मिळत असून, त्यातून मराठी नाटकांना एक वेगळीच ताजेपणाची झळाळी प्राप्त होत आहे. अशाच नव्या दमाच्या कलाकारांना घेऊन ‘दृष्टी’ आणि ‘अद्वैत… Read More नव्या दमाच्या कलाकारांसह रंगणार ‘जोडीचा मामला’

‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे यांची रहस्यमयी एन्ट्री! 👁️✨

अनुभवी थिएटर आर्टिस्ट आणि कुशल मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मिता पायगुडे अंजुटे आता ‘घबाडकुंड’ चित्रपटातून एका गूढ आणि थरारक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत 👀🔥 चित्रपटात त्या ‘रंगी’ ही व्यक्तिरेखा साकारत असून, ब्लॅक मॅजिकच्या जगात वावरणारी ही भूमिका कथानकाला वेगळाच थरार देणार आहे 😨✨“नजरेत धग अन् रग हिच्या अंगी, भल्या-भल्यांना घाम फोडते… नाव हिचं… Read More ‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे यांची रहस्यमयी एन्ट्री! 👁️✨