
-
तस्करीमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर झळकणार इम्रान हाश्मी सोबत!

वर्ष संपताना अमृताचं प्रेक्षकांसाठी नवं सरप्राईज
२०२५ हे वर्ष संपत असताना अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या चाहत्यांना एकामागून एक खास सरप्राईज दिली आहेत. अभिनयाच्या विविध माध्यमांमध्ये सातत्याने स्वतःला नव्याने सादर करणारी अमृता नव्या वर्षात रंगभूमीवर पदार्पण करणार असतानाच, वर्षाच्या अखेरीस नेटफ्लिक्सवरील एका नव्या कोऱ्या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकताना दिसणार आहे.
नेटफ्लिक्सवर येणारी ‘तस्करी’ वेब सीरिज
नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘तस्करी’ या वेब सीरिजमध्ये अमृताची भूमिका विशेष लक्ष वेधून घेणारी असल्याचं समजतंय. या सीरिजमध्ये तिच्यासोबत अनेक बॉलिवूडमधील बडे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. थरारक कथानक, वेगवान घडामोडी आणि दमदार व्यक्तिरेखांमुळे ‘तस्करी’बद्दल आधीपासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
पहिल्यांदाच अमृता–इम्रान हाश्मीची जोडी

‘तस्करी’मध्ये पहिल्यांदाच अमृता खानविलकर आणि बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नव्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या असून दोघेही या थरारक विश्वात नेमक्या कोणत्या भूमिकांमध्ये दिसणार, याची उत्सुकता कायम आहे.
सोशल मीडियावर टिझर, कॅप्शनने वेधलं लक्ष

अमृताने नुकताच ‘तस्करी’चा टिझर सोशल मीडियावर शेअर केला असून तिच्या कॅप्शनने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. “तस्करीच्या दुनियेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे,” असं म्हणत तिने हा टिझर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. इम्रान हाश्मी सोबत ती नेमकी कोणती भूमिका साकारणार आणि या तस्करीच्या विश्वात अमृताचा रोल काय असणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
वर्षभर नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्स, वर्षाअखेरीसही निखळ मनोरंजन
वर्षभर विविध आणि नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अमृता खानविलकर वर्ष संपताना देखील प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणार, यात शंका नाही. त्याचबरोबर येणाऱ्या वर्षात तिला रंगभूमीवर पाहण्यासाठीही प्रेक्षक तितकेच उत्सुक असल्याचं चित्र दिसून येत आहे.
-
शरद पोंक्षेंच्या त्या ‘सावली’ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला!

प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘हिमालयाची सावली’ हे अजरामर नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर अवतरले आहे. मोरया भूमिका आणि अथर्व निर्मित हे नाटक समाजासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ‘हिमालयाच्या’ पाठीशी उभ्या राहिलेल्या ‘सावली’चे, म्हणजेच त्यांच्या पत्नीचे, मन हेलावून टाकणारे आयुष्य मांडते. या महत्त्वपूर्ण भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई दिसत असून, पोंक्षे यांनी या नाटकाच्या भावनिक गाभ्यावर आणि आजच्या तरुण पिढीसाठी असलेल्या त्याच्या महत्त्वाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. या नाटकात विघ्नेश जोशी, जयंत घाटे, सृजन देशपांडे, प्राची रिंगे, सोनाली राजे, चैतन्य राव, ओंकार कर्वे आणि विजय मिरगे या कलाकारांचा समावेश आहे.
नानासाहेब आणि त्यांच्या सावलीची वेदना

शरद पोंक्षे या नाटकात ‘नानासाहेब’ ही भूमिका साकारत आहेत, जे आपल्या आयुष्यात समाजकार्याला सर्वोच्च स्थान देतात. आज आपण आजूबाजूला जे समाजकारण आणि राजकारण पाहतो, त्यापेक्षा वेगळ्या पातळीवर उभं राहणारं हे समाजकारण आहे, असं पोंक्षे सांगतात. त्यांच्या मते, हे नाटक नानासाहेबांचं नसून त्यांच्या ‘सावली’चं आहे. आयुष्यात बायका-मुलांचा संसार किंवा समाजाचा प्रपंच यापैकी एकाच गोष्टीशी प्रामाणिक राहता येतं, दोन्हींची मोट बांधण्याचा प्रयत्न केला तर माणूस दोन्हीकडे पराभूत होतो—हे कटू सत्य हे नाटक ठसठशीतपणे समोर आणतं.
इतिहासातील ‘हिमालय’ आणि त्यांच्या सावल्या

छत्रपती शिवाजी महाराज, मोहनदास करमचंद गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी कर्वे यांसारखी अनेक महान व्यक्तिमत्त्वे म्हणजे समाजाचे ‘हिमालय’. पण त्यांच्या पत्नींच्या, म्हणजेच त्यांच्या ‘सावल्यांच्या’ वाट्याला आलेलं आयुष्य किती कठीण होतं, याकडे इतिहास फारसं पाहत नाही. मोठ्या माणसाची बायको म्हणून ओळख मिळते, पण त्या ओळखीपलीकडे सुख किती मिळालं, हा प्रश्न या नाटकातून ठळकपणे उभा राहतो. ही माणसं कधी एका घराची नव्हतीच; ती समाजाची होती, आणि म्हणूनच त्यांच्या सावल्या आयुष्यभर झिजत राहिल्या—हीच या नाटकाची मध्यवर्ती वेदना आहे.
शृजा प्रभूदेसाई यांचे संवेदनशील योगदान
नानासाहेबांच्या ‘सावली’ची भूमिका अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई यांनी अत्यंत संयमित आणि संवेदनशील पद्धतीने साकारली आहे. अनेक वर्षे पतीच्या ध्येयासाठी स्वतःच्या इच्छांना, सुखाला आणि अपेक्षांना बाजूला ठेवणाऱ्या स्त्रीचा अंतर्गत संघर्ष त्यांच्या अभिनयातून प्रभावीपणे उलगडतो. नानासाहेबांच्या महानतेमागे उभी असलेली ही शांत, न बोलणारी ताकद शृजा प्रभूदेसाई यांच्या अभिनयामुळे अधिक ठळक होते.
भव्य मांडणी, स्पष्ट शिकवण आणि प्रेक्षकांना आवाहन
हिमालयाची सावली हे नाटक केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित राहत नाही, तर खऱ्या आयुष्यात मूल्यांशी प्रामाणिक राहण्याचं भान देतं. आपण जे काही बनू इच्छितो, ते बनताना आपल्या कामाशी किती निष्ठावान राहतो, समाजासाठी काम करताना वैयक्तिक आयुष्याची किंमत काय असते, हे प्रश्न हे नाटक प्रेक्षकांसमोर ठेवतं. दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी १९१० सालच्या काळातील भाषा, पेहराव, जीवनशैली आणि वातावरण अत्यंत बारकाईने रंगमंचावर साकारलं आहे.
आजच्या काळात कमी पात्रांची, कमी खर्चाची नाटकं मोठ्या प्रमाणावर येत असताना, हिमालयाची सावलीसारखं भव्य, आशयघन आणि खर्चीक नाटक टिकून राहणं हे प्रेक्षकांच्या पाठबळावरच अवलंबून आहे. नाटक म्हणजे काय, उत्तम लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि अभिनय कसा असावा, हे अनुभवायचं असेल तर हिमालयाची सावली नक्की पाहावी, असं हे नाटक ठामपणे सुचवतं.
-
३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का’ बालनाट्य अव्वल

१९ बालनाट्यांमध्ये रंगलेली अटीतटीची चुरस
सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रविकिरण संस्थेची ३९ वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात पार पडली. ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे झालेल्या या स्पर्धेत १९ दर्जेदार बालनाट्यांनी सहभाग घेतला. कल्पनाशक्ती, अभिनय आणि विषयवैविध्यामुळे ही स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरली.
‘अडलंय का’ला पाच प्रमुख पुरस्कार

कल्याण-वरप येथील सेक्रेड हार्ट स्कुलच्या ‘अडलंय का’ या बालनाट्याने सर्वोत्कृष्ट बालनाट्याचा प्रथम पुरस्कार पटकावत स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले. यासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट नेपथ्य आणि उत्कृष्ट प्रकाश योजना असे पाच पुरस्कार या नाटकाने पटकावले.
द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी

दिंडी ‘झ’ प्रतिष्ठानच्या ‘दिव्या खाली दौलत’ या बालनाट्याला द्वितीय क्रमांक मिळाला, तर मुक्तछंद नाट्यसंस्थेच्या ‘रंग जाणिवांचे’ या बालनाट्याने तृतीय क्रमांक पटकावला. अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाऊंडेशन, पुणे यांच्या ‘सर्कस’ या बालनाट्याला स्पेशल ज्युरी अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती आणि परीक्षक मंडळ

या स्पर्धेसाठी सन मराठी वाहिनीचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. परीक्षणाची जबाबदारी अभिनेत्री पूर्वा पवार, नाट्यदिग्दर्शक हेमंत सुहास भालेकर आणि नाट्यसमीक्षक नंदकुमार परशुराम पाटील यांनी सांभाळली.
बालरंगभूमीबद्दल मान्यवरांचे मत

दीपक राजाध्यक्ष यांनी बालकलावंतांच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करत हे कलाकार उद्याचे चमकते तारे असतील, असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्ष नागेश नामदेव वांद्रे यांनी रविकिरण बालनाट्य स्पर्धेच्या ३९ वर्षांच्या परंपरेचा अभिमान व्यक्त केला, तर माजी अध्यक्ष विजय टाकळे यांनी ही परंपरा पुढील पिढ्यांनी जपल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
स्पर्धेचा संपूर्ण निकाल
अभिनय, लेखन, दिग्दर्शन, संगीत, प्रकाश योजना, नेपथ्य आणि विविध श्रेणींमधील पारितोषिके विविध शाळा व संस्थांच्या बालनाट्यांना प्रदान करण्यात आली. १९ उत्कृष्ट बालनाट्यांमधून अंतिम निकाल जाहीर करत रविकिरण बालनाट्य स्पर्धेने बालरंगभूमीची समृद्ध परंपरा अधिक भक्कम केली.
-
बे दुणे तीन मधील क्षितीश दातेचा वैयक्तिक आणि भावनिक दृष्टिकोन

झी 5 वरील ‘बे दुणे तीन’ची रसिकजनात चर्चा
काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली झी 5 वरील वेब सिरीज बे दुणे तीन सध्या चर्चेत आहे. तरुण प्रेक्षकांना विशेषतः भावणारी ही मालिका वेगळ्या विषयावर आधारित असून आजच्या पिढीच्या नातेसंबंधांवर भाष्य करते. समकालीन जीवनशैली, निर्णयांची गुंतागुंत आणि भावनिक संघर्ष या सगळ्यांचा सुंदर मिलाफ या कथेत पाहायला मिळतो.
अभय–नेहाची कथा आणि पालकत्वाचा अनपेक्षित प्रवास

अभय आणि नेहा यांची गोष्ट आजच्या काळातील आहे. पालक बनण्याचा निर्णय घेतलेल्या या दोघांच्या आयुष्यात एक नाही, दोन नाही तर तब्बल तीन मुलं येणार असल्याचं समजल्यावर त्यांच्या मनाची झालेली घालमेल, भीती, उत्सुकता आणि गोंधळ या मालिकेत प्रभावीपणे उलगडतो. आजच्या तरुण दांपत्यांसमोर उभ्या राहणाऱ्या वास्तव प्रश्नांना ही कथा जवळून भिडते.
क्षितीश दातेचा दृष्टिकोन
या मालिकेत अभयची भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दाते या भूमिकेमुळे स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला, याबद्दल बोलताना म्हणतो की, “या पिढीचा प्रतिनिधी म्हणून माझा असा विश्वास आहे की मतभेद आणि वेगवेगळ्या मतांना आपण तयार असायला हवं, एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याऐवजी. अभय–नेहासारखी परिस्थिती माझ्या आयुष्यात आली तर मी हे जाणूनच तिला सामोरा जाईन की मतभेद असतील, तणाव येतील, कधी कधी संघर्षही होईल—पण त्याचबरोबर प्रेमही असेल, जे सगळं एकत्र ठेवेल.”
कुटुंब हेच भावनिक केंद्र
क्षितीश पुढे सांगतो की त्याच्यासाठी कुटुंब हे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचे सगळे भावनिक धागे कुटुंबाशी जोडलेले असून घरात काही बिनसलं तर सगळं आयुष्यच विस्कळीत झाल्यासारखं वाटतं. मात्र घरात सगळं ठीक असेल, तर बाहेर कितीही अडचणी आल्या तरी तो शांत आणि आनंदी राहू शकतो. त्याच्या निर्णयांवर, भावना आणि विचारांवर कुटुंबाचा मोठा प्रभाव आहे.
भूमिकांमधून उमटणारी वैविध्याची ओढ
आजच्या काळातील कलाकारांचा कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बे दुणे तीनमधून स्पष्टपणे दिसतो. केवळ लोकप्रियतेपुरती मर्यादित न राहता, आशयघन आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याची इच्छा क्षितिज दातेसारख्या कलाकारांमध्ये प्रकर्षाने जाणवते. हीच वैचारिक परिपक्वता बे दुणे तीनसारख्या कथांना अधिक अर्थपूर्ण बनवते.
-
Rajni 2.0 Marks the Return of Value-Driven Storytelling: Anupam Kher

A Powerful Endorsement at the Success Press Meet
At the success press meet of Rajni 2.0 in Mumbai, veteran actor Anupam Kher described the reboot as “the return of value-driven storytelling,” praising filmmaker Karan Razdan for reviving a legacy that once shaped India’s moral and social consciousness through television. His words set the tone for an evening that celebrated purpose-led content over fleeting trends.
Why Rajni 2.0 Matters Today

Calling Rajni 2.0 a timely revival, Kher noted that at a time when content often chases popularity, the series brings back truth, courage, and conscience. He highlighted the boldness required to reintroduce a fearless female voice to mainstream television, stating that such conviction is rare and deeply necessary in today’s media landscape.
The Strength of Public Broadcasting
Kher also emphasised the importance of the show’s association with DD National and Waves OTT. He underlined that public broadcasting carries a certain purity and reach, ensuring that Rajni 2.0 remains accessible to families across generations, just as the original series once did. According to him, this widespread accessibility is the real triumph of the reboot.
Karan Razdan on the Spirit of Rajni

Creator, writer, and director Karan Razdan spoke passionately about the soul of the series. He explained that Rajni has never been just a character but an idea — a reflection of every individual who refuses to accept injustice. With Rajni 2.0, Razdan aimed to hold up a mirror to contemporary society, reminding audiences that while challenges evolve, courage must remain constant.
A Crusader for a Changing India
Reflecting on the show’s modern relevance, Razdan pointed out that today’s India faces new forms of exploitation, from digital fraud to institutional neglect. Rajni’s daughter, he said, steps into these realities with the same fearlessness, proving that the spirit of Rajni does not fade but adapts with time.
Doordarshan’s Legacy of Responsible Content
Prasar Bharati CEO Gaurav Dwivedi, IAS, praised Rajni 2.0 for staying true to Doordarshan’s long-standing commitment to responsible and empowering storytelling. He described the series as a reaffirmation of DD National’s role in producing content that informs, uplifts, and strengthens social awareness.
A Legacy That Continues to Speak
With Waves OTT streaming the episodes free of cost, Rajni 2.0 now reaches audiences across geographies and age groups. The evening marked more than a celebration of success — it stood as a tribute to creative conviction, ethical storytelling, and the enduring power of a crusader whose voice continues to shape conversations. Rajni 2.0 airs on DD National and streams on Waves OTT, carrying forward a legacy where truth remains the loudest hero.
-
‘ह्युमन कोकेन’चा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित

अंधारमय, धोकादायक आणि भयावह वास्तवाने प्रेक्षक स्तब्ध
‘ह्युमन कोकेन’चा ट्रेलर अखेर विविध माध्यमांवर प्रदर्शित झाला असून काही क्षणांतच प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. धक्कादायक दृश्यांची मालिकाच जणू या ट्रेलरमध्ये उलगडत जाते. गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार आणि अस्तित्वासाठी सुरू असलेल्या निष्ठूर संघर्षाच्या लपलेल्या जगाचे उघड, क्रूर आणि निःसंकोच चित्रण यातून दिसते.
पुष्कर जोगचा हिंदी पदार्पणातील वेगळा अवतार

या ट्रेलरमध्ये पुष्कर जोग अगदी नव्याच रूपात झळकतो. तो पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून, एका भयावह जाळ्यात अडकलेल्या कैद्याची भूमिका साकारत आहे. जिथे सुटकेची किंचितही शक्यता उरलेली नाही, अशी असहाय परिस्थिती त्याच्या भूमिकेतून प्रभावीपणे उलगडते.
ग्लॅमरस इशिता राजचा गंभीर अभिनय

रोमँटिक आणि हलक्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी इशिता राज प्रथमच एका काळोख्या आणि तीव्र व्यक्तिरेखेत दिसते. पुष्करसोबत कैद झालेली तिची भूमिका ट्रेलरला भावनिक खोली देते आणि प्रत्येक फ्रेममधील तणाव अधिक गडद करते.
सिद्धांत कपूर आणि जाकीर हुसेन यांचा प्रभावी अभिनय
सिद्धांत कपूर आपल्या हटके आणि धाडसी लूकमुळे लक्ष वेधून घेतो. त्याचे रूप आणि देहबोली रहस्य आणि अस्वस्थता निर्माण करणारी आहे. तर ज्येष्ठ अभिनेते जाकीर हुसेन अंगावर काटा आणणाऱ्या भूमिकेत दिसत असून, पडद्यावर त्यांची उपस्थितीच भीती निर्माण करण्यास पुरेशी ठरते.
अमानुष वास्तवाभोवती गुंफलेली कथा
‘ह्युमन कोकेन’ ही कथा अत्यंत महागड्या, नव्या आणि मानवी मन सुन्न करणाऱ्या अमानुष प्रक्रियेतून तयार होणाऱ्या कोकेनच्या प्रकाराभोवती फिरते. या निःसंवेदनशील गर्तेत पुष्कर जोग आणि इशिता राज अडकतात आणि त्यांचा या भयावह अंधाऱ्या जगात कसा ऱ्हास होतो, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ही कथा अंडरवर्ल्डच्या दडवलेल्या आणि अंधाऱ्या वास्तवाचा पर्दाफाश करते.
कलाकारांची भावना आणि दिग्दर्शकाचा दृष्टिकोन
चित्रपटाबद्दल बोलताना पुष्कर जोग म्हणतात की, ‘ह्युमन कोकेन’ने त्यांना कलाकार आणि माणूस म्हणून खोलवर हादरवले आहे. व्यक्तिरेखेतील भीती, असहाय्यता आणि अंतर्गत तडफड कॅमेरा बंद झाल्यानंतरही मनात रेंगाळत राहिल्याचे ते सांगतात.
दिग्दर्शक व लेखक सारिम मोमिन यांच्या मते, हा चित्रपट जाणूनबुजून अस्वस्थ करणारा असून समाजातील लपलेली बाजू उजेडात आणण्यासाठीच तयार करण्यात आला आहे.आंतरराष्ट्रीय धाटणीचा थरारक अनुभव
इशिता राज, सिद्धांत कपूर, जाकीर हुसेन आणि काही प्रभावी ब्रिटिश कलाकारांच्या भूमिकांनी सजलेला हा चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव देतो. सारिम मोमिन लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती स्कार्लेट स्लेट स्टुडिओज, वाइनलाइट लिमिटेड, टेक्स्टस्टेप सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि गूजबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. छायाचित्रण सोपन पुरंदरे, संपादन संदीप फ्रान्सिस आणि पार्श्वसंगीत क्षितिज तारे यांचे आहे.
१६ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार
युनायटेड किंगडममध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रीत झालेला ‘ह्युमन कोकेन’ हा केवळ चित्रपट नसून आपण जाणीवपूर्वक टाळत असलेल्या भयावह आणि काळोख्या जगाचे कठोर प्रतिबिंब आहे. हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
Aditya Dhar: The New-Age Storyteller of Realism Strikes Gold with Dhurandhar

A New Chapter in Realism-Driven Bollywood Storytelling
From delivering the razor-sharp precision of Uri, to producing Article 370, Baramulla, Dhoom Dhaam and now helming the explosive spectacle Dhurandhar, Aditya Dhar continues to strengthen his position as Bollywood’s foremost storyteller rooted in realism. With this third consecutive hard-hitting narrative, Dhar revives the era of multi-starrers but through a gritty, character-first cinematic lens, presenting his most ambitious film to date.A Multi-Starrer That Redefines Big-Screen Energy
Dhurandhar is the kind of film Bollywood rarely ventures into today—stark, muscular, emotionally charged and grounded in lived reality. Leading the ensemble is Ranveer Singh in what many hail as his most volatile performance, joined by Sanjay Dutt, Akshaye Khanna, R. Madhavan, Arjun Rampal, Rakesh Bedi and Sara Arjun. The narrative tracks the untold journey of an “unknown Indian” operating deep inside enemy lines, carrying the weight of a high-risk mission that binds personal sacrifice with national stakes. The film has already recorded the biggest opening of Ranveer Singh’s career.A Blockbuster Backed by Vision and Craft
With glowing reviews from audiences and critics alike, Dhar reclaims the box-office battlefield by delivering a spectacle that stands apart from Bollywood’s usual template. The film is backed by Jio Studios in a strategic partnership with Aditya and Lokesh Dhar’s B62 Studios, a collaboration that allowed the story to be shot as a two-film arc—an ambitious model that maximizes scale, efficiency and audience engagement.
The Dhar Signature: Emotion, Craft and Uncompromising Realism
At the core of Dhurandhar lies Dhar’s writing—volatile yet deeply sensitive, inspired by real events and built with a unique visual grammar. The action feels tactile, the emotions land heavily, and the dialogues resonate long after the moment passes. Ranveer Singh has openly credited Dhar for shaping one of the strongest characters of his career, admitting that he agreed to the film almost instantly after hearing the script. Audience reception and soaring numbers now validate that conviction.What Makes Dhurandhar Work
The magic lies in its convergence of towering performances, a stirring narrative, cutting-edge technical finesse, immersive sound design and a background score that has already won over listeners. Akshaye Khanna’s entry sequence—now going viral—is being compared to Bobby Deol’s iconic “Animal” moment, earning him extraordinary acclaim. The film’s cliffhanger ending sets up a fiery stage for Dhurandhar Part 2, widely anticipated to be a revenge saga—because nothing hooks an audience like unfinished vengeance.A Director Who Blends Reality with Scale
With Dhurandhar, Aditya Dhar cements his reputation as the director of realism with grandeur—a filmmaker who creates cinema that hits as deeply as it entertains. His films prove repeatedly that truth, told boldly, has the largest impact on the audience’s heart.The Rise of a New-Age Blockbuster
Dhurandhar stands as a high-octane action-thriller written, directed and produced by Aditya Dhar, co-produced by Jyoti Deshpande and Lokesh Dhar, and presented by Jio Studios in collaboration with B62 Studios. The film opened to massive box-office numbers and continues to soar through the weekend, reinforcing the arrival of a cinematic phenomenon built on intensity, precision and authenticity. -
Punjab & Sind Bank Opens New Field General Manager Office in Mumbai

Punjab & Sind Bank inaugurated its new Field General Manager (FGM) Office in Mumbai on 09 December 2025, marking a major step in strengthening its regional presence and operational capabilities across western and southern India. The new office was inaugurated by the Bank’s Managing Director & Chief Executive Officer, Mr. Swarup Kumar Saha, in the presence of senior leadership, staff members, and invited dignitaries.
Strategic Importance of the New FGM Office
Speaking at the ceremony, Mr. Saha emphasized the strategic relevance of the Mumbai region in Punjab & Sind Bank’s long-term expansion plans. He noted that the new FGM Office will enhance supervisory oversight, speed up decision-making processes, and provide stronger support to branch operations across multiple states under its jurisdiction.

Press Briefing and Business Performance Update
Following the formal inauguration, Mr. Saha addressed the media in a press briefing where he outlined the Bank’s current performance and future roadmap. He highlighted key financial achievements and reaffirmed the Bank’s commitment to sustainable and customer-centric growth.
Key Business Highlights Shared by the MD & CEO
• Total Business: Punjab & Sind Bank has achieved a total business level of ₹2.40 lakh crore, indicating steady growth momentum.
• CD Ratio: The Credit Deposit Ratio stands at 76.14%, reflecting strong credit expansion.
• Asset Quality: Gross NPA has improved to 2.92%, and the Bank is working towards further reduction in the coming quarters.FGMO Mumbai: Current Performance and Expansion Plans
The newly inaugurated FGMO Mumbai oversees business operations amounting to nearly ₹60,000 crore, including activities under the Large Corporate Banking (LCB) portfolio. The region manages five Zones spread across 12 states, supported by a network of approximately 236 branches.
Looking ahead, the Bank plans an aggressive expansion within the Mumbai FGM jurisdiction. Around 180–200 new branches are proposed to be added over the next one to two years. Additionally, three new Zones—Bhubaneswar, Bangalore, and Raipur—will be established shortly to strengthen the Bank’s regional reach and improve operational efficiency.
Focus on Women Entrepreneurs and Inclusive Growth
During the media interaction, Mr. Saha addressed queries regarding banking products for women entrepreneurs. He shared that Punjab & Sind Bank offers tailored financial solutions such as Self Help Group (SHG) financing, and reaffirmed the Bank’s strategic focus on the Retail, Agriculture, and MSME (RAM) sectors. Women-led enterprises, he noted, form a key segment within the Bank’s growth strategy.
Commitment to Customer-Centric and Responsible Banking
Mr. Saha reiterated Punjab & Sind Bank’s commitment to delivering customer-focused services, strengthening operational excellence, and fostering responsible banking practices. He expressed confidence that the new FGM Office in Mumbai will catalyze improved service delivery, stronger regional performance, and enhanced customer engagement in the years ahead.
-
Dhanush Starrer ‘Tere Ishk Mein’ Storms Past 100-Crore Mark Worldwide

Dhanush starrer Tere Ishk Mein continues its powerful run at the box office, maintaining rock-steady collections in its second weekend. Despite Dhurandhar grabbing a big chunk of screens, Tere Ishk Mein has confidently entered the coveted 100-crore club with its combined Hindi and Tamil business touching Rs.104.94 crore.
Near-100 Crore in Hindi Belt Alone
In the Hindi belt, the film is inching very close to the 100-crore mark on its own merit. With an impressive Rs.97.93 crore net collection in Hindi, Tere Ishk Mein has shown strong momentum even in its second weekend, reflecting solid word of mouth and repeat viewership.
Global Collections Surpass ‘Kuberaa’

Overall, Tere Ishk Mein now stands at Rs.123.82 crore total collection, while its worldwide gross has reached Rs.145.38 crore, thereby surpassing the lifetime worldwide collections of Dhanush’s earlier hit Kuberaa (Rs.138.86 crore). This steady growth cements the film’s status as one of Dhanush’s biggest successes.
Beats the Lifetime Business of Cult Classic ‘Raanjhanaa’
With this performance, Tere Ishk Mein has officially beaten the lifetime collections of Dhanush’s cult classic Raanjhanaa. The Aanand L Rai directorial Raanjhanaa had earned Rs.87.26 crore at the worldwide box office, with Rs.60.35 crore net (Rs.77.37 crore gross) in India. In comparison, Tere Ishk Mein has moved well beyond those figures, proving its strong connect with today’s audience.
Audience Hunger for Dhanush’s Intense Emotional Performances
The box office trend clearly shows that the audience was eager to see Dhanush return to a space filled with intense emotions — love, rage, betrayal and vengeance. The love he received for Kundan in Raanjhanaa and now for Shankar in Tere Ishk Mein proves that Dhanush has a rare ability to disappear completely into emotionally conflicted characters, making each of them unforgettable on screen.
Mastery Over Emotion-Driven Romance-Drama Genre
Dhanush’s deep understanding of this emotion-heavy romantic-drama genre, combined with the outpouring of love from viewers, underlines the trust that audiences and netizens place in him. Whether it is Raanjhanaa or Tere Ishk Mein, viewers know that when Dhanush is at the centre of such stories, they can expect raw intensity, layered emotions and powerful character arcs.
Strong Word of Mouth Keeps the Film Going
Given the extremely positive word of mouth, Tere Ishk Mein is expected to continue with decent collections in the coming week as well. As the film keeps breaking records day after day, the sustained enthusiasm in theatres strongly indicates that the audience has thoroughly connected with both the story and its central performances.
Backed by Aanand L Rai’s Direction and AR Rahman’s Music
Directed by Aanand L Rai and further elevated by ए. आर. रहमान यांच्या इमर्सिव्ह साउंडट्रॅकने, Tere Ishk Mein becomes a complete cinematic experience on the big screen. Alongside Dhanush, the film also stars Kriti Sanon in a pivotal role and is currently running successfully in theatres, continuing its impressive box office journey.
-
Crime-Thriller Sequel Unveiled: Raat Akeli Hai – The Bansal Murders 🔥🎬

Actors at the Trailer Launch Event
Netflix unveiled the gripping trailer of its crime-thriller franchise Raat Akeli Hai: The Bansal Murders in a star-studded launch event attended by Nawazuddin Siddiqui, Chitrangada Singh, Deepti Naval and Sanjay Kapoor, whose presence added to the excitement surrounding the sequel.
About the Sequel
The second installment marks director Honey Trehan’s return, with writer Smita Singh once again shaping the screenplay. Produced by RSVP and MacGuffin Pictures, the film brings back Nawazuddin Siddiqui as the sharp, no-nonsense Inspector Jatil Yadav, supported by a stellar ensemble cast including Chitrangada Singh, Rajat Kapoor, Deepti Naval, Ila Arun, Revathy, Akhilendra Mishra, Priyanka Setia, Sanjay Kapoor and Radhika Apte.
Story and Timeline

Set a few years after the events of the 2020 original, the sequel follows Jatil Yadav as he tackles a chilling cold-blooded murder that unravels long-buried secrets of a powerful family. As the investigation deepens, he is forced to confront the ever-delicate line between truth and consequence.
World Premiere Announcement
The film is set to have its World Premiere at the 56th International Film Festival of India (IFFI), Goa, this November, ahead of its streaming release on Netflix.
Nawazuddin Siddiqui on Returning as Jatil Yadav
Nawazuddin shared, “Jatil Yadav is a character very close to me… coming back feels like returning to unfinished business.”
Why the Sequel Stands Out
With atmospheric tension, layered storytelling and commanding performances, Raat Akeli Hai: The Bansal Murders expands the legacy of the original while raising the bar for Indian crime thrillers.
Credits
Director: Honey Trehan
Producers: Ronnie Screwvala, Honey Trehan, Abhishek Chaubey
Associate Producer: Pashan Jal
Written By: Smita Singh
Cast: Nawazuddin Siddiqui, Chitrangada Singh, Rajat Kapoor, Deepti Naval, Ila Arun, Revathy, Akhilendra Mishra, Priyanka Setia, Sanjay Kapoor, Radhika Apte
